नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
दोघींच्या ही गोलाबो मस्त!!!!
दोघींच्या ही गोलाबो मस्त!!!!
मी वर दिलेल्या प्र.ची. शमी नसुन (Senna auriculata) मराठी नाव तरवड आहे...
ही देखिल औषधी वनस्पती आहे..
आणि मी काल नर्सरीत जाऊन खर्या खुर्या शमीचे रोप पण मिळवले..:)
जागू आणि अर्चना मस्त गुलाब
जागू आणि अर्चना मस्त गुलाब .
अर्चू अभिनंदन, गुलाबाची वाट बघत होतीसना.
सायली तरवड छान, नाव पहिल्यांदाच ऐकतेय.
सायु, नाकात माळीण झाली की
सायु, नाकात माळीण झाली की तरवडाच्या फुलांचा वास घ्यायला सांगतात.
शमी आणि सौंदड एकच का? शमीला खूप काटे असतात. पाने साधारण बाभळी सारखी असतात.
मी वर दिलेल्या प्र.ची. शमी
मी वर दिलेल्या प्र.ची. शमी नसुन (Senna auriculata) मराठी नाव तरवड आहे... स्मित>>>

बरोबर सायली. नगरला बर्याच ठिकाणी ही शेताकडेला आढळ्ते.
धन्स अन्जु ताई.. आणि मला खुप
धन्स अन्जु ताई..
आणि मला खुप आनंद झालाय, कारण या तरवडीची फुल काहिशी बहावा आणि काशिद सारखी दिसतायत..
नलिनी हो का हे माहिती नव्हते, आम्ही मोगर्याचे किंवा सुवासिक फुलाचा वास घेतो.. कदाचित औषधी वनस्पती असल्यामुळे , माळिणी वर उपाय असावा..
शमी आणि सौंदड एकच का? +++ हो बहुतेक. गुगलुन पाहिल्यावर दिसते आहे खरे..
आ हा हा! मानुषी ताई, कसले
आ हा हा! मानुषी ताई, कसले सुंदर प्र.ची..
तरवड च्या झुडुपाला अजिबातच
तरवड च्या झुडुपाला अजिबातच आकार नसतो. इथे त्याचा एक वेगळा प्रकार आहे. तूरे मीटरभर लांब असतात पण तरीही झाड बेंगरुळच दिसते.
मीपण बघितल्यासारखे वाटतेय
मीपण बघितल्यासारखे वाटतेय मला, इथेच डोंबिवलीच्या आसपास. आता नीट लक्ष ठेवेन.
पुन्हा कांदा...... coming
पुन्हा कांदा...... coming soon !

अर्रेच्या , सगळे गेलेत
अर्रेच्या , सगळे गेलेत कुठे?
गुलाबाचे ताटवे, मैत्रीणीच्या बागेतुन सभार...
डीसेंबर ची थंडी जाणवतेय का नाही...:)
आणि हे गोडुले purple oxalis...:)
सगळे फोटो मस्त आहेत, टवटवित
सगळे फोटो मस्त आहेत, टवटवित फुले आहेत
वॉव..पुन्हा कांदे.. मस्त रे
वॉव..पुन्हा कांदे.. मस्त रे सुकि..
क्यूट फुलं..
purple oxalis.. Surekh !
purple oxalis.. Surekh !
वरचे गुलाब बघून जीव
वरचे गुलाब बघून जीव वेडावला.
गुलाबाची चांगले येण्यासाठी काय करावे .
मी गुलाब आणले कि ५-६ गुलाब चांगले येतात नंतर आकार लहान होणे, वाढ खुरटणे असे प्रकार होतात. कलम असेल तर नुसतेच झाड वाढते. .
गुलाब खूप आवडतात.जमिनीत निट वाढेनात म्हणून कुंड्यांमध्ये लावले. पण नो फरक .
मृणाल जमत असेल तर टॉप रोझ हे
मृणाल जमत असेल तर टॉप रोझ हे खत आणून बघ. त्यावर डायरेक्शन्स असतात कसे घालायचे ते. चमचाभर फक्त बाजूला पसरून पाणी घालायचे असते. पण मला खुप चांगला अनुभव आला होता ह्या खताचा. आणि शेणखतही तितकच प्रभावी असत. शिवाय उन मिळाल पाहीजे झाडाला.
सगळे फोटो सुंदर.
अरे वा सुकी येऊ का गोण घेऊन कांदे न्यायला?
हे माझ्या अंगणातल. साधनाने मध्ये नाव सांगितलेल आता विसरले.

माझा निसर्ग सहवास http://www.maayboli.com/node/56600
धन्यवाद जागू. बघते इथे मिळते
धन्यवाद जागू.
बघते इथे मिळते का.
महाराष्ट्राचे राज्य
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू.ब्लू मोर्मोन वाटते आहे. गुगल इमेजेस पण असेच फोटो दाखवत आहे.
https://www.google.com/search?site=&tbm=isch&source=hp&biw=1295&bih=582&...
पण वरील फोटोत पंखाच्या एकदम खालच्या टोकाला थोडासा पिवळसर रंग दिसत आहे त्यामुळे खात्री नाही.
जागु मस्त फुल पाखरु ग.. vt220
जागु मस्त फुल पाखरु ग..
vt220 छान छान प्र.ची आहेत त्या लिंक वर..:)
ही मातीची बास्केट सोलापुरला मिळाली, त्यात बुचीची फुलं मस्त खुलुन दिसतायत...(फोटो धुसर, मो.मुळे)
मस्त फोटो सर्वच. बुचाची फुले
मस्त फोटो सर्वच.
बुचाची फुले मला बालपणात घेऊन जातात. पहाटे गोळा करायचो मग आई सुंदर गजरा (वेणी) गुंफायची.
सुवास दरवळला, सायली.
vt220 तुमचा अंदाज अगदी बरोबर
vt220 तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. जागूच्या फोटोतलं महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मोर्मोनच आहे.
तो हळदुला रंग म्हणजे चिकटलेले परागकण आहेत.
नमस्कार, सुकि,जागु,मानुषी,साय
नमस्कार,
सुकि,जागु,मानुषी,सायु
सर्व फोटो छान !
सुकि,
शेतात तणाचा नामो निशान दिसत नाही, मस्त !
या वर्षी पा ऊस कमी असण्याचा एक फायदा म्हणजे तण खुप उगवलं नाही.
जागु,दिनेशदा,
मी टाकलेल्या फोटो मध्ये केळीच्या बागे नंतरच्या लालसर फुलाचं नाव सांगता येईल का ?
हे भर उन्हाळ्या उगवलं होत, आणि विषेश म्हणजे १०-१२ दिवस तरी सुकलं नव्हतं.
धन्स अनिल..
धन्स अनिल..
सायु, गुलाबाचा रंग वेगळाच छान
सायु,
गुलाबाचा रंग वेगळाच छान आहे..
आमच्याकडे सध्या गुलाबाला नवीन पालवी-पाने फुटत आहेत्त, त्यामुळे फुले लगेच येणार नाहीत अस वाटतं...
सगळे फोटो छान छान.
सगळे फोटो छान छान.
आहाहा सुंदर गुलाब. मरुन-यलो
आहाहा सुंदर गुलाब. मरुन-यलो मिक्स कलर पहील्यांदाच बघितला.
व्वा! सुरेख गुलाब, फ़ुलपाखरू
व्वा! सुरेख गुलाब, फ़ुलपाखरू
सुकि, जाता जाता, एक पोतं कांदा, देऊन जा रे आमच्या घरी.
वा मिक्स गुलाब मस्त दिसतायत.
वा मिक्स गुलाब मस्त दिसतायत.
सायु, अन्जू हा सोनटक्का खास तुमच्यासाठी. बहीणीच्या बागेतला.
वॉव हेमाताई. थांकु. माझ्या
वॉव हेमाताई.
थांकु.
माझ्या कुंडीतल्या रोपालापण कणीस आलंय.
सोनटक्का बघितल्यावर मला तुमची
सोनटक्का बघितल्यावर मला तुमची दोघींचीच आठवण आली. ( स्मित)
सोनटक्का! आ हा हा... धन्स हो
सोनटक्का! आ हा हा... धन्स हो हेमा ताई, सोनटक्का बघुन तुम्हाला माझी आठवण झाली..
कृष्ण कमळे आणि बुचीची फुलं बघीतली की तुमचीच आठवण येते बघा..
अन्जु ताई मज्जा आहे बुवा.. फोटो टाक ग प्लीज..
Pages