एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण सध्या या प्रश्नांची उत्तरं मिळाली तरी पुरेत. याच अनुषंगानं स्त्रियांसाठीही काही प्रश्न आहेत, पण ते आत्ता लिहीले तर फाटे फुटतील असं वाटतंय त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर पुढे लिहीन.

धाग्याचा विशय आणि ऋन्मेश ची एक पोस्ट यावरून एक-दोन गोष्टी आठवल्या :

मी मागेही एक्दा लिहिल होतं , की मुम्बईत रात्री उशिरा रिक्शाने फिरताना मला कधिच असुरक्शीत वाटत नाही याचं कारणं मला आलेले त्यान्चे चांगले अनुभव.
एकदा अशीच रात्री अकरा-साडेअकरा वाजता रिक्शाने एकटी येत होते .
गोरेगाव-मालाड हायवे ला दोघ जण बाईक वरून रिक्शाच्या सोबत सोबत चालवत होते .
बाईकचा स्पीड कमी जास्त करायचा , रिक्शाच्या मागे पुढे जायचं , मागे वळून वळून बघायच असे प्रकार झाले .
मी साफ दुर्लक्श केलं . रिक्शा वाल्याने शेवटी मला विचारलं " मॅडम , ये लोग आपके पेहचान के है ? नही ना ? " मी फक्त मानेने नाही म्हटल . त्याने शिताफीने सुसाट रिक्शा चालवली . नंतर त्या बाईक ने ही आपला रस्ता पकडला असेल . माहित नाहे . पण त्या वेळेला , त्या परिस्थितित त्या रिक्शावाल्याचे चार शब्द प्रचंड आश्वसक होते. आपला तोंड दाबून बुक्क्याचा मार कोणी समजतो शकतो ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती.

असाच एक नीता बस मधून प्रवास करताना .
एक्दा पूण्याहून निघायला फार उशीर झालेला . मी एक विन्डो सीट मिळाली , आता आरामात बसू शकते , कधी पोहोचू तेन्व्हा पोहोचू ,अशा विचारात होते .बाजूला एक छपरीसा माणूस येउन बसला . मला काही खटकले नाही . मी काही फार विचार केला नाही. नन्तर तो मुंबईत उतरल्यावर बस अटेन्डन्ट - २५-२६ वर्शाचा तरूण आला.
"वो आपके साथ नही था? मुझे पता नहि था . आप एक बार बोल देते , मै पूना मे ही आपका सीट अ‍ॅडजस्ट कर देता . लेडीज सीट दे देता " . मी फक्त हसून " कोई बात नही , पर थँक्यु " म्हटलं . माझ्याशी बोलताना त्याच्या आवाजातली काळजी आणि 'आपण काही मदत करू शकलो नाही ' याची खंत जाणवत होती.
रात्री १२-३० ला बस बोरिवली ला पोचली . त्या बसमधल्या बाकीच्या अटेन्डन्टस नेही मला नीट रिक्शा पकडून दिली. " संभालके जाईये" बोलले . कदाचित त्यांच्या कामाचा भाग असेल , पण त्यावेळी ते मला सुखद वाटलं .

एक्दा मी आणि माझी बहिण आरे कॉलनीत माझ्या नवर्याची वाट बघत उभे होतो . ट्रॅफिकमुळे त्याला वेळ लागत होता . बाजूलाच एक दूकान वाला होता . आम्ही नउच्या नंतर तिथून निघलो तो परयन्त त्याचे दूकान चालू होते. नवरा आला , आम्ही दोघी गाडीत बसल्याबरोबर लगेच त्या दूकानदाराने शटर डाउन केलं .
( हॅवेल की कसली तरी जाहिरात आहे , आम्ही काही वर्शापूर्वी ती प्रत्यक्श अनुभवली होती Happy )

वाईट अनुभवांबदाल नंतर लिहेन .

छान पोस्ट अरुंधती कुलकर्णी, सुमुक्ता, अ वैद्य, सगळ्यान्च्याच छान पोस्ट्स! >>>निरा +१

अंजली रोखठोक प्रश्न विचारले आहेस त्याबद्दल धन्यवाद. पुढिल चर्चेत या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी आशा करूयात. म्हणजे धागा रस्त्यावरही राहिल.

अकु, चांगली पोस्ट.

पुरुषांचा काय आणि स्त्रियांचा काय, 'लिबिडो' असं काही असतं हे नाकारण्यातच आमचं संस्कृतीरक्षण होतं.
(परदेशी थेरं आहेत - आम्हाला नसतं तसलं काही!)

बायकांच्या झुंडीच बायकांचे रक्षण करू शकतात या निष्कर्षाप्रत मी वेळोवेळी येते. बायांनी घराचे उंबरे ओलांडून रोजच्या आयुष्यात भरपूर संख्येने घराबाहेर पडणे, समाजात गठ्ठ्याने वावरणे, मोठ्या संख्येने आपले अस्तित्त्व सर्व क्षेत्रांत जाणवून देणे, सार्वत्रिक संचार करणे, सामूहिक संचार करणे, बायकांना निषिद्ध समजल्या जाणार्‍या स्थळी किंवा वेळी समूहाने - मोठमोठ्या झुंडींनी व सुसज्जपणे संचार करणे, कोणत्याही दबावांना भीक न घालणे हेच केवळ इथे होऊ शकते. इथल्या पुरुषांकडून सरसकटपणे सुवर्तनाची किंवा सभ्य वर्तनाची अपेक्षा ठेवणे हे व्यर्थ आहे. अपवाद असतीलच. परंतु परदेशात जाऊन 'सुसंस्कारित व सुधारित' मताचे झालेले कित्येक पुरुष परतोनि भारतात आले की पुन्हा एकदा कोषात गेल्याप्रमाणे त्याच पूर्वीच्या मानसिकतेत व दांभिक बुरख्यांत किती अलगदपणे शिरतात हे अनेकदा पाहिलेले आहे. त्यामुळे तेथूनही फारशी अपेक्षा नाही. >>>>> अकु, १००%. उत्तम पोस्ट.

वाचतेय. अतिशय उत्तम चर्चा.

पाश्चात्य देशात या अशा गुन्ह्यांना अत्यंत कडक शिक्षा असतात. शिवाय त्यांची अंमलबजावणीही त्वरित होते. यामुळेही कदाचित लोकांची मानसिकता आधीपासूनच वेगळी होत असेल का? निदान अनेक कारणांपैकी हेही एक कारण असू शकेल का?

आपल्या कडे न्यायालयीन प्रक्रिया फार वेळखाऊ नि वर गुन्हेगार सुटण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे या अशा लोकांना कायद्याची भीती फारशी नसते.

भारतीय मानसिकतेचा अनुभव इथे एकदा घेतला आहे स्विमिंग पूलवर इतर अमेरिकन बायकांबरोबर असताना एक भारतीय माणूस स्वतःच्या मुलांकडे लक्ष ठेवायच्या हेतूने बसलेला, पण लक्ष सतत बायकांकडे. त्यातून भारतीय बायकांकडेच. कदाचित त्या तक्रार करणार नाहीत असे वाटले असेल.

घरी आल्यावर नवर्‍याला सांगितले तर तो रागावलाच- जाऊन त्याला झापले का नाही म्हणून.

स्वाती_आंबोळे | 14 August, 2015 - 10:26 नवीन
अकु, चांगली पोस्ट.
पुरुषांचा काय आणि स्त्रियांचा काय, 'लिबिडो' असं काही
असतं हे नाकारण्यातच आमचं संस्कृतीरक्षण होतं.
(परदेशी थेरं आहेत - आम्हाला नसतं तसलं काही!)>>>>>>>>>>>>पुरुषांना लिबिडो असतो,तो फार स्ट्रॉगही असतो हे निर्विवाद सत्य आहे.परंतू स्त्रीयांनाही लिबिडो असतो ही पाश्च्यात्य स्त्रीवाद्यांनी मारलेली लोणकढी थाप आहे.स्त्रीयांना लिबिडो असता तर सुंदर पुरुषांचे रोज विनयभंग झाले असते,आणी स्त्रीयांनी त्यांची मानसीकता बदलावी यासाठी ईथे धागे निघाले असते.

कदाचित मी चुकीच्या जागी मत व्यक्त केले ....... सॉरी

मी संपूर्ण चर्चा खूप इंटरेस्ट घेवून वाचली आणि या साठी पुरुषाने काय करावे या पेक्षा मी काय केले या बद्दल लिहू इच्छितो.
मला २ मुली. त्यांना कधीही दुय्यम आहात वा पदरी पडले गोड झाली अशी वागणूक दिली नाही. त्यांना सदोदित विश्वासात घेतले.
पत्नीचा कधीही अपमान केला नाही आणि इतर स्त्रियांशी वर्तन करतांना आदरपूर्ण जवळीक आणि मैत्री जुळवली. ती त्यांच्या गुणांवर आणि भावनांवर आधारित होती ऑफिसात असे आगळे वर्तन करतांना दिसले तर त्यावर तीव्र विरोध व्यक्त केला. ...... कारण त्या माझ्या व्हॅल्युज...... मूल्ये आहेत.
मुलींना कोअण्त्याही प्रकारच्या आक्षेपार्ह वर्तनास खपवून घेण्यास विरोध करा असे वारंवार सांगितले.
बहुतेक मित्रमंडळी समविचारीच असतील याची काळजी घेतली आणि इतरांना दूरच ठेवले.
लिंगभेद कधीच केला नाहीए.

सलं काही!)>>>>>>>>>>>>पुरुषांना लिबिडो असतो,तो फार स्ट्रॉगही असतो हे निर्विवाद सत्य आहे.परंतू स्त्रीयांनाही लिबिडो असतो ही पाश्च्यात्य स्त्रीवाद्यांनी मारलेली लोणकढी थाप आहे.स्त्रीयांना लिबिडो असता तर सुंदर पुरुषांचे रोज विनयभंग झाले असते,आणी स्त्रीयांनी त्यांची मानसीकता बदलावी यासाठी ईथे धागे निघाले असते.>>

अरे द्येवा, आत्ता काय करायचं?

एकंदर, स्त्रीयांचं फार्र कठिण दिसतंय काम!
वी हॅव अ लाँग वे टु गो.

मामी | 14 August, 2015 - 13:10 नवीन
लिबिडो म्हणजे विकृत कामवासना असा काहीतरी गैरसमज
दिसतोय.>>>>>>>लिबिडो म्हणजे sex drive हे मला माहीत आहे,असा स्ट्रॉग sex drive स्त्रीयांमध्ये नसतो.तसा sex drive स्त्रीयांमध्ये असता तर लैंगिक स्वैराचार बोकाळला असता.त्यामुळे पाश्च्यात्य स्त्रीवाद्यांच्या खुळचटपणात भारतीय स्त्रीवाद्यांनी स्वत:ला गुर्फटुन घेऊ नये.

अय्या, काय तुमच्या नावाचा उच्चार असेल तो,
तुम्हाला खरंच असं वाटतं?
कमाल आहे.
बायकांना सेक्स ड्राईव्ह असतो हे काही पाश्चात्य खूळ नाही.
फार पूर्वीपासून भारतीयांना माहित्येय ते.
सभ्य साहित्यात त्याचे वर्णन आहेच पण ग्राम्य भाषेंतही या ड्राईववर आधारित शिव्या आहेत.

'चंदनाची चोळी माझे अंगंअंगं जाळी' हे काय सनीलिऑनवर लिहिलेले गीत नाही आहे.

नेमका असे लिहिण्यामागचा काय तर्क आहे ते कळत नाही.

बोकाळला कशाला? ब्यालन्स झाला असता म्हणा. मग ट्रेन मध्ये पुरुष आणि बायका निस्ते एकमेकांचे विनयभंग करत करतच दरररोज इष्टस्थळी पोहोचले असते?

साती +१, मलाही नेमकं कळत नाहीये ह्यांना काय म्हणायचय ते.
१) स्त्रीवा, स्त्रीयांचा लिबिडो हा मुख्य विषय नाहीये
२) लिबिडो जास्त असला म्हणून तूलनेत पुरुषांकडून स्त्रीयांचा विनियभंग जास्त होतो असं म्हणत आहात का? तसं असेल तर मग ज्या देशात भारताच्या तूलनेत कमी विनयभंग होतात त्या पुरुषांचे लिबिडो काय घास खायला गेलेत?
माणसाला "माणसाळून" खुप खुप वर्ष झालीत, खुप काळ लोटला. आता बेसिक इन्स्टिंक्ट्सचा दाखला देऊन चालणार नाही. इतर देशातले पुरुष पण माणूस म्हणून भारतीय पुरुषा इतकेच एवॉल्व झालेत आणि प्रश्न फक्त आपल्या समाजाच्या वैचारिक बैठिकीत असलेल्या (वर बर्‍याच लोकांनी लिहिलय त्याबद्दल) लूपहोल्समुळे हे होत आहे का? हा आहे..

अकु, पोस्ट आवडली.

बाकी परदेशातील अनुभवांबद्दल बोलायचे तर न्युयॉर्क काय किंवा टोक्यो काय. तुम्ही मेनस्ट्रीममधे असाल तर ट्रेन मधे विपरीत अनुभव येतात. जपानमधे chikan हा प्रकार भारतातल्या गर्दीच्या जागी जे काही वाईट अनुभव येतात त्याचेच जपानी रुप.
परदेशात भारतीय म्हणजे तुम्ही त्यांचे पाहुणे/ न्यु इमिग्रंट. त्यामुळे लोकं ठीक वागतात. मात्र स्थानिक स्त्रीयांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते.
अमेरीकेत कायदे कडक आहेत तरीही फास्ट फूड इंडस्ट्री, असेंब्ली लाईनवर काम करताना अचकट विचकट , द्वयर्थी बोलणे वगैरे प्रकार होतात. स्त्री कर्मचार्‍याला क्वालीटी चेक करायला एकटे पाठवायचे नाही हे पथ्य एक -दोन सप्लायर्सच्या बाबतीत माझ्या नवर्‍याला कायम पाळावे लागते. एवढे करुनही अधून मधुन सप्लायरकडे गैरवर्तन करणार्‍या कामगाराबद्दल तक्रार करणे,वार्निंग देवून फायर वगैरे प्रकार होतात.

तो इमिग्रन्ट्स वाला मुद्दा कळला नाही स्वाती२.
मला नाही वाटत न्यू जर्सी - न्यू यॉर्क किंवा तत्सम ठिकाणी इमिग्रन्ट्स ना कोणी पाहुणे म्हणून बेटर ट्रीटमेन्ट देत असेल. स्थानिक स्त्रियांना जिथे -ज्या एरियात वाईट अनुभव येतात त्या एरियात इमिग्रन्ट स्त्रियांना पण येत असणारच की. त्यात हे असले चाळे करणारे लोक स्त्री पाहुणी आहे की स्थानिक वगैरे कशाला विचार करतील!

तसे नाही मैत्रेयी. रेप आणि इतर गुन्हे करणारे वेगळे. हे जे इव टिजिंग टाइपचे संधी साधणे चालते त्या बाबत लिहिले. देशी स्त्रीया बर्‍यापैकी परीघाबाहेर असतात. बेटर ट्रिटमेंट म्हणून नाही पण एकंदरीत वाटेला जात नाहित. मोठ्या शहरात रहायला जाणार्‍या कॉकेशियस मुलींना आलेले अनुभव आणि देशी मुलींना आलेले अनुभव वेगळे होते.

भारतीय स्त्रीयांना परदेशात वाईट अनुभव येत नाहीत याचे कारण त्यांच्या दिसण्यात आहे.प्रगत देशातल्या (अगदी जपान वगैरेपन) स्त्रीया या एकंदर दिसण्याच्या बाबतीत भारतीय स्त्रीयांपेक्षा फारच ऊजव्या असतात,खास करुन गौरवर्णीय.एक उदाहरण देतो,भारतात येणार्या गोर्या अमेरीकन /युरोपिअन प्रवासी महीलांना अत्यंत वाईट अनुभवातून जावे लागते याचे कारण त्यांचे सौंदर्य असते,तेच जर एखाद्या आफ्रिकी वंशाची महीला भारतात आली तर तिला कुणी त्रास देत नाही.

त्यातच भारतीय लोक म्हणजे ugly,stinky,filthy asians असा तिकडे प्रवाद आहे, त्यामुळे एकंदरच भारतीयांपासून हे लोक लांब रहात असावेत.

>> अमेरीकेत कायदे कडक आहेत तरीही फास्ट फूड इंडस्ट्री, असेंब्ली लाईनवर काम करताना अचकट विचकट , द्वयर्थी बोलणे वगैरे प्रकार होतात.

स्वाती२, भारताइतके वाइडस्प्रेड अनुभव नाहीत हे. ठराविक जागा, ठराविक वेळा जोखमीच्या असू शकतातच. जगाच्या पाठीवर कुठेही त्या अर्थी रामराज्य नाही. पण कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळी कुठल्याही वयाच्या स्त्रीला असे अनुभव येणं इज अ मॅटर ऑफ कन्सर्न.

शिवाय इन एनी केस 'त्यात काय, हे अमेरिकेतही होतं!' हे कशावरच उत्तर असू शकत नाही.

>>जपानमधे chikan हा प्रकार भारतातल्या गर्दीच्या जागी जे काही वाईट अनुभव येतात त्याचेच जपानी रुप.>> नाही. त्याहीपेक्षा वाईट आहे. वर स्वाती म्हणतेय तसं भारत सोडून बाकी ठिकाणी रामराज्य नाही. आता बाकी गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये किती जॅपनीज बायांना असा अनुभव आलाय आणि किती वेळा हे विचारावं लागेल. पण मागे म्हटल्याप्रमाणे मला खच्चून भरलेल्या ट्रेनमध्ये एकदाही आलेला नाही.

>>शिवाय इन एनी केस 'त्यात काय, हे अमेरिकेतही होतं!' हे कशावरच उत्तर असू शकत नाही.
नाही. 'त्यात काय, हे अमेरीकेतही होतं ' असे म्हणतच नाहिये. मात्र जपान मधे किंवा अमेरीकेत असे अनुभव आले नाहीत असे वाचले म्हणून एकंदरीत परीस्थिती बद्दल लिहिले इतकेच. भारतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत फ्लोअरवर तिसर्‍या शिफ्टला किती स्त्रीया असतात? इथे रस्ट बेल्टमधे पुरुष वर्कर्सच्या बरोबरीने स्त्रीया असतात. मुक्त व्यवहार असूनही द्वयर्थी बोलून कानकोंडे करायचे प्रकार होतात. फरक इतकाच की तक्रार केली तर तात्पुरता का होइना त्रास बंद होतो. आमच्या इथे भरपुर जपानी कंपन्या आहेत आणि साहाजिकच बिझनेस विसावर येणारी जपानी मंडळीही. त्यामुळे हे तिथल्या ट्रेनचे कळले.

>> भारतात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीत फ्लोअरवर तिसर्‍या शिफ्टला किती स्त्रीया असतात? इथे रस्ट बेल्टमधे पुरुष वर्कर्सच्या बरोबरीने स्त्रीया असतात.

देअर यू गो!

http://www.huffingtonpost.com/jennifer-hamady/eve-teasing_b_1123285.html

प्रिडॅटोरी वागणे हे केवळ आणि केवळ त्याच्यावर संस्कारांचा, नैतिकतेचा, कायद्याचा वा जगनिय्यंत्याच्या पेक्षा स्वतःचा लगाम नसल्याने व सहज "सावज" उपलब्ध असल्याने होते... पुरुषांची (स्त्रियांचीही) जबाबदारी एकच त्या आतल्या नैसर्गिक जनावराला नीट ओळखणे व योग्य पद्धतिने कायम काबुत ठेवणे व ते कसे ठेवायचे हे शिकणे व शिकवणे...

अकु, उत्तम पोस्ट!!

अंजली, तुझ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळाली तर या धाग्याला जरातरी न्याय मिळाल्या सारखं वाटेल!!

Pages