दिवाळी म्हणजे झगमगाट, चमचमाट. प्रत्येक घरात नवीन रंग, आकाशकंदील, लाइटची तोरणे ह्या बाह्य रोषणाई सोबत अंतर्गत सजावटीतही चमक आलेली असते. त्यात जास्त मेहनत केली जाते ती म्हणजे गृहीणीच्या लाडक्या स्वयंपाकघरावर. पूर्वी प्रत्येक स्वयंपाकघरात भिंतीलाच फळी ठोकलेली असायची व फळीवर तांब्या-पितळेची भांडी हौशेने रचलेली असायची.ह्या तांब्या पितळेच्या भांड्यांवरून त्या घरच्या गरीबी वा श्रीमंतीचा दर्जा ठरला जायचा.
पण आता बदल हा काळाचा नियम असल्याने चिंच लावून तांब्या-पितळेची भांडी घासणे हे वेळखाऊ काम असल्याने तांब्या-पितळेची भांडी ९०% घरातील किचनमधून रिटायर्ड झाली आहेत.
परंतू अशाच काही आमच्या सासूबाईंच्या ठेवणीतल्या जुन्या वस्तू/भांडी अजूनही आमच्या घरी दिवाळीत तोर्यात मिरवतात. मी लग्न होऊन सासरी आले आणि येथील दिवाळी पारंपरिक वस्तूंसोबत साजरी करताना एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला येऊ लागली.
दिवाळी जवळ आली की सासूबाईची लगबग चालू होते ती ठेवणीतील लोखंडी खलबत्ता, अंघोळीचे तांब्याचे घंगाळ आणि पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाला कामवाली कडून चिंच लावून, घासून-पुसून दिवाळी सणाला सज्ज राहण्यासाठी. नरक चतुर्दशी म्हणजेच पहिल्या अंघोळीच्या आदल्या दिवशी सासूबाई लोखंडी खलबत्त्यामध्ये गवळा-काचरी आणि खोबरं कुटतात. ही जिन्नस कुटण्यात त्यांना दिवाळीच्या तयारीचा आनंद येत असल्याने हे कुटण्याचे काम ते आम्हा कोणाकडेच देत नाहीत. ही गवळा काचरी कुटत असताना खलबत्याच्या ठणक्यासोबत गवळा काचरीचा सुगंध घरभर पसरतो. त्यामुळे दिवाळीचे क्षण सुगंधी होऊ लागतात. आम्ही दोन सुना सासूबाईंच्या सुचनेनुसार कुटलेले खोबरे मिक्सरमध्ये अजून बारीक करतो. दुसर्या दिवशीच्या अभ्यंग स्नानासाठी वाटलेले खोबरे व गवळा काचरी रात्रीच पाण्यात भिजवऊन ठेवली जाते. अभ्यंगस्नानाच्या दिवशी सूर्य उजाडायच्या आत घरातील पुरुष मंडळी म्हणजे माझे मिस्टर व दीर बंब पेटवून दिवाळी स्पेशल गरम पाणी तापवतात. अभ्यंग स्नानासाठी तांब्याचे लखलखते अंघोळीचे घंगाळ त्याच्या स्थानी मानात ठेवले जाते. घरातील प्रत्येकानी घंगाळ घेतले की नाही हयावर सासूबाई जातीने लक्ष देतात. पूर्वी लहान असताना पुतण्या अभिषेक व आता माझ्या छोट्या असलेल्या मुली तर ह्या घंगाळात बसुनच अभ्यंगस्नानाची मजा लुटण्याची परंपरा चालू ठेवत आहेत.
अभ्यंग स्नान उरकले की आम्ही ह्याच घंगाळात पाणी ठेऊन त्यात फुले ठेऊन तरंगणार्या पणत्या रात्री लावतो. खलबत्ताही मला कधी कुटलेली चटणी करण्याची लहर आली की मी त्याचा ठणठणाट करते. उन्हाळ्यात हळद कुटण्यासाठीही आम्ही खलबट्याचा वापर करतो. मी माहेरी चुलीचा अनुभव घेतला होता पण सासरी येऊन घेतलेला बंबाचा अनुभवही माझ्यासाठी आनंददायी होता. गिझर च्या झटपट गरम पाण्यामुळे मात्र बंबाला आराम मिळून तो थंड झाला आहे.
वरीत प्रत्येक वस्तूवर सासूबाई माया करतात. दर दिवाळीला खलबत्ता कुठून आणला होता, बंब किती पैशात मिळाला होता, घंघाळ आणताना धोधो पाऊस आणि विजा चमकत होत्या ह्याचे वर्णन त्यांच्या तोंडून ऐकताना ह्या वस्तू आम्हालाही जीवलग झाल्या आहेत. दिवाळीचा सण पार पडला की ही ठेवणीतील ऐवज पुन्हा आपल्या ठेवणीच्या जागी ठेवण्यात येतात.
घंगाळ
खलबत्तालोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणी मध्ये शनीवार ७/११/२०१५ रोजी प्रकाशीत.
(दिवाळीत माबोवर नसल्याने व आजच माबोवर आल्याने आज हा लेख इथे शेअर करत आहे.)
तुमचे लेख फार नॉस्टॅलजिक
तुमचे लेख फार नॉस्टॅलजिक करतात.
जागू, फार सुंदर. लेख.
जागू, फार सुंदर. लेख. चकचकीत घंगाळ आणि काळा खलबत्ता दोन्ही मस्त दिसतेय.
छानच लेख आहे. असे ठेवणीतले
छानच लेख आहे. असे ठेवणीतले ऐवज असतातच. त्यांच्यामुळे काही दिवंगत माणसांच्या आठवणीही जिवंत आणि टवटवीत राहतात.
जागू, फार सुंदर. लेख. चकचकीत
जागू, फार सुंदर. लेख. चकचकीत घंगाळ आणि काळा खलबत्ता दोन्ही मस्त दिसतेय. >>
+१
व्वा! मस्तच जागू मलाही अशा
व्वा! मस्तच जागू

मलाही अशा जुन्या वस्तू खुप आवडतात. आईकडच्या आहेतच काही + माझ्या सासरीही बर्याच अशा जुन्यावस्तू आहेत. लग्न झाल्यावर २/३ वर्ष फक्त ऐकून होते मग त्या माळ्यावरून काढुन पाहिल्या... आणि मोडीत घालण्यासाठी काढलेल्या खुपशा वस्तू माझ्या हट्टाने पुन्हा माळ्यावर विराजमान झाल्यात. माहेरचा बंगला बांधुन झाल्यावर त्या वस्तूंची योग्य देखभाल व वापर मी माझ्या आवडीने करणार आहे
जागू, फार सुंदर. लेख. हो
जागू, फार सुंदर. लेख.
हो पेपरमध्ये वाचला होता आता परत वाचला. मस्तच
सुंदर लेख
सुंदर लेख
मस्त आहे जागू ताई . माहेरी
मस्त आहे जागू ताई .
माहेरी अजूनही काळा खल्बत्त आहे .
मी पुण्याला असताना , ज्या घरी पेईंगगेस्ट म्हणून रहायचे , त्यान्च्या कडे मोठ्ठ घंगाळ आणि आणखी बरीच मोठी पितळी भांडी शोभेसाठी होती. मस्त दिसयाच.
ते बघून आईने तुळशी बागेतुन एक हातावर मावेल ईतक घंगाळ घेतलं . ते अजून आहे , शो-केस मध्ये
संजीव, मनीमोहोर्,बेफिकीर,
संजीव, मनीमोहोर्,बेफिकीर, अनघा, हर्षा, सृष्टी, चनस धन्यवाद.
स्वस्ति मी पण मुलीला खेळण्यातले घंगाळ घेतले आहे आणि एक मिडीयम साईझचे घंगाळ शोसाठी घरात ठेवले आहे.
छान लेख.आई आणि सा बा यांच्या
छान लेख.आई आणि सा बा यांच्या कडे अशा ठेवणी तल्या वस्तू असतातच सहसा.. घंगाळं आणि खलबत्ता दोन्ही छान..घंघाळा मध्ये पाणी,फुल,,रंगीत दिवे ठेवण्याची आयडिया मस्त.!
छान लिहीलयस जागु. आवडले.
छान लिहीलयस जागु. आवडले.
मस्त लिहिलं आहे!
मस्त लिहिलं आहे!
मस्त लिहले आहे.आमच्याकडेही दर
मस्त लिहले आहे.आमच्याकडेही दर दिवाळीत वर कोपर्यात ठेवलेल्या घंगाळाला खाली घेऊन्,,चिंच मीठ्,पितांबरी वगैरे वापरुन स्वच्छ केले जाते. वेगळ वाटत दिवाळीच तो पुर्ण आठ्वडा.
छान लेख. खलबत्ता आमच्याकडेही
छान लेख. खलबत्ता आमच्याकडेही आहे.
घंगाळ मस्त चमकतंय.
.
डिंपल, रश्मी, रावी, अंकु, भरत
डिंपल, रश्मी, रावी, अंकु, भरत धन्यवाद.
वाह जागू - सुर्रेख लेख ....
वाह जागू - सुर्रेख लेख ....
जागू, मस्त लेख! . आणि मोडीत
जागू, मस्त लेख!
. आणि मोडीत घालण्यासाठी काढलेल्या खुपशा वस्तू माझ्या हट्टाने पुन्हा माळ्यावर विराजमान झाल्यात.>>>>>>..आमच्याकडचा सगळ्या मोडीत गेल्या
यात वेगवेगळ्या आकाराचे पितळेचे तांबे, लोटी, पळ्या, परात, ताटं, वेगवेगळ्या घाटाचे डबे, असं बरचं काही होतं

भरत, शशांक धन्यवाद. तुम्ही
भरत, शशांक धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सुचनेनुसार बदल केले आहेत. फारच कच्च आहे बुवा माझ ज्ञान ह्या चतुर्दशी शब्दाबाबत.
शोभा माझ्या सासुची खुप पितळी भांडी आमच्या जुन्या घरात बांधुन ठेवली आहेत.
वा जागू, मस्त लिहिलस!
वा जागू, मस्त लिहिलस!
मस्तय लेख. ऑनलाईन अशा वस्तू
मस्तय लेख. ऑनलाईन अशा वस्तू विंटेज म्हणून विकल्या जातात अव्वाच्या सव्वा किंमतीत तेव्हा त्याची किंमत आपल्याल कळते.
मला हवंय असं घंगाळ. कुठे मिळेल मुंबईत?
छान मस्त.. आमचा सेम असा
छान मस्त..
आमचा सेम असा खलबत्ता चोरीला गेला
(जस्ट सांगितल. भलता गैरसमज करून घेऊ नये)
मस्तच घंगाळ किती लखलखीत
मस्तच
घंगाळ किती लखलखीत दिसतंय. काही वर्षांपुर्वी देशात अशा तांब्याच्या डेगीवर काचेचा गोल ठेवून एंड टेबल करायची खूप फॅशन होती.
सायो, सिटीत लेक्झिंटन अॅवेन्युवर दुकानं आहेत तिथे मिळेल तुला घंगाळ. एवढं मोठं मिळेल की नाही माहिती नाही.
मस्त ! आमच्याकडेही असाच
मस्त !
आमच्याकडेही असाच खलबत्ता होता..
आणि ते पाटा वरवंटाही.. विचारायला हवे आईला, आहेत अजून की काढले..
आणि ते पाटा वरवंटाही..
आणि ते पाटा वरवंटाही.. विचारायला हवे आईला, आहेत अजून की काढले.. >> अगदी अगदी.
पारंपारिक नाही म्हणता येणार पण एक दूधाचा कूकर(???) ही होता आमच्याकडे .
दूध उकळायला लागल की शीटी मारायचा
विळीलाही पारंपारीक म्हणावे की
विळीलाही पारंपारीक म्हणावे की नाही माहीत नाही, पण विळीवर जसा आई रपारप कांदा चिरते तसे आजकालच्या कित्येक मुलींना नाही जमत हे पाहिलेय. जमवलेच तर तेवढा बारीक नाही चिरता येत.
लेख मस्तच ! ते घंगाळ फार्फार
लेख मस्तच ! ते घंगाळ फार्फार आवडले. अशी दिवाळी साजरी करण्यात काय मजा येत असेल नाही ?
आमच्याकडे या तिनही वस्तु
आमच्याकडे या तिनही वस्तु होत्या, खलबत्ता,घ्न्गाळ आजुनही आहे,बन्ब मात्र जागेच्या प्र्श्नात गेला,बन्ब अगदी मागच्या काही वर्शात वापरणे बन्द झाले, आमच घर अपार्ट्मेन्ट असल तरी शेवटच्या मजल्यावर असल्याने गच्चीत ठेवुन वापरता यायचा, ..हिवाळयात आवर्जुन वडिल काढुन वापरायचे...वडिल गेल्यावर त्याला हौसेने वापरणार कुणि उरल नाही ...त्या बन्बाबरोबर पितळेचीच एक घागरही होती (३ हो हो फक्त ३ रुपयाला घेतल बन्ब आणि २ आण्याची घागर!! वर्शानुवर्स्।ए एकुन आकडे अगदी कोरलेत स्मरण्शक्तित)
सासरी गावाकडे या सगळ्या वस्तु आहेत आणि नित्य वापरात सुधा आहेत... मोठ्या पुजेला,कार्य्क्रम्ला बन्बच वापरला जातो.
आहाहा जागुले, किती सुंदर
आहाहा जागुले, किती सुंदर लेख.. हळू हळू चव घेत चघळत चघळत वाचला.. मनात लहानपणीच्या आठवणी उफाळून आल्या वर..
खूप छान वाटतंय..
तुझ्याकडे सर्व वस्तू जपून ठेवलेल्या आहेत ती किती छान गोष्ट आहे.. आमच्याकडल्या वस्तू काय जाणे कुठे गेल्या असतील..
बंब आहे घरी पण वापरात नाही
बंब आहे घरी पण वापरात नाही कितीतरी वर्षांपासुन. खलबत्ता वापरात होता पण भाउ आता मेहंदी भिजवायला वापरतो. घन्गाळही आहे पण वापरात नाही.
मामाकडे मात्र अजुनही हे सगळे वापरात आहे.
मस्त लेख..
मस्त लेख..
Pages