पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वत्थल म्हणजे उन्हात सुकवलेल्या वेगवेगळ्या भाज्या. वेंदेकाई वत्थल, सुंदकाई वत्थल. मनथिकारी वत्थल असे वेगवेगळे प्र्कार असतात. जनरली तमिळ दुकानांमध्ये विकत मिळू शकतील. त्या सुकवलेल्या भाज्या वापरून वत्थल मसाला वगैरे वापरून भाजी ग्रेव्ही टाईप प्रकार करतात किंवा तेलात तळून पापडासारखे खाल्ले जातात.

बी, तिर्फळ वेगळे अन त्रिफळा वेगळे .
त्रिफळा ( चूर्ण ) हे आवळा, हरडे अन अजून एका फळाच्या कोरड्या पावडरीचे मिश्रण असते.

तिर्फळे कोकणी स्वैपाकात वापरली जाता तेंव्हा त्यातल्या बिया काढून , जराशी ठेचून पदार्थात घालतात.

http://www.maayboli.com/node/25383?page=1 इथे फोटो आहे तिर्फळाचा अन बियांचा.

"देशी" गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, प्लस खडीसाखर हे मिश्रण काचेच्या बंद बाटलीत घालून रोज उन्हात ठेवणे. महिन्याभरात गुलकंद होतो.

कच्च्य्या केळाचे उकडून काप करतात् त्यासाठी एक मोठं केळं मिळालं होतं त्यातल्या अर्ध्याचे काल तुपावर परतलेले काप केले. फार कोरडे झाले आणि घास लागत होता. उरल्या अर्ध्या उकडलेल्या भागाचे काप करताना घास लागू नये म्हणून तूप्/तेल भरमसाट न घालता करता येईल अशी काही पाकृ आहे का?

थोडे दिवस दुर्लक्ष आणि मग शिकरण. Happy
पाकृ लिहायची असेल तर मात्र त्या शिकारणीत किमान ओटस घालून किमान अप्पे करावेच लागतील.

हायला सशल कश्शी गं तू. तुला कसं कळलं? सांग मला. अ‍ॅक्च्युअली केळं एवढं जाडं होतं नं (जिएमो मेलं ;)) तर येस्स आय मीन नो...नीट शिजलं नाही आहे. आता आम्ही आमच्या कुकिंग स्कील्सना दोष द्यायच्या ऐवजी केळ्यालाच देणार ना Proud झाकण ठेऊन पाहते Happy

अमित लब्बाड आहेस तू. फार होमवर्क दिलाय. कुणीही ते पेसल शिकरण/ आप्पे केले तर मी प्रतिक्रिया वेत वेळ काढून नक्की देईन.
शॅलो फ्रायची आयड्या पण चांगली आहे.

Thank you all.

मऊ. पक्षी दातांनी नीट चावून खाता येइल असा तीळगूळ वडी/ लाडू कसे बनवतात. ? मजकडे तीळकूट/तीळ भाजलेले शेंग दाणे व गूळ आहे. तसेच सुके खोबरे देखील आहे. अगदी लहान पणी
तिळगुळाच्या़ मऊ वड्या करून त्यावरून सुक्या खोबर्‍याचा कीस पेरत असत. अश्या खाल्लेल्या आठवत आहेत. कडक लाडू ते ही कमर्शिअली बनवलेले बघूनच कंटाळा आला. ह्या वड्यांचे टेक्स्चर व माउथ फील छान असते. अगदीच दगड गोटे आहेत असे वाटत नाही बघा. द्या पाकृ. वीकांताला वेळ आहे अजून. करून बघते.

माझ्याकडे कुळीथाचे पीठ १ पाकीट उरले आहे.मोठ्यांना आनि लहान बाळाला देण्यासाठी काय करता येईल त्याच ???
कुळथाचे पीठल एकदा करुन झाले आहे.

राईस कुकर मध्ये ब्रेड बनवायची कृती हवी आहे.
(कोणते मोड ठेवायचे, किती वेळ ठेवायचे इ.इ.)पर्सनलाइझ्ड(स्वतः प्रयोग केला असल्यास) व्हर्जन हवे आहे, गुगल लिंक नकोत.

अमा, तीळ भाजून पूड करणे + गूळ किसून घेणे. आता दोन्ही अंदाज घेऊन मिक्स करत राहायचं. हातानीच. गूळ जरा मऊ होतो आणि लाडू वळ्ण्याइतपत झालं की लाडू वळायचे. नो कट्कट रेस्पी. ना पाकाची झिगझिग. मऊ लाडू कमी श्रमात तयार.

चौकोनी राईस कुकर मध्ये पाव बनवायच्या पृती इंटरनेट वर आहेत पण मला कुकर कैलासवासी होण्याची भीती वाटते त्यामुळे फर्स्ट हँड अनुभव हवाय.

ग्रेव्ही / सुक्या गोभी मंच्यूरियनची ट्राइड अँड टेस्टेड पाककृती असेल तर कृपया माझ्या विचारपुशीत डकवा. पाककृती तंतोतंत पाळून तयार झालेला पदार्थ चांगला झाला तर खाऊन तृप्त झालेल्यांचा अंतरात्मा तुम्हाला धन्यवाद देईल. Proud

माशांपासून लोणचं कसं बनवतात>>>> माशांचं नाही पण कोलंबीचे लोणचे माहित आहे. १-२ दिवसांत लिहिते.

मृण्मयी, मी सुहानाच्या रेडी मिक्सचे मांचुरियन बनवते. आणि सो फार ज्यांनी खाल्ले त्यांना आवडले आहेत. यामधे दोन पॅकेट्स मिळतात. एकामधे ग्रेवी साठी इन्स्टंट पावडर असते आणि दुसर्‍या पॅकेटमधल्या पावडर मधे ग्रेटेड भाज्या मिक्स करुन त्याचे मांचुरियन बॉल्स बनवतात.

पुर्वी घरी जे मांचुरियन बनवले जायचे त्यामधे, थोडं बेसन, थोडं तांदुळ पीठ आणि जास्त कॉर्न फ्लोअर मिक्स करुन, ग्रेटेड भाज्या घालुन मांचुरियन बॉल्स बनवले जायचे. पण कुक बनवायचा म्हणुन मला जास्त माहित नाही. आता मी इन्स्टंट पावडर्सचेच बनवते.

मी बनवलेले मन्चुरीयन...
बॉल्स साठी : किसलेला कोबी, कांदापात (हिरवी पात फक्त) आलं पेस्ट, थोडी जास्त लसूण पेस्ट, हि. मिरची अगदी बारीक चिरून, आवडत असेल तर अगदी बारीक चिरून गाजर (अगदी चवीपुरतं) थोड मीठ / अजिनोमोटो वापरत असाल तर ते आणि गोळा व्हायला थोड कॉर्नफ्लोर घालुन मळुन घेऊन त्याचे बॉल्स करायचे.. तळून घ्यायचे.
ग्रेव्ही साठी : पाण्यामध्ये थोडं कॉर्नफ्लोर कालवुन घ्यायचं, तेलावर लसूण पेस्ट, आलं पेस्ट घालायची, त्यावर थोडी कांदापात + पातीचा (पांढरा) कांदा, मिरची रिंग्ज, (बारीक गोल कापून मिरची तुकडे) घालुन परतून घ्यायच, त्यावर पाण्यात डायल्युट केलेलं कॉर्नफ्लोर घालायचं ते थोड ट्रान्स्परंट झालं की गॅस बंद करून सोया सॉस, थोडं व्हिनिगर, चिली सॉस, चवीपुरतं मीठ घालून हलवून ठेवून द्यायचं. सर्व करताना सॉस / ग्रेव्ही थोडी गरम करून त्यात बॉल्स घालून द्यायचं.

ड्राय मंचुरीयन हवं असेल तर कढईत तेलावर आलं, लसूण पेस्ट, मिरची रिंग्ज, कांदापात+कांदा घालुन परतायचं, अगदी थोडसं कॉर्नफ्लोर पाणी घालुन आटवायचं आणि सगळे सॉसेस मिक्स करून त्या तयार सॉसच्या कन्सिस्टन्सी च्या ग्रेव्हीत बॉल्स परतून वाढायचे.

मनिमाऊ, हर्षा, मनःपूर्वक धन्यवाद!

असं मन्च्यूरिअन रेडी मिक्स आमच्या गावात मिळतं का ते बघायला हवं.

हर्षा, तुमची पाककृती आवडली. नक्की करून बघेन. तुम्ही वेगळा 'नवीन पाककृतीचा धागा' काढून ही कृती तिथे चिकटवली तर जास्त मायबोलीकरांना करून बघता येईल.

मला 'फ्लावर' (फुलकोबी) मंच्यूरियनची पाककृती हवी आहे.

Pages