एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष,

ही लेटेस्ट पोस्ट आवडली पण तोही विषय किंचित वेगळाच वाटत आहे. मात्र 'मुलगी ह्या विषयावर बोलत असताना तिच्याशी अर्ग्यू करू नका' हा पुरुषांनी करायचा भाग मात्र फार उत्तम मांडलात! तेवढे नक्कीच करता येईल कोणालाही!

पुढील पोस्टमध्ये मी ह्या चर्चेबद्दल मला जे काही प्रामाणिकपणे वाटले ते लिहायचा प्रयत्न करतो.

१. चर्चाप्रस्तावाचा सूर थेट आणि नेमका होता. त्यातील 'नक्की काय बिघडतंय' हे तीन शब्द कळीचे वाटले. परिस्थिती एकुण वाईटच होती पण आता ती आणखी वाईट होत आहे हे नोंदवल्याचे ते चिन्ह वाटले. ह्या समस्येची इतर कारणे येथे चर्चिली जाऊ नयेत असे तीव्रपणे सुचवण्यामागे एक आवाहन होते की केवळ आणि केवळ एकाच सर्वाधिक महत्त्वाच्या कारणावर एकाग्र होऊन लिहा.

२. अनेकदा चर्चांचे विषय असे असतात की त्याबाबत ज्याला जे काही वाटते ते तो लिहून मोकळा होतो. तसेच काही प्रमाणात येथेही झाले. चर्चा 'पुरुषी मानसिकतेत बदल कसे करया येतील' ह्या विषयावर आणण्याचे प्रयत्न करत राहावे लागले. पण तरीही प्रतिसाददात्यांचा प्रचंड तोल वगैरे गेल्याचे कुठे जाणवले नाही. मुख्य म्हणजे ही एक गंभीर समस्या आहे आणि त्यावर उपाययोजना व्हायला हव्या आहेत हे सर्वांनी मान्य केले. हे एक यश म्हणता येईल.

३. वैयक्तीक मतमतांतरे झाली पण ती सहसा शॉर्ट लिव्ह्ड असतात व त्यामुळे त्यातील भावनिक तीव्रतेकडे कानाडोळा करणे शक्य व स्वागतार्ह आहे.

४. समस्येच्या इतर कारणांचा विषय शेवटी निघालाच आणि तो विषय काढणार्‍या सदस्याला निदान इतके मान्य झाले असेल की तो विषय न काढताही ह्या समस्येवर चर्चा होऊ शकते, अशी आशा आहे. जर ते मान्य झाले असेल तर तेही एक यश म्हणावे लागेल.

५. उपाय म्हणून अनेक चांगल्या गोष्टी सुचवल्या गेल्या. त्या कोणत्या ते कृपया धागाकर्तीने स्वतंत्र प्रतिसादात नोंदवावे कारण त्यातील काही मीही सुचवलेल्या होत्या.

६. चर्चेसाठी पुरेश्या माबोकरांनी वेळ दिला नाही. 'ह्यावर आधी चर्चा झालेल्या आहेत' किंवा 'इथे वेगळे काय होणार' अश्या विचाराने वेळ दिला नसावा. ही उदासीनता हसून खेळून घेण्यासारखी नाही तर हाच मुळात एक प्रश्न आहे असे म्हणावे लागेल.

७. करण्यासारखे किंवा सुचवले गेलेले उपाय अगदी ठोस, प्रभावी, अंमलात आणण्याजोगे वगैरे नसले तरीसुद्धा 'निव्वळ पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी पुरुषांनी काय करावे' ह्यावर चर्चा होऊ शकते हा विचार ह्या निमित्ताने येथे रुजला हेही नसे थोडके.

८. ह्या समस्येच्या इतर कारणांवर चर्चा होण्यास स्त्रीवर्गानेही तितकेच मोकळ्या मनाने तयार असावे जितके पुरुषी मानसिकतेबद्दल बोलण्यास त्या तयार असतात अशी माझी व काही इतरांची अपेक्षा ह्या निमित्ताने नोंदवतो.

प्रत्यक्ष आयुष्यात माणूस कसा असतो आणि त्याने कसे असावे ह्या दोन बिंदूंमधील प्रवासात आंतरजालावर भासमान व्यक्तींसोबत होणार्‍या अश्या चर्चा आशचर्यकारकरीत्या महत्त्वाच्या ठरू शकतात. विचार बदलू शकतात. तेव्हा 'फुक्कट वेळ गेला' असे म्हणण्यापेक्षा आपापले चार पैसे प्रत्येकाने टाकायला हवेत असे वैयक्तीक मत आहे.

चर्चा अजूनही सुरू राहील अशी आशा!

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

गुंतागुंतीचा विषय आहे त्यामुळे निवांत सहभागी व्हावं असं ठरवलं होतं. आता कन्क्लुड केलंच आहे तर ओके.

१. चर्चाप्रस्तावाचा सूर थेट आणि नेमका होता. त्यातील 'नक्की काय बिघडतंय' हे तीन शब्द कळीचे वाटले. परिस्थिती एकुण वाईटच होती पण आता ती आणखी वाईट होत आहे हे नोंदवल्याचे ते चिन्ह वाटले. ह्या समस्येची इतर कारणे येथे चर्चिली जाऊ नयेत असे तीव्रपणे सुचवण्यामागे एक आवाहन होते की केवळ आणि केवळ एकाच सर्वाधिक महत्त्वाच्या कारणावर एकाग्र होऊन लिहा.>>> हे काही पटले नाही. प्रसारमाध्यमांमुळे ह्या प्रकारांचे चर्वण जास्त होते पण घडत काही नाही. परिस्थिती जास्त वाईट झाली असे काही वाटत नाही, गोष्टी उघडकीला जास्त येतात. मला लिंबूची मतं पटतं आहेत. जिज्ञासा यांनी सगळ्या पुरुष जमातीला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले ते काही पटले नाही पण I can understand where it's coming from. मला स्वतःला परावलंबित्व स्त्री म्हणून आवडत नाही म्हणून वाईट प्रवृत्तिची मानसिकता बदलेल अशी अपेक्षा ठेवणे सुद्धा मला परावलंबित्वच वाटेल.

>>>वाईट प्रवृत्तिची मानसिकता बदलेल अशी अपेक्षा ठेवणे सुद्धा मला परावलंबित्वच वाटेल.<<<

उर्वरीत प्रतिसादाबद्दल सध्या काही म्हणत नाही. पण वरचे वाक्य (मला) फार महत्त्वाचे वाटले.

'महत्त्वाचे वाटणे' ह्याचा अर्थ पटणे किंवा न पटणे ह्यापैकी काहीच समजला जाऊ नये हे वेगळे लिहितो.

व्वा! बेफीकीर यांचे विचार खुपच आवडले,काही वर्षांपुर्वी बेफीकीर यांनी याच विषयावर एक सुंदर लेख लिहाला होता,फेसलेस एन्काऊंटर या नावे.या सत्यकथेत दिपा म्हेत्रे यातरुणीला आलेले अनुभव दिले आहेत.डोन्ट मिस ,मस्ट रिड

http://www.maayboli.com/node/39478

बर झालं आलात बेफी.
बेफी, तुमच्यात आणी दिपा म्हेत्रेमध्ये वोल्वोत त्या रात्री काय घडलं याच्यावर भाष्य करायचा मला अधिकार नाही.पन असल्या प्रसंगाचे रसभरीत वर्णन टाकण्यामागे तुमचा काय उद्देश होता ते जरा विस्तृतपने सांगीतले तर बरे होईल,आणी त्या लेखामध्ये तुम्हि खालील वाक्य टाकले आहे,

<<<<
आपण लोक साले वासनेला इतके अस्पृश्य का समजतो? असतेच
की प्र्तय्केआच्या मनात? एकाला मार्ग मिळतो हे मान्य करून
व्यक्त होण्याचा, एकाला नाही!
खर्याला खरे न मानणे म्हणजे हिंदू संस्कृती!>>>>>>>

याचा पण अर्थ सांगा जरा,

काय चुकीचे वाटले त्यात?

वासना प्रत्येकाच्या मनात असतेच. एकाला मार्ग मिळतो, एकाला नाही.

ह्या सगळ्याचा अर्थ असा होत नाही की एकाला हवे असताना दुसर्‍याने एकाला हवे तसे वागावे किंवा एकाचे वागणे सहन करावे.

तुम्ही (तुमच्या ह्या कोणत्यातरी आय डी ने ?) तुमचे आंतरजालीय पटूत्व सिद्ध करण्याच्या भानगडीत माझी चोवीस-मालिका उद्धृत करून स्त्रियांवरच बदनामीचा शिक्का मारत आहात.

येथील चर्चा 'त्याच त्या' नजरेने बघणार्‍या पुरुषांबद्दलची आहे. 'हवे तेव्हा हवे त्या नजरेने बघणार्‍या' स्त्रियांबद्दलची नाही. Happy

अश्या स्त्रिया समाजात असतात हे ह्या धाग्यावर सिद्ध करत बसणे हे मला ह्या धाग्याच्या स्पिरिटच्या विरोधी वाटते. उद्या जर असा धागा निघाला की स्त्रियांमध्ये कोणकोणते विचारप्रवाह आजकाल नांदू शकतात तर त्यात कदाचित अशी उदाहरणे लागू होतीलही. Happy

मला वैचारीकदृष्ट्या नग्न करण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही तुम्ही अयशस्वीच ठराल ह्याची मला खात्री आहे कारण त्या मुद्याचा विरोध करणार्‍या इथेच पन्नास स्त्रिया तुम्हाला मिळतील.

अत्यंत दुर्दैवीरीत्या ही चर्चा नको त्या वळणावर नेलीत हे पाहून ह्यापुढे मी येथे लिहिणे थांबवत आहे. ह्याचे कारण 'स्वतःला सिद्ध करणे' हा ह्या धाग्यावरील चर्चेत सहभागी होण्याचा माझा मूळ उद्देश नसूनही तुमच्या दोन पोस्ट्समुळे मला आधी ते करत बसावे लागेल आणि चर्चा बिनसेल. Happy

माझी बदनामी करण्यासाठी तुम्हाला आभाळभर शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

sarcosuchus imp... | 13 August, 2015 - 08:11
बर झालं आलात बेफी.
बेफी, तुमच्यात आणी दिपा म्हेत्रेमध्ये वोल्वोत त्या रात्री काय घडलं याच्यावर भाष्य करायचा मला अधिकार नाही.पन असल्या प्रसंगाचे रसभरीत वर्णन टाकण्यामागे तुमचा काय उद्देश होता ते जरा विस्तृतपने सांगीतले तर बरे होईल,आणी त्या लेखामध्ये तुम्हि खालील वाक्य टाकले आहे,

>>>>>>>>>>

ती गोष्ट होती sarco...
कथा, सिनेमा आणि वास्तव ह्यातला फरक लोकाना का समजत नाही हा प्रश्ण आहे?
कथेत, कवितेत, सिनेमात, नाटकात लेखकाला, दिग्दर्शकाला पुर्ण स्वतन्त्र्य असते. त्यात खुन होउ शकतात,
रोड रोमियोबरोबर प्रेम होउ शकते, १००व्या मजल्यावरुन उडी मारुन जिवन्त राहु शकतो सर्व होउ शकते.
त्यामागचा उद्देश शोधुन त्याची वास्तवाशी सान्गड घालण्यात काहीच पॉइन्ट नाही.

ती गोष्ट होती sarco...>>>>>>>ती सत्यघटना आहे , वाटल्यास बेफीनाच इथे विचारा ,तेच सांगतील तुम्हाला.बेफींनीच वरती प्रतीसाद दिला आहे,हा घ्या.

>>>>>बेफ़िकीर | 13 August, 2015 - 10:51
हा हा! मस्त काऊंटर!
खरे आहे. मी रोज बदलत आहे असे सांगायला मला लाज वाटत
नाही.<<<<<
याचा अर्थ ती घटना खरी आहे व कथेतही बेफींनी तसे लिहिले आहे.

ती खरी असेल किन्वा खोटी एखाद्या लेखकाला त्याचा लेखनात त्याने लिहिलेले आपण प्रत्यक्षात साक्षी पुराव्यासारखे
वापरु शकतो का? याचे उत्तर मला तरी ते अयोग्य होइल वाटते.
उदा एखाद्या मुलीला सिडने शेल्डनच्या गोष्टीततला हिरोने कॉपीरुम मध्ये केलेला रोमान्स आवडला असेल आणि ती चवीने वाचत पण असेल याचा अर्थ प्रत्यक्ष आयुष्यात आपल्यासोबत अशी घटना व्हावी असे आवडेल असे नाही.
तिला तिच्या या विचाराबद्दल कोर्टात आणने चुकीचे आहे तेव्हढेच लेखकाला लेखनाबद्दल.

एखाद्या कवीने कधी कधी मला असे वाटते म्हणुन एखादा अवास्तव विचार लिहिला किन्वा विजय तेन्डुलकरानी
जर नाटकात "बलात्कार असला तरी त्याचा राकट स्पर्श मला आवडला" अशी वाक्ये टाकली (जी मला एकदम चुकीची वाटतात व अमान्य आहेत) तरी त्यातुन वैयक्तिक रीत्या मला प्रत्यक्ष जीवनातील घटनाबद्दल लेखकाला जबाबदार धरावे हे चुकीचेच वाटते. (ह्याउलट त्या कथेपुरती समिक्षा करताना तुम्ही हे मत मान्डु शकतात). याला अनेक कारणे आहेत.
१) अशी घटना लेखकाने स्वतः सान्गितल्याशिवाय आपल्याला कळत नाही.
२) लेखकाने ती खरी म्हणुन लिहिली असेल तरी ती बरेचदा कल्पनाविस्तार ही असु शकते.
३) लेखन हे बरेचदा विवादास्पद सन्कल्पनावरच केले जाते त्यामुळे लेखकाला समाज्कन्टक व्रुत्तीच्या बाजुनेही लिहावे लागते, वा लिहिले जाते.

जर अशा प्रकारे लेखकाला जज केले जाउ लागले तर साने गुरुजीन्च्यानन्तर सर्व काही ललित लिहुन सम्पले असेच म्हणायला हवे. (इथे साने गुरुजीन्चा अपमान नाही, सुन्दर पत्रे ही मला तितकीच आवडतात जितकी बेफीन्ची प्रकरणे लिहिण्याची लेखनशैली)

या विषयावर वाद बरेचदा झाला आहे आणि इथे अवान्तर होइल म्हणुन हेमाशेपो.

मामी,

>> फार समजुतदार पोस्ट ऋन्मेष. पुरुषांनी अशी संवेदनशीलता आणि संयम दाखवला की बरं वाटतं.

सहमत. पण इथे ऋन्मेऽऽष यांनी पुरुषांनी काय करू नये हे सांगितलंय. याचं 'काय करावे' मध्ये कसं रुपांतर करायचं?

तसं करू गेल्यास 'पुरुषाने संवेदनशीलता व संयम दाखवावा', असा तुम्ही लिहिलेला अर्थ निघतो. एक पुरूष म्हणून अशा रीतीने सामाजिक जबाबदारी निभावणे योग्यही आहे. मात्र याचा गुन्हेगारावर कितपत प्रभाव पडेल याची शंका आहे.

त्या संदर्भात देखील विचार व्हावा. Happy ऋन्मेऽऽष यांची उकल अर्धी समस्या हरण करते. उर्वरित तशीच आहे.

आ.न.,
-गा.पै.

ज्या गोष्टी पुरुषाला समस्या वाटत नाहीत त्या स्त्रियांकरिता खूप मोठ्या समस्या असू शकतात हे मुळातच पटायला हवे.
>>>

हो, हे मला अनुभवाने समजले आहेच, पण मगाशीच थोडीशी ज्ञानात भर माझ्या आणखी एका मेल कलीगच्याही पडली.

चर्चा याच विषयावर जी आम्ही दोघे पुरुष व दोन सहकर्मचारी स्त्रियांमध्ये चालली होती.

त्यातील एक मुलगी सांगत होती की कसे तरुण मुलांपेक्षाही मध्यमवयीन वा वय उलटलेले घातक असतात. बसमध्ये २०-२५ ची कॉलेजची तरुण मुले शिस्तीत बसतील, पण ४०-४५ चे स्पर्शाला हपापलेले असतात. शेजारी बसलेले असताना झोप आल्याचे नाटक करत अंगावर घसरतात, हळूच बोटाची टोके खांद्याला रुतवायला बघतात. माझ्याबरोबरच्याला हे पचनी पडायला जड जात होते, तर मला आधीही काही मैत्रीणींकडून असे किस्से ऐकल्याने कल्पना होती.

हो
हे अगदी खर आहे
तरुण मुलांपेक्षा ५० -५५ वयाचे काही लोक फार विकृत असतात
कॉलेजमधे २ वर्ष एस टी ने अप डाऊन करायचे तेव्हा जर मुलींजवळ बसायला जागा नसेल तर मी एखाद्या मुलाशेजारी बसायचे पण म्हातार्या जवळ अजिबात नाही
मुलं सावरून बसतात पण थेरडे मुद्दाम धक्का मारायला बघतात Angry
आणि काही बोलायला गेल की ,अग तू माझ्या मुलीसारखी आहेस ,नातीसारखी आहेस असलं काहीतरी बोलतात
एकदा एका म्हातार्याला चांगल झापल होत मी
थेरडा म्हणायला लागला' अग तू माझ्या नातीसारखी आहेस म्हणून खांद्यावर हात ठेवला ':राग:
भरपूर तमाशा केला कंडक्टर ला सांगितलं ह्या म्हातार्याला आत्ताच्या आत्ता खाली उतरवा
तो कंडक्टर चांगला होता म्हणून त्याने त्या माणसाला उतरवल
आणि जर कधी बसायला जागा मिळाली नाही तर मग विचारायलाच नको ,येणाऱ्या जाणार्यांचे असंख्य धक्के
प्रवास संपेपर्यंत वैताग यायचा ,अगदी नको नको वाटायचं Angry

वरच्या पोस्टमध्ये मी थेरडा असा शब्द वापरायला नको होता
पण ती दोन वर्ष आठवली आणि संताप झाला
अशा म्हातार्यांसाठी थेरडा असाच शब्द येतो मनात

ऋन्मेऽऽष,

>> त्यातील एक मुलगी सांगत होती की कसे तरुण मुलांपेक्षाही मध्यमवयीन वा वय उलटलेले घातक असतात.

खरंय हे. माझ्या अनेक मैत्रिणींकडून ऐकलंय. हे केवळ अनोळखी ठिकाणीच (बशीत वगैरे) नाही, तर कचेऱ्यांतूनही सर्रास होतं. Sad तरुण पोरं नीतिमत्तेची जरातरी चाड बाळगून असतात. पण तारुण्य संपल्याने वयस्कर लोकांची गोची झालेली असते.

आ.न.,
-गा.पै.

मनरन्ग तुमचा राग समजू शकतो... आणि अशा प्रकाराबद्दल चिड यायलाच हवी. तुम्ही वर्णन केले आहे अगदी तस्साच अनुभव माझ्या बायकोचा आहे. बस मधे पिशवी/ दप्तर असा अडथळा ठेवणे अशा युक्ती करायची.

याला असन्तुष्टते मधुन निर्माण झालेली मानसिक विकृतीच म्हणायला हवी...

मामी कडून अजून एक इंटेलिजंट धागा.. हॅट्स ऑफ टू मामी!!

,' फार समजुतदार पोस्ट ऋन्मेष. पुरुषांनी अशी संवेदनशीलता आणि संयम दाखवला की बरं वाटतं.' + १००

या धाग्याच्या निमित्ताने येथील प्रत्येक मेल सदस्याने सेल्फ इंट्रोस्पेक्शन केलं तर त्यांची त्यांनाच उत्तरं

सापडतील.. आणी इफ दे आर ब्रेव इनफ, इथे शेअर करतील.
भारतीय मानसिकतेत मुळापासून बदल घडवायला आपल्यासारख्या सजग नागरिकांनी अगदी स्वतःपासून बदलायची तयारी दाखवली तर पुढच्या पिढी समोर एक सकारात्मक उदाहरण ठेवता येईल.

पुष्कळशा साऊथ एशियन देशांत राहिलेय पण कधी ही ईव्ह टीजिंग चा सामना करावा नाही लागलाय. जो काय त्रास सहन केला तो भारतातच , जिथे वय्,कपडे इ, गोष्टींची अजिबात तमा बाळगली जात नाही.
थायलँड मधे तर गल्लो गल्ली, रस्तो रस्ती ओपन बार्स मधून तोकडे कपडे घातलेल्या मुली असतात. कोणालाही त्यांच्याकडे पाहून अचकट विचकट वागताना, बोलताना पाहण्यात नाही आलं, किंवा बार मधली मुलगी काम आटपून अवेळी एकटी रस्त्यावरून निघाली तरी कोणाला शिट्या मारत पाठलाग करताना पाहिलं नाही.
तिथे संध्याकाळ नंतर फुटपाथ वर लहान टेबलं खुर्च्या टाकून, ठेल्यावरची रेस्टॉरेंट्स सुरु होतात. तिथेच बसून बीअर पिणार्‍या लोकांमधून आपण खुशाल , बिंधास्त चालत जावे, एकही वाईट नजरेचा किंवा अर्वाच्य वाक्याचा सामना करावा नाही लागला..
ही मानसिकता त्यांच्या मनात कोणी रुजवली??
आपल्या देशांत संस्कृती चं स्तोम का वाजवावं लागतं.. बरंय आत्ताच्या काळात सीते, शकुंतले सारखे कपडे कोणी वापरत नाही , नाहीतर अजून एक बहाणा मिळाला असता.. !!

अनुभव शेअर केलात ते बरं केलत वर्षू नील. हे इंट्रेस्टिंग आहे. मला वाटलं ह्या मानसिकतेचा संबंध गरिबी, अशिक्षित समाज ह्या सगळ्या डेवलपिंग इकॉनॉमीजशी संबंधित गोष्टींशी असेल, पण तसं वाटत नाही.

मला आणखी एक कुतुहल अहे ते म्हणजे मुंबई/दिल्ली मधल्या लोकल्स नी प्रवास करणार्‍या मुलींनी नंतर न्यू यॉर्क लंडन इथल्या लोकल्स नी प्रवास केला असेल तर त्यांचा अनुभव वेगळा होता का? की हे युनिव्हर्सल आहे ?

मी आता चाळीशीत आहे. मी लहान असतानाचा काळ हा दिव्य काळ होता. घरातून जे काही संस्कार दिले ते सर्वसाधारण असतील. त्यामुळे कधी गुन्हा करावासा वाटला नाही, कुणाचं काही हिसकावून घ्यावंसं वाटलं नाही इतकंच. पण ब-याच प्रश्नांची उत्तरं घरात पालकांकडून मिळवावीत इतकं डेअरिंग नव्हतं. हे माझ्याच बाबतीत नाही, तर अनेकांच्या बाबतीत होतं. घरी येणा-या मुली या ताई वगैरे असल्याने त्यांच्याशी मोकळेपणाने बोलण्याचा संबंध नव्हता. तसंच त्यांचेही संस्कार असेच दिव्य वगैरे असल्याने कॉलेजमधे आम्ही काय करतो त्याच्या चहाड्या घरी पोहोचण्याची शक्यता असल्याने त्यांना टाळणे किंवा त्यांच्या भीतीने काही न करणे असा नरक वाट्याला आलेला. त्यातून मुलींशी मोकळेपणे बोलण्याबाबत एक गंड तयार झाला. ही गोष्ट शहरातली. त्यातून अडनिड्या वयात पडणा-या अनेक प्रश्नांची उत्तरं बाहेर मिळवण्याची पद्धत सुरू झाली.

कॉलनीत एका बाईंचं कीर्तन ठेवलं होतं. त्या काळात महिला कीर्तनकारांची सुरूवात होती. त्या बाईंनी कुठली एक पौराणिक कथा सांगताना मुलांची कर्तव्ये, मुलींची कर्तव्ये सांगताना मूळ गोष्ट सोडून विश्वामित्र ऋषी मेनका यांची उदाहरणे दिली. त्यातून पुरूषाने कसं स्त्री पासून दोन हात दूर रहावं, मोह माया वगैरे पासून सुटका करून घ्यावी हा सारांश होता. महिला कीर्तनकार असल्याने आणि मोकळ्या पटांगणात कार्यक्रम असल्याने बायकांनी घरोघर जाऊन एक दिवस चूल बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं . लहान असताना असलेल्या त्या कार्यक्रमातून कीर्तनकार म्हणजे सर्वज्ञ असा समज झाल्याने असे उपदेश डोक्यात घट्ट बसले असावेत. घरच्यांनाही मुलांनी आज जे काही ऐकलं आहे त्यातून त्यांचे काय समज झाले असतील हे जाणून घ्यायची तसदी वाटली नसावी. थोडक्यात सांगायचं तर नैसर्गिक मोकळ्याढाकळ्या वातावरणापासून क्रुत्रिम संस्कारांची रेलचैल आपल्या समाजात भरपूर आहे, त्यामुळे स्त्री आणि पुरूष यात मोठी भिंत उभी करण्यात येते. को एज्युकेशन मुळे खूप फरक पडला आहे, त्यामुळं या पिढीला त्याची माहिती नाही.

या भिंती कायम ठेवणारी परिस्थिती आजही आहे. हिंदी भाषक पट्ट्यात भीषण परिस्थिती आहे. मुला मुलींमधे मोकळेपणा असणे एकमेकांना समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. हेच नेमकं होत नाही. तरुण होताना विरुद्ध लिंगाचे आकर्षण एकीकडे,रव्बर ताणावा तसे सर्व दिशांनी झालेले वेडेवाकडे संस्कार एकीकडे यामुळे विचित्र परिस्थितीतून जावं लागलं. मग आमच्यासारख्या "बुळ्या" मुलांपुढे पौरुषत्व सिद्ध करून हिरो बनण्ञासाठी पैजा लावून मुलींना "भिडणारे" काही महान आत्मे असायचे. अशांना मुली "पटल्या" क आपला जन्म "व्यर्थ" वाटू लागायचं. एक आहे शिक्षण, छंद, पुढे नोकरी, व्यवसाय यामुळे फारसा वेळ मिळाला नाही. त्यातच काधीतरी लग्न होऊन गेलं. त्यानंतर तसंच पुरोगामी चळवळीतल्या महिला तसेच पुरूष कार्यकर्त्यांमुळे पुढे अनेक गैरसमज दूर झाले. एक पुरूष म्हणून माझ्या मुलाला योग्य वयातग्योग्य ती उत्तरे मिळतील, अनियंत्रित संस्कार त्याच्यावर होऊन तो भांबावून जाणार नाही याची काळजी स्वानुभवातून घेईनच.

ज्यांना एव्हढंही मिळत नाही, त्या छीनके ले लो असं तत्त्वज्ञान असणा-यांपासून ते लैंगिक सुखाबद्दलचे वेडे वाकडे विचार यातून आलेली विकृती जोपासणारे लोक कसे विचार करतात याबद्दल जास्त माहिती नाही. पण भारतीय समाजात अशांच प्रमाण जास्त आहे का हा प्रश्न पडतो.

अहमदनगर सारख्या ठिकाणी आजही नितीन आगेची हत्या होते यामागे जातीय रागाबरोबरच बहीणीला धडा शिकवण्ञाचाही हेतू असतोच. आपल्या बहिणीने बाहेर काही करू नये असं समजणारे हे नरपुंगव तमास्।आतल्या बाईबरोबर एक रात्र काढण्याची मनिषा बाळगून असतात, एखादं अंगवस्त्र बाळगणं यांना पुरुषार्थाचं लक्षण वाटतं. डान्सबार मधे दौलतजादा करणारे कोण असतात ? हे असले संस्कार जोपर्यंत जोपासले जातात तोपर्यंत काय बोलणार ? समाजात बदल व्हावेत म्हणून काम करणारे काम करत असतात, हे "आपलं" काम नाही असं समजून त्यापासून दूर राहील्याने पुढे त्याचे चटके आपल्याला बसतच राहणार आहेत.

जोरदार पोस्ट खडी साखर! Very well written! नेमक्या शब्दात जणू आढावाच घेतला ही मनोवृत्ती कशी तयार होत असावी ह्याचा.

मला आणखी एक कुतुहल अहे ते म्हणजे मुंबई/दिल्ली मधल्या लोकल्स नी प्रवास करणार्‍या मुलींनी नंतर न्यू यॉर्क लंडन इथल्या लोकल्स नी प्रवास केला असेल तर त्यांचा अनुभव वेगळा होता का? की हे युनिव्हर्सल आहे ?>>>>

मी साउथ ईस्ट अशिया बरोबर जपान, कोरीया , व्हीयेत्नाम, तैवान, हॉगकॉग , मकाउ , ऑस्ट्रेलिया , युरोप मधील १० देश मधील पब्लिक ट्रान्सपोर्ट बायका मुला समावेत मध्ये प्रवास केला आहे. ( पब्लिक ट्रान्स्पोर्ट मध्ये प्रवास करणे ही आमची हॉबी आहे. आणि शक्य असल्यास आम्ही पिक वेळेत, रात्री पण प्रवास केले आहेत. मलेशिया, तैवान, पॅरीस, सिंगापुर, जपान मध्ये मध्यरात्री पण सहपरिवार पब्लिक ट्रान्स्पोर्ट नी हॉटेल, अपार्ट्मेंट मध्ये परत आलो आहे). जपान, हॉगकॉग , तैवान , लंडन आणि कोरिया मध्ये पिक हवर्स मध्ये बर्यापैकी गर्दी असते पण कुठेही महिलासाठी वेगळा डबा न्हवता, आणि ह्या सगळ्या देशात ईव्ह टीजिंग कधीच बघायला मिळाले नाही किंवा बायकोला, मुलीला वाईट अनुभव आले नाहीत. जरी बायकानी तोकडे कपडे घातलेले असले आणि अल्कोहोल घेतले असले तरी कोणी त्याचाकडे वाईट नजरेने बघत नाही. त्यामुळे महिलावर अत्याचार हा भारत/ साउथ एशियाचाच प्रोब्लेम आहे. (बाकिच्या देशात अपवाद असतिल पण त्याचे प्रमाण नगण्य आहे. )

पण अमेरिकेत आमच्या शहरात ईव्ह टीजिंग नसले तरी काही डेंजर एरिया आहेत जिथे रात्री महिला जाउ शकत नाहीत ( गाडीत असेल तरी) . आणि आमच्या शहराचा रेप चा रेट हा दिल्ली पेक्षा खुप जास्त आहे. त्यामुळे घरच्याना रात्री ७ च्या नंतर एकटे बाहेर जायला बंदी आहे. आणि त्याला पुरुष म्हणुन मी काही करु शकत नाही.

वर्षू नील ,+१

कडीसाखर,+१
वर्षू नील, साऊथ एशियन देश आणि भारतात कशामुळे इतका फरक असेल?

Pages