अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके फाईन. आय वॉज जोकिंग. Happy
अहो लोकं असंतोष दाखवणारच पण एकदा लेट्स वर्क वित हिम असं म्हणाल्यावर आणखिन फटकारुन काय उपयोग? इट विल मेक थिंग्स वर्स.

आता व्यावसायिक ट्रंप विरुद्ध अध्यक्ष ट्रंप ची परिणीती कशात होते ते बघुया. पुर्ण मालकीचा व्यवसाय असल्याने करविवरणाप्रमाणे व्यवसायिक करार सुद्धा गोपनिय ठेवण्याची मुभा ट्रंप घेऊ शकतात.

शें.न. माझे पोस्ट तुमच्या "ओबामा हा आता "उरलो उपकारापुरता" असा वागतो की काय असा संशय येत आहे. " वाक्याला धरून होते. तुमचे पोस्ट पुढे असे आहे. " अनेकदा त्याने काळ्या लोकांचे पोलिसांवर हल्ले करण्याचे समर्थन केले आहे. टेक्ससमधे ब्लॅक लाइव्ह्स म्याटरच्या रॅलीत एका स्नायपरने अनेक पोलिसांना वेचून ठार केले तेव्हाही ओबामाने अत्यंत वादग्रस्त विधान करुन पोलिसांच्या विरुद्धच भूमिका घेतली होती. " हे वरचे प्रकार निवडणूकिच्या आधीचे होते. त्यामूळे तुम्ही फक्त सध्याच्या निदर्शनांबद्दल आगपाखड करत आहात ह्याची कल्पना नव्हती. माझे पोस्ट त्या अनुषंगाने वाचावे.

“Well, it looks like America has finally answered Jeff Foxworthy's question,” said Seth Meyers on NBC’s “Late Night,” flashing the title card from “Are You Smarter than a 5th Grader?

Trump also received congratulations from Russian President Vladimir Putin. They spent two minutes on the phone discussing politics, then an hour saying, “No YOU hang up!” “No YOU hang up first.”

As the evening went on and the results came in, every anchor looked like a child slowly realizing that no one was showing up to his birthday party.

Sources say that Trump is already finalizing his cabinet in case he wins tomorrow. Rudy Giuliani would be attorney general, Newt Gingrich would be secretary of state, and Chris Christie would be the wall.

राज.. गेल्या १८ महिन्यात ट्रंप बरेच काही प्रक्षोभक बोलुन गेला आहे.. त्यामुळे निर्माण झालेला लोकांचा असंतोष इतक्या लवकर्..(किंबहुना कधीच होणार नाही! ) दुर होइल की नाही याबद्दल मी जरा साशंकच आहे.

मलाही जाळ्पोळ लुटालुट अश्या प्रोटेस्ट मधे तथ्य वाटत नाही व त्याचे समर्थन कधीच होउ शकत नाही... ही लोकशाही आहे व तो निवडुन आलेला अध्यक्ष आहे( म्हणजे होणार आहे).

तरीसुद्धा शेंडेनक्षत्र मला तुम्हाला एक सांगावेसे वाटते.... हे सध्या जाळपोळ व नासधुस करुन प्रोटेस्ट करणारी माणसे सगळे पुरोगामी विचारांचे डेमोक्रॅट्स आहेत असे तुम्हाला का वाटते? इथल्या समाजात तसे वागणारा १ वर्ग आहे..त्यांना एखादे कारणच हवे असते ..तसे करण्याचे... रॉडनी किंग, ओ जे सिंप्सन व्हर्डिक्टच्या वेळेलाही असे ( याच्याही पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात! ) झाले होते...

ट्रंप इज नॉट अवर प्रेसिडेंट या नार्‍यांबद्दल व स्लोगन्स बद्दल बोलायचे झाले तर.. ओबामा जेव्हा २००८ मधे निवडुन आला तेव्हाही बर्‍याच प्रेज्युडिस्ट व्हाइट वर्गाने उघड बोलुन दाखवले होते..की ही इज नॉट देअर प्रेसिडेंट.. इन्फॅ़क्ट्..त्याला पहिल्या २ महिन्यात कोणीतरी असॅसिनेट करा रे असाही सुर त्यातल्या बर्‍याच जणानी काढला होता..

अमेरिकेत गेल्या २०-२५ वर्षापासुन २ पक्षातले लोक एवढी पोलराइझ्ड झाली आहेत की बस! एकमेकांना एकदम पाण्यात पाहतात्..कधी कधी मला वाटते की बहुतेक अजुन १ सिव्हिल वॉर सुरु होइल की काय्..एवढा द्वेष ते एकमेकांचा करतात.. त्यामुळे गेल्या १५-२० वर्षात अमेरिकन काँग्रेस् मधे फार कमी को ऑपरेशन दिसुन येते... नेहमी भांडणे..अडेलतट्टुपणा..फिलबस्टर...लोक तर खरे कंटाळली आहेत काँग्रेसच्या कामाबद्दल.. त्यांचे अप्रुव्हल रेटींग १० टक्के पेक्षाही खालचे आहे! पुर्वी खरच काँग्रेसमधे बायपार्टीसन कॉऑपरेशन होउन काम चालायची... सध्या दुसर्‍या पार्टीने काही बिल आणले तर ते हाणुनच पाडायचे असाच पवित्रा असतो दोन्ही चेंबर्समधे. देअर हॅज टु बी सम सॅनीटी रिस्टोअर्ड इन काँग्रेस.. रिअली!

खर म्हणजे ओबामाही "चेंज" या स्लोगनच्या नावाखाली निवडुन आला होता.पण एक ओबामाकेअर( तेही एक्झ्युक्युटिव्ह ऑर्डर मुळे..जी ऑर्डर नेक्स्ट प्रेसिडेंट नलिफाय करु शकतो! ) किंवा बँक्स व ऑटो बेल आउट सोडले ( ज्या ऑटो बेलाउटने.. ज्या मिशिगनच्या लोकांनी ट्रंपला निवडुन दिले..त्यांचे उरलेसुरले जॉब्स वाचले होते!) तर त्याला काँग्रेसने ८ वर्षात जास्त काहीच करु दिले नाही.. रिपब्लिकन मॅजॉरीटी मेड शुअर तो अत्यंत इन इफेक्टिव्ह प्रेसिडन्ट बनेल्..टुथलेस टायगर सारखा..

म्हणुनही बहुतेक अमेरिकन जनतेने नुसते ट्रंपलाच निवडुन आणले नाही तर काँग्रेस व सेनेटही रिपब्लिकन पार्टीला दिले आहे...या अपेक्षेने की आतातरी काँग्रेसमधली माणसे इफेक्टिव्हली काम करतील. अर्थात कन्झर्व्हेटिव्ह लोकांना माहीत होते की या वेळचा प्रेसिडंट २-३ सुप्रिम कोर्ट जस्टिसेस नेमणार आहे..तेही एक कारण आहेच...म्हणुन गेली ९ महिने रिपब्लिकन मॅजॉरिटीने ओबामाने सुचवलेला सुप्रिम कोर्ट नॉमीनी वेठीस धरुन ठेवला होता..याचा अर्थ शेवट्च्या १ वर्षात ओबामाच्या अध्यक्षपदाला त्यांनी तिलांजली वाहीली होती...त्याच्या ऑर्डर्सना शुन्य किंमत! मला त्याची खुप गंमत वाटते.. म्हणजे तुमचा बॉस जर ९ महिन्यांनी रिटायर होणार असेल तर त्या ९ महिन्यात त्याने/तिने दिलेले काम करायचे सोडुन्..आपण नुसत्या तंगड्या वर करुन खुर्चीत बसुन्..आराम करायचा..त्याला/तिला सांगायचे..तु गप बस्..तु तर ९ महिन्यात रिटायर होणार आहेस्..तु सांगीतलेले काम आम्ही का करु?

हिलरीच्या पराभवाचे एक अजुन कारण म्हणजे तिच्या कँपेनने हिस्पॅनिक व कलर्ड लोकांना कसे प्रचंड मोठ्या प्रमाणात ते व्होट करायला सांगत आहेत याचा केलेला प्रचंड गाजावाजा! ..ते बघुन अनुत्साही व्हाइट रिपब्लिकन्स..जे ट्रंपला व्होट करायला बहुतेक कचरत होते..तेही इर्षेला पेटुन म्हणाले असतील..अजुनही अमेरिकेत ६३ टक्के व्हाइट मॅजॉरीटी आहे( १९८० मधे तो आकडा ८०% होता)..लेट्स शो देम्..वुई कॅन कम आउट इन लार्ज नंबर्स टु व्होट्..आणी ग्रास रुट रिपब्लिकन पार्टीने गाजावाजा न करता अश्या लोकांना व्होटींगसाठी बाहेर आणले..हु अदरवाइज वुड हॅव्ह स्टेड होम बिकॉज दे प्रॉबेबली वेअर नॉट दॅट हॅपी विथ ट्रंप! ..जस्ट टु शो..दे स्टिल मॅटर!.. हिस्पॅनिक्स अँड कलर्ड पिपल कॅनॉट डिसाइड प्रेसिडेन्सी एव्हरी टाइम्...( अ‍ॅट लिस्ट नॉट यट! )..

पण अजुन १५-२० वर्षे ..रिपब्लिकन पार्टी जर अशीच फक्त व्हाइट लोकांची पार्टी राहीली तर.. रिपब्लिकन पार्टीचा प्रेसिडंट निवडुन येणे कठीण होणार आहे.काँग्रेस व सेनेट मधे मात्र ते अजुन काही काळ मॅजॉरीटी ठेवु शकतील्.. कारण्... हाउ दे मॅप काँग्रेशनल डिस्ट्रिक्ट्स! फार विचित्र कारभार आहे... एखाद्या रस्त्यावरची ३ घरे ३ वेगवेगळ्या प्रिसिंक्ट मधे मतदानाला जाउ शकतात...अश्या आडव्या तिडव्या रेषा मारुन डिस्ट्रिक्ट्स विभागले आहेत की ..मेकींग शुअर्..व्हाइट रिपब्लिकन रेजिस्टर्ड व्हॉटर्स एका डिस्ट्रिक्टमधे व हिस्पॅनिक्स, ब्लॅक्स व कलर्ड पिपल्स हाउसेस आर ब्रोकन डाउन इन मेनी डिस्ट्रिक्ट्स!.... सो दे कॅन नेव्हर व्होट इन अ बन्च ..इव्हन इफ दे स्टे इन अ क्लस्टर्..दे ब्रेक डाउन दॅट क्लस्टर..टु मेक शुअर दे कॅन नेव्हर व्होट इन देअर पार्टी कँडीडेट!

पण फारेंड.. तुझे बरोबर आहे...इलेक्टरोल व्होटिंग सिस्टिम इज नॉट फ्लॉड... कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांना पण त्यामुळे महत्व येते..

आता अमेरिका नॅटो मधुन बाहेर पडणार्.. त्याचे परीणाम काय होतील व पुटीन त्याचा फायदा घेउन युरोपमधे किती पाय मोकळे याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसच जपानच्या ओकिनावा मधुन अमेरिकन सैनीकी तळ परत अमेरिकेत येणार्..त्यामुळे तिकडे चायनाचे पण पाय मोकळे करणे चालु होइल्..एकंदरीत कम्युनिस्ट वाढवु द्यायचा नाही या अमेरिकन पॉलीसीला ट्रंप तिलांजली देणार असल्यामुळे रशिया व चायनाचे फावणारच आहे. ते दोन कम्युनिस्ट देश त्यांचे साम्राज्य किती वाढवतील हे बघणेही इंटरेस्टिंग असेल.

तसेच चायनीज मालाला ट्रंप आता ४० टक्के टॅरिफ बसवणार ..त्यामुळे बहुतेक वस्तुंची स्टिकर प्राइस ४० टक्क्यांनी वाढणार..आर्यनी अशी आहे की पेन्सिल्व्हॅनिया ,ओहायो, मिशिगन मधल्या ज्या गरीब रुरल व्हाइट लोकांनी ट्रंपला निवडुन आणले त्याच लोकांना त्याचा जास्त फटका बसणार आहे. त्यांचे जॉब परत आणुन देण्यात ट्रंप कितपत यशस्वी होईल याबबात मी जरा साशंकच आहे.. होप फॉर दोज पुअर पिपल ही कॅन गिव्ह देम देअर जॉब्स बॅक!

किंवा असेही होउ शकेल की ट्रंप बेस्ट डिलमेकर असल्यामुळे तो चायनाच्या वस्तु हाफ प्राइसमधे अमेरिकेत आणु शकेल व ४० टक्के टॅरिफ बसवुनही सगळ्यांना त्या वस्तु १० टक्के स्वस्तही मिळु शकतील.

तसच १३ मिलियन्स इलिगल मेक्सिकन्स साठी भरपुर जेल बांधावी लागतील. झालच तर अमेरिकेतली घर बांधणीला व फळ काढायला लागणारे मजुर जे बहुतेक मेक्सिकन आहेत ते परत मेक्सिकोत किंवा जेलमधे गेल्यावर घर बांधायला व फळ काढायला कोण पुढे येते तेही कोडच आहे.

नाफ्टा आता नलिफाय होइल्..त्याऐवजी अमेरिकेला बेस्ट डिल मिळुन तिथुन येणार्‍या वस्तुही स्वस्त होतील व सध्या मेक्सिकोत तयार होणार्‍या अमेरिकेन गाड्या परत डेट्रॉइट्-फ्लिंट मधे तयार होतील..त्यामुळे गाड्यांच्या किंमती मात्र महाग होउ शकतात.. पण डेट्रॉइट-फ्लिंटमधे परत गजबजाट होउन त्या सिटी़ज बँकरप्सीमधुन नुकत्याच बाहेर आलेल्या आहेत..त्यांची परत भरभराट होण्यास मदत होइल. तिथली रिअल इस्टेट इन्व्हेस्ट्मेंट फायद्याची होउ शकते.

ट्रंप ऑफिसमधे पहिल्याच दिवशी बरेच काही करणार आहे असे म्हणाला आहे....त्या दिवशी त्याला २४ तास बहुतेक पुरे पडणार नाहीत. बट लेट अस होप् नाउ...फॉर द कंट्रिज सेक्...तो,काँग्रेस व सेनेट एकाच पक्षाचे असल्यामुळे..वॉशिंग्टनमधे लोक पुन्हा कामे करु लागतील व देशाचा प्रेसिडेंट म्हणुन ट्रंपला त्यासाठी मनापासुन शुभेच्छा!

तसच १३ मिलियन्स इलिगल मेक्सिकन्स साठी भरपुर जेल बांधावी लागतील. झालच तर अमेरिकेतली घर बांधणीला व फळ काढायला लागणारे मजुर जे बहुतेक मेक्सिकन आहेत ते परत मेक्सिकोत किंवा जेलमधे गेल्यावर घर बांधायला व फळ काढायला कोण पुढे येते तेही कोडच आहे. >> सोप्प आहे मुकुंद. जसे वॉल बांधायला मेक्सिको पैसे देणार आहे तसे इलिगल मेक्सिकन्स आधी जेल्स बांधतील नि मग त्यात जातील. Wink jokes apart, बरेच आभाळापुढचे वायदे कसे पूर्ण केले जाणार आहे हे बघणे उल्लेखनीय असेल.

Good post otherwise. कार्स बाबत फारसा बदल होईल असे वाटत नाही. नक्की बदल होईल अशा गोष्टी म्हणजे marriage equality, roe v wade, planned parenthood, EPA policies.

जसे वॉल बांधायला मेक्सिको पैसे देणार आहे तसे इलिगल मेक्सिकन्स आधी जेल्स बांधतील नि मग त्यात जातील>>> Lol

इंटरेस्टींग पोस्ट मुकुंद!
ट्रंप रीपब्लीकन आहे म्हणून त्याला विरोध आहे असं नाहीये. तो या जॉबसाठी 'अन्क्वालीफाईड' आहे किंवा लायक नाहीये म्हणून त्याविरूद्ध लोक जातायेत.

आणि हिलरीला जेलमधे पाठवणार ते राहिलंच! >> आज क्रिस क्रिस्टी, रुडी जुलियानी (दोनदा) ह्या सरोगेट्स नी सांगितले कि तसे काही होणार नाही. तिच्याविरुद्ध ठाम पुरावा आहे असे वाटत नाही वगैरे वगैरे.

प्रचाराच्या वेळेस केलेल्या घोषणांना एवढा अर्थ नाही. प्रत्यक्ष ऑफिस मधे आल्यानंतर रिअ‍ॅलिटी जाणवली की बरेच बदल केले जातील. वोटर लोक त्याचे रॅशनलायझेशन करून घेतील.

पोस्ट वाचूनच दमायला झालं मुकुंद Happy
मुद्दे पटले म्हणण्यापेक्षा लक्षात आले आणि होपफुली लिहिलेले पॉजिटिव पॉईंट्स खरे होतील अशी आशा करतो पण फा म्हणत आहे तसं तेव्हा केलेल्या प्रॉमिसेस आणि खरं पुढे नक्की काय करता येइल ह्यात फार फरक पडतो.
हाऊस अन सेनेट दोन्ही रिपब्सचं आहे त्यामुळे होपफुली ते गप त्याच्याबरोबर काम करायला बघतील. डेम्सनी पण परत पुढे चान्स मिळावा ह्या करता थोडा विचार करुन विरोध करायला पाहिजे.
काहीतरी विचित्रच होऊन बसलय सगळं! सगळीकडे रिपब्स वर आहेत पण प्रेसिडेंटच त्यांच्यातला नाही.
बाकी डेमोक्रॅटिक पार्टी मध्ये पुढे कोण स्टार बनणार आहे ह्याचाही काही पत्ता नाही. क्लिंटन इरा इज डन, हूज नेक्स्ट? सँडर्स विल बी टू ओल्ड टु फाईट अगेन इन फोर यर्स.
रायनचं करियर पण गेलं म्हणतात कारण आत्ता क्लिंटन आली असती तर तो शुअर शॉट कँडिडेट होता म्हणे २०२० चा. आता ट्रंप आल्या मुळे ऑल इज अप इन दि एअर.

डेम्सनी पण परत पुढे चान्स मिळावा ह्या करता थोडा विचार करुन विरोध करायला पाहिजे. >> बुवा कोअर गोष्टींना हात घातला कि डेम्स पण विरोध करणार हे उघड आहे. फिलीबस्टर झिंदाबाद असणार आहे. Two can play the game.

तीन वर्षांनी मिशेल ओबामा आली तर ? Wink

त्याने जर रिपब्लिकन बेस ला अनुकूल धोरणे आणली तर काँग्रेस सपोर्ट करेल. पण तो तशाच आणेल याचा भरवसा नाही. तो बेस मधून आलेला नाही, त्यांच्याशी त्याची काहीच बांधिलकी नाही. त्याची लिबरल मते अनेकदा आधी उघड झालेली आहेत. त्यामुळे "नेहमीच्या राजकारण्यापेक्षा वेगळे" काही तो करायला गेला, तर काँग्रेसवाले त्याला विरोध करतील कारण त्यांना त्यामुळे बेस दुरावण्याची भीती वाटेल.

तीन वर्षांनी मिशेल ओबामा आली तर ? >>> मध्यंतरी मिशेल बद्दल ज्या पोस्ट्स येत होत्या त्यावरून मला ओबामा, हिलरी व मिशेल यांत हाउस ऑफ कार्ड्स ची सिच्युएशन तयार होत आहे अशी शंका आली. वरकरणी हिलरी, पण समर्थकांकडून मिशेल ची मागणी व "नाईलाजाने" तिची उमेदवारी :). पण तसे काही झाले नाही. मात्र २०२० ला नव्याने येउ शकते ती.

अरे हां! मिशेल ओबामा विसरलोच होतो. या! शि कुड बि अ फोर्स टु रेकन वित इफ सम अदर किंक्स वर्क आउट.

खरय भौ, कोअर ला हात लागला की कोण एकत नाय! हू केअर्स व्हॉट हॅपन्स इन ४ यर्स. आत्ताचा मोमेंट आणि आपले कोअर वॅल्युज महत्चाचे असतात.

डेम्सनी आतापासुन च हालचाल करावी नाहितर ८ वर्ष ट्रन्पसरकार च बिगुल वाजवत बसाव लागेल... मिशेल चागली बोलते बाकी राजकीय अनुभव काहीनाही पण तीला पण राज़किय अनुभव नसणेच प्ल्स आहे अस दिसतय.

"देश सोडीन, राज्य सोडीन, नोकरी सोडीन, जगणे सोडीन असले काहीही विचार मनात आलेले नव्हते."...शेंडेनक्षत्र हे तुमचे बरोबर आहे.. ट्रंप आला तर तस करीन असे आधीच बोलणे निर्र्थक होते.

पण तुम्ही असा विचार केला का की..असेही असु शकते की तुम्ही तसे बोलत नव्हता कारण तुम्हाला बहुतेक खात्री होती की ट्रंप निवडुन येणार नाही. तुम्हीच म्हणाला होता की तुम्ही हिलरीच निवडुन येइल असे ग्रुहीत धरुन चालला होता..त्यामुळे तुम्ही देश सोडीन्,जॉब सोडीन, जगणे सोडीन असे म्हटले असते तर खरच हिलरी निवडुन आली असती तर तुम्हाला देश्,जॉब सोडुन जाण्याची खरोखरची भिती होती.

त्याउलट्..जे बरेच हिलरी सपोर्टर्स बोलुन गेले की ते जॉब्,देश सोडुन जातील..त्याच कारण ते एवढे कॉन्फिडंट होते की ट्रंप निवडुन येणारच नाही..त्यामुळे तसे बोलायला ते बिल्कुल घाबरले नाहीत्..कारण त्यांना खात्री होती की ट्रंप निवडुन येणे शक्यच नव्हते! त्यामुळे तसे ते बोलले तरी त्यांना तसे करायला लागणार नाही!

पण ज्या निकालाने ट्रंप सपोर्टर्सना पण धक्का बसला अश्या या निवडणुकीच्या निकालामुळे जे हिलरी सपोर्टर्स तसे बोलले ते तोंड्घशी पडले हे मात्र नक्की.

असामी, फारेंड... म्हणजे एकंदरीत : लॉक हर अप" असे म्हणणारे , झालच तर मिलिअन्स ऑफ रिअली बॅड हाँब्रेज जेलमधे किंवा मेक्सिकोत परत जातील अशी आशा करणारे, झालच तर नाफ्ता रद्द झाल्यामुळे त्यांचे जॉब्स पेन्सिल्व्हानिया,मिशिगन मधे परत येणार आहेत अशी आशा करणारे , झालच तर जपान्,नाटो कंट्रिज आता त्यांचे संरक्षण स्वतःच करणार व त्यामुळे अमेरिकेचे ट्रिलिअन्स ऑफ डॉलर्स मोकळे होउन ते त्यांच्यावर खर्च होतील अशी आशा बाळगणारे... अश्या मिलिअन्स ऑफ ट्रंप सपोर्टर्सची घोर निराशा होणार असे म्हणता? अरेरे!

मुकुंद जॉब्,देश सोडून जाण्याबाबत दोन पार्टींमधे एक मह्त्वाचा फरक आहे. एका पार्टीच्या सभांमधे गन सपोर्ट बरोबर kill the b****, lock the b**** अशी भाषा होती, दुसरीकडे नव्हती. त्यामूळे दोन्ही बाजूंचे पॅनिक सारखे आहे असे म्हणणे धाडसाचे होईल.

मिलिअन्स ऑफ ट्रंप सपोर्टर्सच्या घोर निराशेबद्दल ट्रंप सपोर्टर्स नाच विचारायला हवे. ग्रॅब हर प* म्हणण्याबद्दल बिल बुशचा जॉब गेला नि प्रत्यक्ष म्हणणारा सर्वात उच्च जॉब मिळवून बसला. तेंव्हा इथले लॉजिक माझ्या कुवतीच्या बाहेर आहे.

बऱ्याच अंशी असा ही सूर आढळतोय की ट्रम्प जे काही रद्द करणार आहे ओबामाने सुरु केलेल्या गोष्टी, त्याचा सर्वाधिक फटका हा निम्न वर्गीय श्वेतवर्णीय लोकांना सुद्धा बऱ्यापैकी बसणार आहे, ज्यांनी त्याला निवडून देण्यात मोठा हातभार लावला आहे
त्याच प्रमाणे जर त्याने रिपब्लिकन काँग्रेस प्रतिनिधींचे ऐकले नाही किंवा त्यांनी ट्रम्प चं ऐकलं नाही तर काही कामं होतील का हाही प्रश्न आहेच, कारण तो त्यांच्यापैकी एक नाही आणि या वेगळेपणाची जाहिरात त्याने बरीच केली होती प्रचारा दरम्यान.
सध्या तरी wait and watch हेच सर्वांच्या हातात आहे

असामी, फारेंड... म्हणजे एकंदरीत : लॉक हर अप" असे म्हणणारे , झालच तर मिलिअन्स ऑफ रिअली बॅड हाँब्रेज जेलमधे किंवा मेक्सिकोत परत जातील अशी आशा करणारे, झालच तर नाफ्ता रद्द झाल्यामुळे त्यांचे जॉब्स पेन्सिल्व्हानिया,मिशिगन मधे परत येणार आहेत अशी आशा करणारे , झालच तर जपान्,नाटो कंट्रिज आता त्यांचे संरक्षण स्वतःच करणार व त्यामुळे अमेरिकेचे ट्रिलिअन्स ऑफ डॉलर्स मोकळे होउन ते त्यांच्यावर खर्च होतील अशी आशा बाळगणारे... अश्या मिलिअन्स ऑफ ट्रंप सपोर्टर्सची घोर निराशा होणार असे म्हणता? अरेरे!>>>>

मुकुंद, 'अरेरे' तुम्ही उपरोधानं म्हणताय का? म्हणजे कळलं नाही...

असामी,
दुसरा उपरोध कळला, पहिला कुठे आहे?

ट्रंप रीपब्लीकन आहे म्हणून त्याला विरोध आहे असं नाहीये. तो या जॉबसाठी 'अन्क्वालीफाईड' आहे किंवा लायक नाहीये म्हणून त्याविरूद्ध लोक जातायेत.>>> याबद्दल म्हणत असशील तर ते मुकुंदला उद्देशून नव्हतं, एक जनरल कॉमेंट होती (खरंतर शेंन साठी ;))

बाय द वे, सारखे डोळे मारू नकोस.

Wink Proud

Wink लक्षात आले का ? Happy पहिला बहुधा तुला उद्देशून नसावा. वर जाऊन बघायचा कंटाळा आला होता.

असामी.. धन्यवाद!.. Happy

तिला दोष देउन उपयोग नाही.. माझ्या परवापासुनच्या पोस्ट्सच वैद्यबुवा म्हणतो त्याप्रमाणे खुप मोट्ठ्या होत्या.. त्यामुळे तिने त्या सगळ्या वाचल्या नसाव्यात..:)

असामी... "ग्रॅब हर प* म्हणण्याबद्दल बिल बुशचा जॉब गेला नि प्रत्यक्ष म्हणणारा सर्वात उच्च जॉब मिळवून बसला. तेंव्हा इथले लॉजिक माझ्या कुवतीच्या बाहेर आहे."... हाच प्रश्न मी परवाच्या माझ्या पोस्टीत विचारला होता. त्याला राजने उत्तर दिले आहे.. उदाहरण देउन.. बहुतेक त्याला ते लॉजिक कळले आहे.

वरचा मला उद्देशून नव्हता.

मुकुंद, तुमच्या पोस्टस कालपासून वाचत आहे. छान लिहीताय आणी पटत आहेत. Happy

Pages