नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
दिनेश, मिरच्या मस्त
दिनेश, मिरच्या मस्त दिसतायत.
कुंडीतही कंद मस्त वाढलाय.
लाल कृष्ण कमळापेक्षा निळचं आवडत. माझ्या कडे असं पांढर आहे फोटो टाकते.
निरु, खुप सुंदर फोटो. अगदी
निरु, खुप सुंदर फोटो. अगदी गुलाबाचा गुच्छाच..
निरू फारच सुंदर फोटो. तो
निरू फारच सुंदर फोटो.
तो पुण्यातील वृक्षसंपदेचा लेखही छान.
ममोताई लाल कृक मस्त.
सगळे फोटो माहिती छान. दिनेश
सगळे फोटो माहिती छान.
दिनेश यांच्या रेसिपी त्यांनी पाककृती मधे पण द्याव्यात.
काही महिन्या पुर्वी
काही महिन्या पुर्वी मैत्रीणीला बर्याच भाज्यांच्या बिया दिल्या होत्या.. तीच्या कडे खुप मोठ्ठ आंगण आहे,
मी अधन मधन जात होते, त्या बिया छान रुजल्या, काकडी, कारली, दोडके,गीलके, याचे वेल तीने वर चढवले होते टोमाटो, वांगी, दुधी, मस्त बाग तय्यार झाली..:)
आज सकाळी तीने छान कोवळी कोवळी गीलकी आणुन दिलीत..
गिलक्यांची मस्त भजी तळ आणि
गिलक्यांची मस्त भजी तळ आणि चटणी सॉस बरोबर फस्त कर.
गुड आयडीया सकुरा...
गुड आयडीया सकुरा...:)
भज्यांचे फोटो टाकायला विसरु
भज्यांचे फोटो टाकायला विसरु नको...
(No subject)
सायु गिलकी अगदी रसरशीत
सायु गिलकी अगदी रसरशीत दिसतायत. घरची भाजी खायला किती मजा वाटते ना!
हे माझ्याकडच पांढरं कृष्ण्कमळ
आणि ही माझी रिक्षा . बघा आवडतेय का ते
http://www.maayboli.com/node/56633
लाल कृष्णकमळ आधीच्या पानावरचं
लाल कृष्णकमळ आधीच्या पानावरचं आणि हे पांढरं दोन्ही छान.
घोसाळी मस्तच. श्रीरामपुरला अशी ताजी मिळायची मला. मालकांनी लावली होती.
माझा बी बी म्हणजे बाल्कनीतली
माझा बी बी म्हणजे बाल्कनीतली बाग. या बागेची चित्तरकथा म्हणजे बी सी (B.C.) हा पुढचा अध्याय. इथे अनेक प्रयोग केले. मोसमानुसार अळू, पालक, लाल माठ, फरसबीं, मिरची, पुदिना, टोमॅटो, वांगी यांची एकेक दोन-दोन रोपे वाढवली. एकवेळपुरती भाजी मिळवली. पन्नाससाठ मिरच्या मिळू शकल्या. करांदा, कोनफळ बहरले. देवचाफा, लालचाफा फुलला. रताळीसुदधा धरली. ती खाली मोकळ्या जागेत लावल्यावर उंदीर-घुशींनी खाल्ली. अनेक चित्तरकथा. आता इथे कुंडीतल्या कोंबड्याचे फोटो टाकत आहे.



मजा आहे.
सर्व फळा-फुलांचे फोटो - एकदम
सर्व फळा-फुलांचे फोटो - एकदम मस्त ...
अशीच सर्वांची बाग फुलत-फळत राहो ....
कुंडितला कोंबड्याचा तुरा
कुंडितला कोंबड्याचा तुरा मस्तच.
अय्यो! पांढरे कृ.कमळ कीत्ती
अय्यो! पांढरे कृ.कमळ कीत्ती गोड..
कोंबडयाचा रंग मखमली...
वा सायु मस्त भजी कर. हेमाताई
वा सायु मस्त भजी कर.
हेमाताई पांढरा कृष्णकमळ सुंदर.
हीरा तुमचे प्रयोग पाहून मला वडीलांच्या प्रयोगांची आठवण आली. आमची शेती होती आधी. कसल्याही नफ्यातोट्याचा विचार न करता त्यात वडील दर वर्षी नविन नविन पिकाची लागवड करुन आनंद घ्यायचे. जे आमच्या मातीत कोणी कधी पिक घेत नाहीत अशी पिके. एक वर्ष उस लावला होता. पण उस कधी होतो हेच न कळल्याने सगळ्या उसाला फुले धरली. आणि आमच्याइथे कोणी उस घेत नाहीत त्यामुळे शक्य तितका वाटून, एका उसाच्या रस वाल्याला विकून आणि राहिलेला बराच फुकट जाऊन पुढल्या वर्षी वडीलांनी शेंगदाणा पीक लावले. शेंगदाणे छान आले. ते विकलेही गेले. एक वर्ष वटाणा लावला. तो तितक्या जोमाने नाही झाला. पण त्या मटारच्या शेंगांचा स्पर्श, सुगंध अजुन मला आठवणीत आहे. खुप छान वाटलेल स्वतःच्या शेतात वटाणा आलेला पहाताना. एक वर्ष हरभरा लावला होता. एक वर्ष कलिंगड. घरातले कलिंगड खाताना खुप आनंद झालेला तेव्हा, एकदा बटाटेही लावलेले. पण बटाटे अगदी छोटे निघाले. बाकी आमचा दरवर्षीचा मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी, अलकोल, कोबी, फ्लॉवर, पडवळ व इतर भाज्यांचा मळा नियमीत लागायचा. एक शेत वडील अश्या नविन पिकासाठी राखुन ठेवायचे.
जागु तुझ बालपण कीत्ती छान
जागु तुझ बालपण कीत्ती छान गेलल ग...:)
जागुताई, तुमच्या वडिलांचे हात
जागुताई, तुमच्या वडिलांचे हात म्हणजे परीसच असणार. हात लावतील तिथे सोने पिकेल असा परीस. तुमच्याही लेखनातून तो परीसस्पर्श जाणवतो. निसर्गाविषयी माया पाहिजे मग निसर्गही आपल्यावर भरभरून प्रेम करतो.
हिरा माझ्या वडीलांनी शेतीचा
हिरा माझ्या वडीलांनी शेतीचा सांभाळ करण्यासाठी परमनंट नाईटशिफ्ट केली. ते प्रिमियर कंपनीत होते कुर्ल्याला. रोज मचवा, लाँचने अपडाउन करायचे. उरण ते मुंबई. प्रवासातील काही झोप व घरी एखाद-दोन तासाचीच झोप.
अजुनही ते धडपडतात वाडीतली कामे करायला. आता वय ७८ आहे त्यांचे. आम्हीच त्यांना काही करु देत नाही. पण वहिनीसोबत रोज दुकानात जातात मदतीला.
ओळ्खा पाहु....
ओळ्खा पाहु....
हे अंडं आहे कुणाचं तरी.
हे अंडं आहे कुणाचं तरी.
हे अंडं आहे कुणाचं तरी.>>
हे अंडं आहे कुणाचं तरी.>> इमूचं
धन्यवाद नलिनी काय सुंदर आहे!
धन्यवाद नलिनी
काय सुंदर आहे! नीरु, तुम्ही पाळलेत का इमू?
हिरा, फार सुंदर प्रयोगशील
हिरा, फार सुंदर प्रयोगशील आहात तुम्ही.
जागू तुझे बाबा ग्रेट. प्रीमियरमध्ये नाईटशिफ्ट करून हे सर्व करणं खूप कठीण.
अंड्याचा कलर किती सुंदर.
जागू - तुझ्या वडिलांना शिर
जागू - तुझ्या वडिलांना शिर साष्टांग - एवढे कष्ट घेऊन शेतीत रस घेणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही ...
<<<...जागू - तुझ्या वडिलांना
<<<...जागू - तुझ्या वडिलांना शिर साष्टांग - एवढे कष्ट घेऊन शेतीत रस घेणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही ...>> +१११
खरच जागुताई, अतिशय तिव्र इच्छा आणि आत्यंतिक आवड याशिवाय हे शक्य नाही....
अश्विनी के आणि नलिनी, ईमुचेच
अश्विनी के आणि नलिनी,
ईमुचेच अण्डे आहे ते...
इमुचे अंडे एखाद्या गोलाकार
इमुचे अंडे एखाद्या गोलाकार दगडासारखे वाटतेय.
निरु मेल केलाय तो चेक करा प्लिज.
शशांकदा, निरु नक्कीच तुमचा नमस्कार पोहोचवेन.
प्र.चि ०१... प्र चि ०२...
प्र.चि ०१...
प्र चि ०२... कोम्बडीच्या अण्ड्यासोबत, आकाराचा अन्दाज येण्यासाठी
आई, बाबा ईमु...
आई, बाबा ईमु...
Pages