अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रम्पजी इंडीयन्सच्या विरोधात आहेत असा काहींचा समज झालेला दिसतो.>>>

सपना हरीनामे, तुम्ही सगळ्या पोस्टस नीट, सविस्तर वाचलेल्या दिसत नाहीत. इथे 'भारतीयां"बद्दल बोलणं चाललं आहे किंवा काळजी नाहीये. सर्व लीगल, इथे जन्मलेल्या, इथले सगळे कायदे कानून मानणार्‍या, टॅक्स भरणार्‍या, स्वतःला अमेरीकन म्हणवणार्‍या - नव्हे असणार्‍या- इमीग्रंटस बद्दल बोलणं चाललं आहे.

अरे पण तोच माणुस आता जबाबदारीच्या पदावर लोकशाहि मार्गाने निवडुन आल्यावर, सगळ्यांना एकत्र घेउन पुढे जायची भाषा करतोय >>> कुठे केली भाषा? एक साधं व्हेग ट्विट केलं सकाळी. आणि मुळात ही 'व्हाईट सुप्रीमसी' ही भावना सतत बोलून आणि वागून लोकांमधे रूजवल्यावर, त्या तसल्या ट्विटला काय अर्थ उरतो? होणर्‍या परीणामांना कोण जबाबदार आहे?
तुम्ही परत परत होणार्‍या प्रोटेस्टकडे वळताय, माझा मुद्दा वेगळा आहे. NC मधे केकेके ची रॅली चालणार आहे अशा बातम्या आहेत. लोकांमधे बितीची भावना आहे, त्याबद्दल माझा मुद्दा आहे.

बे एरियात रोज कुणीतरी ट्रम्प समर्थकाला झोडपून काढतो आहे, ट्रंप समर्थकाच्या मालमत्तेची नासधूस करत आहे, कार जाळत आहे, फोडत आहे. लोक मोर्चे काढून त्यात जाळपोळ, दगडफेक, मारहाण करत आहेत. आणि हे सगळे योजनाबद्ध पद्धतीने होत आहे. उत्स्फूर्तपणे नाही. बसेस वगैरे भाड्याने घेऊन दूरदूरच्या शहरातून लोक दंगली करायला बोलावले जात आहेत. हे पैशाशिवाय होणे शक्य आहे का?

लोक त्या भागात प्रवास करताना, कामावर जाताना जीव मुठीत धरून जात आहेत. शिकागो, न्यू यॉर्क, लॉस अन्जेलिस सगळीकडे तेच.

पण आम्हाला ह्या खरोखर घडणार्‍या घटनांची भीती नाही. आम्हाला फक्त दुष्ट दुष्ट श्वेतवर्णीय लोकांची भीती आहे! कारण ते आम्हाला ठार मारणार आहेत. त्यांनी काहीही केलेले नाही. पण आम्हाला खूप खूप खूप भीती वाटते बुवा!
वा! वा! अस्सल पुरोगामी लोक!

>> कुठे केली भाषा?<<

ट्रंपचं विक्टरी स्पीच बहुतेक तुम्हि मिस केलंत...

केकेके - ट्रंपने प्रायमरीज ला केकेकेला डिसवाव केलेलं आहे. त्यांनी काहि गैरकानुनी कारवाई केली तर देशात लाॅ ॲंड आॅर्डर आहेच.

बायदवे, माझ्या शेजारच्या कौंटित एकेकाळी केकेकेचं हेडक्वार्टर होतं. आज त्या कौंटिवर देसी लोकांनी जवळजवळ कब्जा केलेला आहे. कौंटिचा एसेटि स्कोर स्काय राॅकेट झाला आहे, घराच्या किंमती वाढल्या आहेत, एकेकाळी रेडनेक्स ओळखली जाणारी शहरं काझ्मोपालिटन झाली आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेडनेक्स आर नाॅट कंप्लेनिंग... Happy

शाम भागवत, धन्यवाद तळवलकरांचा लेख शेअर केल्याबद्द्ल.

लोकसत्तेच्या कुबेरांना, अमेरिकेच्या संबंधीत लेख, अमेरिकेचा अभ्यास करुनच तो हि आॅंखोदेखा, लिहावे हे सुचवु इच्छितो... Happy

==शाम भागवत, धन्यवाद तळवलकरांचा लेख शेअर केल्याबद्द्ल.
+१.
गोविंद तळवळकरांचा लेख अत्यंत मर्मभेदक आहे. पराभवाचे विश्लेषण अगदी अचूक केले आहे.
आंधळ्या हिलरी समर्थकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे!

आधी कुणी उल्लेख केला आहे की माहीत नाही पण हेल्थकेअर मध्ये काम करत असल्याने एक महत्वाचा मुद्दा आहे तो हेल्थ्केअर रीफॉर्म चा.

ओबामाकेअर मुळे लाखो uninsured लोक आज काही प्रमाणात आरोग्य सेवा घेउ शकत आहेत. There are provisions such as preventive services that would affect all of us if taken away. There are several things such as coverage of preexiting conditions, insurance coverage of people under 26 under their parents' policies, etc.

हा मोठा विषय आहे.प्जे बदल आतापर्यंत झाले आहेत ते अनडू करणे जवळपास अशक्य आहे. सो इट विल बी इंटरेस्टिन्ग !!

ज्ञाती, माझा नवरा हेल्थ केअर कंपनीत आहे, पण आयटी नाही. त्याचा डायरेक्ट हॉस्पीटल अ‍ॅडमिनीस्ट्रेशन, डॉक्टर्स, नर्सेस यांच्याशी संबंध येतो. त्यांच्या मते ACA मूळ स्वरूपात चांगले होते. त्याची मोडतोड करून जे काही आणलय ते उत्तम नसलं त्रुटी मान्य करूनही तरी अगदी गरीब लोकांना उपयोगी आहे. ACA बंद केलं तर सगळ्यात जास्त फटका ट्रंपच्या मतदारांना बसणार आहे.

हिलरीनं हेल्थ केअर मधे काहीतरी चांगलं काम केलं असतं. निदान ACAच्या त्रुटी तरी सुधारल्या असत्या.

इट विल बी इंटरेस्टींग इंडीड!

अहो शेंडेनक्षत्र...ओबामाची पहीली ४ वर्षे तर बुशने करुन ठेवलेला प्रचंड लोचा निस्तरण्यातच गेली..त्याचा स्वतःचा कामाचा अजेंडा तर बाजुलाच ठेवा. आणी नशीब समजा ८ वर्षांनी आज अनएम्प्लॉयमेंट रेट ८-९ टक्क्यापासुन ५ टक्क्यावर त्याने आणुन ठेवला आहे..आपल्यापैकी बर्‍याच लोकांना नाहीतर अनएम्प्लॉयमेंटच्या रांगेत उभे राहायला लागले असते हे विसरु नका. आणि काँग्रेसधे आडमुठेपणा कोण करत होत हे समजत नसेल तर कठीण आहे. राज म्हणत आहे तसेच मी सुद्धा म्हणु शकतो होपफुली समबडी विल थिंक रॅशनली. नाहीतर काँग्रेसमधे जसे बिकरींग चालले आहे त्यात आणि आपण इथे करत असलेल्या चर्चेत काहीच फरक नाही.

इथे मी ऑब्जेक्टिव्हली हिलरी का हरु शकते किंवा हरली याचे विवेचन करत होतो. मीच नाही तर सगळे जग त्याचे उत्तर शोधायच्या प्रयत्नात आहे. ते करताना कधीही मी ट्रंप जिंकला म्हणुन दंगल, जाळपोळ करावी किंवा जे तसे करत आहेत त्याचे समर्थन केलेले नाही व करणारही नाही ..इतरही सगळे तसेच म्हणत आहेत.

ते विवेचन करताना मी जी काही विधाने केली आहेत ती सर्वस्वी माझी आहेत. ती विधाने ( जी तुम्ही क्योट केली आहेत) त्याचे बेसिस म्हणजे जे वेगवेगळे पोस्ट इलेक्शन पोस्टमार्टम चालले आहे..रेडिओ,टिव्ही व व्रुत्तपत्रामधे..ज्यात दोन्ही पक्षाचे सोर्सेस आहेत.. त्यावरुन काढलेल्या निष्कर्षातुन केलेली आहेत. तसेच माझ्या रोजच्या जिवनात जे माझे आजुबाजुचे दोन्ही पक्षाचे लोक आहेत त्यांच्याशी बोलुन केलेली ती विधाने आहेत्..झालच तर मला जो अमेरिकेच्या गेल्या ४०० वर्षाच्या इतिहासात जो इंटरेस्ट आहे त्यामूळे मी जी काही त्याबद्दलची शेकडो पुस्तके वाचली आहेत त्यावरुन माझे स्वतःचे काही अंदाज मी केले आहेत. त्यामुळे मी नुसते हवेत तीर मरले आहेत असे तुम्हाला वाट्त असेल तर खुशाल वाटुन घ्या. आणी मी केलेली विधाने म्हणजे काळ्या दगडावरची रेघ आहे असाही दावा मी केला नाही. उलट माझ्या निवडणु़कीच्या दिवशी लिहीलेल्या पहिल्या पोस्टमधे मी म्हटलेही होते.. ट्रंप एवढा कंपॅटिटिव्ह का याची मी दिलेल्या कारणा व्यतिरिक्त अजुनही कारणे समजुन घ्यायला आवडेल.

आणि तुम्ही जी रिपब्लिकन पक्षातली ४-५ अल्पसंख्याक लोकांची टोकन नावे दिली आहेत ती देउन जर तुम्हाला रिबब्लिकन पार्टी ही मायनॉरिटी पार्टीला रिप्रेझेंट करते असा आभास निर्माण करायचा असेल तर तश्या तुमच्या स्वप्निय दुनियेतुन व गैरसमजुतीतून तुम्हाला बाहेर काढण्याइतका समर्थ मी नाही हे मी प्रांजळपणे कबुल करतो. खर म्हणजे तुमचे ते उदाहरण वाचुन मला एक मुलभुत शंका येउ लागली आहे की २ पार्टीमधला वैचारीक मतभेद समजण्यास तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे की काय.

असो.तुमच्या कंझरव्हेटिव्ह विचारसरणीबद्दल मला आदरच आहे..इथे मी माझी इथली पोस्ट्स त्या विचारसरणीला किंवा तशी विचारसरणी असलेल्यांना झोडपायचेच या हेतुने लिहीली नाहीत..तर ट्रंप का जिंकला किंवा हिलरी का हरली याची मला वाटलेली कारणे काय आहेत ते लिहावेसे वाटले म्हणुन लिहीली. ती जर तुम्ही नीट वाचली असतील तर मी तिच्या काय चुका झाल्या व लोक तिच्या ऐवजी ट्रंपला का निवडतील किंवा निवडले.. याबाबतचे माझे विचार... त्याबद्दलच जास्त लिहीले आहे.

परत एकदा.. एक प्रेसिडेंट म्हणुन ट्रंपला शुभेच्छा!

असामी... बोल ..भांडायला कधी येतोस माझ्याकडे?..लगे हात क्रिकेट व फुटबॉलवरही गप्पा होतील..:)
आणी हो.. येताना वैद्यबुवाला पण घेउन ये...बॅकयार्डमधेच गल्ली क्रिकेट खेळु..:)

गोविंद तळवलकरांचा लेख Lol
निदान त्यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती. नो वंडर शेंन आणि राज यांना आवडला Proud

हिलरी हरण्याची कारणं मुकुंदनी चांगली लिहीली आहेत.

राज आणि शेंडेनक्षत्र,

तुम्ही ट्रम्प चे पाठीराखे आहात आणि तो एक सुयोग्य उमेदवार आहे आणि समर्थपणे अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवू शकेल असे तुम्हाला ठाम पणे वाटते हे समजून पुढील प्रश्न विचारत आहे
(मी या धाग्यावरच्या पहिल्या १५०० प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत)

इतक्या ठामपणे तुम्हाला असे वाटण्याचे कारण काय? त्यामागची तुमची भूमिका कोणती?

ट्रम्प चे इतर पाठीराखे ज्यांचे खालील काही समज गैरसमज आहेत असे वाटते
ते तुमच्या आमच्या सारख्यांचा विरोध करतात कारण आपण बाहेरून इथे आलो आहोत,
त्यांच्या नोकऱ्या आपण हिसकावून (?) घेतल्या आहेत,
बाहेरून येऊन आपण त्यांच्यापेक्षा वरचढ झालो (?) आहोत
आपण गोरे नाही त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा कमी दर्जा चे आहोत असा त्यातील काहींचा समज आहे इत्यादी

त्यांच्या नेत्याला तुम्ही सुद्धा समर्थन देताय, या अनुषंगाने तुमची भूमिका काय आहे?
(त्यांच्या मते आपण उपरे आहोत, त्यांच्यातले नाही)

नवीन सरकार ची ध्येयधोरणे साधारणपणे अल्पसंख्य आणि / किंवा परदेशातून येथे स्थायिक झालेले / होऊ पाहणारे याना अनुकूल नसतील असे चित्र आहे, या बद्दल आपले मत काय?

निवडुणकी दरम्यान केल्या गेलेल्या अतिरेकी आणि बेछूट प्रचारामुळे बराच मोठा जनसमुदाय (ज्यात इतर सर्वांबरोबर आपण भारतीय जे इथे स्थायिक आहोत ते ही येतो) अस्वस्थ किंवा चिंतीत आहे हे तुम्हाला मान्य आहे का ?
आणि आता निवडणुकीचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने काही लोकांनी उघड उघड इतरांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे हे तुम्हाला योग्य वाटते का?

सध्या निवडणुकीच्या निकालाविरुद्ध जी आंदोलनं, दंगे सुरु आहेत ते साफ चूक आहे आणि त्याचे कोणतेही समर्थन नाही हे संपूर्णपणे मान्य आहे.

आपण किती ही वर्ष इथे राहिलो तरी त्यांच्यातील काही लोकांच्या मते उपरेच हे खरे नाही का?
त्यामुळे आपल्याला थेट काही त्रास नाही झाला तरी त्यांना आपण त्यांच्यातील एक वाटत नाही हे नाकारता येणार नाही ना?

सध्या तटस्थ राहावे काय होईल ते पाहावे आणि त्यावरून ठरवावे की नवीन अध्यक्ष आणि त्यांची टीम देशाचे त्यातील सर्व नागरिकांचे भले करतायत किंवा वाईट, असे माझे वैयक्तिक मत आहे.

मस्त धागा आहे. जागतिक राजकारणाची खूपच छान माहिती मिळत आहे.

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार!

मला आवडलेले प्रतिसाद :

१.

ट्रंप इथे असलेल्या इमीग्रंटसचाही प्रेसीडेंट आहे. त्याची काय जबाबदारी असावी आणि होती?

(क्ष हा य लोकांचाही प्रतिनिधी आहे.. या चालीवर वाचावे)

२.

अरे पण तोच माणुस आता जबाबदारीच्या पदावर लोकशाहि मार्गाने निवडुन आल्यावर, सगळ्यांना एकत्र घेउन पुढे जायची भाषा करतोय तर तुम्हि मागचंच काय घेउन बसलात?

३.

ट्रम्पजी इंडीयन्सच्या विरोधात आहेत असा काहींचा समज झालेला दिसतो.

http://trumptowerspune.com/pune/apartments-in-kalyani-nagar

हे पहा ट्रम्पजींचं प्रोजेक्ट. त्यांचे पार्टनर कोण आहेत ते पण पहा. इथले हे पहिले प्रोजेक्ट आहे. ते कशाला भारताला दुखावतील ? अजून एक चंमतग आहे, पण नाही सांगणार,,

---

but then again, why am i re-posting old replies to same thread?

im so daft! forgive me intelligent people. have a nice day!

एक मजेशीर अनुभव लिहावासा वाटला
२-३ वर्षांपूर्वी एका प्रोजेक्ट वर काम करताना क्लायंट इंडियाना मधील होता.
त्या संपूर्ण प्रोजेक्ट दरम्यान मी त्याला थेट इमेल केला तरी रिप्लाय तो माझ्या गोऱ्या बॉस ला करत असे.
मला सीसी देखील करत नसे मी पाठवलेल्या इमेल ला. काय त्याच्या डोक्यात होत कोणास ठाऊक.
एक दोन वेळा माझ्या बॉस ने त्याला सांगितलं मला रिप्लाय कर थेट म्हणून, पण नाही.
अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हे उत्तम. नंतर मी ही फारसं लक्ष दिल नाही मग.

नव्याची नवलाई सरल्यावर मुळ स्वभावावर न येता वाल्याचा वाल्मिकी होईल अशी सद्भावना मनात बाळ्गुन ट्रंपना अमेरिका सर्वलोकसंपन्न राष्ट्र बनविण्यासाठी हार्दिक शुभेच्छा Happy

अंजली
प्रतिसाद वाचून ट्रम्प अमेरिकेत राहणा-या इंडियन ओरोजिन असलेल्या इमिग्रंट्सच्या विरोधात आहेत... असं मी लिहायला हवं होतं.

मला जे सांगायचं होतं ते तुम्ही वाचलेलं नाही. मोदीजींच्या आणि ट्रंपजींच्या इलेक्शन कँपेनची व्यवस्था एकाच कंपनीने पाहिलेली आहे. त्यामुळे दोघांचा प्रचार एक सारखा आहे. कुणाच्या तरी विरोधात पोलरायझेशन. त्यामुळे अन ईझी वाटणं साहजिक आहे. पण प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार वेगळेच असतात. त्यामुळे तसे वागणे कुणालाही शक्य नसते.

आम्ही स्वतः ट्रम्पजींचे बेनेफिशियरीज आहोत. त्यांची इन्वेस्टमेंट भारतात होतेय. आणखी ब-याच देशात होणार आहे. इथल्या लोकल मार्केटमधे हा ब्रॅण्ड बनणार असेल तर अमेरिकेत (इंडीयन ओरिजिन) अमेरिकनांना ते कसे दुखावतील असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.

काही चुकले असेल तर माफ करा.

एक खूपच मजेशीर अनुभव सांगावासा वाटतो. सॅन फ्रान्सिस्को शहराला अभय शहर म्हणतात अर्थात सॅन्क्चुअरी सिटी. ह्याचा अर्थ असा की बेकायदा घुसखोरी केलेल्या लोकांना हे शहर अभय देते. त्यां ह्या रम्य शहरात लोपेझ सान्चेझ नावाचा बेकायदा घुसखोर मेक्सिकोतून येऊन दाखल झाला. हा मनुष्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. दोन तीनदा पकडलाही गेला पण अभयदान मिळाल्यामुळे त्याला मेक्सिकोत हाकलले गेले नाही. ह्या मनुष्याने एका पोलिसकारमधून एक पिस्तूल चोरले.

मग तो फिरत फिरत समुद्रकिनार्‍यावर आला. ते एक लोकप्रिय स्थळ होते. अनेक पर्यटक तिथल्या रम्य वातावरणाचा आनंद घेत हिंडत फिरत होते. ते पाहून लोपेझ सान्चेझला काय झाले माहित नाही. त्याने अचानक पर्यटकांच्या दिशेने चोरलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. त्यातली एक एका ३३ वर्षाच्या गौरवर्णीय युवतीला लागली. तिचे नाव केट स्टाइन्ली. गोळी लागताच ती पडली. जवळ तिचे आईवडिल होते. त्यांनी इमर्जन्सीचा फोन लावून मदत मिळवायचा प्रयत्न केला. पण ती स्त्री तिथेच मरण पावली.

आता हा गुन्हेगार माणूस पकडला गेला. इतका निर्ढावलेला गुन्हेगार, बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसला, अनेक गुन्हे केले पण त्याला मेक्सिकोत हाकलून का दिले नाही?
गंमतीची गोष्ट अशी की हे झाल्यावर सॅन फ्रन्सिस्को शहराचे प्रशासन जे कमालीचे पुरोगामी समजले जाते त्यांच्यापैकी प्रत्येक जण दुसर्याकडे बोट दाखवू लागला. महापौर पोलिस कमिशनरला दोष देतोय, तो शेरिफला देतोय, शेरिफ शहराच्या कौन्सि लकडे बोट दाखवतोय अशी मोठी गंमत उडाली. पण आपल्या शहराचे अभयस्थळ असल्यामुळे मूळ समस्या उद्भवली आहे हे कोणीच मान्य करेना! आहे की नाही मोठी गंमत? त्या निरपराध बाईचा प्राण गेला खरा. पण जगाच्या कल्याणाकरता असे छोटेमोठे हादरे सहन करावेच लागतात!

असुफ:

>>(मी या धाग्यावरच्या पहिल्या १५०० प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत)<<
या विकेंडला वेळ काढुन वाचा, इट्स ए गुड लाइट रिडिंग... Happy

>>इतक्या ठामपणे तुम्हाला असे वाटण्याचे कारण काय? त्यामागची तुमची भूमिका कोणती?<<
१. ट्रंपचं बॅकग्राउंड, सेल्फमेड बिल्यनेर, लिडरशीप क्वालिटिज
२. बिजनेस मध्ये जसं पीपल, प्लॅनिंग/प्रोसेस/पाॅलिसी आणि टेक्नाॅलाॅजी या तीघांची सांगड व्यवस्थित घातल्या शिवाय कुठलाहि प्रोजेक्ट/वेंचर यशस्वी होऊ शकत नाहि, तीच गत गवर्नमेंट ला लागु आहे, असं माझं मत. ट्रंपचा या बाबतीतला अनुभव मोठ्ठा ॲसेट ठरु शकतो.
३. क्लिन स्लेट. अनलाइक हिलरी, नो बॅगेज (वाॅल स्ट्रिट मिंध्यत्व).

>>(त्यांच्या मते आपण उपरे आहोत, त्यांच्यातले नाही)<<
१. कायदेशीर मार्गाने आलेल्या कोणालाहि इथे उपरा समजत नाहि, आणि कोणालाहि तसं समजण्याची संधी देऊ नये.
२. उपरेपणा निघुन जाण्यासाठि सेंस आॅफ ओनरशीप येणे आवश्यक आहे.

>>नवीन सरकार ची ध्येयधोरणे साधारणपणे अल्पसंख्य आणि / किंवा परदेशातून येथे स्थायिक झालेले / होऊ पाहणारे याना अनुकूल नसतील असे चित्र आहे, या बद्दल आपले मत काय?<<
१. चुकिची कल्पना आहे. लिगली या देशात आला/रहात असाल तर हि भिती अवाजवी आहे. द नेशन इज बिल्ट बाय इमिग्रंट्स, आफ्टरआॅल...
२. तुमच्या शिक्शणाचा, कौशल्याचा फायदा या देशाला होणार असेल तर तुम्हाला अस्थिरतेची भिती अजिबात नाहि. अर्थात, स्किलसेट रेलेवंट ठेवण्याची जबाबदारी तुमची.

>>निवडुणकी दरम्यान केल्या गेलेल्या अतिरेकी आणि बेछूट प्रचारामुळे बराच मोठा जनसमुदाय (ज्यात इतर सर्वांबरोबर आपण भारतीय जे इथे स्थायिक आहोत ते ही येतो) अस्वस्थ किंवा चिंतीत आहे हे तुम्हाला मान्य आहे का ?<<
१. इथे परत एकदा हि भिती अवाजवी आहे असंच म्हणेन. दुर्दैवाने या फियरमाॅंगरींग मध्ये मेनस्ट्रिम मिडिया आणि शेपटिवर पाय पडलेल्या नेत्यांचा मोठ्या प्रमाणात हातभार लागलेला आहे.

>>आणि आता निवडणुकीचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याने काही लोकांनी उघड उघड इतरांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे हे तुम्हाला योग्य वाटते का?<<
१. अर्थातच नाहि. दोन्हि पक्शात इंपल्सीव निर्णय घेणारे लोक आहेत. त्यांना काम डाउन करणं हे रिस्पेक्टिव लिडरशीपचं कर्तव्य आहे, होपफुली ते आपापलं कर्तव्य बजावतील...

शेंडेनक्शत्र यांचे हि विचार माझ्या विचारांशी मिळतेजुळते असावेत... Happy

>>पण जगाच्या कल्याणाकरता असे छोटेमोठे हादरे सहन करावेच लागतात!<<

आपण लिबरल/पुरोगामी असलो कि "बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है" असं म्हणायचं असतं... Lol

>>इतक्या ठामपणे तुम्हाला असे वाटण्याचे कारण काय? त्यामागची तुमची भूमिका कोणती?<

राज.. तु दिलेल्या या प्रश्नाचे उत्तर सोडुन पुढच्या ४ प्रश्नांची जी उत्तरे तु दिली आहेस त्याच्याशी मी पुर्णपणे सहमत.

मुकुंद, ट्रंप काहि महिन्यांतच तुझं मतपरिवर्त करेल अशी आशा करतो. गेले दोन दिवस त्याला टिवीवर पाहिलंस का? एकदम गुड बाॅय सारखा वावरतोय... Happy

--------------------------------
तुम्ही ट्रम्प चे पाठीराखे आहात आणि तो एक सुयोग्य उमेदवार आहे आणि समर्थपणे अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवू शकेल असे तुम्हाला ठाम पणे वाटते हे समजून पुढील प्रश्न विचारत आहे
(मी या धाग्यावरच्या पहिल्या १५०० प्रतिक्रिया वाचलेल्या नाहीत)

इतक्या ठामपणे तुम्हाला असे वाटण्याचे कारण काय? त्यामागची तुमची भूमिका कोणती?
-------------------------------------

आम्हाला ठामपणे अमुक काही वाटते आहे हे तुम्ही ठामपणे कसे म्हणू शकता? दोघांपैकी एक हाच पर्याय आहे त्यामुळे अनेक वेळा दगडापेक्षा वीट मऊ अशी निवड केली जाते. त्यात ठामबिम काही नाही. एक अंतःप्रेरणा म्हणू हवे तर (गट फील).

ट्रंप जी आश्वासने देतो आहे त्याच्या १०% पाळली तरी त्याचे अध्यक्षत्व सफल झाले असे मी मानतो.
त्याची ही काही आश्वासने
बेकायदा स्थलांतराला आळा घालणे, अनिर्बंध आयातीला कर लावणे, देशात उत्पादन करणे सोपे बनवणे, मुस्लिम दहशतवादावर नियंत्रण आणणे, जपान, जर्मनी, सौदी अरेबिया ह्या देशांना मदत केली तर त्याची योग्य किंमत वसूल करणे.
मध्यपूर्वेतील (शस्त्रास्त्र लॉबीच्या दबावामुळे होणारा) अव्यापारेषू व्यापार बंद करणे.

हिलरीने याबाबतीत आश्वासनेही दिलेली नाहीत त्यामुळे ती पाळण्याचा प्रश्नच येत नाही.

मला जिव्हाळ्याच्या वाटणार्‍या विषयात हिलरी काही करणार नाही हे मला ठामपणे वाटते. त्यामानाने ट्रंप काही करेल अशी शक्यता तरी वाटते आहे.

बाकी बाबतीत माझी आणि राज यांची मते सारखीच. Happy

राज व शें.न., हे वरचे प्रतिसाद चांगले आहेत तुम्हा दोघांचे.

मला सगळ्यात आश्चर्य हे वाटतं की सगळे मिडिया, पोलस्टर्स, भारतातल्या चाणक्य पोलपासून इथले सगळे पोल- सगळे चूक ठरले. हिलरी का हरली याचा अ‍ॅनालिसिस करतील तसाच आता पोल्स का चुकले याचा पण वेगळा अ‍ॅनालिसिस करावा लागेल.

त्या सर्व पोल्स दिशाभुल करणार्‍या ठरल्या, त्याने हिलरीचे काढावरचे निरुत्साही समर्थकान्ना बेसावध ठेवले, आणि ट्रम्पचे सगळे सपोर्टसनी झाडुन मतदान केले. कमी मतदान झाल्याचे नुकसान हिलरीला झाले.

मुकुन्द यान्च्या सर्व पोस्ट नेहेमीप्रमाणेच आवडल्या. हिलरीने खुप वेळा हिस्पॅनिक, ब्लॅक, मुस्लिम यान्चीच नावे घेतली. मायनॉरिटी महत्वाचे आहेतच, पण बहुसन्ख्य व्हाईट पण तेव्हढेच महत्वाचे आहेत. त्यान्ना कशाला दुर्लक्षायचे? त्यातही जे कमी शिकलेले भाइ व्हाईट्स आहेत त्यान्ना खुप डावलले गेले असे वाटणे सहाजिक आहे. ट्रम्पने त्यान्ची दुखरी नस व्यावस्थित जाणली आणि योजनाबद्ध हल्ला चढवला.

मला सकारात्मक बदलाच्या मोठ्या आशा आहेत. (निवडणुकीत तो जेव्हढा बोलत होता त्या पैकी अशक्यप्राय गोष्टी करणार नाही हे गृहित धरलेले आहे, उदा: मेस्किकन वॉल, पहिल्यास दिवशी इराण करार रद्द, ओबामा केअर रद्द हे सर्व निवडणुक जुमला होता असे मानतो). असो, ट्रम्पला सन्धी मिळाली आहे, बघायचे सन्धीचे सोने कसे करतो ते. ट्रम्प यान्ना शुभेच्छा...

. हिलरीने खुप वेळा हिस्पॅनिक, ब्लॅक, मुस्लिम यान्चीच नावे घेतली. मायनॉरिटी महत्वाचे आहेतच, पण बहुसन्ख्य व्हाईट पण तेव्हढेच महत्वाचे आहेत. त्यान्ना कशाला दुर्लक्षायचे?

खरंय!
आणि हिस्पॅनिक्स व ब्लॅक्सनी तिला ओबामांच्या तुलनेत मतंही कमी दिली.
इंडियन अमेरिकन्सचं हे एक रत्न सापडलं. आपापल्या जबाबदारीवर बघणे!

https://www.youtube.com/watch?v=SCu5G7McS2M

डोन्ट इव्हन फील लाईक रीडिंग द "कान्ट अ‍ॅव्हॉईड इट, एंजॉय इट" टाईप रिस्पॉन्सेस.

माफ करा इंग्रजी येत नाही. देवनागरीतून टंकले आहे.

अन वाल्याचा वाल्मिकी! वुऽहू!~

लयच भारी!!

Pages