एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषयाचा आवाका प्रचंड आहे. विचारला गेलेला जवळपास प्रत्येकच प्रश्न एका निबंधाचा विषय ठरेल असा आहे. एक चमत्कृती म्हणजे किडक्या पुरुषी मनोवृत्तीला कसे बदलावे हा प्रश्न पुरुषी मनोवृत्तीलाच विचारण्यात आलेला आहे. (हे खरे तर स्तुत्य आहे, पण) ह्याचा अर्थ असा होतो की येथे प्रतिसाद देणारे पुरुष नक्कीच अश्या मनोवृत्तीचे नसावेत असा ग्रह आहे. चारचौघांत भूमिका मांडणे आणि स्वतःच्या घरात वेगळेच नियम लागू करणे अशी भूमिका कोणताही पुरुष घेऊ शकतो व हे त्याच्यासाठी तुलनेने सोपे असते ह्याकडे कानाडोळा केला गेलेला आहे.

पहिलीच दोन वाक्ये चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटवणारी आहेत.

'रोजचा पेपर......नक्की काय बिघडतंय?'

'आधी बिघडत नव्हते का' ह्यावरच एक लंबीचौडी चर्चा होऊ शकते.

हे सगळे म्हंटल्यानंतरही लेखातून केले गेलेले आवाह्न स्तुत्यच वाटत आहे.

वैचारीक जडणघडणीत उलथापालथी व्हाव्यात अशी अपेक्षा अप्रत्यक्षपणे व्यक्त करणारा हा लेख आहे.

(उद्या सविस्तर लिहायला जमेल.)

चर्चेला शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

छान धागा मामी!! फक्त मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे मायबोलीवर येणारा पुरुषवर्ग हा मध्यमवर्गीय, सुसंस्कारीत गटातला आहे. इथे बरेच जण येऊन कदाचित चांगले मुद्दे मांडतील. पण "बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना ह्यामध्ये सहभागी होणारे" हे मायबोलीवर येऊन वाचणार, लिहिणार नाहीत, आणि सामाजिक जबाबदारी सर्वांचीच असली तरी मुख्य बदल हा त्या वर्गाकडून आणि व्यक्तींकडून अपेक्षित आहे.
पण तरीही ह्या विषयाला तू हात घातलास हे आवडले. वर लिहिल्याप्रमाणे कदाचित मी विचार न केलेले चांगले मुद्देही इथे येतील. त्यामुळे प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

फक्त मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे मायबोलीवर येणारा पुरुषवर्ग हा मध्यमवर्गीय, सुसंस्कारीत गटातला आहे. इथे बरेच जण येऊन कदाचित चांगले मुद्दे मांडतील. पण "बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना ह्यामध्ये सहभागी होणारे" हे मायबोलीवर येऊन वाचणार, लिहिणार नाहीत, आणि सामाजिक जबाबदारी सर्वांचीच असली तरी मुख्य बदल हा त्या वर्गाकडून आणि व्यक्तींकडून अपेक्षित आहे.>>>>
हे जरी खरं असलं, तरी मला मामीचा अपेक्षित मुद्दा जो समजलाय तो असा-
जर तुमच्यासमोर काही चुकीचं घडत असेल, मग ते रस्त्यातल्या छेडछाडीसारख्या "दिसणर्‍या" घटनेपासून ते माहितीतल्या एखाद्या घरी होणार्या, आणि सहजासहजी "न दिसणार्‍या" चुकीच्या वागणूकीपर्यंत काहीही, तर ते थांबवण्यात तुमचा काय सहभाग असतो? रस्त्यावर तिथल्यातिथे ते चुकीचं काम करणार्‍या पुरुषाला अडवणं इथपासून त्रयस्थ घरात घडणार्‍या घटनेमधे संबंधितांना परावृत्त करण्यापर्यंत अनेक प्रकारची जबाबदारी निभावता येऊ शकते, तर तुम्ही यातलं काय करता?

मामी बरोबर आहे का माझा समज?

पुरुष वर्गाला कळत नकळत वर्चस्व देणारी सामाजिक व्यवस्था बदलायची गरज आहे. घरा-घरात लहानपणापासूनच मुलगा आणि मुलगी हा भेदभाव न करता समान वागणुक दिली तर मानसिकता नक्कीच बदलु शकेल.

काही छोटे बदल -
घरात आई-वडिला नी एकमेकाना आधी समान वागणुक देणे.
आलटुन पालटुन पारंपारिक समजली जाणारी मुलींची कामं मुलाना आणि मुलांची मुलीना द्यायची. उदा - मुलाना स्वयंपाक, मुलींना घर साफ करणे.
काही उत्सव, सण यात बदल करणे - मुलींची मुंज ( केस न कापता), भावानी बहिणी ना ओवाळणे, पती ने पत्नी ला ओवाळणे, त्यांच्यासाठी व्रत ठेवणे.
शाळां मध्ये Domestic Violence, हुंडाबळी, बलात्कार याबाबत चर्चा घडवून आणणे.

चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद.

प्रज्ञा तुला मुद्दा अगदी बरोब्बर समजलाय .

शिवाय, याचबरोबर आपले परंपरेनं घडलेले पुरुषी मानसिकतेचे विचार तुम्ही कधी बदलण्याचा प्रयत्न केला आहे का? कसा? यावरही कोणाचे काही अनुभव असतील तर जरूर लिहा.

आपण मुलांना घरी , शाळेत मुलींची छेड काढु नये , अशी घटना पाहिल्यास मदतीसाठी हाका मारणे वगैरे गोष्टी समजाऊ शकतो.
मी कुठेतरी वाचलं होत की , भारतीय पुरुष स्त्रियांना जास्त न्याहळुन बघतात हे खर आहे का ? ( किंवा आशिया खंडातले). एअरपोर्टवर वगैरे गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार थोडाफार जाणवतो.

भारतीय पुरुष स्त्रियांना जास्त न्याहळुन बघतात हे खर आहे का ?>>> हो
>>
ईंटरेस्टींग Happy
मर्दोंकी सोसायटी अलग, औरतोंकी सोसायटी अलग .. यामुळे असावे..
जसे आमच्या शाळेत फक्त मुलेच असल्याने एक आकर्षण होतेच .. पण अपवाद वगळता लाजरेपणाही होता, न की हपापलेपणा .. त्यामुळे या न्याहाळण्यामागे समाजात घडणार्‍या गुन्ह्यांची कारणे शोधू नयेत असे मला वाटते..
बाकी विषयावर उद्या परवा, आता मुंबईत रात्रीचे ३ वाजल्याने शुभरात्री Happy

>>> नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ?<<<

हे प्रश्न विचारावेसे वाटले ह्याबद्दल अभिनंदन! कारण 'पुरुषी मानसिकता युगानुयुगे भयानकच होती' असे सरळसोट गृहीतक न वापरता तिच्यात अलीकडे काहीतरी फेरफार होताना दिसत आहेत हे डोळसपणे नोंदवले जात आहे.

पूर्वी पुरुष असेच वर्चस्व दाखवत असत, छळत असत, पण घरातील मोठ्यांचे काही किमान संस्कार तरी होत असत. त्या संस्कारांमध्ये माणसातील पशूत्व नष्ट करण्याचे सामर्थ्य असे. विवेक जागृत करण्याचे सामर्थ्य असे. घराघरातील संस्कार वेगवेगळे असले तरी काही किमान घटक समानच असत. आज संस्कारांना बाजूला सारून 'राहणीमान उंचावणे' हा घटक ठळक होऊ लागला आहे. ह्यामुळे पुन्हा एकदा माणसाचा प्रवास अतिशय धीमेपणाने रानटीपणाकडे होऊ लागला आहे, जीवघेण्या स्पर्धा, ताण, वाहतूक, शिक्षणातील अनंत आव्हाने, माध्यमांमधून होणारा हिंसेचा आणि वखवखीचा भडिमार ह्या सगळ्या गोष्टी माणसाला चटकन् व अचानक एखाद्या क्षणी पशूसारखे वागण्यास प्रवृत्त करत आहेत. ह्यासाठी जशी 'रोगप्रतीकारक शक्ती' असते तशी 'संस्कार' ही 'अविवेकप्रतीकारक' शक्ती होती. तिचे प्रमाण घटू लागले आहे.

मला वाटते की प्रामाणिकपणे सगळ्यांनी मान्य करायला हवे आहे की पुरुषांच्या (व तसे तर सर्वांच्याच) मानसिकतेत गेल्या तीन दशकांमध्ये खूप वेगाने नकारात्मक बदल झालेले आहेत. बदलांचा हा वेग आधीच्या वेगाच्या तुलनेत अमाप आहे. त्यामुळे 'आधीसुद्धा पुरुष असेच असायचे' हे काही प्रमाणात खरे असलेले विधान काही प्रमाणात गैरही आहे. कारण तेव्हाचे पुरुष किमान विवेकाने वागत असत जो ह्या तीन, साडे तीन दशकांनी पद्धतशीरपणे नष्ट केला. विशिष्ट प्रकारच्या वैचारीक जडणघडणीवर उभा राहिलेला आपला समाज तंत्रज्ञानाच्या अवाक करणार्‍या धबधब्याला आणि त्यातून उद्भवणार्‍या सांस्कृतीक उलथापालथींना सोसायची क्षमताच बाळगून नव्हता. जगातील ज्या देशांमधून ह्या गोष्टी इथे आल्या त्या देशांमध्ये त्या गोष्टींची निर्मीती झालेली असल्याने तेथे त्या गोष्टींचा स्वीकार होणे ही प्रक्रिया नैसर्गीक वेगाने झाली. आपल्याकडे मात्र नवनवे तंत्रज्ञान लादले गेले आणि आता आपण कोणीच त्याशिवाय राहू शकत नाही, राहू इच्छीत नाही आणि राहावे असे मला सुचवायचेही नाही.

आपण हे तंत्रज्ञान स्वीकारताना व त्याला सुधारीत / सुखासीन जीवनशैली मानताना आधीच्या समाजाला करावेच लागले नव्हते असे त्रास सहन करू लागलो. अंतरे वाढली, स्पर्धा तीव्र झाल्या, लोकसंख्या वाढते आहेच, ताण वाढला, एकत्र कुटुंब पद्धती ढासळली आणि माणूस स्वतःसाठी अजिबात वेळ न ठेवता नुसता यंत्रासारखा कमावू लागला. पण त्याच्या मनाला कोठेतरी शांततेची गरज असणारच. ही गरज भागत नसल्याची खंत त्याच्यामधील पशू दाखवू लागला.

एकंदरीत, 'संस्कारांमधून मिळणारा विवेक' नष्ट झाल्यामुळे मानसिकता अधिकच भयानक होऊ लागली.

=================

>>>पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का?<<<

प्रामाणिकपणे सांगायचे तर रोडसाईड रोमिओंशी पंगा घेण्याची हिम्मत होत नाही. ही हिम्मत न होण्यामागेही जवळपास तीच कारणे आहेत. पूर्वीच्या काळी असा पंगा कोणी घेतला तर चार सुजाण लोक पाठीशी उभे राहायला यायचे. आज मोबाईलवर भांडण, दमदाटी आणि मारामारी कॅप्चर करून यू ट्यूबवर टाकतील. उद्या ते रोमिओ माझ्या घरातील स्त्रियांना त्रास देऊ लागले तर माझ्यावतीने कोणी भांडायला येणार नाही. मी पोलिसांकडे जाणार नाही कारण त्या खात्याने विश्वासार्हता गमावली असल्याचेच मनात येते. एकुणात, प्रकार दडपून टाकण्याकडे बहुतेकांचा कल राहील.

निव्वळ गुळमुळीत संस्कार केंद्रे, जाणिव केंद्रे असले उपक्रम (तेही मुळातच सुजाणपणे वागणार्‍यांना घेऊन) चालवण्यातून जे खरे गुन्हेगार असतात ते कधीच बदलत नाहीत. ते अश्या गोष्टींना हसतात. त्यांच्यात बदल एक तर लहानपणी त्यांच्यावर चांगले संस्कार झाले असतील तर होऊ शकतात किंवा त्यांना कोणी फोडून काढले तर होऊ शकतात.

आपण खरोखरच हे मान्य करायला हवे आहे की पुरुषांना काय करता येईल ह्या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने 'विशेष काही नाही' असे येत आहे. आपले सामान्यत्व आणि भ्याडपणा दागिन्यासारखे जपणे ह्यात आपल्या आयुष्याचे सार्थक आहे असेच वाटत आहे.
==================

>>>दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? <<<

निदान नातेवाईक, सोसायट्या, कंपन्या येथे सर्वांना आठवड्यातून एकदा जमवून स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा घडवून आणावी. सातत्याने चांगल्या विचारांचे हॅमरिंग सर्व पातळ्यांवर करत राहावे. जे माध्यमांनी केले तेच पुरुषांनी आणि सर्वच जनतेने करावे. प्रत्येक जाहिरातीत स्त्रीसमस्यांबाबत एक एन्डिंग लाईन असावी. प्रत्येक समारंभात ह्याबाबत काहीतरी पाऊल उचलले गेल्याचे मुद्दाम दाखवावे. बाकी मी काय केले हे मी सांगतो. मी एक प्रतिज्ञा तयार केली होती. ती अशी:

"मी ह्या देशाचा एक नागरीक म्हणून अशी प्रतिज्ञा करतो की मी स्त्रीला पुरुषाइतकेच महत्त्वाचे मानेन, तिच्यावर माझ्याकडून अन्याय होऊ देणार नाही, इतर कोणी अन्याय करताना दिसले तर यथाशक्ती विरोध करेन. स्त्री-शक्तीचा विजय असो"

ही प्रतिज्ञा मी माझ्यामागोमाग सगळ्यांना म्हणायला लावत असे. मग ते सगळे म्हणजे कोण? तर कोणत्याही कार्यक्रमासाठी, अगदी दारू प्यायचा कार्यक्रम असला तरी त्यासाठी जमलेले लोक! लोक प्रथम कुतुहलाने फॉलो करायचे. प्रतिज्ञा संपायची तेव्हा सगळ्यांचे चेहरे आनंदी दिसायचे. प्रत्येकाला बरे वाटायचे. निर्भया प्रकरणानंतर मी हे सुरू केले होते. नंतर ते कधीतरी बंद झाले. आता पुन्हा सुरू करेन.
=======================

फारच लांबलेल्या पोस्टसाठी क्षमस्व!

चू भू द्या घ्या

-'बेफिकीर'!

प्रत्येक पुरषाने स्त्रीयांना मान देण्याची सुरवात स्वता:च्या घरापासुन करावी.
आई,बहीन,पत्नी,मुलगी आणि मग इतर. बाहेर समाजात स्त्रीयांना आदराने बोलणारे घरातल्या स्त्रीयांचा कचरा करताना पाहिले आहे.
मायबोली वर पण असे महाभाग पाहिले आहेत.स्त्री आय डी बाबतित ........ठेवणारे.
आसाराम ला पाठिशी घालणारे.

बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराबाबत बोलायचे झाले तर स्त्री-पुरुष संबंधाबाबत असलेले मागासलेपण सद्ध्याच्या परिस्थितीस कारणीभूत आहे असे माझे मत आहे. लैंगिक संबंध आणि लैंगिकता हे विषय खूप मोठे tabu आहेत. ह्याविषयी उघड चर्चा करणे किंवा तसे संबंध ठेवणे हे मुलगा-मुलगी "बिघडल्याचे" लक्षण आपण अजूनही मानतो. त्याबद्दलचे यथायोग्य ज्ञान देण्याऐवजी आपण आपल्या मुलामुलींनी त्यापासून दूर रहा, लग्न झाल्यावर हवे ते करा असे सल्ले देतो. पण त्यामुळे मुलामुलींच्या मनातील तारुण्यसुलभ भावना कमी होत नाहीत. उलट बंडखोर प्रवृत्तीच्या तरूणांचा जे tabu आहे तेच करण्याकडे कल होतो. त्यातूनही आई-वडिलांचे चांगले संस्कार असणारी, शिक्षण आणि करियरचे महत्व कळणारी मुलीमुले ह्या तारुण्यसुलभ भावनांकडे दुर्लक्ष करून महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. पण ज्या घरांमध्ये संस्कार किंवा शिक्षणाचा अभाव आहे तेथील मुले आणि मुलीसुद्धा विचित्र मार्गांचा अवलंब करताना दिसतात. पुराणकालीन भारत देश लैंगिक संबंधांविषयक जितका पुढारलेला होता तितकेच आज आपण मागासलेले आहोत. लैंगिक अत्याचारांमागचे हे प्रमुख कारण असावे असे मला वाटते. ह्यामध्ये सुधारणा घडायला वर्षानुवर्षे लागतील आणि त्या सुधारणा घडविण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांची जबाबदारी समानच आहे.

स्त्रियांवरील इतर अन्याय-अत्याचारांबद्दल बोलायचे झाले तर आधी अन्याय म्हणजे नक्की काय ते प्रत्येक पुरुषाने समजून घेतले पाहिजे. मुळात कोणत्या गोष्टी अन्यायकारक आहेत हेच कळले नाही तर अन्यायाचा विरोध तरी कसा करणार? तेव्हा आपल्या जवळच्या स्त्रियांकडे (आई, बायको, बहिण, मुलगी, मैत्रिण) पाहून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना कोणत्या गोष्टी चूक आणि अन्यायकारक वाटतात हे समजणे हे सर्वात पहिले पाऊल असेल. मला सर्व समस्यांची माहिती आहे अशा भ्रमात न राहता, ज्या गोष्टी पुरुषाला समस्या वाटत नाहीत त्या स्त्रियांकरिता खूप मोठ्या समस्या असू शकतात हे मुळातच पटायला हवे. त्यानंतर स्वतःकडून अत्याचार होणार नाही ह्याची काळजी घेणे हे दूसरे पाऊल असेल. त्यापुढे जाऊन मगच इतरांवरील अन्यायाला वाचा फोडणे, त्याचा विरोध करणे शक्य होईल.

मामी,

तुमचा हा धागा आल्यापासुन प्रतिसाद द्यावा का न द्यावा हे मनात चालले होते आज हिय्या करून बोलतो

(प्रस्तुत मत हे वैयक्तिक अनुभवांवर आधारीत सरसकटीकरण करायची मनापासून इच्छा अन हेतु नाही हे प्रथम वाचावे)

प्रसंग १
स्थळ : नवी दिल्ली एअरपोर्ट

काही टॅक्सी ड्राइवर्स एका भगिनीस पाहुन आचकट विचकट बोलत होते, त्यांस समज द्यावी अन प्रस्तुत स्त्रीस थोडा आधार वाटावा ह्या हेतुने (आम्ही देवाब्राह्मणा समक्ष माळ घातलेली अर्धांगिनी सोबत असताना) मी त्या रोड रोमियो लोकांस हटकले व सरकार दरबारी असलेला हुद्दा व ओळख ह्यांचा धाक घालुन गप केले (दिल्लीत नाइलाज असतो तिथे "पहुँच" किती आहे त्यावर टशन ठरते), हे केल्यावर त्या भगिनीस जेव्हा आम्ही "मॅडम आप डरिये नहीं मैं और मेरी वाइफ आपको लाउन्ज तक छोड़ देते है चलिए" इतके स्पष्ट बोलल्यावर सुद्धा त्या लेडी चा रिप्लाई थेट लिहायचा झाल्यास "Get lost u son of a bitch, I am independent to take care of myself, idiot" असा होता, त्या क्षणी बायकोचा उतरलेला चेहरा अन कोणी स्पर्श ही न करता माझे मुस्काड गरम केल्याची भावना शब्दांत मांडणे कठीण आहे, ह्यात माझी काय चुक होती?? तुम्ही विचारले एक पुरुष म्हणुन तुम्ही काय कराल? अश्या केसेस मधुन गेल्यावर मी स्वतःहुन ह्यापुढे स्त्रीदक्षिण्य ठेवावे काय??

प्रसंग दोन
स्थळ पटना रेलवे स्टेशन

एक मध्यमवर्गीय मध्यमवयीन स्त्री, रेलवे स्टेशन वर रात्री १० ची वेळ, विलक्षण घाबरलेली ही स्त्री, तिला दिलासा देताच ती रडु लागली अन म्हणाली "भैया प्लीज मुझे बोगी तक छोड़ोगे?" तेव्हा मदत केली तिला, आजही तिचा "भाईदूज" ला फोन असतो, फार काही नाही फ़क्त आभार प्रदर्शन अन भैया ठीक आहेत का नाही ही चौकशी असते

माझे कंफ्यूजन

मुळात मी फोर्सेज च्या वातावरणात पोसलेला जीव, स्त्री ही अबला असते कमजोर असते असे मी मानत नाही पण तिचे शारीरिक बळ हे कमी असते हे एक नैसर्गिक सत्य (प्रयत्न करता ते वाढते हा विश्वास अन द्वितीय सत्य) अश्या केस मधे गोंधळ उडतो मदत करावी का नाही हा, बघ्याची भूमिका पटत नाही अन स्थल -काल -आर्थिक स्थिती - अन देवाने दिलेले नैसर्गिक रूप असली परिमाणे लावणे चुकीचे वाटते मदत करताना पण प्रसंग एक प्रमाणे वेळ ओढवु नये ही इच्छा असते, (वरील परिमाणे स्त्रीत्वाचा अपमान आहेत असे प्रमाणिकपणे वाटते)

तुम्ही एक पुरुष म्हणुन ज्या जबाबदारी बद्दल बोलला आहात ती कुठली परिमाणे न लावता कशी उचलावी जेणे करून स्वतःचा आत्मसन्मान सुद्धा अबाधित राहील? हे माझे कंफ्यूजन आहे

(यावर बरंच लिहायचं होतं पण हपिसात असल्याने संक्षिप्त)
सोन्याबापू, मुलीला मॉडर्न कपडे घालणारी असेल तर आचकट विचकट बोलणे कानाआड करण्याची सवय असेल.प्लस बोलणारे पुढच्या पातळीला जाणार नाहीत या खात्रीसाठी तुमचा आणी बायकोचा नुसता प्रेझेन्सही तिला पुरला असता, जर ते त्यापुढे जाऊन धोकादायक ठरत आहेत असं वाटलं असतं तर मात्र तिने युनिफॉर्म मुळे तुमचा हस्तक्षेप अपेक्षित आणि वेलकम केला असता. (तसेच 'आज तू आलास मदतीला, रोज कोण येणार आहे, मला अपंग बनायचं नाही' ही भावना असू शकते.)
अर्थात दिल्ली हे शहर असं आहे की जिथल्या वातावरणाबाबत माझे बाळबोध अंदाज चुकीचेही असू शकतात.

अत्यंत उपयुक्त धागा आणि चर्चा!
मामी मनापासुन धन्यवाद.
तथाकथित सुसंस्कृत समाजात मला/आपल्याला सुरक्षित वाटत नाही, तर असे नसणार्‍या वर्गातील (उदा. वस्त्या, वाड्या, झोपड पट्टी) मुली/ आई ला किती भिती वाटत असेल?
खुद्द वडिल, मोठा-छोटा सख्खा चुलत, मामे मावस...भाऊ, शेजारी पाजारी, शिक्षक. अनेक घटना घडल्या आहेत.
याच कारणाने आम्ही लेकिचे लग्न १५-१७ व्या वर्षी करतो असे आमच्या मेड ने सांगितले. ज्याला माझ्या कडे काहीही उत्तर नव्हते. Sad
मला वाटते हा प्रश्न- शालेय अभ्यासक्रमतील एक विषय करावा. व बालपणापासुनच याची ओळख, शिकवण सुरु करावी. जेणे करुन मुलांना (मुलगे) कळेल व तसे संस्कार होतील. खुप काही आदर्शवादि अथवा थेरॉटिकल नाहिये. काही प्रमाणात जरी फ़रक पडला तरी उद्देशाचे यश शंभर टक्के आहे.

सोन्याबापू तुमचे कंफ्यूजन रास्तच आहे!! पण पुष्कळ स्त्रियांना पुरुषांची मदत घेणे आवडत नाही त्याचप्रमाणे मदत करणार्‍याच्या हेतूबद्दलसुद्धा संशय असतोच. छेडछाड सहन करण्याची भारतीय स्त्रियांना इतकी सवय झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणी मधे पडून मदत करेल अशी अपेक्षाही नसते. त्यामुळेसुद्धा अशी टोकाची रिअ‍ॅक्शन दिली जाते असेल.

सोन्याबापू, तुम्ही लिहिलेला प्रसंग वाईटच. पण असं काही घडणं फार फार दुर्मिळ असेल. तिनं नेमक्या कोणत्या मनस्थितीत तुम्हाला असं उत्तर दिलं माहित नाही. तिला माफ करून टाका. पण त्यावरून जनरलाईज करू नका इतकीच विनंती. तुमची मदत इतर कोणा स्त्रीला अतिशय महत्त्वाची ठरू शकते.

मला वाटते हा प्रश्न- शालेय अभ्यासक्रमतील एक विषय करावा. व बालपणापासुनच याची ओळख, शिकवण सुरु करावी. जेणे करुन मुलांना (मुलगे) कळेल व तसे संस्कार होतील. खुप काही आदर्शवादि अथवा थेरॉटिकल नाहिये. काही प्रमाणात जरी फ़रक पडला तरी उद्देशाचे यश शंभर टक्के आहे. >>> होय. हे नक्कीच करता येईल. अजिबातच थिऑरेटिकल नाहीये.

याशिवाय जर सामाजिक भान आलेल्या प्रत्येक पुरुषानं निदान अजून एका पुरुषाला, मुलग्याला या बाबतीत सजग केलं तरीही खूप काही साध्य होईल. आणि हे करणंही तितकं कठिण नाही. अगदी आपल्या शेजारी, नात्यातला अथवा घरातला मुलगा / पुरुष जर स्त्रियांविषयी प्रतिगामी विचार बाळगत आहे हे लक्षात आलं तर त्याला समजावून, त्याच्याशी बोलून, वाचायला लावून त्याचे विचार योग्य वळणावर आणून ठेवता येतील. हे ही काही आदर्शवादी नाहीये. मुळात ही पुरुषवर्गाची/ ची(ही) जबाबदारी आहे हे लक्षात घ्यायला हवंय.

मामी ,

मी जनारालाइज अजिबात करत नव्हतो/नाह/नसेन , माफ़ी च काय नाय हो इतके कधीच सोडला तो विषय आज विषयानुरूप आठवले इतकेच!

पुरुष म्हणून जी सामाजिक जबाबदारी आहे तिची सुरुवात ही स्वतःच्या घरापासूनच व्हायला हवी. "मुलीच्या जातीला..." अशा शब्दांनी चालू होणारे वाक्प्रचार घरात बोलणे थांबले पाहिजेत. ज्यांना मुलगे आहेत त्या पालकांनीही स्वतःच्या मुलाला घरातील आणि बाहेरील स्त्रीचा आदर करण्यास स्वआचरणातून शिकवले पाहिजे.

लैंगिक शिक्षण हे वयात आलेल्या मुला-मुलींना सर्वप्रथम आई-बाबांकडून मिळायला हवे. ते देत असताना मुलांच्या शंकांचे समाधानकारक उत्तर देता आले पाहिजे. वयात येणारा मुलगा/मुलगी सेक्ससंदर्भात बोलताना/वाचतांना/बघतांना आढळली तर त्याचा अति बाऊ न करता त्यांच्या भावना समजून घेतल्या तर बरे पडेल असे वाटते. नाहीतर घरी आई-बाबांच्या धाकाने गुडबॉय आणि गुडगर्ल असलेली हीच मुले बाहेर गुण उधळताना दिसून येतात. मुळात हे असे आई-बाबांसमोर बोलायचे /बघायचे नसते ही मानसिकता बदलली पाहीजे मुले आणि आई-बाबा मित्र होणे गरजेचे.

त्याचप्रमाणे हे घडणारे बलात्कार, अत्याचार यांत बहुतांशी आरोपी हे आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या निम्नस्तरातील असलेले आढळून आले आहे. त्यामुळे वरील मुद्द्यात घरच्या पातळीवर करायच्या गोष्टी या अशा लोकांच्या घरांतून घडतीलच असे नाही कारण शिक्षणाचा अभाव !

अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कायद्याचा धाक असणे. गिळगिळीत, मिळमिळीत कायद्याच्या तावडीतून कसेही सुटता येते हा समज खोटा ठरेल असे कायदे जारी केले जावेत, अगदी शिवाजीराजांच्या राज्यात होते तसे. तर या प्रकरणांवर वचक बसू शकतो.

वरती कुणीतरी लिहिल्याप्रमाणे पोलिसखात्यावरचा उडालेला विश्वास हे अगदी दुर्दैवी सत्य आहे. मागे आमच्या ऑफिसात सेल्फ डिफेन्स कोर्स आयोजित केला होता. त्यावेळेस इन्स्ट्रक्टरने स्वतःच असे सांगितले होते की काही प्रसंग घडला आणि पोलीसांची मदत घ्यावीशी वाटली तर कृपया एकट्या पोलीस स्टेशनवर जाऊ नका. कमीत-कमी ५-१० जणी मिळूनच जा. अन्यथा छेडछाड करणारे रोडरोमियो परवडले पण या पोलीसांचे प्रश्न नकोत असे म्हणायची पाळी येईल.

स्त्रीवरील अत्याचारांच्या संदर्भात पुरुषांनी स्वतःच्या / इतर पुरुषांच्या वर्तनात (/मानसिकतेत) काय सुधारणा घडवाव्यात असा मूळ धाग्याचा विषय आहे.

काही सदस्यांचे प्रतिसाद 'एकुणात काय काय व्हायला हवे आहे' इकडे जाऊ लागले आहेत.

बघा बुवा, मला तरी वाटते की चर्चा अजूनही सुसंगत वळणावर आलेलीच नाही आहे. Sad

बेफी, फार टेक्निकॅलिटीत जाऊ नका. चर्चा होऊ देत. नुसते शब्दच्छल, विषयाला धरूनच वगैरे पेक्षा त्यामागील विचार आणि भावना महत्त्वाच्या. विचारमंथनही गरजेचं आहेच आणि त्यातून निघणारे अ‍ॅक्शन पॉइंटसही.

स्त्रीवरील अत्याचारांच्या संदर्भात पुरुषांनी स्वतःच्या / इतर पुरुषांच्या वर्तनात (/मानसिकतेत) काय सुधारणा घडवाव्यात असा मूळ धाग्याचा विषय आहे. >>> हे बरोबर आहे. आणि या भोवती चर्चा केंद्रित व्हायला हवीय. पण तरीही.....

>>>> स्त्रीवरील अत्याचारांच्या संदर्भात पुरुषांनी स्वतःच्या / इतर पुरुषांच्या वर्तनात (/मानसिकतेत) काय सुधारणा घडवाव्यात असा मूळ धाग्याचा विषय आहे. <<<<<
बेफिकीर, हा संस्कारविषय आहे. संस्कार निरनिराळ्या पातळीवर निरनिराळ्या ठिकाणांहून होत असतो.
त्यात आईवडील भाऊबहिण जसे येतात तसेच शाळकरी/महाविद्यालयीन सखेसोबतीही येतात.
संस्कारांमधे मिडीयामार्फत स्त्रीविषयक भोगवस्तु म्हणुन अप्रत्यक्षरित्या केल्या जाणार्‍या "प्रतिमांच्या" हल्ल्यांचाही समावेश होतो.
या सर्व ठिकाणी, निव्वळ पुरुष एके पुरुष असे नसते, तर स्त्रीव पुरुष दोनही घटक बर्‍यावाईट संस्कारांना जबाबदार असतात.
तेव्हा निव्वळ "पुरुषांनी" काय करायला हवे या प्रश्नाचा रोखही कळला नाही वा उद्देशही.

तेव्हा निव्वळ "पुरुषांनी" काय करायला हवे या प्रश्नाचा रोखही कळला नाही वा उद्देशही. >> निव्वळ पुरुषांनी असं नाही. 'पुरुषांनी काय करावं?' असा प्रश्न आहे.

स्त्रियांनी काय काय करावं, कुटुंबानं काय करावं हे अनेकदा चर्चिलं गेलं आहे.

>>>चर्चा होऊदेत<<<

मग ठीक आहे. धाग्यातही 'एकंदरीत उपाय-योजना' असे एक आवाहन केले जाऊ शकेल.

मात्र, सदस्य चर्चा करत नाही आहेत म्हणून प्रतिसादांमधून धाग्याच्या विषयाची व्याप्ती वाढवण्याचे सूचित करणे हे मला व्यक्तीशः पटत नाही. असो! मला इतकेच म्हणायचे होते.

==========

लिंबूभाऊ,

तुम्ही विषय नीट ध्यानात घ्या. स्त्रीवरील अत्याचारांना शेकडो कारणे असतील. सदर धाग्यामध्ये त्यापैकी 'पुरुषांची मानसिकता' ह्या एका कारणावर चर्चा करणे अपेक्षित आहे. (आता काही अधिकही बाबी अपेक्षित आहेत असे वर सूचित करण्यात आलेले दिसते, ते वेगळे). तुम्ही स्वतंत्ररीत्या 'फक्त पुरुषांनी काय काय सुधारणा करणे शक्य आहे' ह्यावर लिहू शकता का बघा! ते अशक्य मुळीच नाही. आणि त्याचा अर्थ असाही होत नाही की इतर घटक कारणीभूत नसतातच.

तुम्ही स्वतंत्ररीत्या 'फक्त पुरुषांनी काय काय सुधारणा करणे शक्य आहे' ह्यावर लिहू शकता का बघा! ते अशक्य मुळीच नाही. आणि त्याचा अर्थ असाही होत नाही की इतर घटक कारणीभूत नसतातच.

>>> नेमकं लिहिलंयत बेफी. धन्यवाद.

बेफिकीरजी, माझे कन्फ्युजन होते आहे, कसे ते बघा हं.....
माझ्या पहाण्यातील बरेच पुरुष फॉरवर्डेड मेसेजेसमधुन वा डाऊनलोड करुन "पोर्न" वा तत्सम बरेच काही फोटॉ/व्हिडीओ चवीचवीने बघत/दाखवत असतात अन मग त्याच चवीचवीने लाळघोट्या नजरेने कृत्रीम स्क्रीनवरील नजर हटवुन प्रत्यक्षात दिसणार्‍या स्त्रीयांचे नुस्ते अंगप्रत्यंगच न्याहाळत बसत नाहीत तर त्यावर "रसभरित" चर्चाही करत रहातात. आता एक शक्यता फारच कमी की या मुडदुस पांढरपेशांपैकी कुणी "प्रत्यक्ष स्त्रीवर हल्ला करील" मात्र पोर्न बघुन झाल्यावरची त्यांची दशा ही जवळपास तशीच असते यात मला तरी शंका नाही, फक्त त्यांना संधी मिळत नाही.
अशा वेळेस अशांच्या गाभुळलेल्या नजरांचा त्या त्या स्त्रीयांना किती त्रास होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
अशा प्रकारे दाखविणारे/बघणारे माझ्या आजुबाजुला असले तरी मला त्यात ओढू शकत नाहीत्/ओढायला जात नाहीत कारण त्यांना लिंब्या त्यांची शब्दानेच चारचौघात कशी सोलवटून काढेल हे माहिती असते.

तर मुद्दा असा की, अशा पोर्न वगैरे व तत्सम सेक्स्युअली उद्दीपीत करणार्‍या जाहिराती वगैरे चा विषय निघतो, तेव्हा त्यावरील बंदीबाबत पोर्नचे आधीन शौकिन पुरुषवर्गाचे खान्द्याला खान्दा लावुन व्यक्तिस्वातंत्र्याचे नावाखाली बहुसंख्येने सुशिक्षित स्त्रीवर्गही उभा राहिलेला दिसतो तेव्हा मला प्रश्न पडतो की आधी "पुरुषांची नजर" बदलायला हवी, पुरुषांची कर्तव्ये काय ते उगाळायला हवय की आधी स्त्रीयांनीच आपापसातले "मतभेद" दूर सारुन विशिष्ट विषयांवर ठाम कोणती भुमिका घ्यायची ते ठरवायला हवे?

हाच विषय, चिन्ह अंकाचे वेळेस, चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी "नग्नतेचे" चित्रण शिकण्याकरता समोर नग्न जिवंत मॉडेल्सच उभी करावित वा न करावित या वेळेस होता.

हाच विषय, आबा पाटलांनी बारमधे मुली नाचविण्यावर घातलेल्या बंदीचे वेळेस चघळला गेला होता.

तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या व स्त्रीपुरुष समानतेच्या नावाखाली वरील पोर्नोदिक/नग्नतेच्या बाबींना व कलाकारांच्या स्वातंत्र्याच्या(?) नावाखाली "नग्न चित्रणाला" वेळॉवेळी पाठीबा व्यक्त करणार्‍या स्त्रीया खर्‍या की स्त्रीवर अत्याचार होतो म्हणून परत पुरुषांचीच जबाबदारी काय असे विचारणार्‍या/अपेक्षिणार्‍या स्त्रीया खर्‍या, या दोहोंमधे माझा गोंधळ होतो आहेच, शिवाय मी बघितलेल्या/अनुभवलेल्या वरील "व्यक्तिस्वातंत्र्यवादी व स्त्रीपुरुषसमानतावादी" स्त्रीयांचे व्यतिरिक्तही या समाजात बाकी स्त्रीवर्ग आहे वा नाही, असेल तर त्यांची मते काय, मला कशी समजु शकतील इत्यादि प्रश्न पडत आहेत.
बेफिकीरजी, कृपयाच मला मार्गदर्शन करावेत ही विनंती. Happy

Pages