अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकुंद Lol
It's always good to hear your view point my friend. Happy

ते बिली बुशचं लफडं होणं सहाजिक आहे. कंपनी तुमच्याकडून काँट्रॅक्ट लिहून घेते, so you can fight it if you'd like (just like it's their right to fire you, you too have the right to defend yourself) पण ते सहसा लूजिंग बॅटल असतं.
ट्रंप was running for public office and unless someone files suit (which people have) and are willing to go the distance could've ruined his chances too. But that never happened. So no injustice happened as such.

रशिया हा आता कम्युनिस्ट आहे का? एक मूलभूत शंका.

फळे वगैरे काढण्याकरता रीतसर परमिट घेऊन, ३-४-६ महिन्याचा व्हिसा घेऊन लोक आणता येणे शक्य आहे. अशा गटाकरता त्वरित, सोप्या पद्धतीने व्हिसा उपलब्ध करुन देणे शक्य आहे. केवळ उघड्या सीमेवरुन घुसखोरी करणे हाच एकमेव मार्ग नव्हे.

==हिलरीच्या पराभवाचे एक अजुन कारण म्हणजे तिच्या कँपेनने हिस्पॅनिक व कलर्ड लोकांना कसे प्रचंड मोठ्या प्रमाणात ते व्होट करायला सांगत आहेत याचा केलेला प्रचंड गाजावाजा! ..ते बघुन अनुत्साही व्हाइट रिपब्लिकन्स..जे ट्रंपला व्होट करायला बहुतेक कचरत होते..तेही इर्षेला पेटुन म्हणाले असतील..
==
हे सगळे कुठल्या पुराव्यानिशी केलेले दावे आहेत का नुसतेच अंदाज? ट्रंपला फक्त श्वेतवर्णीयांनीच मत दिले ह्याला काही आधार आहे का?

==
पण अजुन १५-२० वर्षे ..रिपब्लिकन पार्टी जर अशीच फक्त व्हाइट लोकांची पार्टी राहीली तर.. रिपब्लिकन पार्टीचा प्रेसिडंट निवडुन येणे कठीण होणार आहे.
==
ही अशीच व्हाईट लोकांची पार्टी म्हणजे काय? बेन कार्सन, हर्मन केन, टेड क्रुझ, मार्को रुबियो, निकी हेली, बॉबी जिंदाल इतके नेते ह्यातले काही आपापल्या राज्यात मानाची पदे बाळगून आहेत. हे काय निव्वळ श्वेतवर्णी आहेत का? काळ्या, निमगोर्या, पिवळ्या ह्या सगळ्या अल्पसंख्यांनी यावच्चंद्रदिवाकरौ डेमोक्रॅटसची साथ देण्याचे वचान दिले आहे का? अल्पसंख्य लोकांत धार्मिक, धनिक, परंपरावादी लोक नसतातच काय? सर्व अल्पसंख्य कायम मेंढराप्रमाणे डेमोक्रॅट्स ना साथ देतील हे फारच भोळसटापणाचे समीकरण आहे.

ओबामाच्या निष्क्रियतेकरता सबबी शोधणे सोपे आहे. पण जातिवंत नेता अशी हार मानत नसतो. नाक दाबल्यावर तोंड उघडते तसे देवाणघेवाण करुन १००% नाही तर ३०% - ४०% कामे करवून घेता येतात. पण खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा माज केला असेल तर दुसरी बाजूही दाद देणार नाही.

ओबामा निवडून आल्यावर किती दंगली झाल्या? किती दुकाने फुटली? किती लोकांना मारले? नुसत्या तोंडच्या बाता काय कुणीही करु शकते. इथे ओकलंडमधे लोक खरोखरची दुकाने फोडतायत. पत्रकारांना मारहाण करत आहेत.

हे लोक डेमोक्रॅट नाहीत असा आपला दावा आहे का? मग कोण आहेत ते ? रिपब्लिकन की लिबर्टेरियन? आणि नेमके याच वेळेस का उपटले? त्यांना नक्की काय हवे आहे? नव्याने निवडणुका? की ओबामाला आणखी ४ वर्षे द्यायची?

, निकी हेली, बॉबी जिंदाल इतके नेते ह्यातले काही आपापल्या राज्यात मानाची पदे बाळगून आहेत. हे काय निव्वळ श्वेतवर्णी आहेत का

शेंन,

कधी ann coulter nikki haley असं गुगल सर्च करा. मग निकी हेलीना मान मिळेल की अपमान ते ठरवा.

शेंडेनक्शत्रांच्या ओबामा संबंधित पोस्टशी अंशत: सहमत. गेले वर्षभर तरी ओबामाचा कारभार निष्क्रियतेकडे झुकलेला वाटतो, ॲज इफ हि वाज काईंडा मेंटली चेक्ड आउट. सिरीया, एस्पेशली अलेपो सिचुएशन हि डिडंट इवन बादर टु इंटरविन...

नाॅट शोर हिज ॲकंप्लिशमेंट्स वुड लीव ए ग्रेट लेगसी बिहाइंड, हौएवर हि डेफिनेटली वर्कड हार्ड आॅन हिज गोल्फ गेम टु इंप्रुव्ड हिज हॅंडिकॅप... Happy

जुना आकडा आहे पण चालायला हरकत नाही
http://www.gallup.com/poll/160373/democrats-racially-diverse-republicans...

delegates कुठले होते हा एक उत्तम नमुना होउ शकतो
http://www.vox.com/2016/7/29/12295830/republican-democratic-delegates-di...

ओबामाच्या निष्क्रियतेकरता सबबी शोधणे सोपे आहे. पण जातिवंत नेता अशी हार मानत नसतो. नाक दाबल्यावर तोंड उघडते तसे देवाणघेवाण करुन १००% नाही तर ३०% - ४०% कामे करवून घेता येतात. पण खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असा माज केला असेल तर दुसरी बाजूही दाद देणार नाही. >> हे उगाचच ;लिहिण्यासाठी लिहिता आहात हे उघड आहे. सहा वर्षे काहीच काम झाले नाही असे तुमचे म्हणणे आहे का ?

काँट्रॅक्ट >> बुवा ह्याबाबतीमधे फक्त लीगल पॉईंट ने येता एथिकल गोष्ट पण येते. मी आधी पण लिहिले होते कि तुमचा मोराल कंपास कसा आहे ह्यावर ह्याबाबतीचे मह्त्व ठरेल. मागच्या काहि वर्षांमधला ह्या बाबतींमधला जागरुक समाज (पेन स्टेट पासून कॉस्बी पर्यंत) बघता बहुतांशी लोकांना ( ते कुठल्या बाजूचे आहे त ह्यापलीकडे बघता) हे अतिशय खटकले असेल असे मला वाटले होते. अर्थात तसे नाही हे उघड आहे.

काँट्रॅक्ट >> बुवा ह्याबाबतीमधे फक्त लीगल पॉईंट ने येता एथिकल गोष्ट पण येते. मी आधी पण लिहिले होते कि तुमचा मोराल कंपास कसा आहे ह्यावर ह्याबाबतीचे मह्त्व ठरेल. मागच्या काहि वर्षांमधला ह्या बाबतींमधला जागरुक समाज (पेन स्टेट पासून कॉस्बी पर्यंत) बघता बहुतांशी लोकांना ( ते कुठल्या बाजूचे आहे त ह्यापलीकडे बघता) हे अतिशय खटकले असेल असे मला वाटले होते. अर्थात तसे नाही हे उघड आहे.

बिल क्लिंटनचा इतका drama होऊनही तो लोकप्रिय आहेच की. तिसरी टर्म घेता येत नाही अन्यथा पहिला धुरळा खाली बसल्यावर तो निवडूनही आला असता २००८ मध्ये वगैरे. ओबामांच्या दोन्ही कन्वेन्शनला बिलची स्पीचेस सुपरहिट झाली होती.

राज Lol

मॉरल कंपास आणि लोकांचं तुमच्या विषयी परसेप्शन (बेस्ड ऑन देअर मॉरल कंपस) हे मॅटर करतच पण प्रश्न बिली बुशची नोकरी गेली अन ट्रंप मात्र काँटेस्ट करु शकला, हा होता. They both faced criticism but only Billy Bush paid the price because his relationship with his employer was based on a contract he signed. येवढच म्हणत होतो.

== हे उगाचच ;लिहिण्यासाठी लिहिता आहात हे उघड आहे. सहा वर्षे काहीच काम झाले नाही असे तुमचे म्हणणे आहे का ?

तुमच्या बाजूने (तुम्ही व्यक्तिशः नव्हे) हे खालील दावे केले होते की ओबामाला काँग्रेसने ८ वर्षे जास्त काहीच करू दिले नव्हते. मला वाटते ही लंगडी सबब आहे. घासाघीस, वाटाघाटी हे नीट करता येत असते तर इतके निष्क्रिय रहावे लागले नसते असे माझे मत. आता मूळ दावाच खोटा आहे असे तुमचे मत असेल तर तुम्ही तसा दावा करणार्याशी भांडा. माझ्याशी नको!

मुकुंदरावांचा "तो" उतारा येणेप्रमाणे:
========================
किंवा बँक्स व ऑटो बेल आउट सोडले ( ज्या ऑटो बेलाउटने.. ज्या मिशिगनच्या लोकांनी ट्रंपला निवडुन दिले..त्यांचे उरलेसुरले जॉब्स वाचले होते!) तर त्याला काँग्रेसने ८ वर्षात जास्त काहीच करु दिले नाही.. रिपब्लिकन मॅजॉरीटी मेड शुअर तो अत्यंत इन इफेक्टिव्ह प्रेसिडन्ट बनेल्..टुथलेस टायगर सारखा..
========================

== कधी ann coulter nikki haley असं गुगल सर्च करा. मग निकी हेलीना मान मिळेल की अपमान ते ठरवा.

अ‍ॅन कूल्टर ही रिपब्लिकन पक्षाचे कुठलेही पद धारण करत नाही. ती निकी हेलीला काही का बोलली असेना का, त्यात रिपब्लिकन पक्षाची अधिकृत भूमिका दिसत नाही. कूल्टरबाईंची स्वतःची भूमिका.

आणि माझा मुद्दा निकी हेलीच्या पदाचा आहे. साउथ कॅरोलिनासारख्या प्रतिगामी समजल्या जाणार्‍या राज्यात एक भारतीय वंशाची महिला गव्हर्नर बनू शकते हे विशेष आहे. ज्या पक्षावर जातीयवादाचा आरोप होत असतो त्याच्याकडून हे बघायला मिळणे म्हणजे रिपब्लिकन पक्ष हा केवळ श्वेतवर्णीयांकरताच असा पक्ष नव्हे.

घासाघीस, वाटाघाटी हे नीट करता येत असते तर इतके निष्क्रिय रहावे लागले नसते असे माझे मत. आता मूळ दावाच खोटा आहे असे तुमचे मत असेल तर तुम्ही तसा दावा करणार्याशी भांडा. माझ्याशी नको!>>>>

बुवा मोड ऑन -
आणि त्या वाटाघाटी, घासाघीस केली नव्हती हे कशाच्या आधारे म्हणताहात? तुमच्या अंगणात झाली होती का तुम्हाला वाटाघाटीसाठी मध्यस्त म्हणून बोलवलं होतं घासाघीस तुम्हाला कळायला? कैच्या कै लॉजिक तुमचं.
-बुवा मोड ऑफ.

Proud

पण ओबामा केअर त्याच्या मूळ स्वरूपात अमलात न येण्याचं कारण म्हणजे अशा अनेक वाटाघाटी करायला त्याला भाग पाडलं. असो.

रिपब्लिकन बाजूने असा दावा केला जात आहे की ओबामाने कुठलीही तडजोड करण्यास नकार दिला त्यामुळे त्यांनीही आडमुठेपणा सुरू केला. ओबामा हॅरी रीडला सांगत असे की तुम्ही मिच मॅकोनेलशी बोलून त्याला पटवा. मी काहीही करणार नाही. अशा प्रकारे चर्चेत सहभागी न होण्याच्या भूमिकेमुळे तडजोड होऊ शकली नाही. आता कोण किती खरे बोलतो ते तुम्हीच बघा.

ओबामा लेम डक बनल्यावर दोन्ही बाजूच्या भूमिका जास्त ताठर झाल्या आणि त्यातून निष्क्रियता घडली. पहिल्या ४ वर्षात ओबामा थोडेफार तरी करु शकला. असे माझे मत.

रिपब्लिकन बाजूने असा दावा केला जात आहे की ओबामाने कुठलीही तडजोड करण्यास नकार दिला त्यामुळे त्यांनीही आडमुठेपणा सुरू केला. >>> म्हणजे रीपब्लीकनांनी त्याला काम करू दिलं नाही हे तर मान्य झालं ना? त्याचा सामान्य लोकांना तोटा झाला.

अहो, साधी गोष्ट आहे टाळी एका हाताने वाजत नाही. दोन लागतात. तेव्हा निव्वळ रिपब्लिकन हाउस रेप्रेजेंटेटिव्ह्ज नव्हे तर ओबामाही आडमुठा होता.

तुम्ही तसा दावा करणार्याशी भांडा. माझ्याशी नको! >> त्याने काम केले नाही हा दावा तुमचा आहे. त्याला करू दिले नाही हा इतरांचा आहे. इथे टाळी वाजवायची इच्छाच नव्हती. तुम्ही सुरूवातीपासून ACA मधे रिप्ल्बलिकन्स नी घुसवलेले क्लॉज बघितले असते तरी तुम्हीसुद्धा तोंडात आश्चर्याने बोटे घातली असती.

असो, अशा घटना बर्‍याच जणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी ऐकल्या. (खालची लिंक लिबरल मिडियामधली नाही, घडणारी जागा रेड आहे ) कोणी कितीही कोलांट्या उड्या मारून कसेही समर्थन करोत, ह्या निवडणूकीमधे फक्त एका उमेदवाराने रेसिस्ट अंडरकरंट ला पूर्ण जागे केले आहे हे नाकारता येणार नाही.
http://www.dallasnews.com/news/education/2016/11/10/students-plano-east-...

असामी, अस्वस्थ करणारी न्यूज आहे.

शेंन, तुम्हाला काय वाटतं अशा होणार्‍या घटनांबद्दल? का होत आहेत आणि काय केलं पाहिजे? ट्रंप इथे असलेल्या इमीग्रंटसचाही प्रेसीडेंट आहे. त्याची काय जबाबदारी असावी आणि होती?

दुर्दैवी घटना आहेत. प्रेसिडेंट, प्रेसिडेंट-इलेक्ट हे प्रकार थांबवण्याकरता प्रयत्न करतीलंच त्याचबरोबर डेम्स लिडरशीपने हि त्यांच्या समर्थकांना आवरण्याचे प्रयत्न करावेत. लोकशाहित दंगल, जाळपोळ करुन जनतेचं मॅंडेट बदलता येत नाहि...

कसे आहे ना कि निवडणूकीच्या आधी पासून "निवडणूकीचे निकाल मानण्याची जरुर नाही" असे चिथावणीखोर वक्तव्य जेंव्हा एक उमेदवार उघड उघड वारंवार सांगतो तेंव्हा अशा (दोन्ही प्रकारच्या) घटनांचा पाया घातला जातो. नंतर कितीही सामंजास्याचा सूर लावला तरी आधीच्या बोलण्याचे उत्तर दायीत्व एव्हढ्या सहजासहजी नाकारता येत नाही. लोकशाही चा डंका दोन्ही बाजूने वाजवायला हवा.

काल टेड क्रूझ म्हणत होता की कायदेशीर रित्या अमेरिकेमध्ये येणार्यांना आमचा विरोध नाही , त्यांचा स्वागत च आहे.

पण ट्रम्प कॅम्प मधील इतर काही उच्च पदस्थ नेत्यांच्या भूमिकांपासून (की ज्यांना कॅबिनेट पोस्ट किंवा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये महत्वाची पद मिळण्याची शक्यता आहे) टेड क्रूझ चं वरील विधान विसंगत आहे.

तो फक्त बोलायचं म्हणून बोलला की खरंच त्यांची अधिकृत भूमिका तशी असेल हे समजेलच.

लोकशाहित दंगल, जाळपोळ करुन जनतेचं मॅंडेट बदलता येत नाहि...>>>>> तेच ना. म्हणजे मजॉरिटी ऑफ द लोकांनी दिलेला कौल धुडकावून लावायचा? अन मग ते लोकं रस्त्यावर आले मग?
नवीन नवीन आहे बातमी म्हणून जरा जास्त होत आहे. काही दिवसांनी धार कमी होईल, पोटापाण्याचा प्रश्न जास्त महत्वाचा वाटायला लागला की कंट्रोल मध्ये येइल.

डेम्स लिडरशीपने हि त्यांच्या समर्थकांना आवरण्याचे प्रयत्न करावेत. लोकशाहित दंगल, जाळपोळ करुन जनतेचं मॅंडेट बदलता येत नाहि...>>>>> राज, वरची बातमी वाचलीत का तुम्ही? दंगल, जाळपोळ याबद्दल नाही. तो वेगळा इशू आहे आणि बद्दल ऑलरेडी अनेकांनी सांगितलं आहे की प्रकार बरोबर नाहीत, थांबवले गेले पाहिजेत.
माझा मुद्दा असा होता की प्रचार करताना ट्रंपने ज्या द्वेष भावनेनं केला त्यामुळे अशा विचारसरणीला खतपाणी मिळालं. असा विचार करणारा माणूस जर प्रेसिडेंट असेल तर अशी विचारसरणी बरोबर हा मेसेज समाजात जातोय जो डेंजरस आहे. हायस्कूल सोडा, इथे एलिमेंटरी शाळेत असे प्रकार झालेत. काय दर्शवते हे?

>>प्रचार करताना ट्रंपने ज्या द्वेष भावनेनं केला त्यामुळे अशा विचारसरणीला खतपाणी मिळालं असा विचार करणारा माणूस जर प्रेसिडेंट असेल तर अशी विचारसरणी बरोबर हा मेसेज समाजात जातोय जो डेंजरस आहे. >> सहमत.

=====
कसे आहे ना कि निवडणूकीच्या आधी पासून "निवडणूकीचे निकाल मानण्याची जरुर नाही" असे चिथावणीखोर वक्तव्य जेंव्हा एक उमेदवार उघड उघड वारंवार सांगतो तेंव्हा अशा (दोन्ही प्रकारच्या) घटनांचा पाया घातला जातो.
===

ट्रंपविरोधी आंदोलने, दंगली, जाळपोळी, मारहाणी होत आहेत आणि तरी त्याला जबाबदार ट्रंपच? वा!

ट्रंपने "ते" विधान का केले? कारण हिलरीने प्रायमरी निवडणूकीत फसवणुक केल्याचे धडधडीतपणे उघड झाले होते. त्याकरता बळीचा बकरा म्हणून डेबी वासरमन शुल्झला हाकलून देण्यात आले हे विसरलात का? तेव्हा हिलरीने आपला लोकशाही परंपरेवर किती विश्वास आहे ते आधीच सिद्ध केले होते त्यामुळे निकाल लागला तरी जर गैर प्रकार झाल्याचे दिसले तर आम्ही त्याला कोर्टात आव्हान देऊ असे त्याला सुचवायचे होते. रस्त्यावर येऊन जाळपोळ करु असे नाही. पण त्याचे कुठल्या विधानाचा कसा अर्थ लावायचा ते डेमोक्रॅट्सच जाणोत!

आणि समजा त्याने गाय मारली तर तुम्ही वासरू मारणार का?

ट्रम्पजी इंडीयन्सच्या विरोधात आहेत असा काहींचा समज झालेला दिसतो.

http://trumptowerspune.com/pune/apartments-in-kalyani-nagar

हे पहा ट्रम्पजींचं प्रोजेक्ट. त्यांचे पार्टनर कोण आहेत ते पण पहा. इथले हे पहिले प्रोजेक्ट आहे. ते कशाला भारताला दुखावतील ? अजून एक चंमतग आहे, पण नाही सांगणार,,

>>प्रचार करताना ट्रंपने ज्या द्वेष भावनेनं केला त्यामुळे अशा विचारसरणीला खतपाणी मिळालं असा विचार करणारा माणूस जर प्रेसिडेंट असेल तर अशी विचारसरणी बरोबर हा मेसेज समाजात जातोय जो डेंजरस आहे.<<

अरे पण तोच माणुस आता जबाबदारीच्या पदावर लोकशाहि मार्गाने निवडुन आल्यावर, सगळ्यांना एकत्र घेउन पुढे जायची भाषा करतोय तर तुम्हि मागचंच काय घेउन बसलात? या पुढे त्याने डिवायझिव पावलं उचलली तर रस्त्यावर या...

शेंन, आय डाउट इट. ट्रंप लिगल इमिग्रेशन वर पण खुप रिस्ट्रिकक्शन आण्णार आहे म्हणे. आधी मला वाटलं होतं की फ्युचर एच वन कॅप कमी करेल पण नाऊ आय एम वरिड ही मे चूझ टु प्रोलाँग द ऑलरेडी क्रेझी डिलेय्स बाय रिड्युसिंग कोटाज.

त्यामुळे निकाल लागला तरी जर गैर प्रकार झाल्याचे दिसले तर आम्ही त्याला कोर्टात आव्हान देऊ असे त्याला सुचवायचे होते. >> LOL तो असे म्हणाला होता का ? असंदिग्ध विधाने तेंव्हाच केली जातात जेंव्हा त्यातून पळवाटा हव्या असतात. तुम्ही हवे तसे वळवता आहात. २०१२ मधे ओबामा जिंकल्यानंतर ट्रंप ने 'हे बेकायदेशीर आहे, ह्याबद्दल रस्त्यावर येऊया' असे जे म्हटले होते पण "रस्त्यावर येऊन गाडी चालवत कोर्टात जाऊया' असे होते बहुतेक. तेव्हढाच लगे हाथ grab her p*** चा पण त्याला अभिप्रेत असलेला अर्थ सांगूनतेव्हढाच्तो काय लागत नाही बुवा.

आणि समजा त्याने गाय मारली तर तुम्ही वासरू मारणार का? >>> नाही करणार नि केलेलेही नाही. पण तुम्ही म्हणताय तसे फक्त करणार्‍यांवर त्याचा ठपका जातो हे मान्य नाही. पण गाय मारण्याबद्दल त्याला तुम्ही काय शिक्षा केली ते सांगा. तुम्ही तर त्याची उघड उघड भलावण करताय.

या पुढे त्याने डिवायझिव पावलं उचलली तर रस्त्यावर या... >> राज परत तेच तेच होतय. रस्त्यावर येणे हा उपाय नाही आहे.

>>राज परत तेच तेच होतय. रस्त्यावर येणे हा उपाय नाही आहे.<<

दॅट्स एक्झॅटली माय पाॅइंट. "रस्त्यावर" शब्द मी जाणुनबुजुन लिहिला, या आशेने कि ॲटलिस्ट समवन विल थिंक रॅशनली. धन्यवाद, असामी... Happy

ही आज ब्लूमबर्ग मध्ये प्रसिद्ध झालेला लेखाची लिंक

http://www.bloomberg.com/politics/articles/2016-11-10/trump-shows-every-...

आणि ह्या उताऱ्यामधील शेवटचे वाक्य जे आपल्याला थेट लागू पडते

The website reemphasized other Trump proposals for which he may need congressional approval, including plans to build a wall on the U.S.-Mexico border, suspend new visas from certain high-risk countries, end funding for sanctuary cities, and change legal immigration policies to better serve U.S. workers.

ट्रंप हा सफाईदार वक्ता नाही हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. किबहुना त्याच्या जिकण्यामागे त्याचे सामान्यत्वही कारणीभूत असेल. त्याचे असंदिग्ध बोलणे त्याचा सोयिस्कर अर्थ तुम्ही लावता तसा आम्हीही लावू शकतो. कायदा हातात घ्या असे त्याने कधीच म्हटलेले नव्हते. त्यामुळे इथे तो तसे म्हणाला असेल असा निष्कर्ष घाईचा वाटतो.

== लगे हाथ grab her p*** चा पण त्याला अभिप्रेत असलेला अर्थ सांगून टाकाच.

काहीही अभिप्रेत अर्थ नाही. जो काही आहे तो सरळ आहे. त्याने चूक केली आणि त्याकरता माफी मागितली आहे.

गाय मारण्याबद्दल शिक्षा? म्हणजे काय नक्की? मी एक म्हण म्हणून वापरली होती आणि त्यात "समजा" हा शब्द घातला आहे हे विसरु नये. तेव्हा तुम्हाला तसे वाटत असेल तर तुम्ही त्याहीपेक्षा वाईट वागून काय सिद्ध करत आहात असा तो प्र्श्न होता.

डेमॉक्रॅट उच्चपदस्थ जर लोकशाहीवर विश्वास ठेवत असतील तर त्यांनी आपल्या पाठिराख्यांना रस्त्यावर येऊन दंगली करण्यापासून परावृत्त केलेच पाहिजे. ट्रंपवर दोष लादून ह्या विध्वंसक कृत्याचे कुठलेही समर्थन होत नाही.

Pages