शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर बिपीनचंद्र यांनीही मस्त पोस्ट टाकली आहे. त्यांनीही ती ईथे टाकली तर सर्व आरोपांचे आधीच खंडन होईल

असो,
खालील प्रश्नाचे उत्तर वर पेंडींग दिसतेय....
मिडीयाने शाहरूखलाच का मोठे केले?
यात मिडीयाचा काय फायदा?

धन्यवाद ऋन्मेष,

ही त्या धाग्यावरची पोस्ट -

https://www.maayboli.com/node/68450?page=8

{{{ आज २६/ ११ नंतर आपण पाकीस्तानी टिमशी खेळणे बंद केले आहे, तरीही शाहरुखने माहीरा खानला घेतलेच ना? त्याच्याबद्दल तर चक्कार शब्द नाही.}}}

या कारणासाठी जर शाहरुख आवडत नसेल तर कित्येक लोकांना नावडते बनवावे लागेल. सलमानच्या बजरंगी भाईजान मध्ये तो पाकिस्तानात जातो, तिथल्या लोकांचे मन जिंकतो. ती वाचा बसलेली मुलगी त्याला शेवटी मामा म्हणते. सलमानच्याच एक था टाईगर मध्ये तो पाकिस्तानी एजंटसोबत लग्न करतो आणि त्याकरिता चक्क भारताच्या रॉशीही शत्रुत्व पत्करतो. टाईगर जिंदा है मध्ये तर भारत आणि पाकिस्तान एकत्र येऊन तालिबान्यांशी लढतात आणि शेवटी त्या बसमधून विजयी फेरी काढताना दोन्ही देशांचे झेंडे सोबतच फडकवलेले दिसतात हा सीन पब्लिकने थिएअटरमध्ये किती डोक्यावर घेतलाये ते पाहा. आपली दुश्मनी पाकिस्तानच्या आम जनतेशी नसून पाकिस्तानात (व भारतातही) असलेल्या दहशतवादी गटांशी आहे हे आपल्याला कधी समजणार?

कधी कधी वाटतं की आपण खरंच असहिष्णू झालो आहोत की काय? बेबी हा भारतीय सिनेमा पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय गुप्तचरांनी केलेल्या यशस्वी लढ्याबद्दल होता. यात पाकिस्तान्यांचे नकारात्मक चित्रण आहे आणि याच सिनेमात भारतीय गुप्तचरांना मदत करणार्‍या एजंटची भूमिका पाकिस्तानी लोकप्रिय कलाकार मिकाल झुल्फिकार याने रंगविली आहे. ही भूमिका केल्याबद्दल त्याला कुठल्याही पाकिस्तानी संघटनेने दूषणे दिलेली नाहीत. समजा असाच एखादा पाकिस्तानी सिनेमा निघाला ज्यात भारतीयांची प्रतिमा नकारात्मक असेल आणि त्यात एखाद्या भारतीय लोकप्रिय कलाकाराने पाकिस्तानला सपोर्ट करणारे महत्त्वाचे पात्र रंगविले तर आपण भारतीय ते सहन करु का? त्यातही तो कलाकार शाहरुख असेल तर आपली प्रतिक्रिया किती टोकाची राहील?

शाहरुख त्याच्या आचरटपणामुळे, इतरांपेक्षा आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असा डंका सतत वाजविण्यामुळे डोक्यात जातो हे खरे असले तरीही त्याच्या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असण्याबद्दल त्याचा आणि पर्यायाने पाकिस्तानचा द्वेष करणे चूकीचे आहे.

अदनान सामीचे उदाहरण घ्या. मला नाही वाटत त्याची भारतनिष्ठा कुठल्याही भारतीयापेक्षा कमी असेल. त्याच्या एका कॉन्सर्टनंतर आपल्या एका वृत्तपत्राने फायनली वूई गॉट द आन्सर टू पाकिस्तान्स नूसरत अली फतेह अली खान असे उद्गार त्याच्याविषयी छापले तेव्हा ते मुलाखतीत सांगताना त्याचे डोळे आनंदाने भरुन आले होते आणि तो प्रसंग अजिबात नाटकी वाटला नव्हता.

असो. पाकिस्तान व बांग्लादेश हे भारताचेच भाग होते गेल्या सत्तर वर्षांपूर्वी आणि त्यांच्यासोबत आपले कनेक्षन इतक्या सहजी तुटू शकत नाही. अंतूले एकदा मुलाखतीत म्हणाले होते की भारत पाकिस्तान व बांग्लादेश एकत्र व्हावेत व आपण या एकत्रित राष्ट्राचे सुलतान (होय हाच शब्द त्यांनी वापरला होता, पंतप्रधान नव्हे) व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. तिन्ही देश एकत्र करण्याच्या त्यांच्या इच्छेकरिता मी नक्कीच त्यांच्या बाजूने मत दिले असते आणि त्यांच्या त्या सुलतानपदालाही पाठिंबा दिला असता. असो. आपण आता हे त्यांचे स्वप्न पुरे करु शकत नसलो तरीही त्यांच्या कलाकारांचा द्वेष करणे योग्य नव्हे. भारतात त्यांच्या कामाचे कितीतरी चाहते आहेत. इथे मायबोलीवरच पाकिस्तानच्या टिवी सिरीयल्सचे धागे वाचून मी हम टीव्हीवरचे कितीतरी उत्तम कार्यक्रम यूट्यूबवर पाहिले आहेत. भारतीय सिनेमा आणि मालिकांत तिकडचे लोक (जसे की जावेद शेख) काम करतात तेव्हा ते प्रोजेक्ट अजुनच आकर्षक बनतात. मावरा हुकेन ने तर तिच्या सिनेमात दक्षिण भारतीय कर्मठ ब्राह्मण कन्येचे पात्र इतके हुबेहुब वठविले की ती पाकिस्तानी असल्याचा जराही संशय आला नव्हता.

तेव्हा पाकिस्तानी कलाकारांना घेतल्यावरुन शाहरुखला नावे ठेवण्याची गरज नाही. (हे कारण त्याला प्रचंड सहानुभूतीच प्राप्त करुन देईल) त्याच्या डोक्यात जाण्याविषयी इतर अनेक कारणे आहेत आणि रोज त्यात नव्याने भर पडेल याची तजवीज तो स्वतःच त्याच्या वागण्यातून करुन देत असतो.
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 29 December, 2018 - 18:01

क्या विघ्नेश ही ऋन्मेष है?

https://www.quora.com/Why-is-Shahrukh-a-nobody-in-front-of-Aamir

या पानावरचे Vignesh B, Ek Pagal Cinema Watcher. या आयडीचे उत्तर वाचा.

May be Shahrukh's movies aren't breathtaking as Recent Aamir's films (except Dhoom 3 - which was one of the worst films Bollywood had ever made). SRK is no way lesser than aamir. Infact, his popularity in a Worldwide scale is just too much to match. There can never be anyone infront of SRK in the Overseas area. He is way much popular than any actor in the country. Maybe, he hasn't done a film like 3Idiots or a PK, due to which Aamir has gone a little ahead. Just think of the period when it was only SRK who dominated like no one. It was during 1998-2008, 10 long years! There was no Salman, no Aamir. It was just SRK.
The most consistent Actor who has seldom given flops in his last 17 years.

The guy who rose from a very Normal Background, without any Godfathers in the Industry, he has come a long long way that it is even un-imaginable right now. Respect for that!

Sample this:

* He hasn't had a flop film except Paheli/Billu (where he only had a cameo) and Swades (a great film which unfortunately flopped big time) since the last 17 years now.. and still counting.
* The second most Richest Actor in the World.
* Aamir and Salman may have a great Fan following, but the young kids to the Elderly people, everybody is really fond of SRK.
* He has had 226 ­nominations across popular Bollywood awards, and has won 207 of them. He won the best actor award 29 times.
* He never had a Godfather in the Industry, came from a very humble background, lost his parents at a very early age, struggled and Conquered BOLLYWOOD like no body.
* Shahrukh has been hailed as one of the most secular celebrities of Bollywood. Both of his children, Aryan and Suhana have been taught to revere the co-existence of Ganpati and Allah in the Khan household. How exceptionally they are being brought up resonates in the fact that when Shahrukh had undergone a critical neck surgery Aryan had gone to a temple and said an Islamic prayer so that his father my recover faster. Khan is a staunch believer of Islam but celebrates all the religious festivals including, Diwali and Christmas along with Eid every year. There’s a Lakshmi puja organized both at home and his office and each year a Christmas tree is revered, though the children have been heard favoring Christmas over everything else. In the prayer room at Khan’s place Holy Quran is placed along with the Hindu Idols and the kids pray to both simultaneously.
* Shahrukh was the first celebrity to enter the world of advertising for the consumer goods, thus earning certain respectability for the celebrities in this field. He has endorsed a range of products like Pepsi, Hyundai Santro, Smoodles, Mayur Suitings, Cinthol, Bagpiper, Clinic All-Clear, Omega, Sunfeast, Dish TV etc. He has been least bothered by all the criticism his advertisements, or social appearances which he does for money, get. Being utterly unapologetic to all the claims he has that , In the world of entertainment, not getting the recognition you deserve is worse that dying of over-exposure. It is better to burn out than to rust out.

The King, the Badshah, the Baazigar, the Don -- what else should we call superstar Shah Rukh Khan who still continues to rule over billions of hearts worldwide.

And finally, there may be many SRK haters. One thing for them,
"You love him or hate him, you just can't IGNORE him".

हे वाचून ऋन्मेसभायची आठवण होते का नाय?

अतनी अंग्रेजी तो मेरे बाप को भी नही आती Happy

पण खतरर्रनाक !
ही पोस्ट कॉपीपेस्ट करून व्हॉटसपप वर फिरवतो.
आणि हे विघ्नेशभाय मराठी असतील तर त्यांना माबोवर बोलवा....

?
खरंच? सिंथॉलच्या जाहिरातीत विनोद खन्नाला पाहिलंय. अमीर खानने पेप्सीची जाहिरात ऐश्वर्या राय आणि महिमा चौधरीसोबत केलेली तोवर शाहरुख स्टार झाला नव्हता. ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली नव्हती.
लक्सच्या जाहिराती स्टार अभिनेत्री अनेक दशकं करताहेत. लक्सची जाहिरात करणारा पहिला पुरुष अभिनेता शाहरुख असेल कदाचित.

मलाही ते पटले नाही.
काहीतरी वेगळा मतितार्थ असावा.
कदाचित एखादे ठराविक कॉन्ट्रेक्ट करणारा पहिला असावा..
कदाचित प्रतिष्ठा मिळवून दिली असावी.
अन्यथा अमिताभ मिळेल त्या पडेल जाहीरातीत काम करतो म्हणूनही हसणारे लोकं आहे या जगात..

लक्सची जाहिरात करणारा पहिला पुरुष अभिनेता शाहरुख असेल कदाचित.
Submitted by भरत. on 31 December, 2018 - 06:48

प्रत्येक अभिनेता हा पुरुषच असावा असं माझं लॉजिक सांगतं. भरतवाक्यामागचं लॉजिक (?) काही वेगळं असल्यास कल्पना नाही.

This may not be directly related to the topic, however, in response to and in support of the post
"Submitted by बिपीन चन्द्र हर... on 29 December, 2018 - 18:01"

Dan Ariely is an economist specializing in behavioral economics

http://danariely.com/

The best advise he has ever received

"It was when I was a Ph.D. student interviewing for my first academic job. I had a few offers, and one of my advisers suggested that I pick the department most different from where I had studied, in order to force myself to learn new things. I did, and I learned a lot over the next 10 years. Generally, I think it is good advice to think about such choices not as the immediate next step but in terms of how they will help us to develop in the long run."

प्रत्येक अभिनेता हा पुरुषच असावा असं माझं लॉजिक सांगतं.
>>>>

का?
अभिनय ही फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे का?

मग काय अभिनेत्री, लेखिका, कवयित्री, गायिका, नायिका, खलनायिका इत्यादी शब्द डिक्शनरीतून हद्दपार करायचेत का? नवरा - बायको , भाऊ - बहीण आणि आई - बाबा हे शब्द तरी कशाला हवेत मग? जोडीदार, भावंड, पालक असेच शब्द वापरावेत का?

ही - हा, तो - ती, त्या - ते, आला गेला - आली - गेली वगैरे राहीलच की. सगळ्यांनाच हे, ते, आलं गेलं म्हणावं लागेल.
मी गाडीत बसलं, माझं जोडीदार पण बसलं, गाडी सुटलं. पुढल्या स्टेशनला माझं भावंडं आलं, ते विचारलं मी डबा आणलं, तू आणलं का?
श्या! काहीतरीच!

https://en.oxforddictionaries.com/writing-help/the-language-of-gender
मानव, तुमचा प्रश्न बरोबर आहे. इंग्रजीत क्रियापदे लिंगाप्रमाणे बदलत नाहीत, त्यामुळे तिथे विचित्र वाटत नाही.
पण शक्य तिथे लिंगनिरपेक्ष भाषा वापरायला हवी.
जोदीदार, पालक, भावंड अगदी बरोबर.

हो. इंग्रजी तुलनेत बऱ्यापैकी लिंगनिरपेक्ष आहे. नवीन प्रोफेशन्स जसे की डॉक्टर, इंजिनिअर, सायंटिस्ट, ऍस्ट्रॉनॉट वगैरे लिंगनिरपेक्ष आहेत. स्वतःबद्दल लिहिताना पूर्णपणे लिंगनिरपेक्ष लिहिण्याचा वाव आहे.

मराठीत व्यक्ती शब्द वापरून लिंगनिरपेक्ष लिहीता येईल.

शाहरुख खानच पाकिस्तान प्रेम त्याचा मामा आयएसआय अधिकारी असणे ज्यांना माहीत झाला ते लोक त्याचा तिरस्कार करायला लागले.
आझाद हिंद सेनेत त्याचा अजोबा शाह नवाज ने केलेली फितुरी

अज्ञातवासी धागा स्थलांतरीत करा _/\_

तुम्ही या गोंधळ घालणारया लोकांसाठी जो नवीन धागा काढला तो फ्लॉप गेला. हे कोणीच तिथे फिरकत नाहीए. यांना ईथेच गोंधळ घालायचा आहे. आणि मला झिरो चित्रपटाबद्दल बोलायचे आहे, जाणून घ्यायचे आहे. हळूहळू २०० कोटी जवळ पिक्चर पोहोचत आहे...

आझाद हिण्द सेनेत मुसलमान का घेतले होते?>>>>>>>Firing Cat

इतके हास्यास्पद विधान कुठल्या राजकीय नेत्याने सुद्धा कधी केले नसेल.

बर्रं
तरी उत्तर असेल त्या प्रश्नाला?
बातमीची लिंक वगैरे...

अतीपरीचयात अवज्ञा ! ऋन्मेष, तू शाहरुखचा खरा फॅन असशील तर खरच त्याची बदनामी करणे थांबव. मी तुला आधीच सांगीतले आहे की आम्हाला पण अमिताभ, अमिर, अक्षय वगैरे मंडळी आवडतात, पण आम्ही जिथे तिथे त्यांना मध्ये घुसवत नाही. लोकांना शाहरुखचा राग येणार ही नाही पण तुझ्यामुळे तो बर्‍याच लोकांचा नावडता होईल. बाकी तुझी मर्जी !!

पण तुझ्यामुळे तो बर्‍याच लोकांचा नावडता होईल. >>>रश्मी, मी हे बरेच्दा इथेच माबोवर वाचलंय. पण ह्याचं लॉजिक काय ते खरंच मला कळत नाही.
एखादा नट नटी आपल्याला आवडते तर आवडते ना. इतर कुणी त्याच्या बद्दल सतत बोलत राहण्याने तो / ती नावडते कसे काय होउ शकतात?
हा फारतर सतत त्यांच्याबद्दल बोलणारा डोक्यात जाऊ शकतो. Wink ते ही मी इथेच बघितलंय Lol

एखादा नट नटी आपल्याला आवडते तर आवडते ना. इतर कुणी त्याच्या बद्दल सतत बोलत राहण्याने तो / ती नावडते कसे काय होउ शकतात?
>>>>>>

लोकांना शाहरूखचा राग का येतो या धाग्यात विचारलेल्या प्रश्नाचे खरे उत्तर ऋन्मेषमुळे असे आहे Happy

पण आम्ही जिथे तिथे त्यांना मध्ये घुसवत नाही.
>>>>
खालील धागे
१. झिरो परीक्षण
२. लोकांना शाहरूखचा राग का येतो
३. अंबानीच्या लग्नात अमिताभ वाढपी - त्या लग्नात शाहरूखही होता. किंबहुना तोच ट्रेण्ड सेटर आहे.

या सध्याच्या तीनही हॉट धाग्यात शाहरूखला कसे वगळायचे तुम्हीच सांगा.

किंबहुना सिंबाच्या परीक्षणात लोकांनीच आणि धागाकर्त्यानेही झिरो व शाहरूखला आणून तुलना सुरू केली.
कारण लोकांना शाहरूखबद्दल बोलायला आवडते.
आणि धागाकर्त्यालाही ठाऊक असते की आपल्याला टीआरपी ईथूनच मिळणार आहे.

अरे हो. हा एक जुना धागा

शाहरुख खान आणि अमेरीकन इमिग्रेशन - तुम्हाला काय वाटते?

कोणीतरी वर काढला लिंक देत. तिथे जरासे लिहिले.

Pages