Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>You specifically shared
>>You specifically shared that link for that sole purpose, hence my post. You will certainly deny this but you know that is truth.<<
आर यु प्रो. एक्स आॅर रिडिंग टु मच बिटविन द लाइन्स?..
>>People are talking too, you see <<
आय कुडंट केर लेस, सिंस आयॅम नाॅट हियर टु चेंज योर (आॅर एनीबडी एल्सस फाॅर दॅट मॅटर) लाइन आॅफ थिंकिंग...
अगेन इफ यु फाइंड दि टायटल मोर कंपेलिंग दॅन द अंडरलाइंग इशुज, यु आर नाॅट दि इंटेंडेड आॅडियन्स...
मंडळी,
मंडळी, http://www.maayboli.com/node/60759 हे वाचाच ! लई धमाल हाय!
क्रिमिनल चार्जेस वर्दी नाहीये
क्रिमिनल चार्जेस वर्दी नाहीये म्हणे काँटेंट नवीन इमेल्स मधलं.
http://www.cnn.com/2016/11/06
http://www.cnn.com/2016/11/06/opinions/fareeds-take-on-trump/index.html
मी त्या नॅचरल न्यूज चा फॅन
मी त्या नॅचरल न्यूज चा फॅन झालोय गेले काही दिवस. हे नवीन
http://www.naturalnews.com/055906_illegal_aliens_voting_Obama_interview....
लॉलेस ओबामा. सही.
हे natural news आर्टिकल
हे natural news आर्टिकल म्हणजे आपला लिंब्या पोस्ट पाडतो तसे आहे एकदम. एकाच पोस्तीत नक्षली, ब्रिगेडी, लाल बावटे, काँगी असं सगळं कोंबून मनाला येईल तशी बोंब ठोकायची. लिंब्याचा गोरा अवतार दिसतोय लेखक
फार पूर्वी एक बिल क्लिंटन
फार पूर्वी एक बिल क्लिंटन नावाचा राष्ट्रपती होऊन गेला. >>> तेव्हा लोकांनी मूर्खपणा केला म्हणून पुन्हा करावा का? बिल बद्दल ही माहिती असती तर तो ही अपात्रच झाला असता.
मूर्खपणा नव्हे, बुश ओबामा नि क्रेझि पेरॉ या तिघांत क्लिंटन एकदम करिष्मा वाला माणूस आहे. अत्यंत हुषार असून वादविवादात तो पटाईत आहे, जसे ट्रंप "हुषार" आहे म्हणून त्याने टॅक्स बुडवले, दिवाळे काढून लोकांचे पैसे बुडवले (त्याने स्वतःच सांगितले - दिवाळे काढले पण मा़झा फायदाच झाला!) तसेच बिलने स्वतःवरचे आरोप परतवून लावले, शिवाय बारा वर्षे रिपब्लिकन राज्य झाल्यावर लोकांना जरा चेंज हवा होता.
बिलच्या वेळी, देशातील मध्यमवर्गाची परिस्थिती फारशी वाईट नव्हती, त्यामुळे त्याच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून तो एकॉनॉमी सुधारेल या मुद्द्यावर त्याला मते मिळाली. तो नेहेमी म्हणत असे It's economy stupid. ते पण लोकांना पटले. .
तसेहि त्याचे धंदे असले तरी बोलताना तो सावधपणे बोलतो. ट्रंपला ते जमत नाही, म्हणून लोक त्याच्यावर चिडतात. वास्तविक स्त्रिया पुरुषांना ओळखून आहेत, बिल काय, ट्रंप काय किंवा रस्त्यावरचा पुरुष काय, त्यांची बायकांकडे बघण्याची वृत्ति काय हे त्यांना कळते. फक्त जाहीरपणे तसे बोललेले कुणालाच आवडत नाही.
या वेळी मात्र परराष्ट्रात देशाचे वजन कमी, मध्यम वर्गीय, विशेषतः गोरे (जास्त शिक्षण नसलेले,) फारच जास्त आर्थिक अडचणीत आहेत. लष्कर कमजोर झाले आहे असे लोकांना पटवून देण्यात आले आहे. राजकारणातले सगळेच बदमाष, म्हणून पब्लिकला कुणितरी नवीन माणूस हवा आहे,
सर्वे गुणा: कांचनमाश्रयंते नि ट्रंप तर बढाईखोर, ट्रंपने त्यांना पटवले.
बाकी काहि नाही.
तसेहि त्याचे धंदे असले तरी
तसेहि त्याचे धंदे असले तरी बोलताना तो सावधपणे बोलतो. ट्रंपला ते जमत नाही, म्हणून लोक त्याच्यावर चिडतात. वास्तविक स्त्रिया पुरुषांना ओळखून आहेत, बिल काय, ट्रंप काय किंवा रस्त्यावरचा पुरुष काय, त्यांची बायकांकडे बघण्याची वृत्ति काय हे त्यांना कळते. फक्त जाहीरपणे तसे बोललेले कुणालाच आवडत नाही.>>>>>> धिस इज परफेक्ट! अगदी अगदी झालं वाचताना नन्द्या.
मला कुणाचीहि बाजू घ्यायची
मला कुणाचीहि बाजू घ्यायची नाहीये - ट्रंप किंवा हिलरी.
हिलरी नवीन काहीच करेल असे वाटत नाही. त्यातून तिची गर्विष्ठ वृत्ति नि निष्काळजी पणा. एव्हढी स्वतःला अनुभवी म्हणवते राजकारणात - तिला कळत नाही खाजगी इ-मेल साठी कुठे लॉग इन करायचे नि सरकारी कामासाठी कुठे? आज जरी तिच्या विरुद्ध काही सिद्ध झाले नाही तरी एकदा का गोपनीय माहिती रशिया, चीनने हॅक करून पळवली तर दोष कुणाचा? ते काही सगळे सांगत बसणार नाहीत जगाला. मला तर बेनगाझी प्रकरणाबद्दलहि दाट शंका आहे की तिच्या इ-मेल वाचूनच लोकांना कळले की अमेरिका एंबसीचे रक्षण करण्यासांबंधी तयार नाहीये. (गोंधळ चालला होता - कुणि काय करायचे, नि कुणाची जबाबदारी, नि बातमी खरी आहे का? इ. नि हिलरीच्या इ-मेल्स जर हॅक केल्या असतील तर त्यातून त्यांना कळले असेल, डायरेक्ट जरी नाही, तर त्यांच्याकडेहि हुषार लोक आहेत त्यातून अर्थ काढायला, कुणि सांगावे?) हे हिलरीबद्दल माझे मत.
ट्रंप ज्या बाता मारतो त्यातल्या किती तो करू शकेल या बद्दल दाट शंका आहे.
सध्या जरी रिपब्लिकन लोक केवळ हिलरी नको म्हणून ट्रंपच्या मागे असले तरी कित्येकजण उघड उघड त्याच्या विरुद्ध आहेत. ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाला तरी सिनेट, काँग्रेसमधले लोक तेच, तेच. एकदा निवडणुका संपल्या की त्यांना ट्रंप च्या विरुद्ध जाणे सहज शक्य आहे.
डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन यांचे राष्ट्राध्यक्ष झाले सिनेट काँग्रेस झाले, खूप हुषार माणसे त्यातहि होती तरी देशाची ही स्थिती,
. ट्रंप एव्हढ्या बाता मारतो की मी हुषार आहे, धंदे करून श्रीमंत झालो - किती धंदे बुडाले त्याचे? नि त्याच्या खेरीज इतरांनीहि धंदे करून पैसे कमावले - त्यांचे धंदे बुडले नाहीत, नि कित्येकांजवळ ट्रंपपेक्षा पटीने जास्त पैसे आहेत!
तेंव्हा उगीच गाढवाने सिंहाचे कातडे पांघरून स्वतःला सिंह म्हणावून घेऊ नये, नुसते इतरांना नावे ठेवून, नि मी हुषार असे म्हणून काही लोकांना मागे लावणे शक्य आहे पण इतर अनेक हुषार लोक आहेत जगात, त्यांना उगाच थापा मारल्या तर कळते!
बरोबर. अर्ली वेटिंग केलं नसेल
बरोबर. अर्ली वेटिंग केलं नसेल तर उद्या मत द्यायला विसरु/कंटाळा करु नका, मोट्ठी रांग असली तरी...
काहिही म्हणा. पण मजा आली.
काहिही म्हणा. पण मजा आली.
बेरकी आणि गुंड दिसणारे ट्रंप आणि खोट्या वाटणार्या क्लिंटन. अगदी कट्टर लोक सोडले तर बर्याच अमेरिकनांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली असणार. ४ वर्षांनी शेवटी अमेरिकनांवर "कुठे नेउन ठेवलीय अमेरिका" अस म्हणायची वेळ येउ नये म्हणजे मिळवली.
ट्रंप बॅंकरप्टसी - चॅप्टर ११>> हे महाशय फार अनुभवी आणि हरहुन्नरी आहेत हे कबूल करायलाच पाहिजे.
All the best Americans!
All the best Americans!
https://youtu.be/R6JaeNduyFY
https://youtu.be/R6JaeNduyFY
हे आधी आले असते तर शेंडे नक्षत्रांनी काय केले असते कोण जाणे
अस काय करतोय असामी, हे सगळ
अस काय करतोय असामी, हे सगळ ईमेल स्कॅन्डल व्हायच्या आधिच ,हिलरिने इराक युद्ध सपोर्ट करायच्याअ आधिच नाही का? आता ट्रन्म्प सपोर्टर ला कळलय ना कशी हिलरी पाताळयन्त्री, दुष्ट राजकारणी आहे.
USA is in labor. We will find
USA is in labor. We will find out tonight, if it is a boy or a girl!!
(No subject)
प्राजक्ता तसे नव्हे लोक बदलू
प्राजक्ता तसे नव्हे लोक बदलू शकतात हे दोन्ही बाजूंना लागू होते नाहि का ?
फेफे
हे बघाच! भारी मज्जा
हे बघाच! भारी मज्जा आहे!
https://www.youtube.com/watch?v=WrfxnAV6Pzk
LOL
LOL
प्राजक्ता तसे नव्हे लोक बदलू
प्राजक्ता तसे नव्हे लोक बदलू शकतात हे दोन्ही बाजूंना लागू होते नाहि का ?>> व्हय जी! उपरोधिक लिहलय मी ते, ट्रन्म्पचे सपोर्टर त्याचे व्ह्डियो बाहेर येत होते तेव्हा गपगुमान , हिलरीच्या मेल ची नुसती चौकशी केली तरी धाडधाड तोफा चालु..
असो दगडापेक्षा वीट मौ म्हणून मी वोट करुन आलेय.
कदाचित इथे कोणीतरी हे मुद्दे
कदाचित इथे कोणीतरी हे मुद्दे मांडले असतील..मी सगळा बीबी वाचला नाही.
अमेरिकेत बहुतेक वेळा ८ ते १२ वर्षे एकाच पक्षाचा अध्यक्ष सत्तेवर निवडुन आल्यावर लोक दुसर्या पक्षाला निवडुन आणतात. अमेरिकेत फक्त २ च पक्ष असल्यामुळे लोकांना २ च चॉइस असतात्..डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन.. पण पुष्कळ वेळा लोकांना दोन्ही पक्षाचे उमेदवार आवडत नसले तरी तिसरा पर्याय नसल्यामुळे ..त्यातल्या त्यात जो कोणी त्यांच्या वैयक्तिक मतसारणीला जवळचा असेल त्याला ते मत देतात (उदा. अबॉर्शन विरुद्ध प्रो चॉइस, स्मॉल गव्हर्न्मेंट विरुद्ध बिग, क्रिएशन विरुद्ध इव्होल्युशन, सोशल लिबरलिझम विरुद्ध सोशल कन्झरव्हिझम)
पण पुष्कळ वेळी असेही होते की जनता दोन्ही पक्षाला, त्यांच्या करप्शनला,त्यांच्या कारभाराला, त्यांच्या धोरणांना कंटाळली असते पण तिसरा कोणी व्हायबल पर्याय नसल्यामुळे त्यांची पंचाइत होते..मग जर कोणी स्वतःला आउट्साइडर किंवा इंडिपेंडंट उमेदवार म्हणुन लोकांना पटवुन दिले तर बरीचशी लोक त्या उमेदवाराला मत देतात.. उदा. रॉस परो.
अमेरिकेतल्या बर्याच लोकांना कळुन चुकले आहे की दोन्ही पक्ष वॉशिंग्टन मधल्या सत्तेने एवढी माजले व करप्ट झाले आहेत. वॉशिंग्टन मधे काँग्रेसमन, सेनेटर किंवा अध्यक्ष निवडुन येणे म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मिळाल्या सारखे असते हेही लोकांनाही( पुश्कळश्या) कळुन चुकले आहे.वर्षानुवर्षे या पॉलिटिशियन्सनी लॉबीस्ट व मोठमोठ्या कंपनीज( सगळ्या सेक्टरमधल्या) नी पुरवलेल्या पैशाच्या जोरावर एक घडी बसवुन ठेवली आहे.. ती घडी बिघडवु नये म्हणुन दोन्ही पक्ष जिवापाड प्रयत्न करत असतात.
मग कोणी रॉस परो किंवा डॉनाल्ड ट्रंप सारखा स्वत्:ला आउट्साइडर म्हणवणारा उमेदवार आला की बर्याच लोकांना त्याच्याबद्दल आस्था वाटते व ते अपेक्षा करु लागतात की हा उमेदवार तरी वॉशिंग्टन मधली बनी बनायी घडी मोडुन काहीतरी नविन बदल घडवुन आणेल . पण मग दोन्ही पक्ष अश्या उमेदवाराला घबरतात व कोणत्याही रितीने तो निवडुन येउ नये याची खबरदारी घेतात.
अन्फॉर्चुनेटली यंदा डॉनाल्ड ट्रंप सारखा स्वतःला आउट्साइडर म्हणवणारा उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवडुन आला आहे की जो इतका अन्प्रेडिक्टेबल ( अँड विथ लॉट ऑफ बॅगेज अँड ईश्युज) आहे की खुद्द मेन स्ट्रिम रिपब्लिकन पक्षाचेही धाबे दणाणले आहे की जर हा बाबा निवडुन आला व तो जे म्हणत आहे तसे त्याने वॉशिंग्टनचे पॉलिटिक्स बदलुन टाकले तर त्यांची सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मरेल की काय! ( व्हिच आय हायली डाउट ही कॅन डु दॅट सिंगल हँडेडली.. ड्यु टु चेक अँड बॅलंसेस इन अमेरिकन पॉलिटिक्स).. तसेच त्याच्या "लॉकर रुम टॉक " मुळे भल्याभल्या रिपब्लिकन्सची त्याला सपोर्ट करायचा की नाही याबाबतीत पंचाइत झाली आहे..म्हणुन खुद्द मेन स्ट्रिम रिपब्लिकन पार्टीची मोठ्या पदावरची माणसे स्वत्;ची सिट सांभाळण्यसाठी स्वतःला डॉनाल्ड ट्रंप पासुन दुर ठेवत आहेत व विरोधही करत आहेत.(पण बर्याचश्या संधी साधु रिपब्लिकन्सनी त्याबाबतीतही पुर्ण १८० डिग्री केले आहे..जेव्हा त्यांना कळले की आम रिपब्लिकन ट्रंप सपोर्टर्स अजुनही त्याच्या लॉकर रूम टॉक व १०-१२ बायकांच्या आरोपानंतरही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत!)
एवढे इश्युज व बॅगेज असुनही ट्रंप एवढा कंपॅटीटीव्ह का? त्याला बरीच कारणे आहेत्..
एक म्हणजे ट्रंप अश्या बाता करतो की ज्यामुळे अमेरिकेतल्या बर्याच लोकांना तो जवळचा वाटतो( डिस्पाइट हिज बॅगेज्!)..एक म्हणजे अँटाय इमिग्रंट्..खासकरुन अँटाय हिस्पॅनिक व अँटाय मुस्लिम रेह्टोरिक.. जे अमेरिकेत ओपनली बोलायला सगळेच कचरतात..ड्यु टु पॉलिटिकल करेक्ट्नेस..पण कोव्हर्टली अशी बरीच माणसे आहेत की दे लाइक व्हॉट ट्रंप इस सेइंग ओपनली.
दुसरी गोष्ट म्हणजे आउट्सोर्सिंग ऑफ जॉब्स.. खासकरुन मिशिगन मधले ऑटो वर्कस, ओहायो व पेन्सिल्व्हानियामधले कोल माइन वर्कर्स.. ज्यांचे जिवन गेल्या ३०-४० वर्षात उध्वस्त झाले आहे.. त्यांच्या कांनाना ट्रंपच्या (जॉब्स मेक्सिकोमधुन परत अमेरिकेत आणण्याच्या) बाता खुप गोड वाटतात. फोर देम ही इज लाइक अ मसाया!
तिसरी गोष्ट..डाय हार्ड रिपब्लिकन्स.. अशी लोक की रिपब्लिकन पार्टीने दगड जरी त्यांचा उमेदवार म्हणुन उभा केला तरी डोळे झाकुन ती लोक त्याला टिळा लावुन येतील! ( अर्थात दोन्ही पक्षात अशी दगडाला सुद्धा टिळा लावणारी माणसे आहेत!)
चौथी गोष्ट म्हणजे अशीही काही भाबडी आशा ठेवणारी माणसे आहेत की ज्यांना खरच वाटते की ट्रंप हा करिअर पॉलिटिशिअन नसल्यामुळे तो जर निवडुन आला तर तो वॉशिंग्टन मधले करप्ट पॉलिटिक्स जादुची कांडी फिरवल्यासारखे..पटकन नाहीसे करणार आहे.
पाचवी गोष्ट..अमेरिकेत अजुनही काही बुरसट विचाराची माणसे( आणी काही बायकासुद्धा!) आहेत की ज्यांना हे पटत नाही की एक बाइ अमेरिकेचे अध्यक्षपद पेलवु शकेल.. व निव्वळ त्या कारणासाठी ते ट्रंपला मत देतील... आतापर्यंतच्या २४० वर्षाच्या अमेरिकेच्या इतिहासात म्हणुन अजुन एकही स्त्री अध्यक्ष म्हणुन आपल्याला दिसली नाही..
सहावी गोष्ट.. विकी लिक व रशियन हॅकर्स मुळे क्लिंटन कंपुतल्या सगळ्यांच्या प्रायव्हेट इ मेल्स चव्हाट्यावर आल्या आहेत.. याच्या आधी असे प्रायव्हेट इ मेल्स चव्हाट्यावर कधीच आले नव्हते त्यामुळे सगळ्यांना आता बर्याच खाजगी गोष्टी वाचायला मिळाल्या आहेत ( अमेरिकेतल्या किती जणानी त्या इ मेल्स प्रत्यक्ष वाचल्या आहेत ते देव जाणे..पण मिडिया मधुन ज्या गोष्टी लोकांना समजत आहेत त्यावरुन हिलरी क्लिंटनबद्दलचे ज्यांचे मत आधीपासुन कलुषित आहे त्यांचा तिच्याबद्दलचा द्वेष नक्कीच द्विगुणित होण्यास हातभार लागला व त्यामुळे त्यांचे मत ट्रंपकडे झुकण्यात मदत झाली)
सातवी गोष्ट.. हिलरी क्लिंटनसारख्या अनुभवी पॉलिटिशियननी.. सेक्रेटरी ऑफ स्टेट असताना प्रायव्हेट इ मेल सर्व्हर वापरण्याचा गलथानपणा करुन ( जरी एफ बी आय चिफने तिच्यावर क्रिमिनल आरोप केला नसला तरी) ट्रंपला व तिच्या विरोधकांना तिच्यावर ट्रिझनचे आरोप करायला व तिचा तिरस्कार करायला मोट्ठे खाद्य दिले.
आठवी गोष्ट.. क्लिंटन फाउंडेशनने सौदी अरेबिया, कतार वगैरे सारख्या देशांकडुन अमाप पैसा स्विकारला अहे की ज्या देशांचा महिलांबद्दलचा व टेरारिस्ट ऑर्गनायझेशन्सना मदत करण्याबद्दलचा रेकॉर्ड वाइट आहे व त्याच फाउंडेशनमधुन पैसे घेउन हीलरी व बिल क्लिंटनने ,चेल्सि क्लिंटनच्या लग्नाचा ४-५ मिलिअन डॉलर्सचा खर्च केला असे उघडकीस आले आहे..त्यामुळे हिलरी करप्ट आहे हे ट्रंप सपोर्टरचे चे मत अजुनच पक्के होण्यास मदत झाली.
अजुनही काही कारणे असतील.. जाणुन घ्यायला आवडेल.
एक मात्र नवल.. जे काही ट्रंप लॉकर रुमच्या नावाखाली बोलला.. तेच जर अमेरिकेत कोणत्याही जॉबला अप्लाय करणारा उमेदवार बोलला तर तश्या उमेदवारला अमेरिकेतली( किंवा जगातली!) कुठलीही कंपनी ईंटर्व्ह्यु तर सोडाच ..पण दारातही उभा करेल काय? पण इथे तर ट्रंप इज अप्लाइंग फॉर द हायस्ट जॉब इन द कंट्री! माझ्या बरोबर काम करणार्या काही बायका..ज्या ट्रंपला सपोर्ट करतात ..त्या म्हणतात्..आम्ही काही त्याला नवरा म्हणुन निवडत नाही आहे..काय झाल तो अस बोलला व करत असेल तर? बाकीच्या कितीतरी गोष्टी तो चांगल्या बोलतो!..फॉर एक्झँपल.. ही सेज्... ही इज गोइंग टु मेक अमेरिका ग्रेट अगेन!..
तळ्टीपः माझा इथे कोणत्याही पक्षाचा अपमान किंवा प्रचार करण्याचा उद्देश नाही.
बाकीच्या कितीतरी गोष्टी तो
बाकीच्या कितीतरी गोष्टी तो चांगल्या बोलतो! ही सेज्... ही इज गोइंग टु मेक अमेरिका ग्रेट अगेन!..>>>
बाकीच्या कोणत्या चांगल्या गोष्टी बोलतो तो? लेट मी काउंट... ओह, नॉट इव्हन वन!
>>तेच जर अमेरिकेत कोणत्याही
>>तेच जर अमेरिकेत कोणत्याही जॉबला अप्लाय करणारा उमेदवार बोलला तर तश्या उमेदवारला अमेरिकेतली( किंवा जगातली!) कुठलीही कंपनी ईंटर्व्ह्यु तर सोडाच ..पण दारातही उभा करेल काय? <<
ट्रंपच्या वागण्याचं अजिबात समर्थन नाहि; पण मुकुंद, हि "अमेरिका" आहे. गोरे लोक सोड, इन्फोसीसचा फणीश मुर्ती लक्शात आहे? त्या पठ्ठ्याला सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या चार्जेसमुळे इनफोसीस मधुन काढल्यावर तो आयगेट्स मध्ये गेला आणि त्याने तिथेहि दिवे लावले. गोर्या लोकांची ऊदाहरणं दिली तर इथे कित्येकांना विरक्ती येईल...
मुकुंद. चांगले विवेचन. गोर्या
मुकुंद. चांगले विवेचन.
गोर्या लोकांची ऊदाहरणं दिली तर इथे कित्येकांना विरक्ती येईल...
हे कळले नाही. विरक्ति का? काय अर्थ आहे?
रनिंग काँमेट्री का नाही ये?
रनिंग काँमेट्री का नाही ये? मजा आली असती.
फ्लोरिडा अन नॉर्थ कॅरोलायना मजा आणणार. काय होणार?
फ्लोरिडा स्विन्ग होतोय सारखा
फ्लोरिडा स्विन्ग होतोय सारखा अगदी नेक टु नेक
हिलरी-- ८ स्टेट ट्रम्प--६
हिलरी-- ८ स्टेट
ट्रम्प--६ स्टेट
exit poll
फ्लोरिडा पंचाइत करणार
फ्लोरिडा पंचाइत करणार
ट्रंप इज डुइंग रिमार्केबली
ट्रंप इज डुइंग रिमार्केबली वेल इन बॅटलग्राउंड स्टेट्स ॲंड ॲट धिस पाॅइंट, हि हॅज मल्टिपल पॅथ्स टु हिट २७०. इफ हि मेंटेंस द लिड इन फ्लोरीडा, नाॅर्थ केरलायना, पेनसिल्वेनिया, व्हर्जिनिया ॲंड विन्स दिज ४ स्टेट्स, गेम इज ओवर...
व्हर्जिनिआ सेव्ड!
व्हर्जिनिआ सेव्ड!
Pages