काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये मालकाला जावं लागत नाही, हल्ली तर फार कडक आहेतना नियम. त्या वहिनीला सर्व हातात मिळते, तिला काहीच संशय येत नाही. स्कूटरची चावी देताना कोणी बघत कसं नाही.

घाबरले ना मी! ती गौरीची किंचाळी ऐकून..स्मित ????

काय झाले काही अप्डेट द्या ना

चांगला असेल कालचा एपी तर ऑनलाईन पाहिन म्हणते

ते नवीन घर प्रकरण फारच बाळबोध झालंय... किमान त्या साईटवर जाऊन पाहून येऊ असंही त्या माठ निशाला वाटत नाही?!
आणि दागिने गहाण ठेवायला देताना असे दुकान मांडल्यासारखे पेट्या मांडून काय दाखवते ती! मान्य की लॉकरमधून काढून थेट हॉटेलमधे आली, पण ...

आणि स्कूटरची किल्ली विकीला देताना जराही आवाज होत नाही? चांगला किल्ल्यांचा घोस असतो की तो! आणि मो.जो. तिथेच उभा असतो त्या वेळी...

या सगळ्या गोंधळात गौरीचे थंड डोळे Uhoh

केपी Biggrin

विकी आपले जुने कपडे अनाथाश्रमातील 'मुलांना' देणारे आहे असे सांगतो. बाबा इतके आनंदी होतात की 'मोजो खुष हुआ' एवढा डायलॉगच ऐकायचा बाकी होता. अरे माठा, विकीच्या साईझची मुलं कुठल्या अनाथाश्रमात असतात? त्या मितुच्या चेहर्‍यावरचे भाव बदलतात तरी पण गौरी अपचन झाल्यासारखीच भाव घेऊन वावरते.

आज बहुधा जोर का झटका बसणार आहे असं दिसतंय.

शिव आवडतोय की नाही.. घरच्यांच बरोबर म्हणायच की शिव बरोबर आहे ,...शिव असं करुच शकत नाही असं बंड करायच की नाही... हे डायरेक्टरने गौरीला अजुन क्लिअर केले नाहिये अस वाटत तिच्याकडुन बघुन..

नक्की काय करु?? असे एक्स्प्रेशन्स वाटतात मला तर

नक्की काय करु???>>>>>>> जे काही तोंडाने बोलशील त्याचे काहीतरी भाव डोळ्यात दिसतील असं जरा बघ म्हणावं. निदान रागाने बोलतेस तर राग, चिडणं, कंफुजन वै वै. बाकी काही नाही केलंस तरी चालेल.

ही सीरीयल सेम हो सू मी या घ च्या टेम्प्लेटवर चालली आहे. तिथं आपटेबरोबर लग्न ठरवलंनी इथे विकी. तिथे शशिकला बडबडायची इथं आज्जी. आता हे लग्न मोडणार, मग शिव गौरीची प्रेम कथा सुरू होणार मग त्यांचं लग्न मग लग्नांतरचे सासर प्रॉब्लेम्स. मग यांची भांडणं.... दोन तीन वर्षांची निश्चिंती.

ती नायिका किती माठ डोळ्यांनी वावरते आणि इतके माठ डोळे असतानाही तिचा आय मेकप इतका का डार्क केलाय. ते डोळे जरासुद्धा उत्साही वाटत नाहीत. क्लोजपमध्ये तर तिचे डोळे गॉथिक स्टाईलचे आणि आपसूकच हाय वाटतात. टेलीव्हीजन आणि सिनेमासाथी वेगळे मेकप लागतात हे या लोकांना माहित नस्तं का? नवीन मुलींपेक्षा छान खर अवाटणारा मेकप सीनीयर अभिनेत्रींचा असतो. शुभांगी गोखले, चिन्मयी सुमीत, स्पृहा जोशी यांचे मेकप खरंच व्यवस्थित दिसतात, मुख्य म्हणजे प्रसंगानुरूप असतात.

नैतं कै.
बसस्टॉपवर शिवला "तु असं का वागतोयस? मी काय केलंय? वैगेरे बोलत होती पण डोळे चेहरा अगदी अनोळखी माणसाकडे बघतोय तसा.
खरंच थोडे भाव चेहृयाव्र दिसणं एवढं कठीण आहे काय? आपण सहज कुणाशी बोलतो तर आपले चेहर्‍याचे एक्सप्रेशन्स किती बदलत असतात. ते तर सोडा. नुसतं कुणी गंमतीने, रागाने, प्रेमाने बघितलं तरी ते डोळ्यातुन कळतं.
शिवचा राग, हसणं वैगेरे त्याच्या डोळ्यात्नही दिसते. त्यामाने गॉरी सहज वाटत नाहीये.

ह्ह्म्म्म ती आता २३-२४ वर्षांची नक्कीच नसेल. नवीन मुलींमध्ये मग अगदी प्राजक्ता(माळी) किंवा पूजा (सावंत) चालली असती.

पुर्वा गोखले मोठी दिसली असती शिवपेक्षा. पुर्वा गोखले भाग्यविधाता आणि झीच्या एका सिरीयलमधे होती सुबोध भावे हिरो होता.

पुजा सावंत छान, हाईट चांगली आहे तिची. प्राजक्ता नसती शोभली. ती आदित्यचीच मोठी बहीण वाटायची. स्वरदा थिगळे शोभली असती. हाईटपण छान आहे तिची.

स्वरदा, पूजा सावंत, स्पृहा जोशी, मनवा नाईक, सुरुची आडारकर, अनुजा गोखले - या सर्व गुणी अभिनेत्रींना सोडून हा सायली नामक ठोकळा का निवडला कळत नाही.

स्वरदा, पूजा सावंत, स्पृहा जोशी, मनवा नाईक, सुरुची आडारकर, अनुजा गोखले, प्राजक्ता माळी, कुलवधु ह्या सगळ्य्य मला वाटतं त्याच्यापेक्शा मोठ्याच दिसतील Happy
आणि जी आहे तिलाच सुधरवायचं बघु आता Happy

स्वरदा नाही दिसणार मोठी, तशीपण ती वयाने लहान आहे.

असो ते काय आपलं ऐकणार आहेत का? तिचा अभिनय सुधारुदे, तिला थोडा वेळ देऊया.

स्वरदाचा अभिनयपण सुरुवातीला कमीच वाटायचा, नंतर मात्र तिचा ग्राफ सॉलीड उंचावला.

गॉरी छान आहे. फक्त डोळे आणि चेहरा बोलका करावा तिने. आणि ते नंदिनीने मेकपचं तंत्र सांगितलंय ते बघावं. बस. बाकी गोड आहे हो मुलगी. आपल्या शिवला शोभेल अशी. Happy

गॉरी छान आहे. फक्त डोळे आणि चेहरा बोलका करावा तिने. आणि ते नंदिनीने मेकपचं तंत्र सांगितलंय ते बघावं. बस. बाकी गोड आहे हो मुलगी. आपल्या शिवला शोभेल अशी. स्मित:>>>>>

बरोबर

आज झीवर खाली स्क्रोल होता.. विकीमुळे येणार शिव गौरीच्या मैत्रीत वितुष्ट. आज रात्री ९ वाजता.
बहुतेक विकी परत येईल आज. आणि काहीतरी प्रॉब्लेम झाल्याने आईबाबा आले नाहीत असं फेकेल.
नह्ह्ह्ह्ह्ह्ही.. मला पुन्हा त्या विकीचं तोंड नाही बघायचं.

अर्रर्र नको यायला तो विकी परत. किती दळण विकी प्रकरण, बास की आता. तो परत आला तर मी नाही बघणार. तो गेला की बघेन.

झी वाल्याना नवीन भाग उलटुन गेला तरी मागच्या लाईनी स्क्रोलत आणायची सवय आहे. उद्या म्हाळसा आणी बानुची गळाभेट झाली तरी ते खाली कॅप्शन टाकतील "" बानु हेगडी प्रधानाना भेटल्याचे कळल्यावर म्हाळसा काय करेल!""

Pages