निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादे पेन्टींगच वाटते आहे..स्मित फार सुंदर टीपलयस..>>>>>>सायु....थॅन्क्स...
दिनेश सुंदर फोटो,
वैशाली घुबड छान आहे गं
स सा भट्कंती मस्तच!

बार्न किंवा गव्हाणीतले घुबड पुर्वी नावाप्रमाणेच गव्हाण म्हणजे धान्याच्या कोठाराजवळ रहात असे, धान्यावर येणार उंदीर खाऊन ते धान्याचे रक्षणच करत असे. खतरनाक किटकनाशकांपेक्षा कितीतरी सुरक्षित उपाय होता तो.

स_सा, मस्त भटकंती.

वॉव...नलिनी अतीशय सुंदर व्हिडिओ.
हवेतच आपोआप बर्स्ट होणार्‍या आणि बीया उधळ्णारी वनस्पती ....हे पाहिल्यावर लहानपण्ची एक गंमत आठवली.
तेरड्याच्या झाडावरच्या अळ्यांसारख्या दिसणार्‍या शेंगा (याला शेंगा म्हण्तात की काय माहिती नाही)... या पुरत्या पक्व झाल्यावर त्यांना नुस्ता स्पर्श केला तरी त्या अश्याच आपोआप फुटायच्या, त्यातून बीया उधळल्या जायच्या आणि ती शेंग आपोआप स्वता:भोवती गुंडाळली जायची आणि अगदी अळीसारखी दिसायची.खूप मजा यायची. एक शेंग अळी झाली की झाडाच्या सगळ्या शेंगांना स्पर्श करून पुटु पुटु अळ्या केल्याशिवाय बरंच वाटायचं नाही.
या झाडांना आम्ही गौरीची झाडं म्हणायचो.

Beautiful photos Dinesh. Loved the color of cherry tomato flowers. Just for that color I wish I had that plant...
I had barn owl as neighbor for few days. Number of pigeons in our area appear to have come down... but not completely gone. :-o

मानुषीताई तो तेरड्याचा खेळ आम्हीपण खेळायचो.

फोटो सर्वच मस्त. सायली, ग्रीन फिंगर्स ग बायो तुझे, कसली मस्त काकडी आहे.

मानुषी, हो आम्ही पण खेळायचो तो तेरड्याचा खेळ. मज्जा यायची.

टीना,शेवाळी गुलाब ना हा ? रंग फार सुंदर असतो याचा.

नलिनी मस्त क्लीप, मज्जा आली बघायला.

हो आम्ही पण खेळायचो तो तेरड्याचा खेळ. मज्जा यायची. ++१
तसेच आम्ही, हाताच्या मुठी मधे पाणी भरुन त्यात अबोलीच्या बिया ठेवायचो, मस्त तडतडुन फुटायच्या..:)
टीना छान प्र.ची..
हेमा ताई शेवाळी गुलाब नाव आवडल..:)

वर्षू.....:खोखो:
या बिया ठेवायचो, मस्त तडतडुन फुटायच्या..स्मित>>>>>>>>>>>>>>>
सायु हाही उद्योग आम्ही करायचो.....मज्जा!
....वर्षू......हे तरी???? Wink

शांतता.

ह्यावेळी सोनटक्याला जवळजवळ २० फुले आली. आज संध्याकाळी शेवटचे फुलेल. लहान कुंडीत चांगला प्रतिसाद. धन्यवाद फुलांना. मागच्यावेळी ६ फुले आली होती.

नवरात्राच्या शेवटच्या दिवसापासून रोज माझा देव्हारा ह्या फुलांनी सुगंधित केला. Happy

हा आनंद मला इथे शेअर करायला फार छान वाटतंय.

अन्जु ताई, व्वा वीस म्हणजे भरपुर आलीत...:)
डीसेंबर पर्यंत असतो ना बहर?
आज माझ्या लाल चाफ्याला एकसाथ ४ फुलं लागलेली..:)

सायली काहीच माहिती नाही ग मला. जागू, दिनेशदा, जो_एस, शशांकजी सांगतील बहराचं. अजून एक रोप आहे त्याला कणीस येणार कि नाही माहिती नाही.

तुझा सोनचाफा खूप मस्त ग. मध्ये फोटो बघितले. लाल चाफा कुंडीत लावलास? त्याचे मोठे झाड होतेना. अभिनंदन कळ्यांसाठी.

२ वाफ्या मध्ये काय लावावे काळात नव्हते म्हणून झेंडू लावला .
काय सुंदर बहरलाय !!!
दिवाळी च्या पाडव्याला दाराला तोरण लावायची गरजच नाही
अंगणात सुंदर तोरण घातले गेलेय
उद्या टाकते फोटो

ह्यावेळी सोनटक्याला जवळजवळ २० फुले आली. आज संध्याकाळी शेवटचे फुलेल. लहान कुंडीत चांगला प्रतिसाद. धन्यवाद फुलांना. >>>> ग्रेटच .....

अन्जु ताई, ती सोनटक्याची फुल मैत्रीणीकडची होती, त्यांच्या कडे जमीनीत आहे रोप, आपण कुंडी वाले लोक, फुलांच्या साईझ आणि संख्येत फरक पडणारच.. पण मी खुप वाट बघते आहे फुल यायची...
तुझ्या कडे अजुन कणिस येईल कदाचीत...

म्रुणाल लौकर फोटो दाखवा...
माझ्या शेवंतीला कळ्या येऊ लागल्या आहेत...:)

Pages