पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.aayisrecipes.com/gravy-curry-and-daals/tomato-rasam/ इथली रेसिपी मी फॉलो करते बरेचदा

Rasam Powder:
1/2 cup (30gms approx) coriander seeds
1/8 cup (30gms approx) chana dal
3 tbl spn (30gms approx) red chilli powder
1 tbl spn (10gms approx) pepper (for better result, use white pepper)

Method:
Dry roast coriander seeds, chana dal, pepper till a nice aroma comes out. Switch off the heat and add chilli powder. Keep mixing taking care not to burn anything. Cool to room temperature and grind to a smooth powder. Store in an air tight container.

इथे अजून एक आयडी होता ना दिल्लीत रहाणारा? त्यानी पण लिहिली होती कृती बहुधा. इतक्या वेळा त्यांच्या रेसिपीवर कमेंट देऊन आता मला आयडीच आठवेना Uhoh

मागे माझ्या नणंदेनी रत्नागिरी हून "करदण" नावाचा पदार्थ आणाला होता. खारीक, खोबर, डिंक, बदाम पिस्त्याचे काप अस सगळ घातलेल्या वड्या होत्या. त्यानंतर मागच्या आठवड्यात नरसोबाच्या वाडीला गेलो होतो तिथे करदणच्या वड्या विकायला होत्या त्या घेतल्या. आता घरी करुन बघाव्या असं वाटतय. तर कोणाला त्याची पाककृती माहित असेल तर द्या प्लीज Happy

धन्यवाद रश्मी, बघते यु ट्युबवर Happy उंडे बाईंची रेसिपी पण सोपी आहे करायला. पुन्हा एकदा धन्यवाद

ही ओरिजीनल कर्नाटकी रेसेपीच दिसतेय नावावरुनही. >>> हो कर्नाटकचीच आहे

बेळगाव स्पेशल कुंदा अन करदंत

मला खुप आवडते, पण करदंत खावा तर बेळगावचाच, त्याची तोड कुठेही नाही

जैन पाव भाजी मधे फक्त कांदा लसूण नसतो!>>>

जैन भाज्यांमध्ये जमिनी खाली येणारे काहीही खात नाहीत म्हणे!

जैन भाज्यांमध्ये जमिनी खाली येणारे काहीही खात नाहीत म्हणे! >>> काही जण खातात बटाटे, शेंगदाणे सगळे, फक्त कांदा लसुण खात नाहीत

मला कांदा, लसूण आणि बटाटा न घाल्ता करायची आहे पावभाजी.>> मग कशाला करता? Light 1
पण सीरियसली, का घालायचं नाहीये कांदा लसूण बटाटा?

रावी, जैन रेसिपीजमध्ये बटाट्याऐवजी कच्ची केळी वापरतात. >>> + १०००
माझ्या जैन कलिग्ज कडून ऐकल आहे . आलू पराठा (?) आणि फ्रॅन्की मध्ये ती लोक कच्ची केळी घालतात , बटाट्याच्या ऐवजी .
एकीने सांगितलं , पाभा मध्ये कांद्या एवजी बारिक चिरून कोबी घालतात .

यावरून आठवलं, एकदा बटाटा न घालता बायडीनं पा भा जमवली होती. (येणार्‍या पाहुण्यांना पाभाच हवी होती मायनस बटाटा).
मीरा नी सगळ्या भाज्या कोबी, फ्लॉवर, गाजर, लाल-भोपळा, टोमॅटो सगळं कुकरमध्ये शिजवलं होतं. पुढे नेहेमीप्रमाणे भाजी. चवीला जरा गोडस होती (५%) पण चांगली लागली मुख्य म्हणजे सगळ्यांनी आवडीनं खाल्ली.

बटाट्याऐवजी फ्लॅावर वापरता येईल. भाजी जवळजवळ नेहमीसारखीच लागते. लो कार्ब पाकृमधे बर्याचदा बघितली आहे.

१३ मोठी माणसे आणि २ लहान (११ वर्षाची) मुले एव्हढ्यांसाठी उंदियु बनवायचा आहे. प्लीज भाज्यांचे प्रमाण सांगा. कोण-कोणत्या भाज्या किती किती लागतील?

एक मध्यम आकाराचा माठ/ ५-६ लिटर चा कुकर भरेल एवढी तयार भाजी लागेल. अर्थात बाकी काय काय मेनू आहे त्यावरही ठरेल.

एवढ्या लोकांसाठी, इतर काही प्रकार नसतील तर हाफ साइझ ट्रे भरून उंधियू लागेल ( १०.५ * १२.७५ * २.५ इंच असं इथल्या केटरिंग वाल्यांचं हाफ ट्रे चं माप आहे. )
तेव्हढा व्हॉल्यूम हवा असल्यास मला वाटते दीड एक किलो पापडी, ३० एक बटाटे आणि छोटी वांगी,३०-४० मुठिया, आणि ५-६ तरी केळी लागतील. हे जिन्नस कच्चेच एका ट्रे मधे भरून पहा. मग लागल्यास आणखीन प्रमाण वाढवता येईल.

जर अजून एक दोन प्रकार असतील तर थोडे कमी प्रमाण पण चालेल.

पाऊण ते १ किलो सुरती पापडी (न मिळाल्यास साधी पापडी),प्रत्येकी पाव किलो हरभरे,वाटाणे,तुरीचे दाणे,पावटा.पाउण किलो कोनफळ,अर्धा ते पाऊण किलो छोटी वांगी,५-६ बटाटे, २ -३ कच्ची केळी,एका मोठ्या ओल्या नारळाचे खोबरे,कोथींबीर,ओल्या मिरच्या, २ लिंबू, पाती लसूण ७-८ जुड्या(इकडे प्रत्येक जुडीत ४-५ छोट्या लसूण पाकळ्या असतात).

Pages