Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
==ट्रंप कॅंपेनने हे कोमी
==ट्रंप कॅंपेनने हे कोमी कार्ड नीट हाथाळलं आणि ट्रंपबाबाने हि येत्या ९ दिवसांत काहितरी बरळुन स्वत:च्याच पायावर धोंडा पाडुन घेतला नाहि तर "आब के बाॅर ट्रंप साॅरकाॅर" पहायला मनाची तयारी करुन ठेवा... फिदीफिदी
==
राजसाहेबांची काही दिवसांपूर्वीची ही भविष्यवाणी!
हॅट्स ऑफ!
ट्रम्पचे पहिले स्पीच बरेच
ट्रम्पचे पहिले स्पीच बरेच बॅलन्सड होते.
काल रात्री त्याच्या कॅम्प मध्ये वेगळेच वातावरण होते आधी लोक, " लॉक हर अप" म्हणत हिस्टेरिक झाले होते.
पण नंतर त्याने हिलरी इज ग्रेट वगैरे म्हणल्यावर अगदी त्याच लोकांना टाळ्य वाजवल्या. एकदम ३६० टर्न. मोदी भक्त जसे प्रत्येक गोष्टीत टर्न घेतात तसेच अगदी ट्रम्प बाबत काल पाहायला मिळाले. पण नंतर एकदम नॉर्मल.
कॉनवेने ट्रम्पला बराच लाईनीवर आणला आहे. तीला काही तरी चांगली पोस्ट मिळेल असे वाटते. ती एक बाई, ट्रम्पला नाही म्हणू शकते असे दिसले गेल्या १५ दिवसात.
बाकी मार्केट बाबतीत, गो लाँग राईट नाउ. गोल्डन चान्स.
ट्रम्पचे पहिले स्पीच बरेच
ट्रम्पचे पहिले स्पीच बरेच बॅलन्सड होते.>>> +१
This is like a testament to the fact that media cannot really sway elections even if they'd like too.
He was being hammered by all media left and right but he still came out on the top. It almost feels like the hammering kind of backfired because it brought more disgruntled voters out of the woodwork just so they could come out and shove it to the other more pc (politically correct) and visible crowd and pretty much underscore their existence.
त्याची कँपेन मॅनेजर केलीअॅन
त्याची कँपेन मॅनेजर केलीअॅन कॉनवे हीचे विशेष कौतुक आहे. तिने सर्व नीट मॅनेज केले. >> हो. त्यांचे ६० मिलियन वोटर्स कोण आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणे व मतदानाच्या दिवशी ते येतील याची खात्री करणे हे ग्राउण्डवर्क त्यांच्या कॅम्पेन ने यशस्वीरीत्या केलेले दिसते.
काल अमेरिकेचा इलेक्टोरल मॅप दाखवत होते त्यात इकडे न्यू यॉर्क व आजूबाजूची राज्ये व तिकडे कॅलिफोर्निया, ओरेगॉन व नेवाडा सोडले तर मधे सगळे "पेण्ट इट रेड" होते :). बहुधा बुश च्या २००४ च्या निवडणुकीसारखे.
It almost feels like the
It almost feels like the hammering kind of backfired >> मलाही तसेच वाटते.
दुसरे म्हणजे गेली ८ वर्षे नुसते राजकीय विश्लेषकच नव्हे, तर खुद्द रिपब्लिकन पार्टी मधेही हा अॅनेलीसीस केला जात असे की लॅटिनो आउटरीच शिवाय पुन्हा रिपब्लिकन माणूस प्रेसिडेण्ट बनणे अवघड आहे, किंवा ब्लॅक्स, लॅटिनो व इन जनरल "पीपल ऑफ कलर" यांना धुडकावून यापुढे कोणी सत्तेवर येउ शकत नाही. पण ते ही या निवडणुकीने खोटे ठरवले आहे. बायबल बेल्ट मधले मतदान पाहता ब्लॅक्स नी सगळे हिलरीला मत दिले असेल असेही वाटत नाही.
असेही असू शकते की वॉरेन किंवा बर्नी नसल्याने रॅडिकल लिबरल्स अनुत्साही राहिले व जेवढे लोक मतदानाला यायला हवे होते तेवढे आले नाहीत.
एक ट्रेण्ड जो जगभर सुरू आहे - राइट विंग ला फेवर करणारे लोक सत्तेवर येणे, तो अमेरिकेतही पोहोचला. भारत, युरोप वगैरे मधे गेल्या २-३ वर्षांत ते दिसले आहे. आयसिस व एकूणच अतिरेक्यांबद्दल असलेला राग व त्याबद्दल जोरदार काहीतरी करू शकेल असा नेता निवडणे याला इतर अनेक गोष्टींपेक्षा प्राधान्य दिलेले दिसते लोकांनी अमेरिकेतही.
एन्पीआरवर सकाळी चक्क
एन्पीआरवर सकाळी चक्क काउन्सिलिंग सुरू होतं श्रोत्यांचं - ९/११सारख्या दुर्घटनांनंतर करत होते तसं!
मला अतीव दुःख होतंय, पण तो नीट लोकशाही पद्धतीने निवडून आला आहे, तेव्हा जनमताचा हा कौल मान्य करणं भाग आहे.
एक ट्रेण्ड जो जगभर सुरू आहे -
एक ट्रेण्ड जो जगभर सुरू आहे - राइट विंग ला फेवर करणारे लोक सत्तेवर येणे, तो अमेरिकेतही पोहोचला. भारत, युरोप वगैरे मधे गेल्या २-३ वर्षांत ते दिसले आहे. >> अगदी अगदी ! ब्रेक्झिट पासून काहीही धडा घेतला नाही यांनी
ओबामाच्या वेळी ब्लॅक टर्नाऊट
ओबामाच्या वेळी ब्लॅक टर्नाऊट ६० % होता, हिलरी करता फक्त ३७% झाला.
फा, माझ्या वाचनात येतय त्यानुसार, आयसिस ला आळा घालणे ह्या बाह्य गोष्टींपेक्षा, देशाच्या आत अनेंप्लॉयमेंट आणि ग्रोईंग इन्कम गॅप ह्या कारणांमुळे लोकं (त्या सेगमेंट मधली) खवळलेले आहेत आणि त्यांनी हा कौल दिलाय. लिंक सापडली की देतो. इट मेड अ लॉट ऑफ सेन्स.
Brexit was another example where people were more frustrated about the economy of their own country (rather than ISIS) and voted for getting out of the EU hoping for a change.
एक्झॅक्टली बाई ! नॉट लायकिंग
एक्झॅक्टली बाई ! नॉट लायकिंग इट बट पीपल हॅव स्पोकन! तेही मीडिया, स्पोर्ट्स, मूव्हीज, म्युझिक सगळे सेलेब्रिटीज, खुद्द ओबामा आणि मिशेल इतक्यांनी एन्डॉर्स करूनही इतका क्लियर डिफीट. लोकशाही जिंदाबाद!
तो नीट लोकशाही पद्धतीने
तो नीट लोकशाही पद्धतीने निवडून आला आहे, तेव्हा जनमताचा हा कौल मान्य करणं भाग आहे. >> सहमत.
आणि त्याला मत दिलेल्यांना मी तुच्छही लेखत नाही. आपल्यासारखे मत नसलेले लोक निर्बुद्ध, जातीयवादी आहेत हे म्हणणे सोपे आहे. पण ६० मिलियन लोक मत देतात तेव्हा बरेच अंडरकरंट्स असतात जे मिडियाला सुद्धा माहीत नव्हते. किंबहुना रिपब्लिकन पार्टीलाही.
तेव्हा यापुढे तो काय करतो याची चर्चा करायलाच हवी. पण सुरूवातच सिनीकल करण्याची गरज नाही.
वर आलेले मुद्दे महत्वाचे
वर आलेले मुद्दे महत्वाचे होतेच त्याचबरोबर ट्रंपचा एस्टॅब्लिशमेंट विरुद्धचा स्टॅंड (अगेंस्ट बोथ रिपब्लिकन्स, डेम्स, डिसी इलिट) हा क्रिटिकल सक्सेस फॅक्टर ठरला. अमेरिकेत ७०% गोरे आहेत, त्यातल्या बर्याच जणांनी बाहेर पडुन मतदान केलं याकडे हि दुर्लक्श करता येणार नाहि...
आणि हो, ८ वर्षांनंतर परत एकदा माझं मत फळाला आलं याचं समाधान आहे...
फा, तुझ्या बॅलन्स्ड थिंकींग
फा, तुझ्या बॅलन्स्ड थिंकींग चं कौतूक.
नव्या प्रेसिडन्ट ला शुभेच्छा!
मला अतीव दुःख होतंय, पण तो
मला अतीव दुःख होतंय, पण तो नीट लोकशाही पद्धतीने निवडून आला आहे, तेव्हा जनमताचा हा कौल मान्य करणं भाग आहे.>>>> +१. अतिशय वाईट फिलींग आहे.
त्यांचे ६० मिलियन वोटर्स कोण आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणे व मतदानाच्या दिवशी ते येतील याची खात्री करणे हे ग्राउण्डवर्क त्यांच्या कॅम्पेन ने यशस्वीरीत्या केलेले दिसते.>>> हेच हिलरी कडून झालं नाही. There was a big disconnect from grass root, rural, blue color people. मॅप पाहिला तर सुशिक्षित, शहरी लोकांनी हिलरीला मतं दिली आहेत. पण रूरल भागातून फार मोठ्या प्रमाणात मतदान केलं गेलं -
इतर कोणीही रीपब्लिकन उमेदवार निवडून आला असता तर पार्ट ऑफ इलेक्श्न म्हणून 'माझा प्रेसीडेंट' म्हणून स्वीकार केला असता. पण ट्रंपच्या बाबतीत असं म्हणवत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे इथे ज्या ज्या देसी मित्र मैत्रिणींशी बोलत होते, त्या सगळ्यांनी 'मुलं फार घाबरली आहेत' असं सांगितलं. 'आई आपलं काय होणार' हा कॉमन प्रश्न होता. 'आम्हाला मूव्ह करायचं नाही' वगैरे. मुलांपर्यंत पण भिती घालणं पोचलं आहे.
It's not about republican or Democrat candidate. It's about eligible, sane (योग्य) candidate.
नव्या प्रेसीडेंटना
नव्या प्रेसीडेंटना शुभेच्छा!
मागच्या तीन प्रेसिडेंटना न लाभलेली सिनेट आणि हाऊस मधली मेजॉरिटीही त्याच्या मागे आहे. ही पॉवर तो योग्य कारणांकरता वापरेल अशी आशा करु या.
पॉप्युलर व्होट हिलरीचे जास्त आहेत. अमेरिकन निवडणूकांचा नेहमीचा घोळ.
लिगली आलेल्या देसी लोकांना
लिगली आलेल्या देसी लोकांना घाबरायचं काय कारण आहे?
लिगली आलेल्या देसी लोकांना
लिगली आलेल्या देसी लोकांना घाबरायचं काय कारण आहे? >>> लिगली आलेल्या कुणालाच घाबरायचं कारण नाही. पण मुलांनी त्याची भाषणं ऐकून इमिग्रंटसचं सरसकटीकरण केलं. दुसरी गोष्ट म्हणजे शाळेतही बाकी मुलं (म्हणजे गोरी) बोलताना याचा उल्लेख होऊ लागला आहे, जे देशी मुलांना नविन आहे. त्यामुळे पोरं घाबरली असणार.
बुवा, नाही म्हंटलं तरी गोरी
बुवा, नाही म्हंटलं तरी गोरी आणि गोरी नसलेली हा फरक आहेच !
ह्म्म्म्म्म. बरोबर आहे. चर्चा
ह्म्म्म्म्म. बरोबर आहे. चर्चा होत असणार आजूबाजूला. पालकांनी मुलांना व्यवस्थित माहिती देऊन ठेवणे हाच एक उपाय आहे मग.
http://www.huffingtonpost.com
http://www.huffingtonpost.com/entry/what-should-we-tell-the-children_us_...
आधीच्या कुठल्याही प्रेसीडेंट्शीअल इलेक्शननंतर ही वेळ आलेली नव्हती.
न्यूयॉर्कर
न्यूयॉर्कर
उदय, मंदार, वैद्यबुवा,
उदय, मंदार, वैद्यबुवा, फारएण्ड, धनि - धन्यवाद. अभिनंदनास पात्र नाहि कारण माझं योगदान फक्त मत आणि कॅंपेनला काहि पैसे देण्यापुरतं. नन्दलेस, थॅंक्स फाॅर बिइंग ए ग्रेट स्पोर्ट.
पब्लिक आॅफिसच्या बाबतीत ट्रंपची पाटी कोरी आहे. त्याला थोडा वेळ देउया, अमेरिकन काॅंस्टिट्युशन त्याच्यावर चाप ठेवायला समर्थ आहे...
अमेरिकन काॅंस्टिट्युशन
अमेरिकन काॅंस्टिट्युशन त्याच्यावर चाप ठेवायला समर्थ आहे...>> असं झालं तर फार उत्तम. पण खरं सांगता मला याबाबत काहीही आशा नाही.
आधीच्या कुठल्याही
आधीच्या कुठल्याही प्रेसीडेंट्शीअल इलेक्शननंतर ही वेळ आलेली नव्हती.
<<
कठिणे बरं अमेरिकेचं!
>>
>> http://www.huffingtonpost.com/entry/what-should-we-tell-the-children_us_... <<
हा हा, आय हॅव सीन धिस मुवी बिफोर, अबाउट २ इयर्स ॲगो इन इंडिया...
अमेरिकन काॅंस्टिट्युशन
अमेरिकन काॅंस्टिट्युशन त्याच्यावर चाप ठेवायला समर्थ आहे...>> असं झालं तर फार उत्तम. पण खरं सांगता मला याबाबत काहीही आशा नाही.
<<
आम्च्या देशात किनै, कॉन्स्टीट्यूशनच बदलायचा प्रेत्न सुरुये
हॅप्पी ट्रंपिंग अमेरिका!
हा हा, आय हॅव सीन धिस मुवी
हा हा, आय हॅव सीन धिस मुवी बिफोर, अबाउट २ इयर्स ॲगो इन इंडिया.
<<
याह.
अँड भक्त्स आर स्टिल वॉचिंग इट.
कठिणे बरं अमेरिकेचं!>>> हो!
कठिणे बरं अमेरिकेचं!>>> हो! खरंच कठीण आहे. पण एवढं गोल गोल होऊन का हसताय?
आम्च्या देशात किनै, कॉन्स्टीट्यूशनच बदलायचा प्रेत्न सुरुये >>>हो का? देशहितासाठी असेल तर चांगलंच आहे. गुडलक!
हा हा, आय हॅव सीन धिस मुवी बिफोर, अबाउट २ इयर्स ॲगो इन इंडिया... >>> हम्म. ओके.
==आधीच्या कुठल्याही
==आधीच्या कुठल्याही प्रेसीडेंट्शीअल इलेक्शननंतर ही वेळ आलेली नव्हती.
अरेरे! हफिंग्टन पोस्टवरचे लेखक ट्रंप जिंकल्यामुळे दु:खी झाले? फारच अनपेक्षित!
मग आता काय करावे म्हणता त्यांचे दु:ख निवारण करायला?
शेंन, तुमचं अभिनंदन. मग काय
शेंन,
तुमचं अभिनंदन. मग काय मोतीचुराचे लाडू वाटले की नाही?
पोरं घाबरली आहेत हो, त्याबद्दल लेख आहे. वाचाल का?
हो का? देशहितासाठी असेल तर
हो का? देशहितासाठी असेल तर चांगलंच आहे. गुडलक!
<<
अग्दी अग्दी. तिकडेपण राष्ट्रहितच येणारे बर्का. रच्याकने ब्रेक्झिटला व्होट करणारे माझे क्लासमेट्स जॉब आप्लं देव पाण्यात घालून बसलेत.
Pages