एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडल्या बर्य्राश्या पोस्ट.... मी नविनच आहे पण मला वाट्ते प्रत्येक स्त्री ने आपल्या जवळच्या पुरुषांचे (भाऊ/नवरा/मित्र/दिर / मुलगा ) विचार तपासून बघायला हवेत............साधा नट्या बद्द्ल केलेला ऊल्लेख / स्त्री कलीग, स्त्री बॉस बद्द्ल केलेल बोलण..... माणूस म्हणून स्त्री कडे बघणे महत्वाचे..........
खूपदा भारतात रिक्श्यावाले, टपरीवाले याच्या पेक्श्या सो कोल्ड सभ्य घरातील ४५+ लोकांचा जास्त त्रास होतो.
मला स्वताला europe खूप सेफ वाटतो.......काम करायला , एकटीने हिडायला.....लोक विचारतात नाही अस नाही पण नाही म्हणल की परत त्रास देत नाहीत ( खूप महत्वाच आहे ते हे).

>>>एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?<<<

ह्या प्रश्नाची उत्तरे नेमकी किती मिळाली असे मनात आले. Happy

एक प्रामाणिक मत मांडले. कृ गै न.

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

अकु, सुरेख मुद्दे.

आणखी म्हणजे, स्त्रीला नकाराचा हक्क आहे आणि त्या नकाराचा अर्थ नकारच होतो त्यामुळे पुरुषानी त्या निर्णयाचा आदर करावा. प्रेम ही भावना ओरबाडून मिळत नसते.

अकू,

आजकाल, आपले सगळे मुद्दे कंपनी ट्रेनिंगमध्ये असतात ... त्यामुळे भरपूर जागरूकता येत आहे. कंपन्या दर क्वार्टरला ट्रेनिंग घ्यायलाच लावतात.

अरुंधती,

तुमच्या मुद्यांपैकी (लैंगीक अपराध ह्या ) विषयाशी अजिबात सुसंगत न वाटलेला हा एक मुद्दा:

>>>५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच. <<< शिव्या देणे टाळणे एक वेळ थोडे सुसंगत मानता येईल, पण बाकीच्या गोष्टी केल्यामुळे लैंगीक स्वरुपाच्या अपराधांची पायाभरणी होऊ शकते असे वाटत नाही. शिवाय, हे सगळेच मुद्दे, आंतरजालासकट (व ओळखीच्या किंवा अनोळखी पुरुषांच्याही बाबतीत) स्त्रियांनाही तितकेच लागू होतात असे म्हणायची वेळ ह्याच फोरमवर अनेकदा येते.

बाकीचे सर्व मुद्दे पूर्ण पटले.

मुद्दा क्रमांक आठ सर्वाधिक पटला. (पुन्हा, हाच स्टँड त्या कुठल्याश्या मुद्दाम ठरवून केलेल्या अश्लील कॉमेडी शो च्या बाफसंदर्भात कोणी घेतला असता तर बरे झाले असते असे वाटून गेले).

(ही मते म्हणजे बाफ भरकटवणे तर मुळीच नाही पण 'एका विषयावर बोलणे ह्याचा अर्थ एकांगीपणे बोलणे' असा होऊ नये म्हणून केलेले प्रयत्न आहेत).

मुद्दा क्रमांक सात हा तसा दुरून संबंधीत आहे, पण त्याचे परिणाम दूरगामी आणि खोलवर जाणारे असल्याने तो थेट लैंगीक अपराधांशी संबंधीत नाही असे म्हणता येणार नाहीच, हे पटत आहे.

ओके. अवमानजनक वागणूक वगैरे टाळणे याचे एक कारण म्हणजे आज स्त्री पूर्णत: शोषित गटात मोडत नसली तरी तिचे मानसिक खच्चीकरण करणे हे सार्वजनिक रीतीने तिचा अवमान, शिव्या, तुच्छतापूर्वक वागणूक यांतून साधले जाते. तसेच असे करणे हे समाजसंमत आहे हेही कितीतरी पुरूष (व स्त्रिया) मानतात. मी येथे आंतरजालावरील नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनातील वर्तनाबद्दल बोलत होते.

जाता-येता एखाद्याची अक्कल, शिक्षण, रूप, रंग, देहयष्टी, सवयी किंवा त्या व्यक्तीच्या चालचलनाविषयी तुच्छ उद्गार, हीन वागणूक यांतून येणारी पिढी काय बोध घेत आहे याचाही जरूर विचार करावा. तुम्ही कोणाला अशी दूषणे देऊन तुम्ही मोठे ठरत नाही किंवा ती व्यक्ती कमी ठरत नाही. असे वर्तन सामान्यत: दुसऱ्या व्यक्तीला दाबण्यासाठी केले जाते.

असो. स्त्री जोवर ऐकून घेते आहे तोवर तिला अशी वागणूक देणारे महाभाग भेटत राहणारच!

माझे म्हणणे अधिक स्पष्ट करू पाहतो.

तुमचा मुद्दा शंभर टक्के मान्य आहे, तो लैंगीक अपराधांची पायाभरणी करतो हे अमान्य आहे. तो स्त्रीचे मानसिक खच्चीकरण करतो हे मान्य आहे, पुढची पिढी चुकीचा बोध घेईन हे मान्य आहे पण त्यामुळे बलात्कारी निर्माण होतील असे म्हणता येणार नाही. (ही माझी मते आहेत. ती चुकीची असू शकतात. बदलायला तयार आहे.)

अंजलींच्या प्रश्नांचेही महत्त्व वादातीतच! पण त्या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे दिली गेली तरीही त्यातून 'असे असे झाल्यामुळे लैंगीक अपराध होतात' अशी थिअरी तयार होईल असे वाटत नाही.

दोन विषय मिसळले गेल्यासारखे वाटत आहेत.

'स्त्रियांवरील लैंगीक अत्याचारांसंदर्भात पुरुषांनी स्वतःमध्ये काय सुधारणा कराव्यात?' - मूळ धाग्याचा विषय

'स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी पुरुषांनी काय करावे' - बर्‍याच प्रतिसादांमधील मूळ विषय

चु भु द्या घ्या

>>>> भारतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत फ्लोअरवर तिसर्‍या शिफ्टला किती स्त्रीया असतात? इथे रस्ट बेल्टमधे पुरुष वर्कर्सच्या बरोबरीने स्त्रीया असतात.

देअर यू गो!

>>
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. माझे म्हणणे - eeoc च्या कृपेने जरी स्त्रीया मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आणि मुक्त व्यवहार आहे तरी अपमानास्पद वर्तन होते. लैंगिक भावनांचे दमन करावे लागते म्हणून गैर वर्तन असा काही प्रकार नाही. अपमानास्पद वर्तन शक्तीप्रदर्शनासारखे वापरले जाते. मात्र न्याय मिळण्याची सुकर सुविधा उपलब्ध आहे.

अंजली यांचे प्रश्न आणि अरुंधती यांची पुरुषांच्या सामाजिक जबाबदारीची सूची दोन्ही उत्तम पोस्ट आहेत.

अंजली यांच्या खालील चौथ्या प्रश्नावरून एक प्रसंग आठवला.
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
>>>>
मध्यंतरी ऑफिसमधून उशीरा घरी जाताना स्टेशनवर एक बाई एका माणसाला शिव्या घालत होती आणि तो माणूस तिच्यापासून दूर पळायला बघत होता. एकंदरीत मला लगेच अंदाज आला की त्याने काहीतरी छेडखानी करायचा प्रयत्न केला असणार. अंगापिंडाने तो माझ्यासारखाच होता म्हणून आपल्याला सहज झेपेल म्हणत मी त्याला दूर पळण्यापासून अडवायला म्हणून जरा जवळ गेलो, तर बाईच्या शिव्या कानावर आल्या. अगदी कचकचीत आणि गलिच्छ शिव्या ज्या मी माझ्या आयुष्यात कधी कल्पना नाही करू शकत. अचानक दचकून म्हणा किंवा त्या माणसाचा भेदरलेला चेहरा बघत तोच त्या बाईच्या तावडीत सापडू नये या विचाराने म्हणा, किंवा ही बाईसुद्धा काही धड दिसत नाही असे पटकन वाटल्याने, प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखे त्याला अडवायचा विचार झटकत दूर झालो आणि त्याला जाऊ दिले. स्टेशनवर जवळच अजून दोघे जण उभे होते, ज्यांनी मनावर घेता ते सहज त्या माणसाला अडवू शकले असते, पण त्यांनीही बहुधा अश्याच काही विचारांत तसे काही केले नाही.

असो, पण पुढचा बराच वेळ माझ्या मनात मात्र द्वंद चालू राहिले की त्या माणसाला असेच जाऊ देऊन चूक तर नाही ना केली. त्यानंतर त्या बाईच्या शिव्या चालूच होत्या पण तिच्याशी नजर मिळवायलाही अपराधीपणाचे वाटत होते. ती कशीही असली, भले झोपडपट्टीत राहणारी असल्याने तसेच संस्कार असले तरी त्या प्रसंगात त्या पुरुषानेच काहीतरी कांड केले होते हे दोघांच्या देहबोलीवरून माझ्या लक्षात आले होते.

बाईला जाता-येता फटकारले, बोलून दाबले, अवमानित केले की तिच्या होणाऱ्या मानसिक खच्चीकरणातून लैंगिक शोषणाचीही बैठक तयार होते. सदर प्रकारचे अवमानजनक वागणे त्या स्त्रीची आत्मप्रतिमा म्लान करण्यास निमित्त किंवा कारण ठरू शकते. आपल्या बाबतीत जे काही शोषण होत आहे तेच आपले वर्तमान (व भविष्य) आहे - तोच एक पर्याय आहे, किंवा आपल्याला आपल्या लायकीचे जिणे जगावे लागते आहे असा (गैर)समज त्यातून होऊ शकतो. स्वत:बद्दल मलीन प्रतिमा किंवा लो सेल्फ एस्टीम - आत्मविश्वासाची कमतरता हिंमतही हिरावून नेते. मग गुन्हा घडला तरी ती व्यक्ती आपल्या बाबतीत जे घडले ते आपल्या लायकीला अनुसरून होते असा (चुकीचा) विचार करू लागते.

आणखी स्पष्ट सांगायचे तर पूर्वीचे गुलाम आठवा. त्यांना समाजात सगळीकडे अवमानास्पद वागणूक मिळायची. तुच्छतेचे बोल ऐकायला लागायचे. परिणामत: कोणी मालक त्यांच्यावर हात उगारायचा तेव्हा ते भीती, दबणूक, आत्मविश्वासाचा अभाव व तुच्छ वागणूक मिळण्यामुळे झालेले कंडिशनिंग यांमुळे प्रतिकार करू शकतच नसत. हातापायांत बळ उरत नसे. इथे स्त्रिया गुलाम नसल्या तरी मानसिक गुलामगिरी आजही अनेक ठिकाणी दिसते. (मला काय म्हणायचंय हे पोचलं की नाही ते माहीत नाही.)

मला काय म्हणायचंय हे पोचलं की नाही ते माहीत नाही. >> न पोचण्यासारखे काही अवघड नाही त्यात. न पटण्यासारखेही काही चुकीचे नाही त्यात. सहमत आहे.

माझे म्हणणे - eeoc च्या कृपेने जरी स्त्रीया मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत >> स्वाती२, चांगले मुद्दे. सगळ्याला प्लस वन आणि -

EEOC व आनुषंगिक समानतेचे तत्त्वपेक्षाही सध्या मोठ्या प्रमाणावर वर्कर शॉर्टेज आहे त्यामुळे महिलांना काम मिळते. खालील लेखात त्याचे विवेचन चांगले केले आहे. अ‍ॅबसेंट इमिग्रेशन असावे म्हणून महिला. म्हणजे गोर्‍या पुरूषाच्या खांद्याला खांदा भिडवून काम करणारी काळी स्त्री आणि त्या अनुषंगाने तिला मिळणारी श्रमप्रतिष्ठा असे समानतेचे चित्र नसून अजून एखादा साऊथ अमेरिकन होजेबंधू नको म्हणून देशातील बाई बरी.

http://fortune.com/2014/03/12/americas-labor-shortage-solution-women/

बाईला जाता-येता फटकारले, बोलून दाबले, अवमानित केले की तिच्या होणाऱ्या मानसिक खच्चीकरणातून लैंगिक शोषणाचीही बैठक तयार होते. >> +१००
कुणीही कुणालाही फटकारले, बोलून दाबले, अवमानित केले की होणार्‍या मानसिक खच्चीकरणातून शोषणाचीही बैठक तयार होते. जर त्यात लैंगिकतेचा आयाम (अ‍ॅस्पेक्ट) असेल तर पुरूष-बालक, पुरुष-स्त्री (अँड व्हायसेव्हर्सा), पुरूष-पुरूष लैंगिक शोषण घडू शकते.

बेफिकीर,

>> पुढची पिढी चुकीचा बोध घेईन हे मान्य आहे पण त्यामुळे बलात्कारी निर्माण होतील असे म्हणता येणार नाही.

अकुंचा मुद्दा थोड्या वेगळ्या प्रकारे मांडतो.

बाईला तिच्या मर्जीविरुद्ध हात लावायचा नाही अशी तुमची धारणा आहे. तशी प्रत्येक पुरूषाची नसते. जो स्त्रीवर लैंगिक अत्याचार करू धजतो त्याच्या दृष्टीने स्त्रीसन्मान किरकोळ बाब आहे. अशा धारणेला विनाकारण पाठबळ मिळू नये म्हणून बायकांचा सर्वांसमोर उद्धार करू नये.

आ.न.,
-गा.पै.

अकुचे सर्व प्रतिसाद उत्तम. तुझा वरचा मुद्दा बरोब्बर कळला. त्या बाईचा असा अपमान करत राहिले व पुढे कधी तिच्यावर वाईट प्रसंग आला तर तिच्यात प्रतिकार करायची मानसिक शक्ती खुप कमी झालेली असु शकते व त्यामुळे ती सहज सावज बनु शकते.

ऋन्मेषचे पण प्रतिसाद आवडले. थोडक्यात लिहिले आहेत पण एकदम पोचतात.

अमेरिकेत वाईट प्रसंग कधी आला नाही. आमचे जाऊदे, पण या गोर्‍या अमेरिकन्सनी गोर्‍या मुलींना पण इतक्या उघडउघड कधी त्रास दिलेले पाहिले नाही. अर्थात सर्व आलबेल नाहीच्चे. पण भारतापेक्षा कितीतरी सुरक्षित वाटते. तिथले वाईट अनुभव येणं अजुनही थांबलेलं नाहिये. पण भारताच्या प्रेमात असल्यावर तिथे जाणे तर थांबवणे शक्यच नाही.

वर काहींनी लिहिल्याप्रमाणे, पुरुषांची एखाद्या बाईच्या अंगाकडे सहज नजर गेली तर समजु शकतो (बायांची पण बायांकडे नजर जातेच की) पण मग तिथेच बास, पुन्हापुन्हा पहात बसु नका, हा पहिला अगदी मुलभुत मुद्दा पाळावा.
असे बरेच मुद्दे निघतील. वर आलेत.

मामी,
अकु चे पुरूषांची सामाजिक जबाबदारी - बद्दलचे पोस्ट पण हेडर मध्ये जाउ शकते. ( त्याची परवानगी घेउन).

अंजलीच्या प्रश्नाबाबत,

४ नंबरच्या प्रश्नाचे उत्तर तेवढ सरळ नाही आहे. काही वेळा eve-teasing ला उत्तर देताना आपला जिव पण जाउ शकतो,
http://www.bbc.com/news/world-asia-15579464
मी ज्याने जिव गमवला त्याचा वडलाची मुलाखत बघितली आहे. त्यांना त्याचा मुलाचा गर्व होता पण एकुलता एक मुलगा गेल्याचे जे दु:ख होते ते बघवत न्हवते. दुर्देवाने आपल्याकडे १०० लाईन एवढी तत्पर नाही की पोलिस लगेच घटनास्थळी हजर होतील. (यात पोलिसाना दोष नाही द्यायचाय. आपातकालीन सेवेसाठी सिस्टम नाही असे म्हणायचे आहे).

६ नंबरच्या प्रश्नाचे उत्तर पण हो आहे. मुली ला/बायकोला सुरक्षेच्या कारणास्तव ७ च्या आत घरीचा नियम आहे. मुलाला हा नियम नाही. समाज बदलला तर मात्र भेदभाव होणार नाही. आम्ही सिंगापुर मध्ये रहात असताना मात्र असा भेदभाव न्हवता.

बाकी सर्व प्रश्नाची माझ्याकडुन तरी positive उत्तरे आहेत.

मामी, घाल की पोस्ट! इतर मुद्देही घ्यावेसे वाटले तर जरूर घे.

बारीकसारीक पण तरी महत्त्वाचे असे आणखीही काही मुद्दे निघतील.

स्वत:च्या घरातील स्त्रियांना सक्षम होण्यास पूरक वातावरण निर्माण करणे व त्यांना जिथे आवश्यक तिथे मदत करणे हेही सामाजिक जबाबदारीचे छोटे रूप म्हणता येईल. आज एका घरातील सक्षम, सिध्द व समर्थ स्त्रिया समाजात खूप पॉझिटिव ऊर्जा निर्माण करू शकतात. समाजाचा आराखडा बदलण्यात पुढाकार घेऊ शकतात. त्यांच्यात ती मनीषा जागविणे व त्यासाठी आपल्या सुखसवलतींत थोडी तडजोड स्वीकारणे हेही जबाबदार व्यक्तीचे लक्षण आहे. ते तर सर्वच पुरूष करू शकतात.

Pages