निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरू वाचत असशील तर तुला मागे म्हटलेलं ते हे हमिंगबर्ड फीडर आणि हमिंगबर्ड. हा लेटेस्ट आहे जुन्या फोटोत आणखी चांगला असेल पण ते शोधायचं काम मी केलंच नाहीये. Proud

HBird.JPG

वेके. वेळ काढून चांगलावाला शोधायचा ना फोटू Lol
मस्तं गा.. हमिंग बर्ड्ज बघते रोज पण त्याचा फोटो काढणं कर्मकठीण कामे.. एक सेकंद स्थिर राहील तर शप्पत
सार्खं भिर्र्र्र्र्र्र्र्र्र

२६ दिवसांच्या सुट्टीनंतर आज ऑफिसला आले. माबोवर पण आजच लिहायला आले. बाकी घरून फक्त मधूनच कधीतरी पहायचे.

सगळ्यांना सुप्रभात.

मागच्या पोस्ट चाळल्या. फार छान माहीती, फोटो आहेत. वेळ काढुन वाचावे लागेल.

अनिल वेलकम बॅक.

सायली अग विपु बघ.

vt220, ho aaptach wataroy, pan phul paandhari hoti ka? agdi pitukali.. >>> धन्यवाद सायु. हो पिटुकली फुले होती.

वेका हमिंगबर्ड किती पिटुकला आहे. नेहेमी अतिक्लोजप बघितल्याने आकाराचा अंदाज येत नाही!
सध्या नवरात्रीपासून आमच्याकडे समोरच्या इमारतीवर रोज घुबड येतं. इतकी सवय झालीय की एखादे दिवशी पहायला नाही मिळाले तर चुकचुकल्यासारखे वाटते. आपला कुणी आपल्याला सोडून दूर देशी गेल्यासारखे वाटते. मग दुसर्या दिवशी परत दिसला की छान वाटते. खरतर अंधारात फक्त सावली दिसते, चेहरा काही दिसत नाही. तरी... Happy

टिना, आपल्याकडे पिकांची आणि भौगोलिक स्थळांची अशी डोक्यात गट्टी बसलेली असते ना, कि त्यापेक्षा काही वेगळे बघितले कि विश्वासच बसत नाही..

द्राक्षे म्हंटली कि मला नाशिक, नारायण गाव, फलटण आठवते आणि अंजीर म्ह्म्टले कि इंदापूर.. म्हणजेच समुद्रकिनार्‍यापासून दूर असलेली गावे. पण न्यू झीलंडमधे अगदी समुद्रकिनार्‍यालगत हि झाडे बघितली आहेत मी.

किवीपेक्षा मला वाटते बियावाली द्राक्षे असतात ना त्याच्यावर प्रयोग करता येईल. अगदी प्रतिकूल हवामानात द्राक्षाचे वेल तगलेले बघितले आहेत मी. भले आंबट का निघेनात ( भाजी करता येईल कि ) पण एक जरी घड लागला ना तर मेहनत सार्थकी लागेल.

ऑकलंड मधे अनेक घरांच्या भोवती फळांनी लगडलेली झाडे दिसतात. त्याभोवती कुंपणही नसते पण तिथे ट्रेस पासिंग हा मोठा गुन्हा असल्याने कुणीही जवळ जाऊन फळे तोडत नाहीत.

आणि ती लोकही फळे तोडतात असेही नाही. खुपदा पिकून झाडाखाली पडलेली असतात. ती फळे खातील असे प्राणी पक्षीही नाहीत तिथे...लेकीकडच्या फळांचेही तसेच होते.

खूप दिवसानी लिहीतेय निग वर. मस्त फोटो मस्त माहिती.

माझी पण रिक्षा " द ओल्ड लेडी ऑफ थ्रेडनीडल स्ट्रीट "

http://www.maayboli.com/node/56299

नक्की वाचा... मस्त आहे स्टोरी

आपटा नाही तो, कांचनच आहे. >>> दिनेश कांचन का वाटला तुम्हाला? तुम्ही म्हणालात म्हणून फ्लॉवर्स ऑफ इंडिया साईटवर जाऊन बघितलं.
आपटा - http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bidi%20Leaf%20Tree.html
कांचन (मराठी सेमला कांचन ?) - http://www.flowersofindia.net/catalog/slides/Roxburgh's%20Bauhinia.html
व्हाईट ऑर्किड (कन्नड कांचन) - http://www.flowersofindia.net/catalog/slides/Dwarf%20White%20Orchid%20Tr...

दहिसरचे झाड मी रात्रीच्या प्रकाशात बघितले. फुले बहुतेक वरच्या सेमला कांचनसारखी नव्हती. व्हाईट ऑर्किडसारखी म्हणता येतील पण झाड ३ मजली तरी होते, म्हणजे ते हे ऑर्किड नसावे.
एक दोन दिवसात परत त्या दिशेला जाणार आहे. परत पाहून घेईन म्हणते.

जागू तुरेवाले शिपाई छान.

गेल्या आठवड्यात एस्सेलवर्ल्डला गेलेलो. तिथे बरीच भारतीय झाडे आहेत. कचनार भरपूर होते. फुललेले पण, पण फ्लॉवर्स ऑफ इंडिया साईटवर दाखवल्याइतके फुललेले नव्हते. मुचकुंदही पाहिला, पण तोवर खूपच थकलो होतो, प्रकाशसुद्धा बराच कमी होता...
सुरुवातीलाच हे फुल सापडले. ह्याला मंद सुवास होता. झाड बरच उंच होते. १५-२० फुट असेल.

ह्या फुलापानांची रंगसंगती छान वाटली...

कचनार

ह्या झाडाला सोनचाफा असे नाव दिलेले. फुले काही दिसली नाहीत. ही बहुतेक फळे असावीत. हा क्रोप केलेला फोटो आणि त्यानंतरचा झाडाचा लांबून...

हे काय असावे? हा क्रोप केलेला फुलांचा फोटो आणि नंतरचा दुरून...

व्हिटी पहिले फुल बुचाचे.

२ नंबरची फुले माझ्याही ऑफिसच्या आवारात आहेत.

तो पांढर्‍या फुलांचा आपटा वाटतोय पण पाने खुपच मोठी आहेत. त्यामुळे तो कांचन जातीतला असावा.

पाणी कपातीमुळे, आमच्या सोसायटीतल्या बागेची हेळसांड होत होती. झाड अगदी सुकून गेली होती. मुकी जास्वंद तर, लहान लहान कळ्या असतानाच फ़ुलत होत्या, कुपोशित दिसत होत्या. हे सग्ळ बघताना वाईट वाटत होतं. मग ठरवलं, घरात जे तांदूळ, डाळ, भाज्या धुतो ते पाणी साठवून, त्या बागेला घालायच. रविवारी दुपारी साठलेले थोडसं पाणी थोडं थोडं घालून आले. आणि तासाभरात धो धो पाऊस पडला. आणि देवाने अनेक बादल्या पाणी झाडांना घातल. मग ती झाडं अशी काही डोलू लागली, की "आनंदाचे डोही आनंद तरंग! "

शोभा,
निसर्गातील झाडे पाण्याचा ताण थोडाफार सोसू शकतात. मुद्दाम लावलेली झाडे मात्र तसा ताण सहन करू शकत नाहीत. त्यामूळे असे पाणी नेहमीच झाडांना घालता येईल. तसेच घातलेले पाणी उडून जाऊ नये म्हणून झाडांभोवती सुका पालापाचोळाही घालून ठेवता येईल.

पाण्याचा ताण पडला तर झाडे लवकरात लवकर फुले फुलवून पुढच्या पिढीची सोय, म्हणजेच बिया तयार करू बघतात.

बापरे मस्त गप्पा , प्र.ची..

ही फुलं कसली, मी शमी म्हणुन एका औषधी नर्सरीतुन झाड आणले होते, त्याला अशी फुलं आलीत..

Pages