अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवाळखोर असलेल्या अमेरिकेसारख्या देशाने (अमेरिकेवर किती कर्जाचा बोजा आहे ते तपासा) लाखो अरबी निर्वासित आणि त्याहून जास्त बेकायदारित्या घुसणार्‍या अशिक्षित मेक्सिकन लोकांची जबाबदारी शिरावर घेणे कितपत शहाणपणाचे आहे? हिलरी ते करणार ही दगडावरची रेघ आहे. ट्रंप निदान म्हणतो तरी आहे की मी असे करणार नाही.

हिलरीच्या आशिर्वादाने इराकविरुद्ध जे युद्ध घडले त्यात १ ट्रिलियन डॉलर जळून खाक झाले. ते कुठले होते?>>>
ट्रंपपेक्षा हिलरी जास्त युद्धखोर आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. >>>>
Lol काय कन्सिस्टंसी आहे Proud

>> त्याकरता अनेक हिशेबनीस आणि अन्य कंपन्यांच्या उत्पन्नाची सोय झालेली आहे. पण हा अनाठायी व्यापार आहे. कर हे इतके क्लिष्ट असण्याचे कुठलेही समर्थनीय कारण नाही. आणि आजवर लॉबीच्या प्रभावामुळे कुणीही ह्यात बदल केलेला नाही.

ओबामा यायच्या आधी रिपब्लिकन बुश होता आठ वर्षं? तेव्हा हे बदल कसे काय झाले नाहीत? ट्रम्प जेव्हा वेळोवेळी हिलरी ने गेल्या ३० वर्षांत काहिही केलेलं नाही असं म्हणतो तेव्हा तीस वर्षं काय सगळीकडे डेमोक्रॅटिक राज्यकारभार होता का?

>> हिलरीच्या आशिर्वादाने इराकविरुद्ध जे युद्ध घडले त्यात १ ट्रिलियन डॉलर जळून खाक झाले

ट्रम्प म्हणजे मुरलेला राजकारणी नाही. पण बाकी सगळे मुरलेले राजकारणी जसं "गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास" वागतात त्यांच्या वागण्यात आणि ट्रम्प च्या वागण्यात काय फरक आहे? तो काय धुतल्या तांदळासारखा त्याच्या तत्त्वांनां कवटाळून इतके वर्षं बिझीनेस करत होता आणि आता तीच तत्वं वापरून राज्यकारभार सांभाळणार का? (काय आहेत ही तत्वं? नार्सिसीजम? फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेणे? मग त्यात आजूबाजूच्या लोकांचं काय वाट्टेल ते का होईना?)

डेमोक्रॅटिक राजकारण्यांमध्ये लाचखोरी, करप्शन भरलेले आहे मग एका बिलीयनेअर ने कर चुकवून परत इन्फ्रास्टक्चर च्या नावाने बोम्ब मारणे हे लाचखोरी आणि करप्शन पेक्षा "स्मार्टनेस" बनून व्हर्च्यू होतो काय?

>> ट्रंपपेक्षा हिलरी जास्त युद्धखोर आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.

म्हणजे नक्की काय? "नूक्स आहेत तर वापरत का नाही"? ही युद्धखोरी नाही काय?

>> ट्रंप हा पुरेसा रिपब्लिकन नाही. त्याची अनेक धोरणे पुरोगामी असणार ह्याची मला खात्री आहे. तो मोठ्या शहरात वाढलेला व्यापारी वृत्तीचा मनुष्य आहे. तो धार्मिक कधीच नव्हता. प्रचाराकरता काय ओबामाही धार्मिक असल्याचा आव आणतच होता!

राजकारणी असल्यावर प्रचार करताना, मतं मिळवताना कोण हे करत नाही? ट्रम्प काय गांधीजी / बाबा आमटे/ साने गुरूजी असल्या आश्रमातून नुकताच बाहेर पडून अमेरिकेची सत्ता मिळवण्याकरता प्रयत्न करत आहे असा समज आहे का तुमचा?

ट्रंप हा पुरेसा रिपब्लिकन नाही. त्याची अनेक धोरणे पुरोगामी असणार ह्याची मला खात्री आहे. >> थोडक्यात तो ज्यांच्या दाढ्या आता कुरवाळतो आहे त्यांना सोयीस्करपणे नंतर बगल देणार. wait a minute, is n't that your objection is about politician in general ?

==पण बाकी सगळे मुरलेले राजकारणी जसं "गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास" वागतात त्यांच्या वागण्यात आणि ट्रम्प च्या वागण्यात काय फरक आहे?
==
बड्या कंपन्या ट्रंपला लाच देत नाहीत. हिलरीला कोट्यावधी डॉलर लाच म्हणून दिलेले आहेत. गोल्डमन सॅक्स हे एक उदाहरण आहे. ते काही कर्णासारखे उदार नाहीत की असेच पैसे देतील. बड्या कंपन्यांच्या हिताचे कायदे बनावेत म्हणून ही लाच दिली जात आहे.

==म्हणजे नक्की काय? "नूक्स आहेत तर वापरत का नाही"? ही युद्धखोरी नाही काय?

भाषणातील डायलॉगबाजी एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला प्रत्यक्ष केलेली कृती ह्यात मी प्रत्यक्ष केलेल्या कृतीला जास्त वजन देतो. हिलरीने काय केले? इराक युद्धाला बिनशर्त पाठिंबा, लिबियात गदाफीला हटवून बंडखोरांचे राज्य आणून तो देश बरबाद केला. कायमस्वरूपी यादवीने ग्रासला. इजिप्तमधे कट्टर मुस्लिम पक्षाला मदत देऊन होस्नी मुबारकला हटवले. सिरियात आयसिसच्या समर्थकांना पैसे आणि सामग्री पुरवून त्या देशात यादवी आणि हिंसा घडवून आणली. मला वाटते हिलरीच्या युद्धखोरीची इतकी उदाहरणे पुरेशी आहेत.

जाता जाता: तमाम बुश खानदान हे हिलरीला मत देणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.

<<म्हणजे नक्की काय? "नूक्स आहेत तर वापरत का नाही"? ही युद्धखोरी नाही काय?>>
----- ते न्युक्स असुनही काही कामाचे नाही आहेत असेच ट्रम्प महाशयान्ना सुचवायचे असेल. उच्च कोटीचा उपरोध (मराठीत सार्कझम) आहे. टम्प शान्तीचा महादूत आहे, जगातले सर्व अण्वस्त्र नष्ट करुन या पृथ्वीवर शान्तता आणेल.

>> बड्या कंपन्या ट्रंपला लाच देत नाहीत

अहो पण लाच घेता येईल अशा ऑफीस मध्येच जर तो नव्हता तर कसा काय लाच घेणार तो मोठ्या मोठ्या कंपन्यांकडून?

त्याने त्याचं केम्पेन सेल्फ स्पॉन्सर केलंय हा मुद्दा आहे का? पण स्वतःचे पैसे म्हणजे फाउन्डेशन, बिझीनेस साठीचे टॅक्स लूप होल्स इत्यादी लांड्यालबाड्या वापरून, लोकांचे /काँट्रॅक्टर्स चे पैसे बुडवून स्वतःचा म्हणून राखलेला पैसा? तुम्ही ही ज्युलियानी प्रमाणे हा स्मार्टनेस समजता का?

>> भाषणातील डायलॉगबाजी एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला प्रत्यक्ष केलेली कृती ह्यात मी प्रत्यक्ष केलेल्या कृतीला जास्त वजन देतो.

परत तेच. तो सरकारात नाही तर त्याचा थेट आशिर्वाद कसा काय पोचणार कुठल्याही राजकीय कृत्याला.

आणि बाकी बाहेरून तर आजपर्यंत हजार मुक्ताफळं उद्गारली आहेत त्याने. "जर बोले तैसा चाले" हे मुद्दलातच नाही तर असा अनप्रेडिक्टेबल माणूस तुम्ही स्वतःचा नेता म्हणून निवडून देणार का??? का?

>> जाता जाता: तमाम बुश खानदान हे हिलरीला मत देणार आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.

ह्याचा खरंतर काय संबंध? रिपब्लिकन प्रिन्सीपल्स ना कवटाळणार्‍या राज सारख्या लोकांनीं विचार करावा ह्यावर.

==ह्याचा खरंतर काय संबंध? रिपब्लिकन प्रिन्सीपल्स ना कवटाळणार्‍या राज सारख्या लोकांनीं विचार करावा ह्यावर.

इराक युद्धाचे जनक आणि खंदे समर्थक हे ह्या खानदानात आहेत आणि त्यांना हिलरी जास्त आवडते. हा एक जाता जाता उपस्थित केलेला मुद्दा इतकेच!

==आणि बाकी बाहेरून तर आजपर्यंत हजार मुक्ताफळं उद्गारली आहेत त्याने. "जर बोले तैसा चाले" हे मुद्दलातच नाही तर असा अनप्रेडिक्टेबल माणूस तुम्ही स्वतःचा नेता म्हणून निवडून देणार का??? का?
==

बोले तैसा चाले असे राजकारणात कधीच नसते. ह्याचे मूर्तीमंत उदाहरण हिलरीच्या रुपात दिसतेच आहे! तेव्हा तो भाषणात जे काही म्हणतो ते सगळे होणार नाही हे गृहितच धरले आहे. ओबामाने तरी काय दिवे लावले? त्याने प्रचारात दिलेली आश्वासने पाळली का? तेव्हा ट्रंपने सगळी आश्वासने पाळली नाहीत तर त्यात जगावेगळे काही नाही. त्याचा कल कुणीकडे आहे हे पाहून आपली पसंती ठरवणे हेच योग्य. निदान तो १८० कोनात वळून म्हणतो आहे त्याच्या विरुद्ध तरी करणार नाही (ते फक्त हिलरीच करेल!).

हिलरी राजकारणात होती म्हणून लाच घेतली हे समर्थन निंदनीय, निर्लज्ज आणि अश्लाघ्य आहे. गरीबांच्या हिताच्या गोष्टी करायच्या आणि मागे धनाढ्य कंपन्यांकडून लठ्ठ लाच घ्यायची हा कमालीचा ढोंगीपणा आहे. आणि असल्या राजकारण्यांना कंटाळूनच ट्रंपसारखे बाहेरचे लोक यावेत असे लोकांना वाटते आहे.

जिच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुरवात होतानाच जी बाई मोठ्या कंपन्यांची मिंधी असणार आहे असे दिसते आहे अशा बाईची धोरणे काय असणार? गरीबांच्या हिताची? शक्य नाही!

ट्रंप निदान कोरी पाटी आहे तेव्हा तो बड्या कंपन्यांची बाजू घेईलच याची खात्री नाही. निदान संशयाला जागा आहे. माझ्या दृष्टीने इतका फरक पुरेसा आहे.

वादाला प्रतिवाद करायचा तर हे अनंत काळापर्यंत (किंवा पुढच्या मंगळवार पर्यंत करता येईल).

राजकारणी १०० प्रॉमिसेस करतात आणि त्यातली त्यांनां जी सगळ्यात महत्वाची असतात, जी आहे त्या सिस्टीम मध्ये राहून इम्प्लिमेन्ट करता येतात ती करतात.

ओबामा ने काय केले नाही ह्याचा पाढा वाचताना सोयीस्कररित्या त्याने काय केले हे तुम्ही आणत नाही चर्चेत. २००८ मध्ये एव्हढा सिव्हीयर एकॉनॉमिक डाऊनटर्न असताना आज ८ वर्षांनीं देश कुठे आहे हे तुम्ही का विसरता. ओबामा काय ८ वर्षं व्हाईट हाऊस मध्ये बसून टिवल्याबावल्या करत होता का?

आणि नुकतीच १८ वर्षं पूर्ण होऊन मतदानाचा पहिला वहिला हक्क बजावायला मिळणार अशा प्रकारचा युफोरिया वाटतो तुमचा ट्रम्प च्या बाबतीतला कॉन्फिडन्स बघता. तो निवडून आला तर आता जे जे काय म्हणत आहे मतं मिळवायला त्यापैकी हिलरी वरचं इन्व्हेस्टिगेशन पुन्हा सुरू करण्याव्यतिरीक्त कुठल्या बाबतीत तो त्याची प्रॉमिसेस् पूर्ण करणार आहे हे मला तर खरंच कळत नाही त्याच्या स्कॅटरब्रेन्स अ‍ॅप्रोच वरून.

<<इन्व्हेस्टिगेशन पुन्हा सुरू करण्याव्यतिरीक्त >>
---- ट्रम्प यान्ना सुडभावना मान्य नाही, ते निवडुन आले तरी ते हिलरी विरुद्ध असे काही करणार नाही याची मला खात्री आहे... इनफॅक्ट तिला या प्रकराणातुन बाहेर पडायला मदतच करेल.

त्यान्चे सर्वोच्च प्राधान्य अमेरिकेला उच्च शिखरावर कसे न्यायचे हाच असेल. Happy

==राजकारणी १०० प्रॉमिसेस करतात आणि त्यातली त्यांनां जी सगळ्यात महत्वाची असतात, जी आहे त्या सिस्टीम मध्ये राहून इम्प्लिमेन्ट करता येतात ती करतात.
==

सिस्टिममधे राहून म्हणजे काय? कुठलेही बदल करताना आधी गोल्डमन सॅक्सला आवडते की नाही ते पहा, सौदी अरेबियाला पसंत पडते का नाही ते पहा, फेसबुक आणि गुगलला आवडते की नाही ते पहा आणि मग कायदे बनवा, असेच ना?
नको. असले "सिस्टिममधे राहून" सुधारणा म्हणजे चिखलात रहाणार्‍याकडून स्वच्छतेची अपेक्षा आहे.

ट्रंप हा सफाईदार राजकारणी नाही त्यामुळे कित्येकदा नको ते बोलून जातो. पण सफाईदार, ऐकायला बरे वाटेल असे बोलणारे अनेक राजकारणी अत्यंत आतल्या गाठीचे घातक निघतात. गोड बोलून केसाने गळा कापतात. हिलरीचे ढळढळीत उदाहरण आहेच!

त्यापेक्षा एक घाव दोन तुकडे हे धोरण जास्त बरे.

लो टॅक्सेशन - आॅलराइट, मला इन्कम टॅक्स अभिप्रेत होता, आय शुढॅव बिन मोर क्लिअर, माय बॅड. कॅंसस, लुईझियाना बरोबरंच ओहायोचं ऊदाहरण कसं बरं नाहि आलं? आणि स्टेट/लोकल लेवलला बर्याचदा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंटसाठि स्पेशल सरचार्ज (स्प्लाॅस्ट) आकारला जातो, जनमताच्या परवानगीने - बॅलट पेपर नीट वाचलात तर कळेल... Happy

स्ट्राॅंग मिलिटरी - म्हणजे फक्त खोगीरभरती आणि बुट्स आॅन द ग्राउंड एव्हढाच समज आहे का तुमचा? गेल्या १० वर्षात आपली डिफेंस सिस्टम रशियाच्या तुलनेत किती कमजोर झाली आहे याचा जरा अभ्यास करा...

सेकंड अमेंडमेंट - गन कंट्रोलला माझाहि सपोर्ट आहे. ॲसाॅल्ट रायफल्स हॅव नो प्लेस इन अमेरिकन हाऊसहोल्ड्स...

ॲबाॅर्शन/एल्जीबिटी - माझ्या मते, गवर्नमेंट हॅज नो बिझनेस इन पिपल्स पर्सनल चाॅइसेस ॲंड सेक्शुअल ओरियंटेशन. माझ्या वरच्या पोस्टमधलं थिन गवर्नमेंट/मिनीमल रेग्युलेशन्स याच संदर्भात लिहिलेलं...

बुश खानदान - सावर ग्रेप्स. जेब आणि डब्लु बुश यांच्या मानहानीचा सूड आहे तो. बाकि, जाॅर्ज पि बुश बद्दल काय मत आहे आपलं?..

ट्रंपचे टॅक्स - करात उपलब्ध असलेल्या डिडक्शनच्या बाबतीतलं अद्न्यान वाचुन खरं तर दुर्लक्श करणार होतो पण एक शंका आली कि हिच लोकं स्टॅंडर्ड डिडक्शन वर पाणी सोडतात कि काय?.. Lol

ट्रंप बॅंकरप्टसी - चॅप्टर ११ फाइल केल्यावर देणेकर्यांच्या रकमेची परतफेड कशी करावी याची कायदेशीर नियमावली आहे. या बाबतीत कोर्टाने ट्रंपकडे कानाडोळा केला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि त्यातल्या काहि केसेस अजुनहि कोर्टात आहेत; ट्रंपने काहि बेकायदेशीर केलं असेल तर होईल शिक्शा त्याला. देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे कि नाहि तुमचा?..

<<ट्रंपने काहि बेकायदेशीर केलं असेल तर होईल शिक्शा त्याला. देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे कि नाहि तुमचा?..>>
------ ट्रम्प महाशय मेक्सिकन सिमेवर वॉल बान्धणार आहे, conflict of interest चा आरोप पुन्हा व्हायला नको म्हणुन जज व्यक्ती मेक्सिकन हेरिटेझ असणारी नको. Happy

http://www.cnn.com/videos/politics/2016/06/03/donald-trump-judge-mexican...

अर्र आता त्या सचिन माहीत नसलेल्या टेनिसपटूप्रमाणे हिलरीवर भारतीय लोक नाराज होणार. हुमा अबेदिन च्या नवर्‍याचे नाव "अँथनी" असल्याने तिला ल्क्षात असेल. त्यालाही आरशासमोर उभे राहायची सवय असावी असे दिसते.

ओबामाने तरी काय दिवे लावले? त्याने प्रचारात दिलेली आश्वासने पाळली का? >>> जर दोन्ही हाउसेस डेम्स कडे आली यावेळेस तर ट्रम्पच्या बाबतीत तेच होईल. आणि रिपब्लिकन-हिलरी सिच्युएशन मधे ओबामाचीच पुनरावृत्ती.

जिच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुरवात होतानाच जी बाई मोठ्या कंपन्यांची मिंधी असणार आहे असे दिसते आहे अशा बाईची धोरणे काय असणार? गरीबांच्या हिताची? शक्य नाही! >>> जगातील कोणत्याही सिस्टीम मधली कोणतीही राजकीय जमात यापेक्षा वेगळी असू शकत नाही.

आणि हे सगळे ट्रम्प बदलवून टाकेल याची काय खात्री? बायकांच्या बाबतीतली त्याची वाक्ये, टॅक्स रिटर्न्स न जाहीर करणे, अफाट घोषणा, स्वतः ट्रम्प फाउण्डेशन मधे स्वतःचा पैसाच न घालणे, व्हेटरन्स च्या डोनेशनच्या बाबतीत धादांत खोटे बोलणे. पण बहुधा प्रेसिडेण्ट झाल्यावर अचानक सुधरेल. वाया गेलेल्या पोराचे लग्न करून द्या तो सुधारेल या लॉजिक प्रमाणे.

बायकांच्या बाबतीतले किस्सेच त्याला अपात्र ठरवायला पुरेसे आहेत.

== ====सगळे बेनेफिट ऑफ डाऊट ट्रंपला आणि हिलरीला काहीच नाही असा रुल आहे शेंन तुमचा

आणि तुमचा काय नियम वैद्यबुवा? सगळे संशयाचे फायदे हिलरीला आणि ट्रंपला काहीच नाही असेच ना? चालायचेच!

==बायकांच्या बाबतीतले किस्सेच त्याला अपात्र ठरवायला पुरेसे आहेत.

फार पूर्वी एक बिल क्लिंटन नावाचा राष्ट्रपती होऊन गेला. त्याचे लोक आजही गुण गातात. त्याचे स्त्रियांच्या बाबतीतले किस्से हे NC-17 वा XXX दर्जाचे आहेत. तो अर्क्यान्साचा राज्यपाल असल्यापासून त्याचे चाळे चालू आहेत. पण तरीही त्याचे गोडवे गाईले जातात. त्याचा व्याभिचार हा त्याच्या राष्ट्रपती बनण्याचा आड नाही आला. पण मग ट्रंपचेच इतके स्तोम का? तो रिपब्लिकन आहे म्हणून का?

टॅक्स रिटर्न जाहीर न करणे हा कुठल्या कायद्या अन्वये गुन्हा आहे?

हिलरीच्या पूर्ण खोटारडेपणापुढे ट्रंपचे तथाकथित असत्यवचन हे फिके आहे.
ट्रंप जी आश्वासने देतो आहे त्यातली एक शतांश पाळली तरी तो हिलरीपेक्षा श्रेष्ठ असेल. याउलट हिलरीची वचने किती पाळेल आणि किती नाही हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही.
आता एक नवे त्रांगडे म्हणजे निवडून आल्यावरही हिलरीच्या डोक्यावर कोर्टाची टांगती तलवार रहाणार आहे.

फार पूर्वी एक बिल क्लिंटन नावाचा राष्ट्रपती होऊन गेला. >>> तेव्हा लोकांनी मूर्खपणा केला म्हणून पुन्हा करावा का? बिल बद्दल ही माहिती असती तर तो ही अपात्रच झाला असता.

टॅक्स रिटर्न जाहीर न करणे हा कुठल्या कायद्या अन्वये गुन्हा आहे? >>> यइच तो बात है. एकदा तुम्ही या स्लिपरी स्लोप वर निघालात की बाकी उमेदवार आणि तुम्ही (म्हणजे ट्रम्प. शेंडे नव्हेत Happy ) यातील फरक ब्लर होत जातो. त्यापेक्षाही महत्त्वाचे - ट्रम्प चा सगळा डोलाराच टीपिकल राजकारण्यांपेक्षा तो वेगळा आहे यात आहे. तो ही जर असल्या पळवाटा आत्ताच वापरत असेल तर नंतर एकदम काय सुधारणार आहे. जो स्वतःच्या श्रीमंती बद्दल वेळीअवेळी वल्गना करतो त्याला टॅक्स रिटर्न मधे काहीतरी गोची असल्याशिवाय ते लपवण्याचे काय कारण आहे. उलट त्याची दरवर्षी स्वमेहनतीने वाढणारी अमाप (इट'स यूऊऊज) संपत्ती त्यातून दाखवायची संधी होती.

पण मग ट्रंपचेच इतके स्तोम का? तो रिपब्लिकन आहे म्हणून का? >>> मी इतरांच्या वतीने बोलत नाही. मला कोणी केवळ रिपब्लिकन्स आहे म्हणून विरोध करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. उलट रिपब्लिकन्स नी एखादा मध्यममार्गी उमेदवार मॅकेन सारखा (मॅकेन स्वतः नव्हे. तो म्हातारा झाला) उभा केला असता, तर हिलरी चे दोष ठळकपणे दिसले असते. माझ्या दृष्टीने मध्यममार्गी म्हणजे आर्थिकदृष्ट्या रिपब्लिकन विचारांचा पण सोशली लिबरल. गे मॅरेज, अ‍ॅबॉर्शन, गन्स च्या बाबतीत कर्मठ नसलेला.

पण तुम्ही एकतर राजकारणी मोड मधे जा (हिलरीसारखे), नाहीतर मि. क्लीन मोड मधे. हा धड इथे नाही धड तिथे.

आता एक नवे त्रांगडे म्हणजे निवडून आल्यावरही हिलरीच्या डोक्यावर कोर्टाची टांगती तलवार रहाणार आहे. >>> ती तर ट्रम्पच्या डोक्यावर आजन्म आहे.

पण मग ट्रंपचेच इतके स्तोम का? तो रिपब्लिकन आहे म्हणून का? >> ट्रंपने दावा केलाय ना 'तो इतर राजकारण्यांपेक्षा वेगळा असण्याचा' नि 'अमेरिका ग्रेट बनवण्याचा' मग ह्या उद्योगांनी कसे होणार ते ? आता 'हेच ते ग्रेट करणे आहे' असे तुम्ही म्हणत असाल तर बात वेगळी. क्लिंटनच्या वेळी मूर्ख होती जनता नि त्यातून धडे घेतलेत लोकांनी असे समजा हवं तर. एकदा केलेली चूक पुन्हा न करण्याची इच्छा आहे. ग्रेट बनवायला निघालेल्या माणसाला हे कळत नसेल तर कठीण आहे.

आता एक नवे त्रांगडे म्हणजे निवडून आल्यावरही हिलरीच्या डोक्यावर कोर्टाची टांगती तलवार रहाणार आहे. >> तुम्हाला माहित नसेल असे नाही पण अजून तरी हिलरीच्या डोक्यावर एकही कोर्ट केस नाहीये. खरी नाही नि खोटी नाही. ट्रंपबाबाचे काय आहे ? ह्याच महिन्यांमधे किमान एक सुनावणी आहे. हे त्रांगडे कि अजून काय आता ?

Do future generation a favor and read this article
https://www.pastemagazine.com/articles/2016/11/the-leaked-email-you-have...

>>बायकांच्या बाबतीतले किस्सेच त्याला अपात्र ठरवायला पुरेसे आहेत.<<
हा हा. हिलरीज कॅंपेन हॅज मुव्ड आॅन बट योर पिन इज स्टिल स्टक टु दि सेम ट्रॅक आॅर यु स्टार्टेड साउंडिंग लाइक ए ब्रोकन रेकाॅर्ड... Lol

ॲंड धिस वन इज फाॅर आॅल हिलरी सपोटर्स...

अच्छा, अशा बातम्या बाहेर आल्यावर दोन तीन दिवस झाले, की तो कॅण्डिडेट आपोआप मॅजिकली पुन्हा पात्र होतो का? सॉरी. आम्ही स्वतंत्र विचार करतो. हिलरीची कॅम्पेन काय करतीय यावर नाही.

वेल, डिस्पायट वाॅचिंग द होल क्लिप, इफ यु आर हंग्ड अप आॅन ए टायटल, माय परपज आॅफ शेअरिंग इज डिफिटेड. सुझन टाॅक्ड अबाउट सम ब्लिडिंग इशुज (फ्रॅकिंग, पाईपलाइन्स, एन्वाॅर्नमेंट एटसेट्रा) नाॅट गेटिंग ॲड्रेस्ड बाय इदर कॅंडिडेट, डिएन्सी करप्शन, लिसनिंग टु योर कांशंस, सिरीया/लिबिया अनरेस्ट विच आर गोइंग टु इंपॅक्ट अवर फ्युचर ॲंड आॅल यु पिक्ड अप फ्राॅम दॅट क्लिप इज टायटल?..

I do not have problems about her picking up issues. She is saying I do not need to vote for a woman because I'm a woman. That does not apply to you for sure. You specifically shared that link for that sole purpose, hence my post. You will certainly deny this but you know that is truth. People are talking too, you see Wink

Pages