अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इलेक्टोरल कॉलेज ला ब्लेम करण्यात काही अर्थ नाही. तो नियम गृहीत धरून दोन्हीकडचे सगळे कॅम्पेन प्लॅनिंग केले गेले होते. तो नियम नसता तर हिलरी कॅलिफोर्निया मधे ठिय्या मारून बसली असती (किंवा नसतीही, विस्कॉन्सिन ची ष्टोरी पाहता Happy ) तेथील सगळी मते मिळवायला. कारण तेथे मग ५१% की ९५% याने फरक पडला असता, जो आत्ता पडत नाही.

ट्रम्प यांची मॅनेजर kellyanne conway ही प्रेसिडेन्शियन कँपेन जिंकणारी पहिली महिला कँपेन मॅनेजर आहे. म्हणजे हे तरी ग्लास ceiling काल तोडले गेले. फॉर विमेन, इट वॉज- किंग ना सही, किंग-मेकर ही सही!

ट्रंप व लोधा बिल्डर्स मुंबई ह्यांचा काही एक प्रॉजेक्ट अंडरवे आहे. त्यांची आज फुल पेज जाहिरात आहे.
प्रेसि डेंट इलेक्ट श्री ट्रंप ह्यांचे हार्दिक अभिनंदन म्हणून. व एक त्यातल्यात्यात बर्‍यापैकी फोटो सोनेरी खुर्चित बसलेला असा आहे जाहिरातीत मध्य भागी. ते प्रेसिडेंट झाल्याने आता ह्या बिल्डिंगचे ग्लॅमर नक्की वाढले असेल. आधीच फारच अपमार्केट फ्लॅट्स आहेत तिथे. परळ ला का जवळ्पास आहे बिल्डिंग.

तुम्ही त्यांचा जो मतदार वर्ग म्हणता आहात तो फेसबुक वर चांगला प्रतीत होतो. त्यामुळे साधारण जनमताची कल्पना होती. सर्वसाधारण नागरीक ( व्हाइट, मध्यमवयीन, पैशाच्या बाबतीत साधारण - म्हणजे कुत्र्यासाठी २६००$ अफोर्ड करू न शक्णारे, पण भावना प्रधान त्यांची एक वेगळीच व्हॅल्यू सिस्टिम आहे. ) हे मी ज्या गॄपची सभासद आहे तिथे खूप संख्येने आहेत. ( डँशुंड लव्हरस, सी शेल्स फॉर फन गृहसजावट वगैरे) तिथे लोक कायम हिलरीची पिसे काढत असत. व न्यूज शेअर होत असे. मीडिआत व्यक्त न होणारे व दाबलेले जनमत फेसबुक वर नक्की दिसून येते. जेझबेल व न्यूयॉर्कर ची आर्टिकल्स फार शेअर होत होती. शेवटी शेवटी जेझबेल ला त्यांच्या विरोधात काय लिहावे ते समजेना मग बायकोला चापटी मारली अश्याटाइपची बातमी देउ लागले. तेव्हा सभासदांनी चांगले झोडपलेले प्रतिसादात.

बर्नींना संधी मिळायला हवी असे तेव्हा आम्हाला पण वाटलेले. पन इलेक्षनची गणिते वेगळी असतात हे आहेच.

==शेंन, तुम्हाला कूल्टर आवडते? तिचा तर लिगल इमिग्रन्ट्सना पण विरोध आहे ना?

एखादी व्यक्ती १००% आवडायचे कारण नाही. ती बहुधा धार्मिक आहे आणि मला त्यात काहीही स्वारस्य नाही.

कायदेशीर इमिग्रेशनबद्दल तिचे मत मला माहित नाही. कायदेशीर असले तरी बड्या कंपन्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यातही दोष आहेतच. त्यामुळे त्यावर टीका करताच येत नाही असे मला वाटत नाही.

मला हिलरीचे भाषण खुप आवडले. विशेषत: शेवटचा भाग... खुप आशादायक चित्र दाखवले.

<<न्युयॉर्क शिकागो नंतर आमच्या लॉस अँजलिस मधे जोरदार प्रोटेस्ट चालु आहे, >>
---- प्रोटेस्ट एका मर्यादे पर्यन्त ठिक आहे. पण आता ट्रम्प निवडले गेले आहेत, "तो माझा प्रेसिडेन्ट नाही" असे फलक घेतलेले, कपाळावर रन्गवलेले लोकान्नी परिस्थिती स्विकारायला हवी. निषेध नक्की कशासाठी करायचा आहे ? तो तर व्यावस्थित नियमाने निवडला गेला आहे.

निषेध नक्की कशासाठी करायचा आहे ? तो तर व्यावस्थित नियमाने निवडला गेला आहे. >> डिसीजन ओव्हरटर्न व्हावा म्हणून प्रोटेस्ट नाही, तर हाफ ऑफ अमेरिका स्टिल डझ नॉट बाय धिस रेसिस्ट _ट हे दाखवून मायनॉरिटी कम्युनिटीजना सपोर्ट प्रदर्शित करण्यासाठी आहे, असे प्रोटेस्टला गेलेल्या काही लोकांचे म्हणणे कळले.

भास्कराचार्य मानसिक धक्का बसणे समजतो... (तो इथे कॅनडामधे पण अनेकान्ना बसलेला आहे, विशेषत: लहानग्याना, शाळे युवा पिढीतही हेच डिस्कशन). तरी पण "नॉट माय प्रेसिडेन्ट" हे थोडे जास्त होते असे वाटते.

काही समाजकंटकांना निवडणुकीचा निकाल आवडला नाही. ठीक. मग काय त्यांना खूश करायला निवडणूक रद्द करावी की काय?
आमच्या आवडीचा उमेदवार आला तर लोकशाहीचा विजय नाहीतर तो भ्रष्टाचार?
लोकांची दुकाने जाळणे, रस्ते बंद करणे, आगी लावणे, हिंसक वागणे हे म्हणजे निषेध?
हे अराजक आहे. कुणीतरी फूस लावून, पैसे पुरवून हे घडवून आणत आहे.
डोके ठिकाणावर असणार्‍या हिलरी समर्थकांनी अशा डोकेफिरु हिलरी समर्थकांना ठीक केले पाहिजे. व्हाईट हाऊसचा सध्याचा रहिवासी डोके ठिकाणावर असणार्‍यात गणायचा का नाही?

प्रोटेस्ट कशाबद्दल?! ही वन फेअर ॲन्ड स्क्वेअर!
इलेक्टोरल कॉलेजबद्दलही आता रडण्यात काय पॉइंट आहे?

हॅविंग सेड दॅट, फूस/पैसे वगैरे कॉन्स्पिरसी थिअरीज कशाला लगेच?!

अहो शे.न.. "व्हाईट हाऊसचा सध्याचा रहिवासी" असे तुम्ही का म्हणता आता ? ओबामा सध्याचा प्रेसिडेन्ट आहे हे तुम्ही ८ वर्षात मान्य करत नसाल तर आत्ता जे प्रोटेस्ट करत आहेत त्यांना त्याच् पोस्ट मधे दोष नका देऊ. Happy

बाय द वे माझा या प्रोटेस्ट ना अजिबात सपोर्ट नाही. आणि त्या करण्यात काही अर्थ नाही असेच माझे मत आहे.

हे अराजक आहे. कुणीतरी फूस लावून, पैसे पुरवून हे घडवून आणत आहे.>>> ह्म्म्म म्म्म ! यु मीन मनसे, शिवसेना ची एक ब्रान्च इथे युएस मधे आहे? काहीही!!
लोकाना निर्णय पचवणे अवघड जातय हे खरय पण निर्णय अमान्य करण आणि तो अशारितिने चुकिचच आहे, तो कायदेशिररित्या निवडुन आलाय हे सत्य आहे त्यावर रडण्यात काय अर्थ आहे? ( हिलरी आली असती तर त्याने हवा तो कान्गावा केलाच असतात)
हा लोकाचा कौल आहे तो लोकानी मान्यच करायला हवा, खरी पन्चाईत रिपब्लिकन पार्टिचीच आहे कारण ज्याला त्यानी डिसओन केल होत त्याच्याशीच जुळवुन घ्यावे लागणार.

>>अराजक वगैरे काही नाही, लोकं इमोशनल होत आहेत येवढच.<<

हिच खरी वेळ आहे, ट्रंप ॲंड कंपनीला (ॲडमिनीस्ट्रेशन पुढे म्हणता येईल) लोकांचा असंतोष घालवुन त्यांची मनं जिंकण्याचा. ट्रंप नीड्स टु पुल आउट समथिंग ॲज "क्विक विन" टु मेक हिज प्रेसिडेंसी रिमार्केबल...

======अहो शे.न.. "व्हाईट हाऊसचा सध्याचा रहिवासी" असे तुम्ही का म्हणता आता ? ओबामा सध्याचा प्रेसिडेन्ट आहे हे तुम्ही ८ वर्षात मान्य करत नसाल तर आत्ता जे प्रोटेस्ट करत आहेत त्यांना त्याच् पोस्ट मधे दोष नका देऊ.
==

आपल्याला उपरोध समजत नसल्यास त्याकरता ह्या पोस्टला दोष देऊ नका! ओबामा हा आता "उरलो उपकारापुरता" असा वागतो की काय असा संशय येत आहे. अनेकदा त्याने काळ्या लोकांचे पोलिसांवर हल्ले करण्याचे समर्थन केले आहे. टेक्ससमधे ब्लॅक लाइव्ह्स म्याटरच्या रॅलीत एका स्नायपरने अनेक पोलिसांना वेचून ठार केले तेव्हाही ओबामाने अत्यंत वादग्रस्त विधान करुन पोलिसांच्या विरुद्धच भूमिका घेतली होती. त्यामुळे ट्रंपच्या निवडीविरुद्ध हिंसक आंदोलन करणार्‍यांबद्दल बोलतानाही हा माणूस आपण अध्यक्ष नसून निव्वळ व्हाईट हाऊसचे रहिवासी आहोत असे वागतो की काय असा मला दाट संशय आहे.

भाषणात लोकशाही परंपरेविषयी गोड गोड गोष्टी बोलणारे दिग्गज डेमोक्रॅट ह्या मूर्खपणाबद्दल ठणकावून का बोलत नाहीत?

तरी पण "नॉट माय प्रेसिडेन्ट" हे थोडे जास्त होते असे वाटते. >>> हो. प्रोटेस्ट त्याने नंतर जर काही अन्यायकारक पॉलिसीज आणल्या तर त्याविरूद्ध असणे वेगळे आणि आत्ताच लोकशाहीतून निवडून आलेल्याला नाकारणे वेगळे. या प्रोटेस्ट्स अगम्य आहेत.

अब्सोल्युटली राज. त्याचा अक्सेप्टन्स स्पीच चांगला होता. होपफुली हि टर्न्स इट अराऊण्ड. त्याच्या अडवायजरी कमिटीला ह्याचं महत्व माहित असेलच अ‍ॅन्ड दे प्रोबबली विल डु समथिंग.

ओबामा हा आता "उरलो उपकारापुरता" असा वागतो की काय असा संशय येत आहे >> त्याच्या कुठल्याही धोरणाला विरोधासाठी विरोध करून अजून काही बाकी ठेवले आहे का हाऊस ने ? अगदी झिका विरुद्ध च्या फंडीगला सुद्धा सुरूवातीला विरोध केला होता. आजही मिच ने "ओबामाच्या सगळ्या निर्णयांना परत फिरवू" असे विधान केले आहे. मला ACA कसा परत फिरवणार ते बघायचे आहे.

ACA परत फिरवल्यास सगळ्यात जास्त ज्यांनी ट्रंपला मत दिलं ते लोक अफेक्ट होतील (म्हणजे राज आणि शेंने सोडून ;)) असा कयास आहे. तसंच टॅक्स न वाढवता भिंत कशी, कधी, केव्हढी बांधणार बघणं रोचक ठरेल. इलिगल लोकांना परत पाठवणार - कसं? कितीही अमान्य केलं तरी इथली कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीत बर्‍यापैकी हीच लोक आहेत. त्याचं काय होईल बघणं इंट्रेस्टींग असेल. काळजी आहे ते इथल्या LGBT आणि मुस्लीम लोकांची. काही आठवड्यांपूर्वी इथल्या इलिमेंटरी शाळेत पहिलीतल्या मुस्लीम मुलाला त्याच्या धर्मावरून बुली केलं गेलं असा त्याच्या पालकांनी आरोप केला होता. चौकशी केली गेली, एक्झॅटली काय झालं अजून कळलेलं नाही. पण हे खरं असेल तर काळजी करण्याची गोष्ट आहे.
ISIS आणि बॉर्डर सिक्युरीटी, टेरेरीझम विरूद्ध लढा... मला आवडत असो वा नसो, तो आता माझा प्रेसिडेंट आहे आणि जी काही देशहिताची कामं करेल त्यासाठी माझा पाठिंबा असेल. त्यानं चांगलं काम केलं तर इथेच येऊन अ‍ॅक्नॉलेज करेन. Happy

त्यानं चांगलं काम केलं तर इथेच येऊन अ‍ॅक्नॉलेज करेन. >>>> ह्यॅ.. त्यात काही मजा नाही. जागत्या पहार्‍याचे बाफ काढा!

-----------------
ओबामा हा आता "उरलो उपकारापुरता" असा वागतो की काय असा संशय येत आहे >> त्याच्या कुठल्याही धोरणाला विरोधासाठी विरोध करून अजून काही बाकी ठेवले आहे का हाऊस ने ? अगदी झिका विरुद्ध च्या फंडीगला सुद्धा सुरूवातीला विरोध केला होता. आजही मिच ने "ओबामाच्या सगळ्या निर्णयांना परत फिरवू" असे विधान केले आहे. मला ACA कसा परत फिरवणार ते बघायचे आहे.
-----------

नॉट माय प्रेसिडेंट आंदोलन हे मूर्ख नादान निरुद्योगी लोकांनी सुरू केले आहे. आणि त्याचा त्रास काँग्रेसमन आणि सिनेटर यांना होत नसून सामान्य जनतेला होत आहे. जाळपोळ, दगडफेक, धक्काबुक्की, विध्वंस ह्यामुळे सामान्य लोक नोकरीवर, शाळेत, कॉलेजात जाऊ शकत नाहीत. व्यवसाय करु शकत नाहीत, रस्ते बंद केले जात आहेत. दुकाने फोडून लुटालूट केली जाते आहे. ओबामाने अशा पिसाळलेल्या आंदोलकांची कान उघडणी न करता काँग्रेस आडमुठेपणा करते म्हणून सामान्य लोकांवर सूड उगवायचा? तसे असेल अशा माणसाला राष्ट्राध्यक्ष न म्हणता व्हाईट हाउसचा रहिवासी म्हणणे कितीतरी सयुक्तिक आहे!

ट्रंप निवडून आला! अरे बापरे आता आमचे काय होणार? आभाळच कोसळले! पळा! पळा ! पळा!

लहानपणी एक गोष्ट वाचली होती. जंगलात अशी अफवा उठते की आभाळ कोसळणार आहे. एक मोठे झाड पडते आणि तो भयंकर आवाज ऐकून ससा ठरवतो की आभाळ खाली पडते आहे .सगळ्या प्राण्यांना हे सांगितलेच पाहिजे! मग तो घाबरुन धावत सुटतो. वाटेत भेटलेल्या हरणाला ही बातमी सांगतो, ते हरीण भिऊन पळत सुटते, मग ते कोल्ह्याला सांगते, मग लांडग्याला, मग वाघाला, सिंहाला, अस्वलाला, हत्तीला ह्या सगळ्यांना ही बातमी कळते आणि सगळे घाबरून पळत सुटतात. मोठाच गोंधळ होतो. इ. इ.

तसला प्रकार होतो आहे का असा संशय येतो आहे. काही लोक मूर्खपणामुळे आणि काही लबाड लोक संधीसाधूपणा म्हणून हा बागुलबुवा जास्तीत जास्त मोठा करत आहेत.

क्लिंटन येऊ शकते निवडून असं वातावरण होतं तेव्हा तुम्ही आभाळ कोसळणार पळा पळा वागत होतात ते ही विसरु नका. Lol

वैद्यबुवा, मोठा गैरसमज करत आहात आपण. मी हिलरीचा कट्टर विरोधक आहे यात शंकाच नको. पण ही लढत अत्यंत अटीतटीची वाटत होती. प्रचारादरम्यान अनेक वेळा मी असे स्वीकारून चाललो होतो की हिलरीच निवडून येणार. पण त्यामुळे जगबुडी येईल आणि माझी वाट लागेल असे कधीही वाटले नाही. लोक चार वर्षांनी भानावर येतील आणि नवा नेता निवडतील अशी मला आशा होती. तोपर्यंत "ठेविले ओबामे तैसेची रहावे" अशा वृत्तीने रहावे असे ठरवले होते. देश सोडीन, राज्य सोडीन, नोकरी सोडीन, जगणे सोडीन असले काहीही विचार मनात आलेले नव्हते.
तेव्हा ते वेगळे आणि हे वेगळे!

Pages