पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंडं, यीस्ट, बेकिंग सोडा, मैदा हे मला भितीदायक पदार्थ न घालता यत्ता पहिली दर्जाचे कणीक, मीठ, तेल, दही इतपतच पदार्थ घालून ते करता येतात का? >>> Lol
भटुरे हवेतच कशाला मग? फुलके करा आणि खा. Proud

अहो तेच तर करतो की एरवी! नैतर पुर्‍या करतो. पण भटुरे करून बघायची इच्छा झाली तर तेच करून नकोत का बघायला? Proud

कणीक, मीठ, तेल, दही इतपतच पदार्थ घालून ते करता येतात का? >>>>> हो! येतात. हे सगळे पदार्थ घालून कणीक भिजवायची आणि पुरीपेक्षा मोठ्या आकाराचे गोल लाटून तळायचे आणि खायचे.

भटुर्‍यांच्या मूळ पाककृतीत मैदा असतोच. तोच खायचा नसेल तर आपल्याला हवेत त्या पद्धतीने भटुरे करायचे आणि खायचे. चार लोकांना सांगितलं तर त्यातली तीन लोक तरी हसतातच.
काहीच न बोलता विचारता शोध घ्यायचा असेल तर 'हेल्दी भटुरे' असा गूगल सर्च करावा.

किती कणकेसाठी किती दही? आणि कणीक भिजवताना तेल घालायचं की भिजवून झाल्यावर वरून चोपडायचं?
(यावर माझ्या दोन मैत्रिणींतल्या मतभेदांमुळे मला चिवट्ट भटुरे खावे लागले आहेत म्हणून हे स्टेपही मला महत्त्वाची वाटतेय.)
मळलेली कणीक ओल्या कपड्यात झाकायची का? किती वेळ? की नुसती उपड्या भांड्याखाली झाकायची?

मी आतापर्यंत कधीच मळलेलं पीठ फुगवून करायचे पदार्थ केले नाहीत त्यामुळे अगदीच बेसिकपासून तयारी आहे.

भटुरे ना? दह्यात भिजवून झाकून चांगले होतील. आपण सणावाराला नुसत्या कणकेच्या पुर्‍या करतो त्या चांगल्या होतातच ना?

गव्हाच्या पीठाचे भटुरे करताना माझ्या साबा चार वाट्या पीठाला दिड वाटी दही, थोडं मोहन, पाव वाटी ते अर्धी वाटी रवा घालतात. आणि ही भटुर्‍यांची कणिक तास-दोन तास ओल्या कपड्याने झाकुन ठेवतात. तुमच्याकडे जर आता उन्हाळा जास्त असेल तर दोन तासांऐवजी तासभरच झाकून ठेव कणिक.

अल्पना, गव्हाच्या पिठाचे भटुरे अशी वेगळी पाककृती लिही प्लीज. नंतर कधी शोधायला बरं पडेल.

मग इथे मिळणार्^या होल व्हीट पेस्ट्री फ्लारचे भटुरे वगैरे चांगले होतील का? कधीच भटुरे केले नाहीत पण ढीगभर होल व्हीट पेफ्ला आणलंय म्हणून तुक्का मारून पाहातेय Wink

माझी एक मैत्रीण म्ह्णते आता जी वस्तू तळुनच खायची आहे त्यात आणखी मैदा तळतेय का गहू का पाहतेस? बरोबरच असेल. माझ्या मुलांना पुरी आयटम्स आवडतात त्यामुळे अल्पनाने लिहिली रेसिपी तर आम्ही रिफर करू Happy

वेका, वर दिलीय की तिने रेसिपी. अगदी ऑफिशियली लिहायची वाट कशाला बघा? म्हणजे भटुरे करायचेच असतील तर आहे ह्या रेसिपीत करता येतीलच.

माझी एक मैत्रीण म्ह्णते आता जी वस्तू तळुनच खायची आहे त्यात आणखी मैदा तळतेय का गहू का पाहतेस? >>

मैत्रीण हुशार आहे.
Happy

सायो तिने रेसिपी लिहिली तर आम्ही ती रिफर करू असे म्हणतो आहोत. इथे पुन्हा पुन्हा पाकृवर प्रश्न विचारण्यापेक्षा आय मीन.

काहीवेळा एक एक रेसिपी दोन्दा येते तर आम्ही अल्पनाला एकदा लिहायला सांगतो आहोत Wink Light 1

हो ते ठिके. टोमणाही पोचला पण
>>माझ्या साबा चार वाट्या पीठाला दिड वाटी दही, थोडं मोहन, पाव वाटी ते अर्धी वाटी रवा घालतात. आणि ही भटुर्‍यांची कणिक तास-दोन तास ओल्या कपड्याने झाकुन ठेवतात>> हे तिने सांगितलं की ऑलरेडी. हे झाकून ठेवलेलं लाटून मोठ्या पुर्‍या करून तळायच्या एवढंच फक्त लिहिलेलं नाही तिने. त्याची वाट बघतेयस का? Wink

होओओओओओओओओ Happy

नाहीतर मी पुन्हा विचारेन आणि मंजुडी सोडून कुणालाही आठवणार नाही तेव्हा काय चर्चा झाली होती ते Proud

अवांतर्‍ - टोमणा भाकरी, उपमा आणि बिर्याणीवाल्या समस्त आयडीजना आहे ज्यांच्या डबल आणि ट्रिपल रेसिपीजमुळे आम्हाला सॉलिड रां.वा.उ.का. करावं लागतं. आणि सारखे मासे करणार्^यांना टोमणा पण डब्बल आहे Wink

मी फार मसाले वापरत नाही. पण दालचिनीचे फायदे लक्षात घेता दालचिनी चहात घालतो. पण जर हीच दालचिनी रसभाजीत घालायची असेल तर त्यासोबत अजून कुठले मसाले घातले म्हणजे दालचिनीची उग्र चव कमी होईल? चहात माझ्या इतर घटक असतात जसे की वेलची, आले, ओली हळद, लवंग, कधीकधी केसर सुद्धा त्यामुळे दालचिनीची उग्रता कमी होते. दालचिनीमुळे वजन खरेच हलके होते हा माझा स्वानुभव मला इथे सांगावासा वाटतो. मी जिथे दुपारचे जेवण करतो तिथे कधीकधी राजम्यात फक्त दालचिनी घातली असे प्रामुख्याने जाणवते.

इथे मसालेभाताची सर्वात चांगली पाककृती मधे कुणीतरी लिहिली होती त्या व्यक्तीचे नाव आठवते का कुणाला? किंवा थेट लिंक मिळाली तर आणखी छान होईल.

chole bhature.jpg

हे छोले भटुरे दिल्लीतल्या 'सिता राम दिवान चांद' यांचे फुड फुड चॅनेलवर एकदा बघितलेले तेव्हापासुन खाण्याची जाम इच्छा आहे. यात जे भटुरे आहेत ते पनीर स्टफ्ड केलेले आहेत, छोले सोबत एक हिरवी चटणी पण आहे.
कुणी इथली हि डिश खाल्ली असेल किंवा ही रेसीपी कुणाला माहित असेल तर प्लीज रेसीपी सांगा.

फोटो इंटरनेटवरुन सभार.

लेकीला सकाळी शाळेसाठी जो डबा द्यायचा असतो, त्यात पोळी किन्वा पोळी भाजी कम्पलसरी असते. शनीवार सोडुन. कारण शनीवारी हाफ डे असतो. तिला एक दिवस पीठ पेरुन सि. मिर्ची, एखाद्या दिवशी लोणचे लावुन-जाम लावुन किन्वा लोणी लावुन देते. एक दिवस आलु पराठा असतो.

पण फ्लॉवर, मटार, कोबी, दोडके, तोन्डली अशा भाज्या सोडुन बाकी अशा भाज्या सुचवा, ज्या सकाळच्या गडबडीत पटकन बनतील. मुलगी नेमक्या याच भाज्या खात नाही, खाण्याची कटकट आहे. तिला पनीर, मटार आवडत नाही. दूधी पण खात नाही. पुलाव, मसालेभात तर नाहीच नाही. बाकी घरी आल्यावर वरण- भाताबरोबर भाजी खाते, पण डब्याला काय देऊ? प्लीज जे काय सुचेल ते लिहा, सेव्ह करुन ठेवते.

वांगी + बटाटा पण खात नसणारच. भेंडी आदल्या दिवशी धुवून, पुसून, डेखे काढून ठेवलीत तर तिच्या पुरत्या १०-१२ भेंड्या मोठे तुकडे अथवा लहान तुकडे परतायला फार वेळ लागणर नाही. उकडल्येल्या बटाट्याची भाजी, कांदा पी.पे., टोमॅटो पर्तून, काकडी, टोमॅतो, गाजर कोशिंबीर भाजीऐवजी करून पहा.
गवार्,वालाच्या शेंगा इ. खात असेल तर ते आदल्या रात्री निवडून उकडून ठेवा.

१. गाजर/ दुधी/ कोबी/ पालक/ मेथी/ बीट चिरून/ किसून कणकेत मिसळून पराठे (आवडत असेल तर मुळाही)
२. थालीपिठं आवडत असतील तर कांदा/ कोबी/ मेथी/ सिमला मिर्ची इत्यादी घालून
३. घावन/ आंबोळ्या
४. तोंडली आदल्या दिवशी चिरून ठेवली असेल तर ती भाजीही पटकन होते, पीठ पेरून करता येते.
५. मेथीची पीठ पेरून भाजी होते
६. भाज्या घातलेला उपमा/ सांजा
७. सँडविच
८.ब्रेडचा चिवडा/ फोडणीची पोळी
९. मोड आलेल्या मुगाचे - १. चाट २. पेसरट्टू
१०. इडली पीठाचे - १. इडल्या २. डोसे ३. उत्तप्पे ४. आप्पे
११. अडई
१२. फ्रँकी
१३. साबुदाणा खिचडी/ थालिपीठ/ उपासाचे घावन/ रताळ्याचा कीस/ बटाट्याचा कीस/ फराळी मिसळ

Pages