एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई अथवा आजी, घरातील वडिलधारी स्त्रि, वयात येणार्‍या मुलीला ज्या काही सुचना/सल्ले देते तश्या प्रकारच्या सुचना/सल्ले पुरुष म्हणुन मुलाला दिल्या जात नाहित. (हे सरसकट विधान नाहिये. अपवाद आहेतच).>>>> ये हुई न बात! मला मुलगी झाली तेव्हा एका नातेवाईक स्त्रीने नाके मुरडली होती, देवाला दोष दिला होता. आजही ही स्त्री ( वयस्कर) आणी तिचे पती नातवाला कायम पाठिशी घालतात. नातीला येता-जाता टोमणे. नातु १२ चा नात ९ वर्षाची.

बाहेर समानता, सभ्यपणाचा आव आणणारे स्त्री-पुरुष घरात/ चार भिन्तीत राक्षसापेक्षा वाईट असु शकतात.

१. स्वतःच्या मु*********** की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?>>>
राग अनावर झाला तर असलं वाक्य निसटच किमान माझं तरी. पण त्यात ती स्त्री आहे म्हणून नाही तर तिचा मुद्दा, आरोप, वा बाब टोकाची असते म्हणून

२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघ-------श्नांची उत्तरं देणार?>>>
ह्या बाफच्या अगोदर, कदाचित रागवलो असतो किंवा त्याला एक फटका पडला असता (ओळखीचा असेल पोर तरच).
पण आता त्याला समजावून सांगितल जाईल.त्याच्या लेवल पर्यन्त जावून (ओळखीचा असेल पोर तरच).

३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या ----- चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?>>>

एक तीक्ष्ण कटाक्ष पुरेसा असतो ज्याला थोडी तरी मनाची लाज असेल तर. नाहीतर बापूंनी सांगितल्या प्रमाणे मधे जावून उभे राहायचे. अथवा फोन वर मुद्दाम हून जोरजोरात बोलायचे.

४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड ---- करता? >>>>

एकटा असलो तर सहसा मधे पडत नाही कारण कदाचीत तो एक सापळा असु शकतो. आमची टोळी असेल तर समोर्च्याची काही खैर नाही.

५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल --- विनोद कधी केले आहेत का? >>>

सुदैवाने असे "मित्र?" नाहीत. जे अस्ले "विनोद?" त्यावर न हसता त्यांचा पोपट कसा करावा ह्या कडे कल असतो
मी नाही केलेत असे विनोद. पण नक्क्ल करता येते कुणाची ही लिंगनिर्पेक्ष. त्यामुळे लहानपणी खुप ओरडा ही खाल्ला आहे. पण जित्याची खोड आहे ती.

६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?>>>
एकच मुलगी आहे त्यामुळे हा प्रश्नाला पास

७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?>>>
हो वाटतो, राग ही येतो, पण पसंद अपनी अपनी असं म्हणायचं नी पुढे जायचं.

८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?>>>
हो केले जातात पण त्याचा कॉनटेक्स्ट वेगळा असतो. स्त्री आहे म्हणून नाही.

धागा उत्त्म आहे आणि मुद्दा ही, आमच्या सौं ना ही रेफर केला आहे बघुयात होतय का वाचन.

अरे वीकांताला इकडे एक पण पोस्ट नाही?
म्हणजे आदर्शवादी गप्पा मारणारे सगळे ऑफिसतुन टीपी करतात का काय?

22 ऑगस्ट : तक्रार करण्यासाठी आलेल्या श्रुती कुलकर्णीची मदत न करता उलट मानहानिकारक विधानं करणार्‍या पोलीस निरीक्षक हरीष खटावकर यांना निलंबित करण्यात आलंय. मानहानिकारक शब्द वापरल्याप्रकरणी औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खटावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीये.

औरंगाबादमध्ये सिडको एन-6 भागात राहणार्‍या श्रुती कुलकर्णीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. स्वप्नील मनियार हा तरूण श्रुतीच्या मागावर होता. श्रुतीने आपल्याशी लग्न करावं यासाठी तो श्रुतीला त्रास देत होता. स्वप्नीलच्या त्रासाला कंटाळून श्रुतीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.

तीने याअगोदर स्वप्नीलची सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता सिडको पोलीस स्टेशनचे एएसआय हरीष खटावकर यांनी तिची मदत तर दूरच उलट तिची मानहानी केली. तुला वडील नाही त्यामुळे तुम्ही मुली अशा वागतात. तुझ्यामुळेच तो मागावर आहे अशा हीन शब्दात खटावकर यांनी श्रुतीवर शितोंडे उडवले होते
श्रुतीच्या बहिणीने याविरोधात तक्रारही केली. एका पोलीस अधिकार्‍याने अडचणीत सापडलेल्या तरुणीची मदत न करता वर्दीचा रोख दाखवल्यामुळे सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खटावकरांवर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणी काल शुक्रवारीही दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय.

बुमरँग, कसल्या आदर्श्वादी गप्पा. झाडुन सर्व बाया, आयुष्यभर किती भयानक त्रास भोगावा लागतो ते प्रामाणिकपणे सांगत आहेत व त्यावर चर्चा केली जात आहे तर ती आदर्शवादी चर्चा? कळले नाही.
थोडे भावनिक होऊन कमीअधिक लिहिताना झाले तर जरा दुर्लक्ष केले तर? त्यामागचे ठळक असलेली असह्यतेची भावना समजुन घ्यायचा प्रयत्न केला तर? ते जास्त बरे वाटले असते. ठीक आहे, निदान मदत करु नका पण एका जातीच्या मनुस्।यप्राण्याला होत असलेला त्रास दुसर्‍या जातीच्या मनुष्यप्राण्याला जाणवला तरी आहे या विचाराने.

ज्यांनी "फक्त पुरुषांनाच का विचारले आहे, बायकांना का नाही?" असे बरेचदा विचारले आहे त्यांना असे म्हणेन की, 'बायका तर जे स्वतःला जपण्यासाठी जे करणे शक्य असते ते करतातच'. त्यांना कोणी सांगावे लागत नाही. ते आपोआप होते. ज्यांचे जळत असते ते करतच असतात. त्यांचे चे जळणे जरासे तरी कमी होईल याकराता ज्यांना असल्या जळण्याची धग लागलेली नसते त्यांना कळवायचा प्रयत्न करत आहोत तर इतका राग? इतकी ठेच पोचते अभिमानाला? अहो, मग बायका तोंड दाबुन किती मार सहन करत असु?
पंधरपूरहुन, मुंबरीला गेला तरी माणूस तुलना करु पहातो. मग अमेरिकेत येऊन किंवा चायना वगैरे जिथेकुठे... "हा त्रास सहन करावा लागला नाही" असे लिहितो तेव्हा ते, 'तुणतुणे'? नशिब, रहा तिथेच, इथे म्हणजी भारतात येउ नका असले अत्यंत संताप आणणारे सल्ले कोणी दिले नाही.

मामी, धागा काही फसला नाहिये. लोक तसे लिहुन ठसवत असले तरी.

धन्यवाद सुनिधी. धागा फसला नाहीये हे मला ठामपणे माहित आहे. अगदी या धाग्यावर पुरुष आयड्यांनी जास्त लिहिलं नाही तरीही हरकत नाही. वर अकुच्या आणि अंजलीच्या आणि धाग्यावर आलेल्या असंख्य मुद्द्यांच्या अनुषंगाने अगदी ०.०१% पुरुषांनी तरी या दिशेने विचार करण्याचा प्रयत्न नक्की केला असेल.

शिवाय केवळ रस्त्यावर होणारी छेडाछेडी हा मुद्दा नाहीये. एकूणच समाजात ज्या विकृती आहेत त्या दूर करण्यास पुरुषांचा हातभार लागू शकतो आणि त्यांच्या मदतीची गरज आहे हे लक्षात आलं असेल तरी खूप झालं.

स्त्री-पुरुष समानता हवीये मग पुरुषांची मदत कशाला हा प्रश्न स्त्री-पुरुष समानता आल्यावर योग्य ठरेल.

>>>>> पुरूष सहभागी होत नाहीयेत याचं एक सबळ कारण म्हणजे न जाणो आपल्यालाच जाब विचारला तर! जे तुम्ही, बागुलबुवा, लिंबूकाका सर्वांनी अनुभवलं आहेच. <<<<<
आशुडी, अहो "सामाजिक जबाबदारी" म्हणूनचा "माझा कबुलीजबाब" मी वर दिलाच, पण मग माझ्या वैयक्तिक शारिरीक व आर्थिक ताकदीच्या क्षमता लक्षात घेता मुलीला जो उपदेश करीन्/करतो असे सांगितले त्यावरच "पुरुषी एकांगी विचारसरणी व परत बायकांवरच बंधने" अशा अर्थाने धुळफेक होऊ लागल्यावर पुढे काही लिहीण्याचे प्रयोजन उरले नाही.

रमा, तुमची पोस्ट वाचली. सुयोग्य वास्तविक सहमतीबद्दल धन्यवाद.
गामा, माझ्या मजकुराबद्दलचे तुमचे विश्लेषण बरोबर. एकीकडे आख्ख्या पुरुषजातीवर घसरायचे, दुसरीकडे वैयक्तिकरित्या काय कराल म्हणून विचारायचे, व खरी खरी उत्तरे (सोशल फोरमवरचा धोका पत्करूनही) दिली तर त्यात खुसपटे काढायची असे चालले आहे. चालुद्यात.

मी हा धागा वाचत होतो, पण फोनवरुन. त्यामूळे आधी प्रतिसाद देता आला नाही.

मामीच्या प्रश्नाचा रोख बहुदा स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल आहे. ( त्यात इतर सामाजिक जबाबदार्‍या म्हणजे सार्वजनिक स्वच्छता, व्यसनाधीनता वगैरे मुद्दे नसावेत असे वाटतेय. )

मलाही सोन्याबापूंसारखाच अनुभव आला होता. त्यावेळी " झक मारली.. " असेच वाटले होते. मग त्या स्त्रीच्या दृष्टीने विचार करता असे जाणवले कि, तिने असा विचार केला असेल, कि आज याची मदत मिळतेय, उद्या काय ? मद्त करणार्‍याचा हेतू काय असेल ? माझ्याकडून परतफेडीची अपेक्षा असेल काय ? मग जाणवले कि तिचेही बरोबर आहेच.

तर आता असे ठरवलेय, मागितल्याशिवाय मदत करायची नाही. अगदीच राहवले नाही तर जवळच्या पोलिसाला किंवा स्त्रीला माहिती देतो.

दिनेश,

तुमच्या आणि सोन्याबापूंच्या प्रतिसादांवरून जे वाटले ते असे:

१. तुम्ही दोघेही स्वतःहून अडचणीतील स्त्रीला मदत करायला गेलात हे स्तुत्य आहे.

२. त्या स्त्रीने मदत नाकारली ह्यामुळे अश्यावेळी पुढे काय करावे ह्याबद्दल विचार करावा असे तुम्हाला वाटले.

तिसरे आणि महत्त्वाचे:

३. काही पुरुष मदतही करू इच्छीत असतील ह्यावर स्त्रियांचा विश्वासही न बसण्याइतकी परिस्थिती असावी.

हेडर मधले सगळे मुद्दे पटले. घरामध्ये बाबा आईशी-बहिणीशी, आई बाबांशी-भावाशी कसे वागतात याचा खूप परिणाम मुलांवर होतो.
घरातील सदस्यांचे एकमेकांशी वागणे बोलणे समानतेचे आदराचे असेल तर नक्कीच सामाजिक वागणेही बदलेल.
दुसरे म्ह्णणजे लहानपणीपासून शाळेत मुलं आणि मुलींमध्ये मोकळीक असावी. एकमेकांशी बोल्ण नाही, खेळणं नाही यामुळे विचित्र कुतुहल्/आकर्षण निर्माण होते.
भारताबाहेर कायदे कडक आहेत आणि एकदा तुमच्या नावावर गुन्हा नोंदवला गेला की पुढे मग करीअर मध्ये खुप अडचणी येउ शकतात त्यामुळे असे गुन्हे कमी होत असावे.

समानते बद्द्ल विचार करताना असे जाणवले की आपल्या स्त्री-पुरुष यांच्या सुंदरतेच्या व्याख्या वेगळ्या आहेत.स्त्रीयांनी सड्पातळ, मोहक इत्यादी असावे आणि पुरुषांनी masculine असावे. जसे एखादी स्त्री शॉर्ट्स्/स्कर्ट्स घालायचे असेल तर वॅक्सींग करेल आणि पुरुष नाही.

दिल्लीतील 'जसलिन कौर' नावाच्या आम आदमी पार्टीची हॉलेंटियर असलेल्या विद्यार्थिनीची बातमी आता पाहीली. आणि प्रश्न पडला की सामजिक जबाबदारी फक्त पुरुषाची असावी काय.

झी न्युजची बातमी Rofl

आम आदमी पक्षाची सदस्य आहे म्हणून छेडछाड करणे योग्य आहे ? कि आम आदमी पार्टीच्या कोणी तक्रार दाखिल केली तर ती पब्लिसिटी स्टंटच आहे म्हणून हेटाळणी करणे योग्य? हीच जर आपल्यातील कुणाची बहिन मुलगी असती आणि तिला असे " तु आप ची कार्यकर्ता आहेस, तु भाजपाची कार्यकर्ता आहे" म्हणून पब्लिसिटी स्टंट करत आहे का? असे वार्ताहर सारखे विचारत असेल तर आपल्या मनात काय येणार सांगा पाहू.

{{{ एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?}}}

हे असलं काही करायची आपल्या बायकोची इछा होऊ नये याची काळजी घेणे हीच पुरुष म्हणून आपली जबाबदारी

https://www.maayboli.com/node/21646

Pages