शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याचा जमाना जरी सम्पला असला तरी तो आजही तितकाच आवडतो खुप जनाना आणि मलाही. चक दे, परदेस, स्वदेस, डी डी एल जे मध्ये त्याचा अभिनय दिसला नाही का?

त्याचा जमाना जरी सम्पला असला तरी तो आजही तितकाच आवडतो खुप जनाना
>>>>>>>
कारण काम करून ठेवलेय ते अमर आहे.
माझ्या घरातच आहे सात वर्षांची मुलगी जिला पिक्चर बघायचा असल्यास टीव्ही चालू करते आणि शाहरूख खान मूवी बोलून सर्च करते.
डीडीएलजे, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है, कभी खुशी कभी गम, बादशाह, डुप्लिकेट, चमत्कार, चलते चलते, चक दे, कभी अलविदा ना केहना, कभी हा कभी ना, येस बॉस ते चेन्नई एक्स्प्रेस... असे कैक पिक्चर तिचे बघून झालेत. सुपरहिरो मूवीजची आवड आहे म्हणून तो रावन (RA-One) शोधत होतो पण सापडत नव्हता. कुठे सापडेल कोणाला काही आयड्या?

अमिताभला रिप्लेस केले, मिथुनचे काय मध्येच?
सर प्लीजच राहु द्या.
असपण प्रतिसादात तुम्ही कोणतीही स्मायली टाकलेली नाही. कारण माझ्या या प्रतिसादानंतर तुम्हाला "मी ते गंमतीने म्हटले" असं म्हणायचीही सोय उरली नाही.

या ईथे >>> गुन्हा जिथे झाला तिथेच तपास सुरू आहे.
>>>

ईटस ओके सर, आजवर मला शाहरूखप्रेमावरून भक्त बोलणारी एकही व्यक्ती त्या धाग्याचे आमंत्रण देऊन आलेली नाही. कारण तिथे आले की विषय संपतोच.
त्यापेक्षा आपण ईथेच एंजॉय करूया Happy

अमिताभला रिप्लेस केले, मिथुनचे काय मध्येच?
सर प्लीजच राहु द्या.
>>>>

तुमचा पॉईट ऑफ व्यूह तर सांगा. कारण आजवर मला शाहरूखची तुलना मिथुनदाशी करणारा कोणी भेटला नाहीये. नक्की काय निकष लावला आहे?

तो धागा फ्लॉप झाला आहे. हिट होण्यासाठी मदत मागितली असती तर नक्कीच विचार केला असता. धाले सोडून अन्य दोनच ओरिजिनल आयडींनी हजेरी लावली आहे तिथे.

कारण आजवर मला शाहरूखची तुलना मिथुनदाशी करणारा कोणी भेटला नाहीये. नक्की काय निकष लावला आहे?
शारुक प्रेमाची झापडं काढुन शब्द नीट वाचत चला.

शाहरूखची तुलना मिथुनदाशी करणारा कोणी भेटला नाहीये. नक्की काय निकष लावला आहे? >> स्वस्तमिथुनी रसना घसरगुंडी

किती तो निरागसपणाचा आव, उबग आणणारा >>> याचमुळे शाखा चा राग येतो. के२एच२ मधे ४५ वर्षाचा घोडा असून त्याला प्रेम. मैत्री आणि लफडं यातला फरक कळत नसतो. गावाला शाळेतल्या पोरांना माहिती असतं ते.

शारुक प्रेमाची झापडं काढुन शब्द नीट वाचत चला.
>>>

शब्द तर शारुक हा देखील तुम्ही चुकीचाच लिहीत आहात Happy

के२एच२ मधे ४५ वर्षाचा घोडा असून त्याला प्रेम. मैत्री आणि लफडं यातला फरक कळत नसतो. गावाला शाळेतल्या पोरांना माहिती असतं ते.
>>>

के२एच२ मधे ??? हा कुठला पिक्चर? कुठल्या पिक्चरमध्ये तो ४५ वर्षांचा घोडा दाखवला आहे. प्लीज फॅक्ट योग्य द्या, शाहरूखशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत Happy

खिक Happy Happy
>>>>

शाहरूखसारखे हसायचा प्रयत्न Wink

शब्द तर शारुक हा देखील तुम्ही चुकीचाच लिहीत आहात Happy
दुकानावर तपास केला लाल रंगाचे सगळे डब्बे कोणीतरी घाउक घेवुन गेलाय म्हणे. ( मी पण खिक्क)

वर्षांचा घोडा दाखवला आहे. प्लीज फॅक्ट योग्य द्या, शाहरूखशी आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत >> चार पायाच्या कष्टाळू प्राण्याची उपमा द्यायला नको असा विचार केला होता. हवे तर मनातल्या मनात प्राणी बदलून घ्यावा.

शांत माणूस, अहो ४५ वर्षांचा कुठल्या के२एच२ चित्रपटात दाखवला आहे? घोडा तर तो अरबी आहे, त्यात शंका नाही Happy

शाखाप्रेमी असून माहिती नाही? म्हणजे तुम्ही शाखाप्रेमी नाहीत. त्याची बदनामी व्हावी म्हणूनच त्याची बाजू वेडगळपणा करत घेता.

अमिताभला रिप्लेस केले, मिथुनचे काय मध्येच? >>>>
Lol Lol आईने अकबरीचा वारसा जिवंत आहे LOL

मलापण आईने अकबरी काय प्रकरण आहे माहीत झालंय. म्हणजे मी जुना मायबोलीकर झालो का आता? की ज्यांनी ती चॅट लाईव्ह वाचली तेच जुने मायबोलीकर आहेत? मला वाटतंय ज्यांनी ते लाईव्ह वाचलं ते खूप जुने मायबोलीकर, ज्यांना माहीत आहे ते थोडेफार जुने आणि ज्यांना माहीत नाही ते नया है वह आहेत.

शाखाप्रेमी असून माहिती नाही? म्हणजे तुम्ही शाखाप्रेमी नाहीत.
>>>>>>

माझ्या माहीतीत नाही म्हणूनच तर खात्रीने सांगतोय असे काही आहेच नाही.
आणा आणि मला खोटे पाडा Happy

म्हणजे तुम्ही शाखाप्रेमी नाहीत.
>>>>
वर मला शाहरूखचे भक्त म्हणत होता. आता मला शाखाप्रेमीही नाही असे म्हणत आहात. हा काय गोंधळ आहे Happy

सगळ जावुद्या...ना तुम्ही शाहरुखभक्त ना तुम्ही शाहरुखप्रेमी तुम्ही नां माबोचे खर्रेखुर्रे शाहरुख खान आहात....................आणी नां आणी नां थोडे थोडे स्वप्नील जोशी सुद्धा...............(खुश आता).
बाकी तुम्हाला डिवचणारे माबोकर हे "हा हलकटपणा आहे माने" या कॅटॅगरीतले आहेत......माझ्यासकट.

भीषोण आश्चोर्ज्य दादा.....हा ४२० वा प्रतिसाद आहे. (आकडा बघुन हे लिहायला परत आलो)

Pages