पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृण्मयी, गोबी मंचुरियनसाठी फुलकोबीचे तुरे ब्लांच करून घ्यायचे. मैदा/कॉर्नफ्लोअर मध्ये मीरेपुड, मीठ आणि हवा असल्यास ठेचलेला लसुण-अद्रक घालून थोडं सरसरीत पीठ भिजवायचं. ते तुरे त्या पीठात घोळवून भज्यांसारखे तळायचे.
हे तळलेले गोबीचे तुरे नंतर मंचुरियन ग्रेव्हीमध्ये घालायचे. बहूतेक वेळा हर्षाने वर दिलेल्या सारखी ड्राय ग्रेव्ही (?) करून त्यात घालून सर्व्ह करतात. मी काही वेळा शेजवान सॉस मध्ये सुद्धा हे तळलेले गोबीचे तुरे घातलेले खाल्लेत.
काही ठिकाणी तेलात आलं-लसूण, कांदा, कांद्याची पात, मिरचीचे तुकडे, थोडा पत्ता कोबी, आणि थोडासा बारिक चिरलेला टॉमॅटो असं सगळं परतून त्यात सोया सॉस, तिखट हवं असल्यास रेड चिली सॉस, थोडं कॉर्न फ्लोअर , मीठ इ.इ. घालून त्यात गोबीचे तळलेले तुरे घालून देतात.

मी या लिंकवरची गोबी मांचोरियन रेस्पी करते.
मॅरिनेशनमध्ये अंडं घालतात हे इथेच पहिल्यांदा पाहिलं.
अंडं चालत असेल तर येणारी चव इंडोचायनीज हॉटेलात मिळणार्‍या गोबी मांचोरियनसारखी होते.
अंडं चालत नसेल तर मिश्रणात एक्स्ट्रा अजिनोमोटो घालून फ्लेवर एनहान्स करावा लागतो.
(नायतर फ्लॉवरच्या तुर्‍यांची भजी खाल्ल्यासारखं लागतं.)


माझ्याकडे फ्रोझन cranberries आहेत. त्यांचे काय करता येईल? कुणाला रेसिपी माहित आहेत का?

प्लीज मद्त करा.

प्रिया

http://www.maayboli.com/node/35281

प्रिया वरच्या लिन्कमध्ये बघा. स्वाती आम्बोळेनी सॉसची कृती दिलीय. पण त्यात फ्रोझन चालत नाही असे लिहीलेय, तरी त्याना विचारुन बघा.

अल्पना, साती, स्वाती२, धन्यवाद!

येत्या आठवड्यात करणार आहे. सगळ्या पाककृती वाचून कुठली वापरायची ते ठरवते. केल्यावर फोटो टाकेन. Happy

Solanum nigrum>> स्वाती२ धन्यवाद ह्याबद्दल. नवीन माहिती मिळाली. तुझे उत्तर बघायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. मी फार कमी येतो ह्या धाग्यावर.

मला दोन प्रश्न विचारायचे आहेत -
१. रेग्युलर गहू आणि खपली गहू यात काय फरक असतो?
२. ज्वारीच्या लाह्या गॅसवर बनवता येतात का? मी मागे ज्वारी भाजताना एक दोन दाणे फुटले होते पन लाही तयार नाही झाली. ज्वारी थोडी ओली करून भाजावी का?

>> ज्वारीच्या लाह्या गॅसवर बनवता येतात का? मी मागे ज्वारी भाजताना एक दोन दाणे फुटले होते पन लाही तयार नाही झाली. ज्वारी थोडी ओली करून भाजावी का?>>
गॅसवर लाह्या बनवता येतात. ज्वारी ओलसर करायची गरज नाही.
https://www.youtube.com/watch?v=3j_jsplQLn4

खपली गहु! स्लर्प! या गव्हाची मस्त खीर बनव नारळ आणी गुळ घालुन. जबरी आहे ती. बाकी कशात वापरतात माहीत नाही.

ज्वारी आणि सध्या किराणामाल वाल्या कडून पॉपकॉर्न मका दोन्ही च्या एकाच पद्धतीने लाह्या बनवते, चांगल्या होतात.
खोल भांड्यात थोडे तेल आणि गरजेपुरते मीठ घालून तापत ठेवणे, मीठ फुललं की ज्वारी/मका(जास्त नाही, एक लेयर तेलाने पूर्ण कव्हर होईल इतका) टाकून हलवून झाकण घालून ठेवणे.लाह्या तडतडल्या की बंद करुन पटकन हळद घालून भांडे झाकण लावूनच गदागदा(मिल्क शेक करताना हलवतो तसे) हलवणे.
गव्हाच्या आणि राजगिर्‍याच्या लाह्या घरी करुन पाहिल्या तो मात्र पूर्ण पोपट झाला होता.

सायीचे दही म्हणजे नक्की काय ? कसे करतात? माझ्याघरी बहिण साय साठवून एक दोन महिन्यांनी डबा भरला की मग ती साय कढवून त्याचे तुप बनवते. सायीचे दही प्रकार कधी पाहिला नाही मी.

हो अनु साय कढवून त्यात लवंग विड्याचे पान शेवटी तळतळून छान मस्त रवेदार तूप बनते.

सायीचे दही मला माहिती नाही.. तेच इथे विचारत आहे.

अनु, बरेच लोक डायरेक्ट सायीचं तूपही कढवतात. तरी एक स्टेप गाळून केलेल्या तुपाला 'तशी' चव, पोत येतं का ते नाही माहीत.

बी, तू सही दही हा धागा वाचून काढ बरं आधी! तिथे बर्‍याच दह्यांवर उहापोह झालेला आहेच.

सही दही धागा वाचुन सायीचे, कवडीचे , म्हशीचे, गायीचे आंबट, गोड, इतकंच काय नासकं दही कसं तयार होतं तेही कळेल. Happy

घरात नाकमुरडे(इन्क्लुंडिंग मी) मेंबरं असतात. साध्या दह्यात साय आलेली चालत नाही.
घरात नाकमुरडे मिक्सर असतात, पूर्ण भरपूर दुधासकट विरजण लावलेल्या सायीचे ते भरपूर लोणी काढून देत नाहीत.
या दोन घटकांमुळे दूध वेगळे, साय वेगळी, विरजण वेगवेगळे इ.इ. व्याप करावे लागतात Happy
मला दही/लोणी/तूप आवडत असले तरी दुधात धुतलेले हात घालून साय काढणे वगैरे कामे प्रचंड ई वाटतात. चमच्याने हाताइतके चांगले निघत नाही.

ग्लोव्हज घालून करावी ही कामं की काय?
साय काढणे यातून वाचण्यासाठी गाय दूध घेतलेले आहे एक दोन महिने,पण त्यात पण पातळशी साय येतेच.हल्ली चांगले लॉ फॅट साय न येणारे दूध देणार्‍या गायी राहिल्याच नाहीत बघा!! Happy

दुधात धुतलेले हात घालून साय काढणे वगैरे कामे प्रचंड ई वाटतात. चमच्याने हाताइतके चांगले निघत नाही.>> ओय अनु... .दुधात हात कशाला घालायला पाहिजे? दुधाच्या भांड्याची साय जमलेली कड चमच्याने किंवा सुरीने नीट कातून घेतली तर सायीचा अख्खा पापुद्रा विनासायास निघतो.
नाहीतर दूध सरळ गाळून घ्यायचं. सायीसाठी वेगळं गाळणं ठेवता येईल. गाळण्यातली साय चमच्याने काढून घेता येईल.

आणि मग तू ताकातलं लोणी कसं काढतेस? Happy

फर्स्ट टाईम साय लेयर नीट असतो तेव्हा चमच्याने निघते..नंतर दुसरे उकळ, तिसरे उकळ मधली निघत नाही.
लोणी हाताने काढणे: (हे काम पण इक्क वाटते, जमले तर आई आल्यावर आऊटसोर्स करते, अगदीच नाईलाज असल्यावर चमच्याने किंवा हाताने.)
मला ही कामं आवडत नाहीत, पण बरीच नावडती कामं करावी लागतात तसे हे पण करते गरज पडल्यास.

Pages