शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आय , मी अन मायसेल्फ़ चालु आहे.
>>>
शाहरूख आणि मी, आमच्या व्यक्तीमत्वात साम्य असले तरी आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत.

हा धागा केदारचा आहे म्हणुन मत व्यक्त करतेय, शाहरुख चा राग येत नाही पण त्याच्यात नसलेले कलागुण शोधुन त्याला 'म.हा.न" कॅटेगरित ठेवुन त्याच्या तारस्वरात कर्कस्श आरत्या गाणार्‍या त्याच्या सगळ्या भक्तगणाचा मात्र नक्किच राग येतो.
माझ्यामते शाखा प्रचन्ड हुशार्, हजरजबाबी, उत्तम डोक असलेला पण खुप्च लिमिटेड अभिनयक्षमता असलेला एक अहकारी नट (अभिनेता म्हणवत नाही त्याला) आहे ज्याला अवास्तव महव्त देवुन मिडियानेच जास्त मोठ केलय.

शाहरूख खान, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर हे आवडण्याची शक्यता अत्यंत कमी असलेले नट आहेत. त्यांची तारीफ करून इथला एक जण (नाव घेत नाही, उगाच फूटेज खायला वाव) जाणुनबुजून लोकांना उकसवत असतो. त्यामुळे लोक चिडून जाऊन त्यांच्यावर हल्ला करतात आणि याचे काम होते. याला जे नकारात्मक लिहायचे असते ते लोकांकडून वदवून घेतो आणु खुंटा मजबूत करायचा म्हणून अधूनमधून मुद्दामून लोकांच्या दृष्टीने जे दर्जेदार आहे त्याला नांवे ठेवत असतो.
अनुल्लेख करावा.

शाहरूख खान, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर हे आवडण्याची शक्यता अत्यंत कमी असलेले नट आहेत
>>>>>
सई स्वप्निल यांचे नाव या यादीत असणे समजू शकतो. कारण मराठीतील ग्लॅमरस कलाकारांना डाऊनमार्केट समजायची आपल्याकडे एक पदधत असते. पण बॉलीवूडचा किंग खान शाहरूख, सुपर्रस्टार ऑफ द मिलेनियम, या देशातील बिगेस्ट ब्राण्ड, मोठ्या मोठ्या प्रॉडक्टसच्या दर दुसरया जाहीरातीत दिसणारा चेहरा लोकप्रिय नाही हे ऐकून माझा ऑनलाईन मृत्यू झाला आहे !

कमल हसन हा रंगरंगोटी कलाकार आहे असे ज्याचे मत आहे त्याचा ऑनलाईन मृत्यू झाला काय आणि... कि पर्क पैंदा ?
असे सन्माननीय भोसरीकर नियमित रस्त्यात पिंका टाकत फिरत असतात.

अभिनेता म्हणवत नाही त्याला
<<<

शाहरूख एक महान अभिनेता आहे

असे खुद्द शाहरूखही म्हणत नसेल

पण तो एक महान सुपर्रस्टार आहे

हे कोणी नाकारतही नसेल

{{{ बॉलीवूडचा किंग खान शाहरूख, सुपर्रस्टार ऑफ द मिलेनियम, या देशातील बिगेस्ट ब्राण्ड, मोठ्या मोठ्या प्रॉडक्टसच्या दर दुसरया जाहीरातीत दिसणारा चेहरा लोकप्रिय नाही हे ऐकून माझा ऑनलाईन मृत्यू झाला आहे ! }}}

बॉलीवूडचा किंग, सुपर्रस्टार ऑफ द मिलेनियम, या देशातील बिगेस्ट ब्राण्ड ह्या आकड्यांत न मोजता येणार्‍या बाबी आहेत त्यामुळे ते तुम्ही शाहरुखला बहाल करा नाही तर राजपाल यादवला कशालाच नाकारले जाऊ शकत नाही अथवा सिद्धही केले जाऊ शकत नाही पण दर दुसरया जाहीरातीत दिसणारा चेहरा ही बाब मात्र आकडेवारीने सिद्ध करता येण्याजोगी आहे आणि ही आकडेवारी नक्कीच शाहरुखकडे दिशानिर्देश करीत नाही. अर्थातच हे नाव म्हणजे अमिताभ बच्चन. आता यातही गोम म्हणजे मोठ्या मोठ्या प्रॉडक्टसच्या दर दुसरया जाहीरातीत दिसणारा अशी मेख मारुन ठेवली आहे. म्हणजे अमिताभच्या जाहिराती जास्त दाखविल्या तर त्या मोठ्या मोठ्या प्रॉडक्ट्सच्या नाही हे सांगायची सोय आहेच. पण प्रॉडक्ट मोठे की लहान यावर जाहिरातींचा दर ठरत नाही. प्राईम टाईम मध्ये दाखविल्या जाणार्‍या जाहिरातींना प्रदर्शित करण्याकरिता सारख्याच दराने पैसे मोजावे लागतात मग ती बनियनची जाहिरात असो की बामची की ह्युंदै कारची. उलट मी तर म्हणेन आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डची कार तशीही तिच्या दर्जामुळे विकली जातेच. कोणी ओळखत नाही अशा चड्डी बनियनला अथवा चमेलीच्या तेलाला ब्रॅण्डपण प्राप्त करुन देणे जास्त अवघड आहे जे केवळ अमिताभच आपल्या प्रचंड अभिनयक्षमतेच्या आणि अफाट लोकप्रियतेच्या जोरावर करु शकतो.

Published: Jul 17, 2018

Bollywood actors Salman Khan and Akshay Kumar (for the second successive year) have made it to the ‘World’s 100 highest-paid entertainers', released by Forbes on Tuesday. Another popular superstar Shah Rukh Khan – who was ranked 65th in the Forbes 2017 list – has dropped out of this year’s Forbes lis

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 29 November, 2018 - 13:50 >>>
बिपीन चंन्द्र कुठे दगडावर डोकं आपटुन घेताय..?

हा धागा केदारचा आहे म्हणुन मत व्यक्त करतेय .... धन्यवाद प्राजक्ता.

माझ्यामते शाखा प्रचन्ड हुशार्, हजरजबाबी, उत्तम डोक असलेला पण खुप्च लिमिटेड अभिनयक्षमता असलेला एक अहकारी नट >> फेअर इनफ Happy
मी फक्त खूपच शब्द काढेन Wink

खरे तर संधी सुधा या तेला चा खप जॅकी भिडू मूळे जितका वाढला तितका शाखा व बच्चन एकत्रीत कुठल्याच प्रॉडक्ट चा वाढला नसावा. तेव्हा त्या बाबतीत भिडू अव्वल ठरतो. Proud
बाकी शाखा चा कुणालाही राग वगैरे येत नाही. but he is at poosition where you may not like him but you can't ignore him..
For Bachchan: You Like him so can't ignore him..
For all others: you can ignore if you don't like...
Proud

काय सांगता मानवजी - बघा नक्कीच. का स्वप्ना याना लेख लिहायची विनंती करू - पिक्चर अभी बाकी मध्ये ☺️

मी पण नाही पाहिला डीडीएलजे. तो जबरदस्तीने मराठा मंदीरला चालवला म्हणून पहावासा वाटला नाही.
शाहरूख खानचा कुछ कुछ होता है पाहिला तेव्हां त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असं वाटत होतं. सतत त्रिफळाचूर्ण किंवा कायमचूर्ण घे असं सांगावंसं वाटत होतं. पण पठ्ठ्या अधून मधून फ्रेश दिसायचा. तसा तो सुरूवातीला कुंदन शहा, अजीज मिर्झा या जोडीच्या उत्तम सिनेमांमुळे प्रकाशात आला. हे सिनेमे उत्तम असल्याने शाहरूखचे सिनेमे चांगले असतात म्हणून लोकांनी त्याला चालवून घ्यायला सुरूवात केली.

राजेंद्रकुमार आणि मनोजकुमार हे दोघेही दिलीपकुमारचे भ्रष्ट झेरॉक्स आणि शाहरूखखान हा मनोजकुमार आणि राजेंद्रकुमारचा भ्रष्ट अवतार. कुंदन शाह च्या टीव्ही मालिकांमुळेच तो लोकांच्या ओळखीचा झाला आणि दिवाना मधे लोकांनी त्याला मोठ्या पडद्यावर जातोहेस तर जा म्हणून पाठिंबा दिला. पण त्याचे स्वतःच्याच प्रेमात पडणारे हातवारे आणि बकरीसारखे बें बे जाम खटकायचं. लाडात येऊन रडण काय किंवा सर्दी झाल्यासारखे दु:खाने ग्लिसरीनयुक्त अश्रू ढाळणे काय.... तो कायमच दयेस पात्र राहीला.

पुढे त्याला मोठी बॅनर्स मिळाली. रडा किती रडताय ते आणि रडता रडता किती हसताय ते अशा पद्धतीच्या नाटकी सिनेमात शाहरूख सारखे अमानवीय कलाकारच सूट झाले असते. भावनेला या सिनेमांनी इतका हात घातला की लवकरच ते शिळे झाले. म्हणूनच आता शाहरूख वेड्यासारखे प्रयोग करत सुटलाय. अजिज मिर्झा, कुंदन शाह, करण जोहर, यश चोप्रा आणि फरहा खान सोडले तर शाखा नेहमीच तोंडावर आपटलेला आहे. चांगला सिनेमा किंवा मोठे बॅनर याच्या जोरावर ओव्हरहाईप्ड असलेला एक अत्यंत सामान्य वकूबाचा अभिनेता आहे तो.

त्याचा राग कोण आणि का करणार ?

Richest actor in india

John Abraham: Net Worth $55 Million. ...
Ranbir Kapoor: Net Worth $66 Million. ...
Dharmendra: Net Worth $70 Million. ...
Akshay Kumar: Net Worth $180 Million. ...
Aamir Khan: $185 Million. ...
Salman Khan: 200$ Million. ...
Amitabh Bachchan: Net Worth $402 Million. ...
1.Shah Rukh Khan: Net Worth 600$ Million.

The 20 Richest Actors of Modern Times, Some of Which Turned Out to Be Dark Horses
Jerry Seinfeld — $860 million. © eastnews.
Shah Rukh Khan — $550 million. ...
Tom Cruise — $480 million. ...
Tom Hanks — $470 million. ...
Johnny Depp — $440 million. ...
Mel Gibson — $400 million. ...
Tyler Perry — $400 million. ...
Jack Nicholson — $400 million. ...

@ धागा.. ईतका राग का येतो?

काही लोकांमध्ये पैसेवाल्यांचा राग करण्याची एक टेण्डेन्सी असते... हे एक कारण असू शकते

@ धागा.. ईतका राग का येतो?

काही लोकांमध्ये पैसेवाल्यांचा राग करण्याची एक टेण्डेन्सी असते... हे एक कारण असू शकते

@ धागा.. ईतका राग का येतो?

काही लोकांमध्ये पैसेवाल्यांचा राग करण्याची एक टेण्डेन्सी असते... हे एक कारण असू शकते

जुन्या लोकांना शाखा आवडत नाही. पण 1985 नंतर जन्मलेल्या लोकांना तो आवडतो असे मला वाटते, कारण त्याचे सिनेमे बघत बघत आम्ही मोठे झालो.
म्हणजे एक काळ नक्की असेल जेंव्हा शाखा आवडत होता, सध्या कदाचित नसेलही आवडत.

काही लोकांची आवडच दर्जाहीन गोष्टींवर पोसलेली असू शकते त्यामुळे दर्जाशी त्यांचं फटकून राहणं असू शकतं. जसं अत्यंत हास्यास्पद अभिनय असलेला शाहरूखखान लोकांना पैसे कमावण्यासाठी आवडणे आणि दर्जेदार अभिनेते त्यांना न आवडणे. चालायचंच. इथेच काही लोकांची झाकली मूठही त्यामुळे खाक झाली...

इतके दिवस धागा दिसत होता समोर पण उघडून बघितला नव्हता.

आता उघडून पाहिले आणि वर दिलवाले चित्रपट व शाहरुख एकत्र पाहून गोंधळ झाला. अजय देवगणचा दिलवाले अजूनही आठवतोय. याचा अर्थ शाहरुखचा आल्या आल्या झोपलेला दिसतोय.....

मी पण नाही पाहिला डीडीएलजे. तो जबरदस्तीने मराठा मंदीरला चालवला म्हणून पहावासा वाटला नाही.
शाहरूख खानचा कुछ कुछ होता है पाहिला तेव्हां त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असं वाटत होतं. सतत त्रिफळाचूर्ण किंवा कायमचूर्ण घे असं सांगावंसं वाटत होतं. पण पठ्ठ्या अधून मधून फ्रेश दिसायचा. तसा तो सुरूवातीला कुंदन शहा, अजीज मिर्झा या जोडीच्या उत्तम सिनेमांमुळे प्रकाशात आला. हे सिनेमे उत्तम असल्याने शाहरूखचे सिनेमे चांगले असतात म्हणून लोकांनी त्याला चालवून घ्यायला सुरूवात केली.

राजेंद्रकुमार आणि मनोजकुमार हे दोघेही दिलीपकुमारचे भ्रष्ट झेरॉक्स आणि शाहरूखखान हा मनोजकुमार आणि राजेंद्रकुमारचा भ्रष्ट अवतार. कुंदन शाह च्या टीव्ही मालिकांमुळेच तो लोकांच्या ओळखीचा झाला आणि दिवाना मधे लोकांनी त्याला मोठ्या पडद्यावर जातोहेस तर जा म्हणून पाठिंबा दिला. पण त्याचे स्वतःच्याच प्रेमात पडणारे हातवारे आणि बकरीसारखे बें बे जाम खटकायचं. लाडात येऊन रडण काय किंवा सर्दी झाल्यासारखे दु:खाने ग्लिसरीनयुक्त अश्रू ढाळणे काय.... तो कायमच दयेस पात्र राहीला.

पुढे त्याला मोठी बॅनर्स मिळाली. रडा किती रडताय ते आणि रडता रडता किती हसताय ते अशा पद्धतीच्या नाटकी सिनेमात शाहरूख सारखे अमानवीय कलाकारच सूट झाले असते. भावनेला या सिनेमांनी इतका हात घातला की लवकरच ते शिळे झाले. म्हणूनच आता शाहरूख वेड्यासारखे प्रयोग करत सुटलाय. अजिज मिर्झा, कुंदन शाह, करण जोहर, यश चोप्रा आणि फरहा खान सोडले तर शाखा नेहमीच तोंडावर आपटलेला आहे. चांगला सिनेमा किंवा मोठे बॅनर याच्या जोरावर ओव्हरहाईप्ड असलेला एक अत्यंत सामान्य वकूबाचा अभिनेता आहे तो.

त्याचा राग कोण आणि का करणार ?

>> हे आहे टिपिकल उदाहरण उगाच राग राग करण्याच . कितीही नाही म्हटल तरी Happy

पण त्याचे स्वतःच्याच प्रेमात पडणारे हातवारे आणि बकरीसारखे बें बे जाम खटकायचं. लाडात येऊन रडण काय किंवा सर्दी झाल्यासारखे दु:खाने ग्लिसरीनयुक्त अश्रू ढाळणे काय.... तो कायमच दयेस पात्र राहीला. >> बर

आता शाहरूख वेड्यासारखे प्रयोग करत सुटलाय. अजिज मिर्झा, कुंदन शाह, करण जोहर, यश चोप्रा आणि फरहा खान सोडले तर शाखा नेहमीच तोंडावर आपटलेला आहे. चांगला सिनेमा किंवा मोठे बॅनर याच्या जोरावर ओव्हरहाईप्ड असलेला एक अत्यंत सामान्य वकूबाचा अभिनेता आहे तो.
>> स्वदेस, डिअर जिंदगी , बाजीगर , चक दे तुम्ही पाहिले नसतीलच. आणि असे जर ५ ६ डायरेक्टर वजा केले तर अमिताभ पासून देव आनंद पर्यंत कुणाचे चांगले सिनेमे उरतील Happy

पुर्वी दहा मधील नऊ सिनेमात तरी शा.खा.चे नाव 'राहुल' असायचे. मात्र गेल्या ४-५ वर्षात रिलीज झालेल्या त्याच्या एकाही चित्रपटात त्याचे नाव 'राहुल' असल्याचे पाहिले नाही. बहुतेक 'राहुल' या नावाचा त्यानेही फारच धसका घेतलेला दिसतोय.

याचा अर्थ शाहरुखचा आल्या आल्या झोपलेला दिसतोय.....

Submitted by साधना on 30 November, 2018 - 09:26

>>>>

येस्स्सस...!

मी तर शाहरूखचा दिलवाले पाहिलाही नाही आणि टीव्हीवर लागला तरी पाहणार नाही. ट्रेलरवरूनच रद्दड चित्रपट वाटत होता.
पण त्यातील एक गाणे, धूप से निकलके, त्यात शाहरूखने धमाल केलेली. आजही आमच्याकडे हिट आहे. पडद्यावर रोमान्स करावा तर शाहरूखनेच. त्याने आपले हात पसरले की धावत जाऊन त्याला मिठी मारायचा मोह झालाच पाहिजे. पण आपल्याकडे प्यार ईश्क मोहोब्बत या गोष्टींना दुय्यम समजले जाते. ईतर सामाजिक संदेश महान पण प्रेमाचा संदेश लहान समजला जातो.

Pages