पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दही डायव्हर्जन पहिले कोणी काढले इथे?
आम्ही सगळ्यांनी मिळालेला रस्ता पकडून ड्रायव्हिंग चालू केले. Happy

साय साठवुन ठेवणं, विरजणं लावणं आणि त्याचं ताक-लोणी-तुप हे माझं सगळ्यात आवडत काम आहे.

तर या आवडत्या कामाचे थोडे साग्रसंगीत वर्णन---
मी दर बुधवारी लोणी काढुन तुप कढवते.
आम्ही म्हशीच फ़ुल क्रीम दीड लिटर दुध घेतो. उकाडा लावला आहे. सकाळी ११ ला दुध आलं की साबा ते तापवुन ठेवतात, गार झालं की दुपारी फ़्रीजमध्ये. (मग संपेपर्यन्त पुन्हा तापवत नाही, लागेलं तस गरम करुन घ्यायचं) मग रात्री झोपताना मी चमच्याने त्यातली साय एका कॉपर बेसच्या जाड स्टीलच्या पातेल्यात काढते. हे रोज आठवडाभर, हे पातेलं फ़्रीजमधेचं असतं, त्यात पहिल्या दिवशीच १ टीस्पुन विरजण लावते. असं आठवडाभर मग मंगळवारी रात्री ते पातेलं बाहेर काढुन ठेवते. बुधवारी सकाळी त्यात भांडभर फ्रीजचं थंड पाणी घालुन छान घुसळते, ५ मिनटांत लोणी, त्याचा चमच्याने गोळा करुन ताक गंजात ओतुन काढते. मग लोणी धुवुन घेते, लक्ष ठेवुन कढवते. काचेच्या बरणीत गरम असताना तुप स्टीलच्या गाळणीने गाळुन घेते.

अवांतर थोडं -- दर बुधवारी मी लोणी खडीसाखर असा नैवेद्य बाळकृष्णाला दाखवुन अथर्वला ते खायला देते, त्यामुळे हे रुटीन सेट आहे. आणि राहिलेल्या बेरीत पाणी घालुन उकळवुन, गाळुन ते पाणी तिखट शिर्‍याला त्यामुळे दर बुधवारी नाश्ता तिखट शिरा.
माझ्याकडे अशी २ पातेली आहेत, त्यातच सायं साठवणं, लोणी कढवणं हे करते, ताक ओतुन घेते. लोणी काढणे हात तेलकट करुन घेणे हे प्रकार कधीचं केले नाहीत.

आम्ही सगळ्यांनी मिळालेला रस्ता पकडून ड्रायव्हिंग चालू केले. स्मित >>>> मी पण, खुपच मोठी पोस्ट...

वाचली पोस्ट मुग्धाची आधीच. ती सायीच लोणी कस बनवते त्याबद्दल लिहिते आहे. मला सायीच दही कस बनवायच ते हव आहे. सही दही खूप वेळ असला की वाचेन.

साय गोळा करा. १ चमचा तयार दही टाका, हलवा. आणि एक दिवस बाहेर ठेवा.
सायीचं दही होईल. मग ते आंबट होऊ नये म्हणून फ्रिज मध्ये.
(प्रोसेस मे व्हेरी)

ओके. म्हणजे हे असे सायीचे दही बाहेर कुणी विकत नसेलच कारण साय दह्यापुरती काढून ठेवायला एक आठवडा तरी जाईल. तोही कदाचित कमी पडेल जर घरात दुध घेणारे कुणी नसतील तर.

धन्यवाद अनु.

मुग्धा केदार, सेम माझी प्रोसेस. फक्त मी शनिवारी हे उपद्व्याप करते. मला हाताने लोणी काढायला फार आवडतं. मस्त मऊसूत हात होतात. लोणी काढून फ्रीझरमध्ये ठेवलं (खाण्यापुरतं फ्रीझमध्ये) की दोन आठवड्यांनी जमा केलेलं लोणी कढवते. साय जमा करणे, ताक करणे, लोणी जमा करणे आणि तूप कढवणे या सर्वांसाठी सेपरेट आकरामानानुसार भांडी आहेत. त्या भांड्यांना इतर कसलीच कामे देत नाही.

ताक असेल त्या दिवशी थालीपीठ हा मेनू हिट असतो. तूप कढवलं की शिरा. फार कंटाळा आला की दहीपोहे (त्यासाठी सायीचं दही)

मुग्धा शंभर टक्के अनुमोदन. मी पण असच करते पण फक्त रविवारी. पण मी लोणी ठेऊन देते फ्रीज मध्ये आणि महिन्यातुन एकदा ते कढवते. आम्हाला कधीच विकतच तूप आणाव लागत नाही अगदी लाडू वगैरे केले तरी ही . तसही आमच्याकडे विकतच्या तूपाला कोणी हात ही लावणार नाही.

आम्ही पण घरचंच तूप वापरतो, पण साय साठवणे,लोणी हाताने काढणे यासाठी मला सासू आणि आई नामक देवमाणसं वेळोवेळी भेटत आली आहेत. Happy भांड्यात लोणी काढून दिल्यावर तूप कढवणं आणि ते गाळून भरुन ठेवणं ही कामं करते.

बेरी उकळलेलं पाणी तुम्हाला आंबट नाही का लागत? मी तिखटामीठाच्या शिर्‍यात आणि कणीक भिजवताना ते पाणी घालून पाहिलं. शिरा आंबट आणि पोळ्या बेकार ('जुन्या दिसताहेत' असं लेक म्हणाली आणि 'चार दिवसांपुर्वीच्या पोळ्या डब्यात दिल्या' असं नवर्‍याने त्याच्या सा.बा.ना सांगितलं.) झाल्या.
तेव्हापासून मी बेरी काढून वांगी, तोंडली, कारली इत्यादी पंचामृती भाज्यांना नाहीतर रव्याच्या केकमधे वापरते. आणि मग त्या भांड्यात पाणी उकळून ते सिंकमध्ये ओतून टाकते.

तुम्ही मुली फक्त इथे गप्पा करुन सोपा मार्ग निवडता. आम्ही हे करतो आणि ते करतो .. असे करतो आणि तसे करतो. सचित्र पाककृती लिहायला इतक अवघड आणि वेळखाऊ प्रकरण आहे का? अगदी ग्रान्टेड घ्यायच की सर्वांना सायीच तूप आणि सायीच दही येत्तच म्हणून Sad

बेरी यम्मी. खायला खूप आवदते. थोडी करपलेली आणि आंबट पाहिजे.
बीराव आता माहित झाली ना सायीचं दही कृती? नो वरीज.

हो अनु तुझ्यामुळे थोड थोड नक्कीच समजल. त्याबद्दल आभारी आहेच आहे. पण सगळी प्रोसेस इथे पाकृमधे आली तर फार बरे होईल.

लोणी दोनदा धुवून घेतले की बेरी आंबट नाही लागत. मी पातेले एक पेला पाणी घालून उकळून, मग गाळून फ्रिजमधे ठेवते. दुस-या दिवशी पाण्यातले तूप वर येते. ते अन खालचे पाणी २-३ दिवस कणकेत मोहन म्हणून घालून सपून जाते. अजिबात वास रंग येत नाही. उलट पोळ्या/फुलके, मऊसुत होतात. Happy

हो का? करून पाहिला पाहिजे. Happy आमच्या मातोश्री वरण करतात त्या पातेल्यात अन वरून फोडणी घालतात वरणाला. Happy

मी काय करते , तूप गाळून घेतल की तूप कढवलेल्या पातेल्यात गरम पाणी घालते व ते पाणी फ्रीज मध्ये ठेऊन देते. थंड झाल्यामुळे तूपाचा थर पाण्यावर येतो ते तूप काढुन घेते . त्यामुळे तूप अजिबात वाया जात नाही . कोब्रा ना जातिवंत ( स्मित) नंतर कढई साफ करताना मीठाच पाणी घालून उकळते. कढईला चिकटलेली सगळी बेरी विनासायास सुटुन येते मीठामुळे . कढई घासण खूप सोप जात.

अनघा बरोबर . मी लिहीपर्यंत तुझी पोस्ट आली.

मी लोणी दोनदाच नाही तर पांढरं पाणी संपून जाईपर्यंत धुते. Happy
नाहीतर लोण्याला वास येतो.
जौद्या! दुधावर दोष ढकलायचा अन् काय Wink

मृणाल -१ - बेरीच्या पातेल्यात बेरी नाहीच असे समजून नेहमीप्रमाणे चहा करायचा. ह्वे तेवढे दुध पाणी साखर वेलची तर वेलची.. आले तर आले असे घालायचे आणि चला उकळी आणायचा. नेहमीप्रमाणे गाळणीतून कपात गाळायचा. एक वेगळीच चव येते आणि ती चव फार खंग्री लागते. आमच्याकडे तर बेरी निघाली की आम्ही चहा प्यायला आतुर असायचो.

Pages