शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा अजून एक धागा

गोंधळ धागा - झिरो का बघितला वा का बघितला नाही?

यावर मात्र मी लिहायचा मोह आवरला.
परीणामी धागा फ्लॉप गेला. याबद्दल माझे आभारच माना.

यातला एकही धागा माझा स्वत:चा नाहीये.
तुम्ही लोकंच शाहरूखवर चर्चेला एवढे धागे काढा आणि मग बोला की जिथे तिथे शाहरूखच दिसतोय Happy

तब्येत जास्तच बिघडलीय. केदार जाधव यांच्या धाग्यावर अज्ञातवासींना आवाहन>>>>>
क्षणभर मीच गोंधळलो, धागा स्थलांतरित करण्याचे राईट webmaster ने माझ्याकडे दिलेत की काय?
जी कमेंट वाचून नंतर आईशपथ पडेस्तोवर हसलो!

कोणाला शाहरुख चा राग येवो अगर न येवो. तो आवडो अगर न आवडो. पण तो चर्चेत असतो. आज तर शाखा चक्क चंद्रावर जमीन खरीदणाऱ्या लोकांच्या यादीत आहे अशी बातमी आली आहे:

शाहरूख खानसह अनेकांनी केली चंद्रावर जमीन खरेदी!
http://www.lokmat.com/pune/shah-rukh-khan-and-many-people-buy-land-moon/

धाग्याचा प्रासंगिक विषय आता इतिहास झाला असे समजूयात.
शाहरूख खानचा अभिनय कधीच आवडला नाही. नाटकी असा शब्द वापरला तर त्याचा अपमान होईल अशी ओव्हरअ‍ॅक्टींग तो करतो. पूर्वी मधून भांड पाडणारा गोविंदा जेव्हां कुणाचा खून झाल्यावर बदल्याची घोषणा करताना खालचा जाड ओठ थरथरवत मानेला बारीक झटका देत अभिनय करायचा ते जसे खटकायचे अगदी तसेच शाहरूखचा दु:खी प्रसंगातला नाटकी अभिनय खटकतो. डोळ्यात गिल्सरीन, चेहरा थरथरवणे, गोविंदाप्रमाणेच ओठांचा चंबू करायचा, फक्त त्याचा चेहरा देखणा असल्याने नाक फेंदारलेला गोविंदा जसा असह्य व्हायचा तितका हा होत नाही. डोळ्यात कितीही ग्लिसरीन ओतलं तरी त्यात भाव उमटायचे नाहीत. रोमॅण्टिक सीनमधे त्याचे मॅनरिजम्स खुलतात. पण अनेकदा तो विचार करून करून एक्स्प्रेशन्स देतो असे वाटते. अलिकडे वय झाल्यावर या सगळ्या गोष्टी तो हातखंडा करून दाखवतो.

क्३जी मधे अमिताभ प्रत्येक फ्रेम मधे त्याच्या पेक्षा उजवा वाटतो. अर्थात तो चित्रपटच भंगार आहे. ओढून ताणून आणलेले रडण्याचे प्रसंग अजिबातच भावुक करत नाहीत. घ्या रडून, घ्या हसून असे पिक्चर्स शाहरूख खानासाठीच आले. बेगडी अभिनय आणि बेगडी सिनेमांनी पर्यायच ठेवला नसल्याने पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणत त्यांना सहन केले. टीव्हीवर तरी काय बिनडोक मालिका चालू असत.

तिन्ही खानात आमीर खान हा उत्तम अभिनेता आहे. सलमान खानने आपण अभिनय करतो असा दावा कधीही केलेला नाही. त्यामुळे त्याच्या इमानदारीला गुण द्यावेसे वाटतात.

अभिनेता जितका बेगडी असेल तितकेच त्याचे भक्तही भंपक असतात असे एक निरीक्षण आहे. कितपत बरोबर हे माहिती नाही. बरोबर असेल तर ते सिद्धही होईल.

यूह कॅन लव्ह हिम
यूह कॅन हेट हिम
बट यूह कॅन नॉट इग्नोर शाहरूख खान....

हेच एक अंतिम सत्य आहे !

जब तक सूरज चांद रहेगा... छे हो.. मी तर म्हणतो ते ही दगडमाती वायूचे गोळे आहेत.. आज आहेत तर उद्या नाही. पण शाहरूख खान हे नाव कायम चर्चेत राहणार Happy

वर्षानुवर्षे सिद्ध होतेय
हजार वर्षांनी या धाग्यावर या.. शाहरूखचा राग लोभ द्वेष मत्सर प्रेम मोह माया ममता सारे काही तेव्हाही तेव्हाचे मायबोलीलर करत असतीलच Happy

आताचेच घ्या... धागा ईतक्या वर्षांनी वर आला. वीस पंचवीस पोस्ट पडतील. पुन्हा खाली जाईल.. आणखी काही महिन्यांनी वर यायला.. आणि हे जगाच्या अंतापर्यंत चालूच राहणार ..
कारण भारतात प्रामुख्याने बोलायचे चार विषय आहेत..
१) क्रिकेट
२) चित्रपट
३) राजकारण
आणि चौथा शाहरूख Happy

शाहरूखला अभिनय येत नाही याच्याशी मात्र सहमत आहे. काही लोकांसाठी त्यांची स्टाईल म्हणजेच अभिनय असतो. शाहरूख त्या कॅटेगरीतील आहे. त्याची स्टाईल मात्र वेड लावणारी आहे.
पण मला त्याहून जास्त आश्चर्य याचे वाटते की ना त्याची बॉडीशॉडी सलमानसारखी होती ना आमीरसारखा चॉकलेट बॉय लूक होता..
तरीही तो किंग ऑफ रोमान्स कसा बनला?
कोणाकडे आहे का ऊत्तर??

तरीही तो किंग ऑफ रोमान्स कसा बनला? >> त्याची खळी

१) क्रिकेट
२) चित्रपट
३) राजकारण
आणि चौथा शाहरूख Happy>>>
हे असही लिहीता येईल
मुलभूत गरजा
१) अन्न
२) वस्त्र
३) निवारा
आणि चौथा शाहरूख

पर्रफेक्ट !
फक्त हा क्रम उलटसुलटही असू शकतो.
म्हणजे मी थिएटरमध्ये शाहरूखच्या चित्रपटांच्यावेळी ईंटरवलमध्ये लोकांना पॉपकॉर्न न खाता ते पैसे वाचवून त्यात शाहरूखचाच अजून एक मूवी बघताना पाहिले आहे. त्यामुळे कित्येकांसाठी शाहरूखचा नंबर अन्नाच्याही आधी लागतो हे मान्य करावेच लागेल.

तरीही तो किंग ऑफ रोमान्स कसा बनला?
कोणाकडे आहे का ऊत्तर??
>> याचे उत्तर गँग्स ऑफ वासेपुर मध्ये रामाधीर सिंग ने दिलेलं आहे... आठवत नसेल तर सांगतो....

>>तरीही तो किंग ऑफ रोमान्स कसा बनला?<<
मागे सुद्दा मी लिहिलं होतं. शाखा हा नविन पिढीचा राजेंद्र कुमार आहे. हे दोघे हि वान्नबी दिलिप कुमार होते, पण दिलिप कुमारच्या नखाची देखील सर यांना नाहि. हे दोघे तरले/टिकले ते गाण्यांमुळे. अभिनयाच्या बाबतीत दोघांचीहि बोंब आहे...

शी.. शाहरुख ची कम्पॅरिझन राजेंद्र आणि दिलीप बरोबर केल्याचा निषेध.... असले हजारो दिलीप आणि राजू येत राहतील... शाह, एकच...

राजेंद्र कुमार मधे मला नेहमी डोक्यावर चाट मसाला घेऊन भेळ विकणारा एक बिझनेस मॅन दिसला आहे. जर दिलीपकुमार नसता तर त्याने वडे तळले असते असे शिरीष कणेकर म्हणतात. पण आमच्या बिरादरीत त्यांना आम्ही घेतले नसते. शाहरूख खान रस्त्यावर मदारीचा खेळ करण्यासाठी सर्वात जास्त लायक होता. त्यात सुद्धा लाऊड अभिनय करावा लागतो. काही वेळा वेळच वाईट येते. मग बंदा रूपयाच्या जागी चवन्नीछाप पण चालून जातो.

देवदास मधले हे दिलीप कुमार आणि शाहरूख खानचे दृश्य
https://www.youtube.com/watch?v=XA25Qpgl_KM

बादशहा का काय सिनेमात जिम कॅरीची पेट डिटेक्टिव्ह ची फार फार वाइट कॉपी केली आहे शाखाने. एक नाचरं भावलं लागतं ते आहे आपलं.

ये ले लुन्मेश. ये ये. च्लप्स तुमि जा आता जोपायला. मी पन जातो वदे तलायला.
वेल मिलेल तेवा येईन. तोपल्यन्त कोन काई नाई बोलत शाहलुक कानाला.

याचे उत्तर गँग्स ऑफ वासेपुर मध्ये रामाधीर सिंग ने दिलेलं आहे... आठवत नसेल तर सांगतो....
>>>
च्रप्स सांगा प्लीज,
मी पाहिला नाही तो पिक्चर

असे शिरीष कणेकर म्हणतात...>> विषय संपला. कणेकर जे म्हणतात त्यातील ८० टक्के वाक्यांना मायनस वन फॅक्टर लावाला.. ती वाक्ये कुठली हे पुरेसे कणेकर वाचले की अनुभवाने कळते.

शाहरुख मध्ये खूप एनर्जी दिसायची >>> हो, उत्साहाचा झरा. हे त्याच्या यशामागचे एक कारण आहे.

शाहरूखच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिणारे रागात असतात हे गृहीतक चुकीचे आहे.
जसे की मला पर्सनली शाहरूखवर टिका होताना दिसली की मी आनंदून जातो.
कारण मला त्याचे कौतुक करायला आवडते, ती संधी मला त्याचे टिकाकार देतात.

बाकी त्याला तावातावाने समर्थन करत भांडणार्‍या चाहत्यांची गरजही नाही. कमाल आहे तो माणूस. सगळे टिकेचे विष पचवेल आणि आणखी वीस वर्षे सुपर्रस्टार म्हणून या बॉलीवूडवर राज्य करेल Happy

आणखी वीस वर्षे सुपर्रस्टार म्हणून या बॉलीवूडवर राज्य करेल हॅप्पी >>>> हे विधान अभक्ताने केले असते तर ठीक आहे. पण निस्सीम चाहता / अनुयायी / भक्ताने शाखा २० वर्षांनंतर सुपरस्टार राहणार नाही असे म्हणणे अत्यंत निराशाजनक आणि धक्कादायक आहे. ५० वर्षांपेक्षा कमीचा दावा करणे हे बोगस भक्त असल्याचे अस्सल लक्षण आहे.
बाकिच्यांनी त्याचा जमाना संपला आहे हे सत्य स्विकारले आहे.

मुलभूत गरजा
१) अन्न
२) वस्त्र
३) निवारा
आणि चौथा शाहरूख

पुस्तकात वाचलेल्या चौथ्या मुलभुत गरजेबद्दल....मैथुनाला शारुकने रिप्लेस केलेले पाहुन डोळे भरुन आले (ग्लिसरीनशिवाय)

पण निस्सीम चाहता / अनुयायी / भक्ताने शाखा २० वर्षांनंतर सुपरस्टार राहणार नाही असे म्हणणे अत्यंत निराशाजनक आणि धक्कादायक आहे.
>>>>>>

मुळात मी यातला काही नाहीये. हे आधीही मी सिद्ध केले आहे. पण माझ्यावर हा आरोप करणारे तिथे फिरकायला तयार नाहीत.
तुम्ही विडा उचला.
या ईथे Happy

https://www.maayboli.com/node/66805

मैथुनाला शारुकने रिप्लेस केलेले पाहुन डोळे भरुन आले (ग्लिसरीनशिवाय) >>>> अमिताभला रिप्लेस केले, मिथुनचे काय मध्येच?

Pages