Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला समजले नाही काय लॉजिक आहे.
मला समजले नाही काय लॉजिक आहे. मग 'नॅचरल न्यूज' मधे एक राजकीय धडाकेबाज आरोप आहे (खरे म्हणजे अनेक आहेत) , तो शहानिशा न करता डायरेक्ट खराच मानावा काय? तुम्ही एक लिन्क दिली आहे, ती लिन्क व ती साइट मला विश्वासार्ह वाटत नाही इतकेच मी म्हणतोय. इतर कोठेतरी काही माहिती असेल तर ती बघून ठरवता येइल.
http://www.thedailybeast.com/
>>तो शहानिशा न करता डायरेक्ट
>>तो शहानिशा न करता डायरेक्ट खराच मानावा काय? <<
अच्छा, तर मग शहानिशा न करता बेधडक तो खोटा मानावा किंवा त्याच्या विश्वासार्हतेवर शंका घ्यावी हा सध्याचा नाॅर्म आहे का? बर्र...
शंका त्या साइटच्या
शंका त्या साइटच्या विश्वासार्हतेबद्दल घेतली. कसलाही राजकीय संबंध नसलेल्या साइटवर अचाट वाक्ये दिसली की ती तुम्ही बाय डीफॉल्ट खरी मानता का?
बरं बरं, बातमीच्या
बरं बरं, बातमीच्या विश्वासार्हतेवरुन आता साईटच्या विश्वासार्हतेवर उडी मारली का. ठिक आहे, तुमची "गिरे तो भी टांगे उपर" या अवस्थेकडे वाटचाल चाललेली आहेच तेंव्हा मी थोडावेळ बाजुला होतो...
समांथा बी रशियन ट्रोल्स ना
समांथा बी रशियन ट्रोल्स ना भेटते: https://www.youtube.com/watch?v=OauLuWXD_RI
फा, बर्याच पोस्टींना
फा, बर्याच पोस्टींना अनुमोदन. अजून इमेल्स मध्ये नक्की काय आहे ते जाहिर व्हायच्या आत शेंडेनक्षत्रं अँड कंपनीच्या कॉन्स्पिरसी थियरीजना उधाण आलं.
बाकी, ती साईट विश्वासार्ह नाही वाटली तरी ती बातमी इतर ठिकाणी पण वाचायला मिळाली आहे.
http://www.dailymail.co.uk/news/article-3886942/Resignation-letters-pili...
बाकी मला स्वतःला सुद्धा हिलरीला लोकं करप्ट का समजतात हे नेमकं जाणून घ्यायचं आहे. आपण खरं कॉन्स्पिरसी थियरीज म्हणतो पण पबलिक मध्ये सहसा एखादं ओवरव्हेल्मिंग सेंटिमेंट असतं आणि ते कधी कधी टोटली चुकीचं नसतं. तो धूर यायला कुठेतरी आत जाळ असतो. ह्याचं उदाहरण म्हणून छोटी गंमत सांगतो. मी साधारण ९ वर्षांपुर्वी एका लहान कंपनीत नोकरी करायचो. तिथल्या एका छोट्या किचनेट मध्ये कॉफी मशीन, टिव्ही वगैरे होता. तिथे लोकं दुपारी लंच करायला बसत टिव्ही बघता बघता. एकदा तिथे टिव्हीवर बिल कॉस्बीची मुलाखत चालली होती. मी आणि इतर काही लोकं पाहत होते. त्यातला एक माणूस कॉस्बि इज फुल ऑफ शिट म्हणून असच उठून निघून गेला, इतर लोकांनी सुद्धा माना हलवून एकंदरित मान्यताच दिली त्या स्टेटमेंटला. मला तसं आश्चर्य वाटलं कारण मला तो फक्त एक अत्यंत पॉयुलर टिव्हि स्टार म्हणून माहित होतं. नंतर त्या उठून गेलेल्या माणसाला मी एक दिवशी सहज विचारलं त्या विषयी तर त्यानी मला सांगितलं की तो बायकांना सेक्शुअली हरॅस करतो हे वेल नोन आहे. त्यावेळी मला ती टोटली कॉन्स्पिरसी थियरी वाटली होती. फास्ट फॉर्वड ८ वर्ष आणि कॉस्बीच्या सगळी काळी कृत्य आता ऑफिशियल होऊ बघत आहेत.
बरं बरं, बातमीच्या
बरं बरं, बातमीच्या विश्वासार्हतेवरुन आता साईटच्या विश्वासार्हतेवर उडी मारली का. ठिक आहे, तुमची "गिरे तो भी टांगे उपर" या अवस्थेकडे वाटचाल चाललेली आहेच तेंव्हा मी थोडावेळ बाजुला होतो... >>> आँ? कधी उडी मारली?
माझी सर्वात पहिली कॉमेन्ट पाहा त्या पोस्टवरची:
"भयंकर विश्वासार्ह साइट दिसतेय ती. ".
पहिल्यापासून मी साइटबद्दलच बोलतोय. साइट विश्वासार्ह नसल्याने इतर कोठून माहिती मिळाल्याशिवाय असले अचाट आरोप खरे कसे मानायचे हा साधा मुद्दा आहे. जगभर वापरला जातो. आरोप कोणी केला आहे, त्यांचा सोर्स काय आहे याचा विचार केला जातो तो आरोप डायरेक्ट खरा मानायच्या आधी.
>> आरोप कोणी केला आहे,
>> आरोप कोणी केला आहे, त्यांचा सोर्स काय आहे याचा विचार केला जातो तो आरोप डायरेक्ट खरा मानायच्या आधी.
ट्रम्प सुद्धा करतो. सगळ्या बायका ज्या पुढे आल्या सेक्श्युअल हॅरॅसमेन्ट चा आरोप करायला त्यांनां क्षणिक फेम/प्रसिद्धी हवी आहे त्यांच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही असं तो म्हणतो
खरे तर दोन्ही उमेदवारांत अनेक
खरे तर दोन्ही उमेदवारांत अनेक दोष.
Polarization on the basis of party is so strong as never before.
पॉलिसी, इशूज वगैरे सगळे पक्षाने ठरवले आहे, त्यात व्यक्तीचा प्रश्नच येत नाही. डेमोक्रॅट्स पॉलिसीज सर्वांना माहित आहेत नि रिपब्लिकन्स च्या पण. त्यामुळे त्याबद्दल बोलायची गरज नाही. नि लोकांनी आधीच ठरवले आहे की कोणत्या पॉलिसीज आपल्याला पाहिजेत. मग काही लोक काय वाट्टेल ते झाले तरी हिलरीला मत देणार नि काही ट्रंपला, त्या पक्षाला मत द्यायचे, उमेदवार कसा का असेना.
मग उमेदवारांनी काय करायचे? ज्यांनी ठरवले नाही की कुठला पक्ष हवा, अश्या लोकांना काय सांगायचे?
तर उमेदवार वैयक्तिक पणे किती चांगला आहे नि किती वाईट.
जो खरे खोटे उलटे सुलटे, सभ्य अश्लील काहीहि बोलून लोकांना स्वतःकडे वळवून घेईल तो/ती जिंकला/ली.
मग त्याच्याबद्दल कुणि काही म्हणो, ते खरे असो वा नसो. त्यात मग सोर्स खरा आहे का? पुरावा आहे का, वगैरे प्रश्न गौण.
खरे तर दोन्ही उमेदवारांत अनेक
खरे तर दोन्ही उमेदवारांत अनेक दोष. >> हो फक्त मतदाराने त्यातले कोणते दोष आपल्या सद्सद्विवेकबुद्धिला खटकतात हे ठरवयाचेय. कोणाला पैसेखोरी खटकतेय तर कोणाला बाईलवेडेपणा.
== अजून इमेल्स मध्ये नक्की
== अजून इमेल्स मध्ये नक्की काय आहे ते जाहिर व्हायच्या आत शेंडेनक्षत्रं अँड कंपनीच्या कॉन्स्पिरसी थियरीजना उधाण आलं
==
आपल्या कल्पनाशक्तीला उधाण आलेले दिसतंय! कुठली कॉन्स्पिरसी थियरी मांडली मी?
काही महिन्यापूर्वी हुमाबाईने शपथेवर एफ बी आयला सांगितले की मी सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे ज्यावर इमेल होत्या ती तुमच्या स्वाधीन केली आहेत. मग हा लॅपटॉप का वगळला? ही शपथेवर दिलेली खोटी जबानी नाही का (पर्ज्युरी)? निदान सकृतदर्शनी तरी तसेच दिसते आहे. हिलरीचा बेपर्वापणा, निष्काळजीपणा हा तिच्या सहकार्यातही दिसतो आहे असे वरकरणी दिसत आहे. कामाच्या इमेल ह्या सुरक्षित ठेवायची अक्कल नाही. लिंगपिसाट वीनरच्या कंप्युटरवर हिलरीच्या इमेल्स का ठेवल्या गेल्या?
जो एफ बी आय डायरेक्टर काही दिवसापूर्वीच घाईघाईने हिलरीला निर्दोष ठरवून मोकळा झाला तो अचानक हिलरीद्वेषाने आंधळा होऊन तिच्याविरुद्ध पक्षपाती वागू लागला की सकृतदर्शनी पुरेसा प्रबळ पुरावा मिळाल्यामुळे त्याने हिलरीविरुद्धचा तपास पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली? मला तरी दुसरी शक्यता जास्त वाटते. ह्याला कॉन्स्पिरसी थियरी म्हणत असाल तर जरूर म्हणा.
हिलरीचा भ्रष्टाचार. राजकारणात मुरलेली असल्यामुळे पळवाटा वापरुन भ्रष्टाचार करण्यात ती वाकबगार आहे. गोल्डमन सॅक्स जेव्हा एका तासाच्या भाषणाचे सहा लाख डॉलर देते तेव्हा ते भाषणावर खूश झाले म्हणून नाही. ती लाच असते. भाषणाचा मोबदला असल्याचे दाखवून एक पळवाट काढली आहे. त्याच्या बदल्यात हिलरी गोसॅक्सच्या आवडीच्या कायद्यांना समर्थन देणार.
हेती ह्या देशात भयंकर भूकंप झाला तेव्हा क्लिंटन फाऊंडेशनने मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला. लक्षावधी डॉलर जमले पण ते हेतीत पोचलेच नाहीत असा आरोप आहे. हेतीच्या अनेक संघटनांनी ह्याविरुद्ध बोंबाबोंब केली पण काही नाही.
त्यांच्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे इतके दिवस हिलरीला रान मोकळे होते. लोरेटा लिन्चसारख्या बाईच्या वागण्यावरुन हे सरळ दिसते आहे की सरकारला हिलरीविरुद्ध कारवाई करण्यात काहीही रस नाही. त्याचा फायदा हिलरीने पुरेपूर घेतला आहे.
परवाच्या घोषणेचा अपवाद वगळता हिलरीवर काही कारवाई झालेली नाही.
एकंदरीतच, अमेरिकेतली ही
एकंदरीतच, अमेरिकेतली ही निवडणूक म्हणजे ' which lunatic should run the asylum ' आहे, असं कुणी तरी म्हटलंय, त्यांत बरंच तथ्य असावं !!
हाय सॉरी इट इस रिअली नॉट माय
हाय सॉरी इट इस रिअली नॉट माय इश्यू पण हे खूप प्राइसलेस विनोदी आहे.
६५० मिलिअन दर आ ठवड्यात अमेरिकेत येणार जर हिलरी निवडून आली तर असे म्हटले ट्रंप साहेब.
आय अॅम लाफिन्ग सो हार्ड. हा निवडून आला तर टॅक्स फ्री करमणूक ची खात्रीच.
http://www.ndtv.com/world-news/donald-trump-implies-us-population-will-o...
त्यांच्याच पक्षाचे सरकार
त्यांच्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे इतके दिवस हिलरीला रान मोकळे होते. >> हे बरोबर आहे, हाऊसमधे मेजॉरिटी असलेले रिपब्लिकन्स पण हिलरीच्याच बाजूने होते. अहो एव्हढेच काय तुमचा आवडता ट्रंपसुद्धा दहा वर्षांपूर्वी हिलरीछ्याच बाजूने होता. तुमची नक्की खात्री आहे ना कि तो बदललाय ? काय आहे सगळे राजकारणी चोर असतात असे तुम्ही कुठेतरी म्हटलय म्हणून विचारतो.
==त्यांच्याच पक्षाचे सरकार
==त्यांच्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे इतके दिवस हिलरीला रान मोकळे होते. >> हे बरोबर आहे,
सरकार म्हणजे वैधानिक वा न्यायव्यवस्था बघणारे नाही तर कार्यकारी शाखा अर्थात एक्जिक्युटिव्ह ब्रान्च असे अभिप्रेत आहे. ओबामाच्या नेतृत्त्वाखाली जे सरकार चालते आहे ते हिलरीच्या ताटाखालचे मांजर आहे. बेनगाझी प्रकरण असो वा इमेल्ची बेजबाबदार हाताळणी असो. ओबामाने हिलरीला कायम पाठिशी घातले आहे हे स्वच्छ सत्य आहे.
(ओबामाने सरकार स्थापन करताना पारदर्शकतेचे वचन दिलेले होते ते पूर्ण खोटे होते हे आता स्पष्ट झाले आहे.)
एफ बी आयमधे अंतर्गत बंडाळी होऊ नये म्हणून असेल किंवा अन्य कारणाने असेल कोमीने गेल्या शुक्रवारी केलेली घोषणा ही एकमात्र आहे जी हिलरीच्या विरुद्ध जाताना दिसत आहे. पण त्यामागे ओबामा असेल असे वाटत नाही. जोवर खरे कारण कळत नाही तोवर आपण आपल्या परीने अंदाज व्यक्त करायचा.
जर विकृत वीनरने सेक्स्टिंग करायला आपल्याच राज्यातील षोडशवर्षा निवडली असती तर हे प्रकरण एफ बी आयकडे गेले नसते. पण त्याला "दुर्बुद्धी" झाली आणि त्याने आपली निवड दुसर्या राज्यात केली त्यामुळे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गेले!
असे ऐकिवात आहे की निवडणूकीतील विजय साजरा करण्याकरता हडसन नदीवर जंगी दारुकाम करण्याचे हिलरीने योजले आहे. तशा योजना उघडकीस आल्या आहेत. हा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे!
खरे कारण कळत नाही तोवर आपण
खरे कारण कळत नाही तोवर आपण आपल्या परीने अंदाज व्यक्त करायचा.
हे बरोबर आहे. ज्यांना खरे कारण माहित आहे ते सांगत नाहीत, कारण ते ट्रंप किंवा हिलरीचे लोक आहेत.
तेंव्हा आपण आपले अंदाज उडवायचे हवेत, ट्रंप अण्वस्त्रे वापरेल. मेक्सिकनांवर अन्याय करेल, तो पुटिनचा भावला आहे वगैरे.
हिलरी करप्ट आहे, खोटे बोलते वगैरे.
नुसते अंदाज हो. खरे काय ते माहित नाही.
बरं आता बरेच वाद झाले.
बरं आता बरेच वाद झाले. शेंडेनक्षत्र व राज - तुम्ही इथले अनकॉप्रोमायझिंग ट्रम्प सपोर्टर्स आहात. तर तुमच्या कल्पनेतील ट्रम्प प्रेसिडेन्सी (हो हा शब्द हॅलोवीन च्या दिवशीच लिहायला हवा होता
) कशी असेल ते लिहा जमले तर 
इतरांकरता:
हिलरी प्रेसिडेन्सी म्हणजे ओबामाचीच अजून चार किंवा आठ वर्षे, कदाचित जास्त अॅग्रेसिव्ह आंतरराष्ट्रीय गोष्टींत, कदाचित युद्धाच्या बाबतीत थोडी आक्रमक, पण यापेक्षा काही वेगळे असेल का?
अध्यक्ष कोण होईल याप्रमाणे खालील प्रशिक्षण कोर्सेस व्हाइट हाउस मधे राबवायला हवेत, ८ नोव्हेंबर ते १९ जानेवारी.
ट्रम्पः सरकार कसे चालते. तसेच तो हुकूमशहा नसणार आहे या धक्क्यातून बाहेर येण्याकरता काउन्सेलिंग.
हिलरी: इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन कसे हाताळावे.

https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=YibDgSd02Xk
हे आवडलेलं आहे
ट्रंप प्रेसिडेंसी पेक्शा एक
ट्रंप प्रेसिडेंसी पेक्शा एक रिपब्लिकन व्हाहा मध्ये येणे हे माझ्यासाठि महत्वाचं आहे.
मिनिमल रेग्युलेशन्स, थिन गवर्नमेंट, क्रिएटिंग कंड्युसिव एन्वाॅर्नमेंट फाॅर बिझ वेंचर्स, लो टॅक्सेशन, स्ट्राॅंग मिलीटरी इ. बाबी रिपब्लिकन्सच्या अजेंडावर कायम असतात. ॲंड ट्रंप हॅज अलाइन्ड हिज विजन विथ दि रिपब्लिकन अजेंडा, सो आयॅम गुड विथ दॅट...
ॲंड ट्रंप हॅज अलाइन्ड हिज
ॲंड ट्रंप हॅज अलाइन्ड हिज विजन विथ दि रिपब्लिकन अजेंडा, >> अहो पण त्याच्या बाकीच्या व्हिजनचे काय ? झापड लावून बसणार का तेंव्हा ?
लो टॅक्सेशन>>> पब्लिक
लो टॅक्सेशन>>> पब्लिक स्कूल्स, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, शिक्षकांचा पगार, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, रस्ते, कचरा
उचलणार्या गाड्या, पाण्याची व्यवस्था इत्यादी फालतू गोष्टींची वाट लागली तरी चालेल. टॅक्सेस कमी पाहिजेत.
स्ट्राॅंग मिलीटरी >> म्हणजे दुसर्या देशांत जाऊन युद्ध करायची, इथली तरूण पोरं तिकडे पाठवायची, भिती निर्माण करून दुसर्या देशांना शस्त्र विकायची. मरेनात का तिकडे ती लोकं. आपल्याला पैसे मिळालेत ना? मग झालं तर.
बायकांचे बेसीक हक्क वगैरे अतिफालतू गोष्टींकडे लक्ष द्यायची काय गरज आहे? तशीही त्यांना काही किंमत नसतेच.
आणि गन कंट्रोल... कशाला हवाय? अगदी एलीमेंट्री शाळेतही गन्स ठेवायला पाहिजेत. शिक्षकांना डिग्रीच्या आधी बंदुका चालवता येण्याचा परवाना कंपल्सरी करायला हवा.
जगात धर्म महत्वाचा आहे, तो आम्ही हवा तसा वाकवणार, चर्चला मधे आणून लोकांना भावनिकरीत्या एक्सप्लॉयट करणार.
अॅंड द लिस्ट गोज ऑन...
लो टॅक्सेशन>>> कॅन्सास
लो टॅक्सेशन>>> कॅन्सास मध्ये करून झालाय प्रयोग. आणि फसलाय सुद्धा ! शेवटी लेजिस्लेटर्स ना गव्हर्नर च्या विरोधात जाऊन टॅक्स वाढवायला लागले कारण जॉब्ज तर काही आले नाहीत पण सरकारी तिजोरी आटली. मग शाळा बंद करायची वेळ आली. मग गप गुमान टॅक्स वाढवले परत.
क्रिएटिंग कंड्युसिव एन्वाॅर्नमेंट फाॅर बिझ वेंचर्स >> बरेच बिझनेसेस आणि चेंबर्स यांना हे पटलेले आहे की नुसते टॅक्स कमी करून काही होणार नाही. उलट जिथे टॅक्स जास्ती आहेत पण सरकार बरोबर सेवा पुरवतय (शाळा, रस्ते, पाणी वगैरे) तिथे उद्दोगधंद्यांची भरभराट होतेय. बरेच ठिकाणी चेंबर्स मॉडरेट्स ना पाठिंबा देतय की जे टॅक्स वाढवायच्या गोष्टी करत आहेत.
टॅक्स ही वाईट गोष्ट आहे हे गृहीतक किती फोल आहे ते बर्याच उदाहरणांतून स्पष्ट झालेले आहे. पण उलट लॉजिकचा भडीमार झाल्याने कोणाला खरे काय आहे ते ऐकून घ्यायची इच्छा नाही.
मिनिमल रेग्युलेशन्स >> म्हणजे सगळी अमेरिका वाईल्ड वेस्ट करा असे का ? जिसकी लाठी उसकी भैंस असे पहिजे आहे असे वाटते. कारखाने अमाप वाढू द्यात, त्यांच्या सांडपाण्याने नद्या - तलावांचे गटार होऊ द्या मग आपण दुप्पट - तिप्पट किंमत देऊन इतर कारखान्यांमध्ये शुद्ध केलेले पाणी पिऊ. अमाप शिकार करू आणि जे राहिलेले आहेत ते पशु-पक्षी पण मारून टाकू. अजून काय काढायचे राहिले ?
रिपब्लिकन्स वाईट नाहीत. पण जे एक्स्ट्रिम जातात ते वाईट आहेत. मी मागे पण लिहिले आहे की कॉमन ग्राऊंड शोधणार्या राजकारण्यांची गरज आहे. दोन्हीकडचे जे चांगले आहे ते घेऊन पुढे जाणार्या. नुसतेच भडकाऊ गोष्टी बोलून तापल्या तव्यावर पोळी भाजून जनतेचे नुकसान करणार्यांची गरज नाही.
>> रिपब्लिकन्स वाईट नाहीत
>> रिपब्लिकन्स वाईट नाहीत
हो, पण रिप्स्ब्लिकन विचार वाईट आहेत?
>> थिन गव्हर्नमेन्ट
स्त्रीयांनीं, एल्जीबिटींनीं मात्र काय करावं आणि काय नाही हाच काय तो थिनपणा?
"लो टॅक्सेशन>>> कॅन्सास मध्ये
"लो टॅक्सेशन>>> कॅन्सास मध्ये करून झालाय प्रयोग. आणि फसलाय सुद्धा !" - लूईझियाना मधे सुद्धा जबरदस्त फसला. ईतका की ते राज्य दिवाळखोरी च्या तोंडावर आलं. ईतक्या कट्टर रिपब्लिक राज्यात डेमोक्रॅटीक गव्हर्नर आला. There is a fine line between audacity and stupidity.
सो ट्रम्प हवा असे नाही तर
सो ट्रम्प हवा असे नाही तर रिप्लब्लिकन सरकार हवे म्हणून ट्रम्प ला सपोर्ट करतायत राज ?
ॲंड ट्रंप हॅज अलाइन्ड हिज विजन विथ दि रिपब्लिकन अजेंडा >>>>रियली ? रिपब्लिकन्स ना पण इतका विश्वास नाहीये त्याबद्दल
राज, माफ करा पण अॅबोर्शन, गन
राज,
माफ करा पण अॅबोर्शन, गन कंट्रोल व गे राईट्स या मुद्द्यांना तुम्ही सोयिस्कर बगल दिली आहे.
ट्रंप आवडत नसूनही बरेच रिप्स फक्त सुप्रीम कोर्ट साठी त्याला सपोर्ट करत आहेत.
कधी एकदा रो / वेड उलथवू असे झालेय त्यांना. शिवाय गे विवाह बंदी चा विषय आहेच.
बाकी रिप्स ची एक मजाय. गरोदर महिलेने कोणत्याही परिस्थितीत बाळाला जन्म दिलाच पाहिजे. पण एकदा बाळ झाले की मग आई जणो व बाळ जाणो. बाळंत पणाची रजा नसलेला एकमेव प्रगत देश !
शून्य कर आणि ८०-९०% कर एवढी
शून्य कर आणि ८०-९०% कर एवढी दोनच टोके आहेत का? सुवर्णमध्य असू शकत नाही का? कर देण्याकरता जी कागदपत्रे भरावी लागतात ती नको इतकी क्लिष्ट करुन ठेवली आहेत. त्याकरता अनेक हिशेबनीस आणि अन्य कंपन्यांच्या उत्पन्नाची सोय झालेली आहे. पण हा अनाठायी व्यापार आहे. कर हे इतके क्लिष्ट असण्याचे कुठलेही समर्थनीय कारण नाही. आणि आजवर लॉबीच्या प्रभावामुळे कुणीही ह्यात बदल केलेला नाही.
सरकारदरबारी जमा झालेले पैसे हे योग्य प्रकारे वापरले जात नाहीत हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. १० डॉ ची वस्तू ३० डॉ क्वचित १०० डॉ ला घेतली जाते. हिलरीच्या आशिर्वादाने इराकविरुद्ध जे युद्ध घडले त्यात १ ट्रिलियन डॉलर जळून खाक झाले. ते कुठले होते? करदात्यांनी आपल्या मिळकतीतून दिलेलेच. बाकी डोळे उघडून बघितलेत तर प्रत्येक राज्यात, शहरात सरकार दरबारी पैशाच्या अपव्ययाची, भ्रष्टाचाराची, लाचखोरीची असंख्य उदाहरणे दिसतील.
ट्रंपपेक्षा हिलरी जास्त युद्धखोर आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.
ट्रंप हा पुरेसा रिपब्लिकन नाही. त्याची अनेक धोरणे पुरोगामी असणार ह्याची मला खात्री आहे. तो मोठ्या शहरात वाढलेला व्यापारी वृत्तीचा मनुष्य आहे. तो धार्मिक कधीच नव्हता. प्रचाराकरता काय ओबामाही धार्मिक असल्याचा आव आणतच होता!
शून्य कर आणि ८०-९०% कर एवढी
शून्य कर आणि ८०-९०% कर एवढी दोनच टोके आहेत का? सुवर्णमध्य असू शकत नाही का? कर देण्याकरता जी कागदपत्रे भरावी लागतात ती नको इतकी क्लिष्ट करुन ठेवली आहेत. त्याकरता अनेक हिशेबनीस आणि अन्य कंपन्यांच्या उत्पन्नाची सोय झालेली आहे. पण हा अनाठायी व्यापार आहे. कर हे इतके क्लिष्ट असण्याचे कुठलेही समर्थनीय कारण नाही. आणि आजवर लॉबीच्या प्रभावामुळे कुणीही ह्यात बदल केलेला नाही.
सरकारदरबारी जमा झालेले पैसे हे योग्य प्रकारे वापरले जात नाहीत हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. १० डॉ ची वस्तू ३० डॉ क्वचित १०० डॉ ला घेतली जाते. हिलरीच्या आशिर्वादाने इराकविरुद्ध जे युद्ध घडले त्यात १ ट्रिलियन डॉलर जळून खाक झाले. ते कुठले होते? करदात्यांनी आपल्या मिळकतीतून दिलेलेच. बाकी डोळे उघडून बघितलेत तर प्रत्येक राज्यात, शहरात सरकार दरबारी पैशाच्या अपव्ययाची, भ्रष्टाचाराची, लाचखोरीची असंख्य उदाहरणे दिसतील.
ट्रंपपेक्षा हिलरी जास्त युद्धखोर आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.
ट्रंप हा पुरेसा रिपब्लिकन नाही. त्याची अनेक धोरणे पुरोगामी असणार ह्याची मला खात्री आहे. तो मोठ्या शहरात वाढलेला व्यापारी वृत्तीचा मनुष्य आहे. तो धार्मिक कधीच नव्हता. प्रचाराकरता काय ओबामाही धार्मिक असल्याचा आव आणतच होता!
टॅक्स ही वाईट गोष्ट आहे हे
टॅक्स ही वाईट गोष्ट आहे हे गृहीतक किती फोल आहे ते बर्याच उदाहरणांतून स्पष्ट झालेले आहे.>>>>>> मोठ्ठं उदाहरण घ्या ना. भारत.

आपल्या इथे टॅक्स म्हणलं की तो चुकवायचा असतो असं गृहितक आहे. रस्ते, इफ्रास्ट्रकचर वगैरे ते बघणं सरकारचं काम असतं आपलं नाही.
Pages