Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा राज आणि शेंडेनक्षत्र
अरे वा राज आणि शेंडेनक्षत्र यांच्या चिकाटीला मानले.
दिल्लीमधे ट्रम्प निवडुन यावा म्हणुन यज्ञ केला होता एका हिंदू संघटनेने. त्याची प्रार्थना लाभली की ट्रम्प साहेबांना...
<<अमेरिका विल बी मेड ग्रेट
<<अमेरिका विल बी मेड ग्रेट अगेन.>>
----- अमेरिका ग्रेट आहेच अजुन बनव म्हणा... अगेन असे म्हणणे ओबामा यान्च्यावर अन्यायकारक आहे.
अनेकान्ना मोठे मानसिक धक्के बसले आहेत. ट्रम्पचे स्पिच काय असेल ?
२८८ अभिनन्दन ट्रम्प... अब
२८८
अभिनन्दन ट्रम्प... अब की बार ट्रम्प सरकार.
अमेरिकन केजरीवाल आला बाबा
अमेरिकन केजरीवाल आला बाबा निवडून
ट्रपंचे स्पीच काय असेल>> यु
ट्रपंचे स्पीच काय असेल>> यु नेव्हर वॉन्ट टू नो ने चालू होईल
Pathetic results. India voted
Pathetic results. India voted against their Rahul Gandhi , America voted for theirs.
Also, with Modi's yesterday 's move India has taken a big leap forward. USA seem to have done exactly opposite.
नानबा, अमेरिकेने त्यांचा
नानबा, अमेरिकेने त्यांचा मोदीच निवडलाय. नीट बघा.
आत्ताच बुंदीच्या लाडवांची
आत्ताच बुंदीच्या लाडवांची ऑर्डर देऊन आलो (चांगले भरपूर केशर घालून गर्द शेंदरी बनवायला सांगितले आहेत!)
दोन तीन दिवस प्रचंड दडपण होते. पण आता गेले!
माध्यमे, विचारवंत, नटनट्या, कलावंत, राष्ट्राध्यक्ष, श्रीमंत हे सगळे प्रतिकूल असतानाही विजयश्री खेचून आणणार्या ट्रंपला मानले!
अमेरिकन नागरिकांना भावणारे, पटणारे बोलून ही लढाई जिंकली आहे. अमेरिकन लोकांनी प्रस्थापितांना नाकारले आहे. सफाईदार आणि तोलून मापून (पॉलिटिकली करेक्ट) बोलणे, घासून गुळगुळीत झालेली भाषणे ही अमेरिकन नागरिकांना रुचेनाशी झाली आहेत.
अभिनंदनाबद्दल आभार. (खरे तर आमचे राज्य ट्रंपला साथ देणार नव्हतेच त्यामुळे माझ्या मताची ट्रंपला काडीचीही मदत झालेली नाही ह्याची जाणीव आहे!). मायबोलीवर ट्रंपचा किल्ला लढवण्यात जो काही खारीचा वाटा उचलायला मिळाला तेवढाच आनंद!
शेंडेनक्षत्र, अभिनंदन!
शेंडेनक्षत्र, अभिनंदन!
अरे मायावती जिंकली काय आणि
अरे मायावती जिंकली काय आणि मुलायम जिंकला काय सारखेच ना !!!
अरे मायावती जिंकली काय आणि
अरे मायावती जिंकली काय आणि मुलायम जिंकला काय सारखेच ना !!! >> Te hee kharach!. But can't stand that person.
माध्यमे, विचारवंत, नटनट्या,
माध्यमे, विचारवंत, नटनट्या, कलावंत, राष्ट्राध्यक्ष, श्रीमंत हे सगळे प्रतिकूल असतानाही विजयश्री खेचून आणणार्या >> he bakee Khare!
अरे मायावती जिंकली काय आणि
अरे मायावती जिंकली काय आणि मुलायम जिंकला काय सारखेच ना>>
नाही हो, भरपूर फरक आहे. हे म्हणजे बंगाल्यास पंजाबी म्हटल्यासारखे.
जौदे, धाग्याचा विषय नको भरकटायला.
शेंडेनक्षत्र,
शेंडेनक्षत्र, अभिनंदन!
ट्रंपकाकांनापण किलोभर लाडु नेऊन द्या.
अमेरिकनांचे अभिनंदन!
हॅपी ट्रंपिंग!
अब की बार ट्रंप सरकार. ट्रंप
अब की बार ट्रंप सरकार. ट्रंप येतील व मार्केट एकदम खाली जाईल अशी मी अटकल बांधली होती.
व फील्डिंग लावली होती. सो हॅपी. उद्यापासून गम्मत.
>>> व फील्डिंग लावली होती.
>>> व फील्डिंग लावली होती. <<<< कुणाचे काय अन कुणाला काय पडलय...
कुणाचे काय अन कुणाला काय
कुणाचे काय अन कुणाला काय पडलय...
>> मार्केट पडलंय. धडाम.
ओ शेंडे आणि राज - अभिनंदन!
ओ शेंडे आणि राज - अभिनंदन!
माध्यमे, विचारवंत, नटनट्या, कलावंत, राष्ट्राध्यक्ष, श्रीमंत हे सगळे प्रतिकूल असतानाही विजयश्री खेचून आणणार्या ट्रंपला मानले! >>> यस. सगळ्या लॉब्या वगैरे सुद्धा.
ट्रंपचे भावी मंत्रींमंडळ नि
ट्रंपचे भावी मंत्रींमंडळ नि सिनेटमधली स्थिती बघता roe v. wade, पर्यावरण, नि EPA ह्या माझ्यासाठी असलेल्या तिन्ही जिव्हाळ्यांच्या गोष्टीची वाट लागणार हे उघड आहे.
काय राज, तात्या cemex घ्यायचा का ? काय म्हणता ?
भारतीय निवडणूकआणि अमेरिकन
भारतीय निवडणूकआणि अमेरिकन निवडणूकी मधील साम्य
१. पोलरायझेशन
२. लोकांनी प्रस्थापितांची वाट लावने.
३. आपआपला बेस काय आहे ते नीट समजावून घेउन त्यांना टारगेट करणे.
४. आपल्या विरोधी मत देणार्या अनेकांना, आपल्या बाजूना आणणे. ( रॉमनी पेक्षा ट्रम्पला लॅटिनो आणि AA मत जास्त पडली आहेत !! )
५ आउटसायडर व्हियू.
६. करपश्न
७. इस्लाम आणि टेररिझम. मोदी आणि ट्रम्प अनेकदा टेररिझम वर डायरेक्ट बोलले. दोन्ही देशातील लोकांना ते आवडले. आणि त्याचे रुपातंर मतपेटीत झाले.
भारतीय निवडणूकआणि अमेरिकन निवडणूकी मधील विरोधाभास.
१. तेथील पप्पू सारखा बोलणारा ट्रम्प कधी निवडून येईल असे वाटले नाही. इनफॅक्ट रागा पण बरेचदा नीट बोलले, पण रागा आणि ट्रम्प मध्ये वाचाळते मध्ये साम्य आहे. कधी काय बोलतील त्याचा नेम नाही.
२. मोदी आणि ट्रम्प ओरेटरी मध्ये काहीही साम्य नाही. (अर्थात आता मोदी पण बरेचदा बोअर करतात ते सोडा.)
३.. मोदींना अनुभव होता. ट्रम्प म्हणजे त्या न्युझिलंडच्या क्रिकेटरसारखा आहे. पहिल्याच इंटरनॅशनल वनडे मध्ये कॅप्टन. मोदी आणि ट्रम्प सारखे आहेत असे म्हणणे नाईव्ह आहे.
४. धर्मातील काही मुद्दे जसे अबॉर्शन. इट इज इंडिड सरप्राईजिंग की २०१६ मध्ये ह्या मुद्द्यावर लोक मत देतात. भारतात हा मुद्दा होऊ शकत नाही. पर्सनल चॉई़स.
-
हिलरी पेक्षा बर्नि असला असता तर कदाचित ट्रम्प आला नसता कारण त्याचाही व्ह्यु बर्याच प्रमाणात ( जॉब आणि कार्पोरेट) ट्रम्प सारखा वाटला असता आणि मत विभागले गेले असते.
असामी- सिनेट व हाउस बद्दल
असामी- सिनेट व हाउस बद्दल म्हणत असशील तर ठीक आहे. ट्रम्प स्वतः टोटल वाइल्डकार्ड आहे. कोणत्याही बाजूला वळू शकतो.
ट्रंपला त्याच्या वक्तव्यावर
ट्रंपला त्याच्या वक्तव्यावर जोखणार्यांनी त्याचं कालचं ॲक्सेप्टंस स्पीच पाहिलं का? त्याच्या भाषणाला ह्रेटरीक, डिवायझीव म्हणणारे आता त्याने पुढे केलेला दोस्तीचा हात खुल्या दिलाने घेऊन कामं करतात कि नाहि ते बघायचं...
जुलियानी, क्रिस्टि, कार्सन एक्झिक्युटिव टिम मध्ये असतीलंच, गिंगरीचहि आल्यास नवल वाटेल...
लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन!
अभिनंदन राज आणि शेंडेनक्षत्र.
अभिनंदन राज आणि शेंडेनक्षत्र. आय कुडंट बिलिव इट लास्ट नाईट!
I really hope he bears the mantle gracefully and this position of utmost responsibility makes him a better man. आत्ता स्पीच एकतोय, नीट बोलतोय एकदम. Lets wait and watch!
एक मोठ्ठे समाधान असे की आता
एक मोठ्ठे समाधान असे की आता निवडणुकीची अंदाधुंदी संपली. उगाच शिव्यागाळी, घाण भाषा खोटारडे पणा असले ऐकावे लागणार नाही. कोण किती वाईट आहे हे सांगून झाले.
आता पुढे काय होईल या वर एक वेगळा धागा काढा. आश्वासनांवर अवलंबून मते दिली पण प्रत्यक्षात अंमलात आणण्यास जो वेळ लागतो तेव्हढा धीर धरवेल का लोकांना? चार वर्षात आयसिसचा पराभव, बेकायदेशीर लोकांना हाकलून देणे, चीनवर ३५ टक्के जकात लावून त्याचे काय चांगले परिणाम व्ह्यायचे ते,हे सगळे व्हायला पाहिजे,
सगळ्यात महत्वाचे म्हणजे वॉल स्ट्रीट. ट्रंप बेभरंवशाचा म्हणून, हिलरीचे नवे इ-मेल प्रकरण बाहेर येताच, वॉल स्ट्रीटचे धाबे दणाणले. ती निर्दोष म्हंटल्यावर एकदम सुधारली! आता परत २००८ होणार की काय?
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.
भारतात जाण्याचे तिकीट महाग होणार!
एक मोठ्ठे समाधान असे की आता
एक मोठ्ठे समाधान असे की आता निवडणुकीची अंदाधुंदी संपली. उगाच शिव्यागाळी, घाण भाषा खोटारडे पणा असले ऐकावे लागणार नाही. कोण किती वाईट आहे हे सांगून झाले.
आता पुढे काय होईल या वर एक वेगळा धागा काढा. आश्वासनांवर अवलंबून मते दिली पण प्रत्यक्षात अंमलात आणण्यास जो वेळ लागतो तेव्हढा धीर धरवेल का लोकांना? चार वर्षात आयसिसचा पराभव, बेकायदेशीर लोकांना हाकलून देणे, चीनवर ३५ टक्के जकात लावून त्याचे काय चांगले परिणाम व्ह्यायचे ते,हे सगळे व्हायला पाहिजे,
सगळ्यात महत्वाचे म्हणजे वॉल स्ट्रीट. ट्रंप बेभरंवशाचा म्हणून, हिलरीचे नवे इ-मेल प्रकरण बाहेर येताच, वॉल स्ट्रीटचे धाबे दणाणले. ती निर्दोष म्हंटल्यावर एकदम सुधारली! आता परत २००८ होणार की काय?
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.
भारतात जाण्याचे तिकीट महाग होणार!
ट्रम्पजींना शुभेच्छा ! मला
ट्रम्पजींना शुभेच्छा !
मला आवडलं ते आले ते. अगदी मोदीजींप्रमाणेच एकट्याने खेचून आणला विजय.
अय्या, हरिनामे ताई, आपके
अय्या, हरिनामे ताई, आपके खयालात कितने मिलते जुलते है उनसे.
मी काल शेवटपर्यंत काही जागं राहू शकले नाही. ट्रंपचं स्पीच अजून पाहिलेलं नाही. तेव्हा बुवांशी सहमत. रिपब्लिकन्स सत्तेवर असले की स्वतःचे खिसे भरतात आणि लोकांनाही भरू देतात असं ऐकून आहे ते खरं होवो म्हणजे झालं.
आता पुढे काय होईल या वर एक
आता पुढे काय होईल या वर एक वेगळा धागा काढा.######
असा धागा काढणार का ?असं मी विचारलं तर , वेळ नाही आम्हाला असं उत्तर मिळाले, वर वाचलं नाहीत का तुम्ही?
राज आणि शेंडेनक्षत्र यांचे
राज आणि शेंडेनक्षत्र यांचे अभिनंदन !
नविन प्रेसिडेंटना त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा !
बदल घडलेला आहे, पण खालची सगळी माणसं तीच आहेत त्यामुळे खरी कसोटी लागेल असे वाटते आहे. त्याची कँपेन मॅनेजर केलीअॅन कॉनवे हीचे विशेष कौतुक आहे. तिने सर्व नीट मॅनेज केले. आधीच्या मॅनेजरने जी थोडी वाताहत केली होती ती तिने सुरळीत केली आणि शेवटचे ७ दिवस बरोबर संदेश देत इतर कुठलीही काँट्रोव्हर्सी न करता कँपेन पुर्ण करणे कमेंडेबल आहे. तिला कुठली तरी चांगली पोस्ट मिळावी.
http://www.newyorker.com/news
http://www.newyorker.com/news/news-desk/an-american-tragedy-donald-trump
Pages