Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजली, हो मी वाचलं ते. ते
अंजली, हो मी वाचलं ते.
ते सुद्धा खुपच अतिश्योक्ती आहे माझ्यामते. ही गॉट फ्रॅझल्ड.
एनिवे, हे शेवटी होणार होतच. ही इज नॉट कटाऊट फॉर धिस जॉब एनिवे. होपफुली लोकांना दिसतय आणि ते स्विच करतील.
धनि, तो एकटाच नाही करत आहे मात्र फियर माँगरिंग.
बाकी भन्नाट खेळी केली डेम्सनी. ही डार्क, डिझास्ट्रस थीम घेऊन लै वेळ तुणतुणं वाजवलं ट्रंपनी आणि डेम्स नी मौक्च्यावेळी बरोब्बर त्याच्या उलट जाऊन, परिस्थिती इतकी पण वाईट नाही, आणि आपण सगळे (एक्ट्यानी नाही) हे फिक्स करु शकतो असली रोमांचक भाषणं केली कन्वेन्शन ला! मास्टर स्ट्रोक होता. मी आधीही लिहिलं एकदा. खुपच सिन्सियर "वाटले" सगळे बोलताना पण आत खरं काय चालतं हे कोणाला ठाऊक? सिन्सियर वाटले तेच महत्वाचं आहे कारण पबलिक त्याच्या जोरावरच मत देइल आणि अजून गंमत म्हणजे ट्रंपच्या ह्या मुर्ख वाचाळपणामुळे तर ते आणखिनच सिन्सियर आणि देशहितात सुख मानणारे वाटले, थोड्क्यात काँट्रास्ट अधोरेखित झाला.
ट्रम्प मैदानात उतरला तेव्हा
ट्रम्प मैदानात उतरला तेव्हा क्लिन्टन्सनीच त्याला रिपब्लिकन्सचा गेम करण्यासाठी ही सुपारी दिली असेल का असा एक प्रवाद होता. तिथून आत्तापर्यंतचा प्रवास बॅफलिंग आहे!
स्वाती, तो प्रवाद खराच असेल
स्वाती, तो प्रवाद खराच असेल असं वाटायला लागलंय
खराच निघू दे!
खराच निघू दे!
खरं तर इतकी मस्त संधी होती
खरं तर इतकी मस्त संधी होती ट्रंपला. सुरवातीला क्लिंटन तिच्या इतर झमेल्यांमध्ये अडकलेली होती आणि तो आरामात बिल्ड करु शकला असता त्याच्या मोमेंटम वर. खरं त्याच्याकडे रिसोर्सेस आहेत, त्याच्या जागी एखादा शांत आणि खरच धोरणी माणूस असता तर क्लिंटनचं काही खरं नव्हतं. ओबामानी निव्वाळ करिस्मा वर ओढली होती पहिली निवडणूक. ओबामाचे काही जरी गुण त्यात असते तर हि निवडणूक खिशात घालू शकला असता तो पण ते शक्य नाही वाटत कारण त्याचं बेसिक मट्रेलच खराब आहे. मी रोखठोक जे आहे ते बोलतो अस म्हणतो पण तोंडानी जे रोखठोक बोलतो त्यात त्याची स्वतःची रियॅलिटी किती गंडलेली आणि ट्विस्टेड आहे हेच दिसून येतं वारंवार (अमितच्या बाफं वर उदाहरणं आहेतच). तो फिट नाहीच आहे हे पद संभाळायला आणि सुदैवानी त्याला ते मिळणार ही नाही बहुतेक.
बुवा, ट्रंपनं २००१ मधे
बुवा, ट्रंपनं २००१ मधे डेमोक्रॅटीक म्हणून नोंद केली होती. पण २००८ मधे परत रीपब्लिकन झाला. त्याचा रेसिस्ट स्वभाव / नेचर पहाता ओबामाला डेमची उमेदवारी मिळाली किंवा ओबामा प्रेसिडेंट झाला हे त्याला सहन झालं नसावं अशी शंका यायला वाव आहे. ओबामाच्या बर्थ सर्टीफिकेटचा मुद्दा त्यानंच तर लावून धरला होता कितीतरी दिवस. २०११ मधे परत त्यानं पक्ष बदलला बहुतेक. म्हणजे इंडीपेडंट झाला आणि २०१४ मधे परत रीपब्लिकन!
हो अंजली. हो कॅन फर्गेट द
हो अंजली. हो कॅन फर्गेट द बर्थर मुवमेंट.
हा सगळा गेम आहे ट्रंप करता. तो अत्यंत संधीसाधू माणूस आहे. त्यातच एक्स्पर्ट आहे तो. जिथे कुठे त्याला स्वतःला लाईमलाईट मध्ये झळकून पैसे कमवायला मिळतं त्यात तो घुसतोच. इथे ताबडतोब पैसे नसले तरी इथे पावर "दॅट्स सेकंड तु नो वन" इन्वॉल्व्ड आहे. ह्या वेळी रिपब्स मध्ये कँडिडेट्सची दैना होती आणि पार्टी वलनरेबल त्यामुळे इथ पर्यंत येऊ शकला तो.
२०१२ मध्ये ओबामा पुन्हा
२०१२ मध्ये ओबामा पुन्हा निवडून आल तेव्हा ट्रंप फार चिडला होता. ट्विटर वर त्याने आवाहन केले की वॉशिन्ग्टन वर मोर्चा काढून आपण क्रांती करुयात. जे लेनो म्हणाला, अरे वेड्या तुझ्या मालकीचे गोल्फ कोर्सेस आहेत. क्रांतीए झाली तर लोक आधी तुझ्या सारख्यांना खांबावर लटकावतील.
>>डेम्स/मिडियाने केलेल्या
>>डेम्स/मिडियाने केलेल्या फियर माॅंगरींग >>>> आणि ट्रंप काय फॅक्टस सांगतोय का अंगाई गातोय?<<
थॅंक्यु फाॅर प्रुविंग माय पाॅइंट...
राज ट्रंपची ट्वीटरवरची
राज ट्रंपची ट्वीटरवरची वक्तव्ये मीडीया लिहितेय असा तुमचा समज आहे का ? किंवा का आहे ?
>>राज ट्रंपची ट्वीटरवरची
>>राज ट्रंपची ट्वीटरवरची वक्तव्ये मीडीया लिहितेय असा तुमचा समज आहे का ? किंवा का आहे ?<<

हा हा, आत्तापर्यंत नव्हता पण शंका घ्यायला जागा आहे...
मेलानिया ट्रंपने इलीगली काम
मेलानिया ट्रंपने इलीगली काम केले असे जर खरच उघड झाले तर ट्रंपची भयंकर पंचाईत होणार आहे कुठलाही मोराल स्टान्स घेताना.
ते सिद्ध कसे करणार पण ?
ते सिद्ध कसे करणार पण ? संबंधित पार्टीज सहज "तिने इन्टर्नशिप केली, किंवा पेड जॉब नव्हताच" असे काहीतरी म्हणू शकतात. इल्लिगली काम केले असेल तर तसेही टॅक्सेस , पेरोल वगैरे रेकॉर्ड नसेलच.
काम इल्लिगली नाहि केलय ग.
काम इल्लिगली नाहि केलय ग. मॅगझिनमधे फोटो आहेत त्यावर तारखा आहेत. तो टाईम पेरियड आहे त्या वेळेस ती (खर तर अजून बरीच वर्षे) युरोपमधे स्टँपिंग साठी सहा सहा महिन्यांनी परत जात होती असे तिने, ट्रंपने , त्याच्या कँपने officially सांगितले आहे (ती कसे सगळे कायदेशीर रित्या करते हे सांगण्यासाठी वेगळ्या context मधे). "सहा - सहा महिन्यांनी स्टँपिंग म्हणजे त्यावरून तो वर्क व्हिसा नसणार म्हणजे तीने काम करणे इलीगल झाले" असे लोकांचे म्हणणे आहे. मॉडेलिंग साठी सहा महिन्यांचा वेगळा B1 असू शकतो पण तो दिला नाही असे कोणी तरी लिहिलय. ब्लूमबर्ग बघ त्यात नीट डीटेलवार दिलय. It seems INS can revoke GC issued in such cases.
ती आली १९९५ मधे का १९९६ मधे.
ती आली १९९५ मधे का १९९६ मधे. तिला २००६ मधे GC मिळालं ना? ट्रंपशी लग्न केल्यावर? मग इतके दिवस कुठल्या व्हिसावर होती?
काम इल्लिगली नाहि केलय ग.
काम इल्लिगली नाहि केलय ग. मॅगझिनमधे फोटो आहेत त्यावर तारखा आहेत >>हो ते लक्षात आले , पण तरीही तिने वर्क व्हिसा नसताना काम केले हे सिद्ध कसे करणार असे म्हणतेय मी. वर्क व्हिसा नव्हता - ओके. फोटो तेव्हाचेच आहेत- ओके पण त्याचे तिने पैसे घेतलेच नाहीत (शैक्षणिक अनुभव, व्हॉलन्टियर वर्क इ. ) असा दावा केला तर ? इल्लीगल तेव्हाच होईल जेव्हा तिला संबंधितांनी पेमेन्ट केल्याचे सिद्ध होईल ना.
ब्लूमबर्ग वाचते आता .
काही असो, प्रेसिडेंट पदाची
काही असो, प्रेसिडेंट पदाची निवडणूक लढवू नये. असतील नसतील त्या सार्या भानगडी बाहेर येतात.
ट्रंप/हिलरी दोघांनाही जर
ट्रंप/हिलरी दोघांनाही जर पुरेसे इलेक्टोरल व्होटस मिळाले नाहीत तर काय करतात ? अजुनही तिसराच कोणी प्रेसिडन्ट होण्याची किती शक्यता आहे ?
काही असो, प्रेसिडेंट पदाची
काही असो, प्रेसिडेंट पदाची निवडणूक लढवू नये. असतील नसतील त्या सार्या भानगडी बाहेर येतात. >>
विकू तुम्ही कधी उभे राहिलात तर आधी मायबोलीचे सर्व्हर ताब्यात घ्या नाहितर सगळे स्वेटर बाहेर पडतील 
तिने पैसे घेतलेच नाहीत (शैक्षणिक अनुभव, व्हॉलन्टियर वर्क इ. ) असा दावा केला तर ? >> शक्य आहे पण त्यात बर्याच इतर पार्टीज येतील फोटोग्राफर, मॅगझिन, तिचा रुमी वगैरे, सगळ्यांना नीट मॅनेज करायला लागेल जे फारच धोकादायक बनू शकते.
अगदी तेच लिहायला आलो होतो
अगदी तेच लिहायला आलो होतो असामी. विकु तुम्ही तर हिंमतच करु नका उभं राहायची.

त्या कारणामुळेच मी उभं न राहण्याचा निर्णय घेतलाय. नसती आफत नको.
तुम्ही कुणीच बर्थर
तुम्ही कुणीच बर्थर मूव्हमेंटविषयी ऐकलेले दिसत नाही.
अरे बॉटम लाईन असंबद्ध गरज
अरे बॉटम लाईन असंबद्ध गरज नसताना वाचाळपणा करू नका आहे. निवडणुकीला उभे राहू नका नाही.

बुवा निवडणुकीला उभे राहिले तर
बुवा निवडणुकीला उभे राहिले तर फारच भलभलती जुनी मैचित्रे येतील बाहेर. माळ्याच्या मळ्यामधी कोन ग उभी, सरकाइलो खटिया वगैरे
शिवाय बुवा नॉमिनेशन
शिवाय बुवा नॉमिनेशन स्वीकारताय्त तोच ...
बुवा निवडणुकीला उभे राहिले तर
बुवा निवडणुकीला उभे राहिले तर फारच भलभलती जुनी मैचित्रे येतील बाहेर >> येउ दे कि बाहेर, पॉल रायनचे सिक्स पॅक चालले तर बुवांनी काय घोडे किंवा गाढव किंवा हत्ती मारलाय
विकु, >>अरे वेड्या तुझ्या
विकु, >>अरे वेड्या तुझ्या मालकीचे गोल्फ कोर्सेस आहेत. क्रांतीए झाली तर लोक आधी तुझ्या सारख्यांना खांबावर लटकावतील.>> याचा अर्थ कळला नाही. तू १% वाला आहेस असं का?
अजुनही तिसराच कोणी प्रेसिडन्ट
अजुनही तिसराच कोणी प्रेसिडन्ट होण्याची किती शक्यता आहे ? >>> गॅरी जॉन्सन हा एक उमेदवार आहे. लिबर्टेरियन पार्टीतर्फे आहे की स्वतंत्र ते माहीत नाही.
गॅरी जॉन्सन - लिबर्टेरियन जोल
गॅरी जॉन्सन - लिबर्टेरियन
जोल स्टाईन - ग्रीन पार्टी
( बरेच सँडर्स वाले तिकडे जायचा विचार करत आहेत)
टी पार्टीचा नाहीये का कोणी?
टी पार्टीचा नाहीये का कोणी? म्हणजे हार्डकोर रिप तिकडे गेले असते.
पण sanders वाले लिबरर्टेरिअन म्हणजे टोटल जोक झाला की.!
ग्रीन पार्टी कडे रे -
ग्रीन पार्टी कडे रे - लिबर्टेरियन नाही
क्लिंटन ला त्याची भिती आहेच.
रिप जे फिस्कल कंझर्वेटीव आहेत ते लिबर्टेरियन कडे जात आहेत आणि
Pages