काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोजो काय सायको आहे का? ढळढळीत दिसतय की विकीने फसवलं आहे तरी त्या शिवला आरडले. नंतर सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगितले की मुलीला पहायला येणारा मुलगा पळून गेला. Uhoh

पाहण्याचा प्रोग्रॅम आहे हे आधीच कळवलेलं असतं का नातेवाईकांना, सगळं ठरायच्या आधीच. धन्य आहे. अर्थात काही ठिकाणी बघण्याच्या कार्यक्रमाला पण बरेच जण जातात म्हणा.

PracheeS +१. कै चाललेलं ते चाललेलं आज. नशीब वेणू तरी वेळेवर बोलला विकी फ्राॅड आहे ते.

अन्जू ते बघायच्या कार्यक्रमाला बरेच जण तेव्हा जातात, जेव्हा सगळं ठरलेलं असतं.. म्हणजे दोन्हीकडून पसंती असते आणि लग्न ही ठरलेलं असतं.. फक्त ऑफिशीयली ते सगळ्यांना कळायला हवं म्हणून तो बघण्याचा कार्यक्रम करतात.

मोजोसारखं असं अजून सगळं ठरायचय आणि नातेवाईक मंडळींना पण फोन करुन बोभाटा करत नाहीत कोणीच.

ओके निधी, मग ठिक आहे. पण श्रीरामपुरला खुपजण आलेले आमच्या घरमालकांच्या मुलीला बघायला, हे बघितलंय.

Gauri cha baap thaar veda zalay.....evda sagla hounahi police na phone lavat nai ...ani tya shiv la polisat dyala eka payavar ready....

Ani ky tar mhane dabe band kara ...evda chidtoy ki jasa kai gauri ch mage lagli hoti vicky shi lagnala ...swata bhulala te nai disat

Ti gauri evdi thand ka zali ashi ....evdya garmit pan thandi vajli tila pahun Happy
no expressions no reaction...promos madhe tar changli vatli hoti

इतकी निर्बुद्ध सिरियल पाहिली नाही....

काहीही दाखवतात. कलाकार पण कसे काम करतात देव जाणे...

जाताना विकी फक्त दोन बॅग्स घेवून स्कूटरवरून जातो आणि घरातले नळापासून, बनियन चोरी करतो?
अरे काय ! किती चेष्टा कराल स्वतःची.

डारेक्टर कोण आहे? बकवास.......

गौरी खूपच खूनी डोळे टाईप आहे. डोळे एकदम जड, थंड. ती वहीनी तरी बरी अँक्टींग करते.
गौरी फक्त ओरडायचे काम बरं करते. तिचे डोळेच मुळात आकर्षित नाहि आहेत. खूपच थंड. आणि पापण्याना केस पण नाहि आहेत वाटतं, त्यात भयानक डोळ्याचा मेकअप.

हायला आम्ही बरेच चांगले भाव दाखवतो तिच्यापेक्षा...

पण खरेच काहीही.....

दर वेळेला एक व्हिलन असलाच पाहिजे जर दुसर्‍याचे चांगले गुण दाखवायचे असतील तर.....

प्रोमोजमध्ये किती क्युट वाटली गौरी, आता अजिबात वाटत नाही. डोळे अगदी भावहीन.

गौराबाय तुम्हाला इतका चांगला हिरो मिळालाय, उत्तम अभिनय करतो तर गुण नाही वाण तरी लाभूदे हीच इच्छा. लक्ष द्या जरा अभिनयाकडे.

दोन bagsमध्ये टीव्ही, दुनियेभरचे कपडे, घरातलं सर्व समान कसं माववायचं हे ट्रेनिंग घ्यायला हवं विकीकडून, एवढं सगळं घेऊन स्कूटरवरून जायचं. क्या बात है.

सगळ्यात शिव आणि शु गो ने अभिनय छान केला आज. सहा महिन्यापूर्वी हरवलेलं घड्याळ असं आजी आज म्हणते, काल त्या शिववर आळ आला तेव्हा नाही लक्षात आले.

जाताना विकी फक्त दोन बॅग्स घेवून स्कूटरवरून जातो आणि घरातले नळापासून, बनियन चोरी करतो? >>> नैतर काय काहीही अचाट दाखवल होत हे चोरी प्रकरण. त्याने फारफार तर वेणुचे पैसे, गौरीच्या वहीनीने दिलेले पैसे आणि दागिने आणि स्वतःच्या वस्तु इतकच घेउन गेलेल दाखवल असत तरी पुरेस झाल असत. फसवलो गेलो आहोत हे दाखवण्यासाठी बाथरुममधले नळ काय, बनियन काय... बावळट्ट

कालचा एपि महापकाउ होता. मोजो चं सगळ्यांना फोन करणं हास्यास्पद होतं. आधी फक्त घरगुती बोलणी झाली असताना गौरीला कोण नावं ठेवणार होतं? समाज तिला नावं ठेवेल म्हणे? का ही ही.

त्या विकीचा एवढा फ्रॉड उघडकीस आलाय तरी तो मित्र असुनही गौरीला थोडही आश्चर्य वाटु नये? एखादा आश्चर्य वाटल्याचा लूक, एखादा डायलॉग ही नाही? नुसती थंडपणे बघत बसते? डायरेक्टर कोणे रे?
खरंच ती वहिनी तरी हिच्यापेक्शा चांगली अ‍ॅक्टींग करते. निदान डायलॉगप्रमाणे चेहराही बोलतो तिचा.

मोजो, शुगो, अशा सिनियर कलाकारांना तरी हे काहीतरी चुकीचं आहे असं वाटत नाही का? का जसं सांगतोय डायरेक्टर तसं करायचं बस्स असं असतं?

बाकी नळ, वेणुची चड्डी-बनियान वैगेरे बॅगेत मावले असतील आणि टीव्ही वैगेरे त्याने आधीच बाहेर काढला असेल.

आणि त्या शिवला मराठी नाही कळते तर हे एवढे हुशार लोक त्याच्याशी नॉर्मली बोलताना पण मराठीच बोलतात. खासकरुन गॉरीबाय. पण त्याला ओरडताना, शिव्या घालताना पण मराथीतच. अरे त्याला समजु द्या ना तुम्ही काय काय आरोप करताय ते.

बरं हे सगळे लोक स्वतःच्याच घरात असे नुसते उभेच का असतात? बसत नाहीच का? सगळे संवाद उभ्यानेच?

अजय मयेकर आहेत डायरेक्टर. बिनडोकपणाचा कहर चाललाय.

सई परांजपेंच्या 'कथा' मधला लबाड फारुक शेख, सभ्य नासिरौद्दीन शहा, दीप्ती नवलच्या भोळ्या कुटुंबाने फारुक शेखच्या गोड गोड थापांना भुलून तिचे लग्न त्याच्याशी ठरवणे आणि मग त्याने पोबारा करणे फसवूनचा ट्रॅक ढापलाय पण किती मठ्ठ, निर्बुद्धपणे.

खरंतर काल शिव गौरी बरोबर २ वाजता निघाला होता ना office मधून. मग ती लवकर आणि तो घरी रात्री कसा काय पोहोचला? जर तो वेळेत पोहोचला असता तर विकीला चोरी करता आली नसती. नाहीतर असं दाखवायला हवं होतं की तो गौरीला बसस्टॉपवर भेटून परत ऑफिसला गेला.

अरे हो खरंच की! कथा चित्रपटाचा ट्रॅक आहे हा!

पण आता बोअर आहे खरंच. गौरीला अजिबातच अभिनय येत नाही. अमानवी लुक्स देत होती काल शिव आणि मोजोना.

इतर मालिकांमधे स्पश्ट न बोलुन .. गप्प बसुन .. गैरसम्ज वाढवतात ..

इथे शिव ला मराठी येत नाही त्याचा वापर करुन गैर समज वाढवत आहेत आणि .. १० मिनिटात होउ शकणारा संवाद १० तास चालवतात..

तो बिचारा म्हणतोय मला काही समजत नाहिये तुम्ही मराठी मधे बोलत आहात.. पण कोणी ऐकत्च नाही..

मुंबई मधे हिंदी बोलणे किती कॉमन आहे..

गौरीला अजिबातच अभिनय येत नाही. अमानवी लुक्स देत होती काल शिव आणि मोजोना. >>> गौरीला ह्या शिरेलीतुन काढून राखेत घालावे काय Proud

हो ना! काल ते बाथरूमचे नळ वगैरे फारच अतीच होतं Angry

पण मो.जो.चं फोनाफोनी करणं मला अचाट नाही वाटलं. विकी पळून गेलाय हे कळताच त्याच्यासारख्या माणसाला जे फ्रस्ट्रेशन येईल त्याचा निचरा म्हणून ते फोनकॉल असा मी अर्थ लावला. डबे बंदची ऑर्डर हा पण त्याचाच भाग.

गौरीचे डोळे थंडही नाहीत... नजरेत थंडपणा आणणे यालाही स्किल लागतं... हिची नजर मख्ख आहे !!!

(पुढे गौरी लग्न करून बनारसला गेली की 'कथानकाची गरज' म्हणून तिथे विकी परत अवतरू शकतो!! Proud )

मोजोंनी शुगोला दिलेल्या एक्स्प्लनेशनमध्ये नातेवाईकांपर्यंत ही बातमी तिसर्‍या कुणाकडुन चुकीच्या मार्गाने जाण्यापेक्षा आपणच कळवलेल बर.

अरे पण आधी मुलगा बघितल्याचं, बोलणी सुरु असल्याचं कुणालातरी माहितीये का? उगीच काय तिसर्‍याकडुन कळेल वैगेरे?

एकवेळ मुलगा पहातायत, बोलणी सुरु आहेत हे आधी कळणार नाही सस्मित, पण मुलगा पळुन गेला हि बातमी आधी जाईल आणि त्या अनुषंगाने कळेल की गौरीच्या लग्नाची बोलणी सुरु होती.

गवरी!

ती इतक्या खुनशी नजरेने बघत होती की कोणत्याही क्षणी अमानवी हसायला लागेल असं वाटत होतं.
हिच्यापेक्षा म्हणजे कारेदुरावामधला सुयश टिळक अभिनयसम्राट म्हणावा लागेल!

विकी मालिकेतून गायब झाल्यावर मालिका बघाविशी वाटेल असं वाटलं होतं पण आता गवरीच बोअर करते.

पण बाकी काही का असेना शिव मात्र बराच सेन्सिबल बोलतो/वागतो ह्या सिरेलीत.
एपिसोडस मात्र भराभर पुढे सरकताहेत हे ही नसे थोडके.

शिव टवका आहे हे नक्की Wink

गॉरी/गवरी/गौरी जी कुणी असेल ती, तिला आधी थोड हसायला शिकायची नितांत गरज आहे. जिथे तिथे सुतकी भाव असतात तिच्या चेहर्‍यावर. जरा तरी नवथर्/शामळु/प्रेमाळलेली दाखवायला काय हरकत आहे??

अगं शुभे ती सुन्न का काय झाली असेल Wink इकडे शिव आवड्तोय हे नीट लक्षात येत नाहीये, तिकडे बाबा लग्न ठरताहेत, तो ही मुलगा पळुन गेलाय...... काय करावे काही सुचेना अशी अवस्था आहे ना.......समझा करो Lol

Pages