कॅनडा गीजचे काही माझेही व्हिडिओ(प्रेरणा: "रार")

Submitted by मानुषी on 25 November, 2015 - 02:22

कॅनडा गीजचे काही व्हिडीओज
वॉशिन्ग्टन डीसीतल्या वास्तव्यात एके दिवशी सकाळीच कॅनडा गीजचं हॉन्किन्ग ऐकू आलं. आणि सकाळी बाहेर पडले तर मेट्रो स्टेशनच्या परिसरात कॅनडा गीजचा एक प्रचंड मोठा कळपच दिसला. आयुष्यात पहिल्यांदाच हे पक्षी पहात होते आणि तेही स्थलांतरित! इतकं सह्ही वाटलं!
लगोलग घरी गेले आणि आयपॅड घेऊन परत आले. आणि खूप फोटो घेतले. आणि काही व्हिडिओजही.
हे सगळे व्हिडिओज अगदी सामान्य माणसाच्या उत्सुकतेने घेतलेले आहेत. पण "रार"चे याच विषयावरचा अत्यंत सुंदर आणि इन्टरेस्टिन्ग असा व्हिडिओ पाहिला आणि वाटलं ...चला आपणही आपले व्हिडिओ डकवूया!
हे व्हिडिओज फेब्रुवारीतले आहेत.
यात एक गूज दुसर्‍या गूजवर धावून जाताना दिसतेय.

https://youtu.be/MCecAYxnKuA
--------------------------------------------------------------------------------------------------------

या व्हिडिओत काही गीज उडून जाताना दिसताहेत. असं वाटतं की काही करण्यापूर्वी हे सगळे एकमेकात चर्चा करून मग निर्णय घेतात.
https://youtu.be/ZrDl0R6Zt6k
-------------------------------------------------------------------------------------------------
या व्हिडिओच्या शेवटी एक गूज दुसर्‍या ग्रुपवर चाल करून जातेय. आणि त्या समूहातले ३ गीज या हल्लेखोराकडे आपल्या शेपटाचा गुच्छ हलवताहेत. आता हे "हाय हॅल्लो" असं ग्रीटिग आहे की तहाची निशाणी आहे कळत नाही.
पण मजेशीर आहे खरं!

https://youtu.be/vFknBJf-FmQ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, वा! खूप छान विडिओ!
खरच, ते खुप कसला तरी विचार करुन मग एकत्र उडायला सुरुवात करतात नाही का!

मस्त.. मला वाटतं ते ( त्यांच्या भाषेत ) एक - दोन - तीन... उडा म्हणत असावेत !!

मस्त आहेत विडिओज्,मानु..

दिनेश Lol

मानुषीताई,

मस्त आहेत विडीयोज. बरेच जण व्हीडीओ का म्हणतात कळत नाही.. ह इथे येतोच कुठे!!!!