Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रम्प अमिरेकेचा अध्यक्ष नसून
ट्रम्प अमिरेकेचा अध्यक्ष नसून राजा होणार आहे असा त्याचा समज आहे अशी टीका होते. पण सध्या असे वाटते की त्याच्या अनेक फॅन्सचा ही तसाच समज आहे. हा नक्की काय करणार आहे निवडून येउन? सध्या ओबामाला प्रत्येक गोष्टीत काँग्रेस अडवते तसे यालाही अडवतील. ऑलरेडी इतके रिपब्लिकन्स लांब राहात आहेत. त्यात सर्वांना बरोबर घेउन जाणे वगैरे प्रकार याला झेपणारे दिसत नाहीत. हा तर स्वतःच्या सभेत येणार्यांचीच चेष्टा त्याच भर सभेत करतो (ते बेबी वाले भाषण पाहा).
स्वतःच्या बिझिनेस करता वाट्टेल ती लूपहोल्स वापरणारा माणूस आहे हा. उद्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या फायद्याकरता युद्ध करण्याची वेळ आली तर थांबेल का?
वरती शेंडेनक्षत्र यांच्या पोस्ट मधे डेम्स वर व हिलरी वर असलेली टीका वाचली. ती सगळी एक मिनीट मान्य आहे असे धरू. पण त्यावर ट्रम्प ची हास्यास्पद प्रतिक्रिया होती त्यावर त्या पोस्ट मधे काहीच नाही. देशासाठी एवढी किंमत मोजलेल्या कुटुंबाबद्दल आदर नाही, किमान सहानुभूती तरी? काय तर म्हणे ती बाई का बोलत नव्हती. त्याची पी आर बाई तर त्याच्याहून अचाट - म्हणे ओबामा मुळे हे झाले.
उद्या प्रेसिडेण्ट म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा चिथावण्या अनेक येतील, एवढेच नव्हे तर प्रत्येक बिल पास करताना विरोधकांसमोर बसून प्रत्येकाची मनधरणी करत त्यांच्या अटी मान्य कराव्या लागतील. हा चांगला निगोशिएटर आहे असे लोक म्हणत. पण बिझिनेस निगोशिएशन मधे पब्लिक मधे चिखलफेक केलेल्या लोकांशी डील करावे लागत नाही. दोघांचे उद्देश तेथे सेम असतात. राजकीय निगोशिएशन्स ही फार वेगळी गेम आहे. हा ते करायच्या आधी ट्विटर वरून हा मूर्ख आहे, तो व्हायनी आहे करत बसेल.
जेंव्हा system मधे एव्हढ्या
जेंव्हा system मधे एव्हढ्या घाऊक प्रमाणात drastic बदल सुचवले जातात नि त्या आधारे आपल्या निवडण्याची बोली लावली जाते तेंव्हा हे उत्तर माझ्यासाठी पुरेसे होत नाही. >>> असामी, सहमत. लोकांना इतके दिवस झिडकारलेले थोडे समाजवादी विचार सुद्धा उपयोगी आहेत असे वाटण्याकरता त्याची उमेदवारी आवश्यक होती. पण ती प्रेसिडेण्ट पदापर्यंत जाईल एवढे 'सबस्टन्स' त्यात होते असे वाटले नाही.
समाजवादाला अमेरिकेत एवढा विरोध लोकांनी तो कम्युनिझम शी लिन्क करण्यामुळे असावा का?
अरे प्लॅन असतोच पण तो इतका
अरे प्लॅन असतोच पण तो इतका पक्का असणं की ऑफिसमध्ये आल्यावर तो तंतोतंत पाळला जाईल, राबवला जाईल ही अपेक्षा खुपच मोठी आणि इम्प्रॅक्टिकल आहे. माणूस रिझनेबल असला की डील करुन, फेरबदल करुन पण कोअर व्लॅयुजशी तडजोड न करता पुढे सरकतो. सँडर्स तसा माणूस नक्कीच वाटला.
ट्रंप तर तसलं काही वाटतच नाही. ३ वर्ष निष्क्रिय कारभाराची टर्म होती म्हणून आता ट्रंप ला किल्ल्या देणे म्हणजे डिफिटिजम ची हद्द झाली!
तरी बरं काही रिपब्लिकन लोकं सुद्धा क्लिंटनला सपोर्ट देत आहेत किंवा ट्रंपला सपोर्ट देत नाहीयेत. .
फा
(१३:५० च्या पोस्टीबद्दल). तेच ना. कुठल्या अँगल मधून हा भौ बाय पार्टिसन डील मध्ये जबरी तोडगे वगैरे काढेल? ह्याला फक्त रुम त्याची असताना युआर फायर्ड म्हणता येतं. 
हा चांगला निगोशिएटर आहे असे
हा चांगला निगोशिएटर आहे असे लोक म्हणत.>>>> नाही, तो बिझनेसमधेही bullyच आहे. चांगला निगोशिएटर असता तर यशस्वी उद्योजक असला असता. The fact that people doesn't want to do business with him tells that he he not a good negotiator.
अंजली, मग तो चांगला निगोशिएटर
अंजली, मग तो चांगला निगोशिएटर आहे असे तोच (फक्त) म्हणत असेल :). ते आर्ट ऑफ अ डील वगैरे. त्यातही गोच्या बाहेर येत आहेत. त्याचा को-ऑथर च म्हंटला ना की ते पुस्तक लिहीण्यात ट्रम्प चा फारसा हात नव्हता.
>> आणि पुढची चार वर्षं हिलरी
>> आणि पुढची चार वर्षं हिलरी आॅफिसमध्ये म्हणजे निष्क्रिय कारभाराची तीसरी टर्म
ओबामा अॅड्मिनिस्ट्रेशनच्या निष्क्रीयतेची तुमच्या दृष्टीने टॉप ३ उदाहरणं काय आहेत?
मग तो चांगला निगोशिएटर आहे
मग तो चांगला निगोशिएटर आहे असे तोच (फक्त) म्हणत असेल >>>>
त्या सैनिकाच्या बापाच्या
त्या सैनिकाच्या बापाच्या भाषणावरील ट्रंपची प्रतिक्रिया चुकीची होती. त्याने आक्रमकपणे हिलरीच्या पदरात त्या युद्धाचे माप पुरेपूर घालायला हवे होते. परंतु हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे का? एका हुतात्मा झालेल्या मुस्लिम सैनिकाकरता आदर असावा हे ठीकच. पण अशा प्रकारे व्हिसे मिळवून अनेक अतिरेकी कारवाया करणारे मुस्लिम, त्यांचे काय? की एक सैनिक शहीद होतो म्हणून सॅन बर्नार्डिनो, ओर्लॅण्डो, फोर्ट हूड, ९/११ हे घडवून आणणारे अतिरेकी गोड मानावेत आणि असे लोक येऊ नये म्हणून कुठलेही प्रयत्न करु नयेत?
हिलरी ही ओबामाचीच धोरणे चालवेल. आणि शिवाय ती जास्त युद्धखोर आहे. त्यामुळे नको ती युद्धे ती अमेरिकन लोकांच्या गळ्यात मारेल.
ओबामाची कुठली धोरणे त्याचा निष्क्रियपणा दाखवतात?
१. आश्वासन देऊनही ग्वांटानामो बे चा तुरुंग बंद न करणे.
२. ओबामा केअरचा पूर्ण पाठपुरावा न करणे.
३. आयसिस व अन्य मुस्लिम अतिरेक्यांबाबत कायम मौन पाळणे. त्यांच्या विरुद्ध नगण्य कारवाया. कायम नकारात्मक सूर. हे मुस्लिम नाहीतच, हा इस्लाम नाहीतच वगैरे वापरून गुळगुळीत झालेली वाक्ये बोलून वरचेवर घडणार्या अतिरेकी घटनांचा निषेध करणे.
४. तथाकथित कॉम्प्रिहेन्सिव इमिग्रेशन रिफॉर्मस ह्यांचा उदोउदो करुन त्याबद्दल आठ वर्षात काय केले? शून्य!
५. पोलिसांविरुद्धच्या काळ्या लोकांनी केलेल्या हिंसेचे अप्रत्यक्ष समर्थन. पोलिस हे सरकारचे नोकर आहेत हे विसरुन काळ्या लोकांच्या बाजूने वहावत जाऊन पोलिसांच्या विरुद्ध केलेली शेरेबाजी.
हिलरी ही ओबामाचीच धोरणे
हिलरी ही ओबामाचीच धोरणे चालवेल. आणि शिवाय ती जास्त युद्धखोर आहे. त्यामुळे नको ती युद्धे ती अमेरिकन लोकांच्या गळ्यात मारेल. >> ओबामाचीच धोरणे ? ओबामाने कुठली युद्धे गळ्यात मारली नक्की आणी ? मला वाटले कि 'ओबामा ताठरपणा दाखवून ISIS बरोबर युद्धात उतरत नाहीये' नि 'इराक नि अफगाणिस्तान मधून लवकर बाहेर पडला' वगैरे आक्षेप होते इतके दिवस. अरेच्चा तुमचा तिसरा मुद्दा पण तेच सांगतोय कि. hawkish policies is GOP's brainchild.
१. guantanamo बे बंद करणे सरळ सोट नाहिये. अधिक माहितीसाठी हा लेख वाचाच. http://www.newyorker.com/magazine/2016/08/01/why-obama-has-failed-to-clo...
तसाही नाहि बंद केला तर बरेच आहे ना, ट्रंप ने म्हटलयच कि तो वापरेल असे. तेव्हढाच खर्च कमी
२. ओबामा केअरचा पूर्ण पाठपुरावा न करणे. >>are you serious about this ? "(We will )repeal Obamacare" हे ब्रीदवाक्य अ़जूनही कोणाचे आहे नक्की ? गेले ५ वर्षे ह्यासाठी अथक प्रयत्न कोणाचे सुरू आहेत ? ओबामाचे ?
पण अशा प्रकारे व्हिसे मिळवून अनेक अतिरेकी कारवाया करणारे मुस्लिम, त्यांचे काय? की एक सैनिक शहीद होतो म्हणून सॅन बर्नार्डिनो, ओर्लॅण्डो, फोर्ट हूड, ९/११ हे घडवून आणणारे अतिरेकी गोड मानावेत आणि असे लोक येऊ नये म्हणून कुठलेही प्रयत्न करु नयेत? >> कुठलेही ? सगळे सरकार २००१ पासून फक्त हातावर घडी ठेवून बसले आहे असे खरच वाटतेय का तुम्हाला ? Lone Wolf type attacks नक्की कसे रोखणार ? नुसते व्हिसा वर बॅन ठेवून शक्य होणार आहे का ? ओर्लॅण्डो मधला मटीन फोर्ट हूड मधला हसन किंवा सॅन बर्नार्डिनो मधला फरूक इथेच जन्मलेले नि वाढलेले अमेरिकन होते. More American (by birthright) than you and me are. व्हिसा वर आलेले नव्हते. अशा प्रकारचा अतिरेकी कसा ओळखणार ? Boston Marathon bombing मधले कसे ओळखले असते ? state सर्वेलन्स ची तयारी आहे का ? हल्ल्यानंतर 'हेच केले का नाही' हे बोलणे फार सोपे आहे. practical आहे का ? तुम्ही बरेच दिवस सॅन बर्नार्डिनो च्या ट्रंप्च्या वक्तव्याचा हवाला देताय म्हणून विचारतोय कि तो फरूक जर इथे जन्मलेला होता नि अतिशय fast radicalized झाला, हे नक्की कसे detect होणार होते ? 'सरळ सगळ्या मुसलमान लोकांना देशाबाहेर हाकलून द्या' हे चूकीचे असले तरी प्रामाणिक वक्तव्य तरी होईल.
हिलरी ही ओबामाचीच धोरणे
हिलरी ही ओबामाचीच धोरणे चालवेल. आणि शिवाय ती जास्त युद्धखोर आहे. त्यामुळे नको ती युद्धे ती अमेरिकन लोकांच्या गळ्यात मारेल.
ओबामाची कुठली धोरणे त्याचा निष्क्रियपणा दाखवतात?
१. आश्वासन देऊनही ग्वांटानामो बे चा तुरुंग बंद न करणे.
२. ओबामा केअरचा पूर्ण पाठपुरावा न करणे.
३. आयसिस व अन्य मुस्लिम अतिरेक्यांबाबत कायम मौन पाळणे. त्यांच्या विरुद्ध नगण्य कारवाया. कायम नकारात्मक सूर. हे मुस्लिम नाहीतच, हा इस्लाम नाहीतच वगैरे वापरून गुळगुळीत झालेली वाक्ये बोलून वरचेवर घडणार्या अतिरेकी घटनांचा निषेध करणे.
४. तथाकथित कॉम्प्रिहेन्सिव इमिग्रेशन रिफॉर्मस ह्यांचा उदोउदो करुन त्याबद्दल आठ वर्षात काय केले? शून्य!
५. पोलिसांविरुद्धच्या काळ्या लोकांनी केलेल्या हिंसेचे अप्रत्यक्ष समर्थन. पोलिस हे सरकारचे नोकर आहेत हे विसरुन काळ्या लोकांच्या बाजूने वहावत जाऊन पोलिसांच्या विरुद्ध केलेली शेरेबाजी.>>>>>
आत्ता घाईत आहे, जरा सवडीनं लिहीते.
असामी +१ मुस्लिम माणूस कसा
असामी +१
मुस्लिम माणूस कसा ओळखतात?
ठीगभर देशातील लोक असेही व्हिसा शिवाय अमेरिकेत लिगली येऊ शकतात. ते सगळे करार रिराईट करणार का?
इथे जन्मलेल्या आणि अतिरेकी बनलेल्याच काय?
आणि ते लीगल तरी आहे का? हा कॉन्स्तीत्युशन पण रिराईट करणार आणि बाहेरच्या देशांकडून त्याचे पैसे वसूल करणार?
ओबामाकेअरचं इन्टेन्शन खुपच
ओबामाकेअरचं इन्टेन्शन खुपच चांगलं असलं तरी इम्प्लीमेंटेशन मध्ये वाट लागली. त्याबद्दल काहीच म्हणणं नाही.
आयसिस किंवा अन्य अतिरेक्यांवर कारवाया (अटॅक्स) केल्याच्या बातम्या सतत येत असतात फक्त आधीच एका अति एक्स्पेन्सिव वॉर मधून बाहेर पडल्यावर आणि परत अमेरिकेला युद्धात ढकलणार नाही हे आश्वासन मला वाटतं ओबामानी नीट पाळलं. अतिरेकी करत असलेली कृत्यं बघून वाईट वाटलं तरी जिथे तिथे अमेरिकेनी तोंड घालावं की नाही आणि ती अमेरिकेची जबाबदारी आहे की नाही हा ही एक महत्वाचा मुद्दा आहे.
इमिग्रेशन बद्दल त्याला कधीच डील स्ट्राईक करता आली नाही रिपबलिकन्स बरोबर. सेकंड टर्म च्या वेळी तर रिपब्लिकन मजॉरिटी आली लगेच पुढे त्यामुळे तर आणखिनच अवघड होऊन बसलं सगळं. ब्लेम नक्की कोणाला द्यावा ह्याबाबत कळत नाही.
पोलिसांविरुद्ध केलेल्या हिंसेचे अप्रत्यक्ष समर्थन हे तुम्ही टोटली तुम्ही इंटरप्रीट केलेलं आहे. असं काही बोलणं म्हणजे आपल्याइथे टिपिकल विरोधी पक्ष नेते आणि हार्डकोअर पक्षकार हगल्या मुतल्यामध्ये वाईट मुद्दे शोधतात तसं आहे.
ग्वांटानामोबद्दल मला माहिती नव्हतं पण विकी तर सांगतय की डिटेनीज कमी केले.
https://en.wikipedia.org/wiki/Presidency_of_Barack_Obama
हे पाच मुद्दे तुमच्याकरता
हे पाच मुद्दे तुमच्याकरता अगदी महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे दिसतात ज्यावरच्या तुमच्या मताप्रमाणे ओबामा अॅड्मिनिस्ट्रेशनच्या "निष्क्रीयतेने" तुम्ही फ्रस्ट्रेट झाला आहात? मग आता ट्रम्प काय काय करून ह्या मुद्द्यांवर सक्रीय होईल ते ही सांगा. तीन मुद्द्यांकरता ट्रम्प चे विचार काय आहेत ते मी समराइज करते.
>> ओबामा केअरचा पूर्ण पाठपुरावा न करणे.
ताबडतोब रिपील करणे
>> आयसिस व अन्य मुस्लिम अतिरेक्यांबाबत कायम मौन पाळणे. त्यांच्या विरुद्ध नगण्य कारवाया. कायम नकारात्मक सूर. हे मुस्लिम नाहीतच, हा इस्लाम नाहीतच वगैरे वापरून गुळगुळीत झालेली वाक्ये बोलून वरचेवर घडणार्या अतिरेकी घटनांचा निषेध करणे.
कुठली तरी कृत्रिम कारणे तयार करून काही देशातील सर्व मुसलमानांनां अमेरिकेत शिरण्यास मज्जाव करणे
>> तथाकथित कॉम्प्रिहेन्सिव इमिग्रेशन रिफॉर्मस ह्यांचा उदोउदो करुन त्याबद्दल आठ वर्षात काय केले? शून्य!
मेक्सिको बॉर्डर वर भिंत बांधणे (ज्याचे पैसे म्हणे मेक्सिकोकडून वसूल करणार)!
पाचपैकी ह्या तीन मुद्द्यांवर ट्रम्प ने अशी सक्रीयता दाखवली की तुम्हाला समाधान मिळणार???
ग्वांटानामो बंद करायचा प्लान
ग्वांटानामो बंद करायचा प्लान पण कॉंग्रेसला सादर केलेला ना मधे ?
५ बद्लॅ: ब्लॅक लॅटीनो फिलिपिनो लोक एकगठ्ठा कायकाय आहेत हे विधान तर प्रसिद्ध आहेच.
>> ग्वांटानामोबद्दल मला
>> ग्वांटानामोबद्दल मला माहिती नव्हतं पण विकी तर सांगतय की डिटेनीज कमी केले.
ओबामा ने ऑर्डर काढलेलीच होती बंद करण्यासाठी असं मी ही बघतेय. आणि डिटेनीज् ८०० वरून ९१ वर आले आहेत आता.
वांटानामोबद्दल माझ्या पोस्ट
वांटानामोबद्दल माझ्या पोस्ट मधली लिंल वाचाच. New Yorker मस्त असते राव. इव्हांका ट्रंप वरचा महिन्याभरापूर्वीचा लेख कसला खतरी होता.
ग्वांटानामो न्यूयोर्कर लेख
ग्वांटानामो न्यूयोर्कर लेख वाचतोय. इतकं डीटेल माहित न्हवत. धन्यवाद.
धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय
वारंवार एक मुद्दा पुढे केला
वारंवार एक मुद्दा पुढे केला जातो कि, ट्रंपचा ॲटिट्युड हा नेहेमी "शुट फ्राॅम दि हिप" असल्याने तो प्रेसिडेंट झाल्यावर नूक्सचा वापर सढळहाताने, कोणाचाहि सल्ला न घेता, परिणामाची पर्वा न करता करेल.
म्हणजे कल्पना करा कि, व्हाईट हाऊसला मुव झाल्यावर ट्रंपने सगळे नियम धाब्यावर बसवुन नूक्स मिसायल्स लाॅंच करण्याचं ॲप फक्त त्याच्या फोनवर इन्स्टाल करुन घेतलंय, डिनरला टाको सॅलड खाताना बातमी येते कि सुरुवातीला बाॅर्डर वाॅल फुकटात बांधुन द्यायला तयार झालेला प्रेसिडेंट नियेऽतो अचानक होस्टाइल झालाय आणि त्याने हात वर केलेले आहेत. हे ऐकुन पिकोत मिक्स केलेल्या हबेनेरा साॅसपेक्शा ट्रंपचा पारा वर चढलाय आणि मागचा-पुढचा विचार न करता, काॅंग्रेसला फाट्यावर मारुन, ट्रंपने (मोबाईल स्ट्राईक मधल्या आरनल्ड सारखं) नूक्स मिसायल्स लाॅंच फोनवर एका सिंपल टॅपने करुन मेक्सिको सिटीला अश्मयुगात पाठवलं...
आता यावर तुमचं प्रामाणिक मत द्या - सीन थोडा बटबटित झालाय कि इट्स इन लाईन विथ डेम्स, मिडियाज प्रापगॅंडा?..
राज आता इथे प्रोज अन कॉन्सची
राज
आता इथे प्रोज अन कॉन्सची चर्चा सुरु आहे म्हणून मुद्दे मांडले पण वर्स्ट केस सिनॅरियो समजा ट्रंप निवडून जरी आला तरी काही फार अनर्थ वगैरे होणार नाहीच आहे. डेमोक्रसी म्हणजे काय मोगलाई आहे का?

फक्त असं आहे, की आप्शन आहेत ना? तर मग जरा बघून निवडावं लोकांनी येवढच. ट्रंप हा ऑपशन आता किती अजून माकडचाळे केले तरी वायॅबल वाटणार आहे काय माहित. It's like he is daring the public and pushing the envelope more and more everyday.
मला तर ट्रंप कधी एकदा निवडुन
मला तर ट्रंप कधी एकदा निवडुन येतो आणि कधी भिंत बांधतो आणि आमच्यासरख्या non-immigrant लोकाना हकलुन लावतो असे झाले आहे.
राज, ट्रंपने गेल्या काही
राज, ट्रंपने गेल्या काही दिवसात किती वेळा न्यूकचा विषय काढलाय? अनेकदा. अमेरिकेकडे आहेत, पण आपण वापरत नाही. मग आहेतच कशाला न्यूक इथपर्यंत वाचलेलं आठवतंय मला.
न्यूक वापरायला कुणाच्याही परवानगी लागत नाही, प्रेसिडेंट जिकडे जिकडे जातो तिकडे एक ब्रीफकेस त्याच्या/ तिच्या बरोबर असते, ज्यात कोड असतात. हे एकदम हॉलीवूड स्टाईल वाटेल पण चेनीच्या इंटरव्हू मध्ये त्यानेच सांगितलं आहे. ज्याला अनेकांनी दुजोरा दिलाय. http://www.vox.com/2016/8/3/12367996/donald-trump-nuclear-codes
खखोदेजा. पण जर खरच असेल तर टाको खाऊन आय लव्ह मेक्सिकन म्हणणारा माणूस काय करेल!
हे फिअर मोन्गरिंग नाही. खरोखर वाटत असलेली भीती आहे.
मुळात ट्रंप त्याचा
मुळात ट्रंप त्याचा मेक्सिकन/इमिग्रंट द्वेष पाहता (किंवा त्याचा व्हाईट सुप्रिमसी अॅटॅअॅट्यूड पहाता) टॅको खाईल हेच पटत नाही
बाकी अमित जे म्हणतोय ते खरं आहे. न्यूक वापरायला काँग्रेस वा सिनेटची परवानगी लागत नाही असं मीही वाचलं होतं.
अरे कोड असतील पण तशी
अरे कोड असतील पण तशी परिस्थिती (आणीबाणीची) आल्यावर मग वापरता येत असतील. उद्या एखाद्या कंट्रीनी धाडकन बॉम्ब टाकला तर सेनेट अन हाऊस मध्ये बिलं पास करायची थोडीच वाट बघतील?
ह्य॑च्याच उलट कोड्स आहेत म्हणून आला राग मेक्सिकोवर अन दिले अण्वस्त्र सोडून असं थोडीच आहे. Him nuking someone is really fear mongering. America is no Philippines and its democracy is very mature. The danger is not really of waging wars out of mania but more of concentrating on the wrong issues and steadily eroding the country's economy. That's why we need people who truly want this country to progress and not someone who is just power hungry. Trump totally fits the bill of a power hungry individual.
अंजली, हे बघ.
अंजली, हे बघ.
https://twitter.com/realDonaldTrump/status/728297587418247168/photo/1?re...
I love Hispanics >>>
I love Hispanics >>>
अमितव, आहे कल्पना मला
अमितव, आहे कल्पना मला नुक्लीयर फुटबाॅलची. त्या प्रोसेसमध्ये चेन आॅफ कमांड (डिफेंस सेक्रेटरी, डेझिग्नेटेड ४ स्टार जनरल्स वगैरे) प्रेसिडेंटची आॅर्डर डिनाय करु शकत नाहि परंतु राजीनामा देउन डिले करु शकतात; अर्थात हे असं इनकमिंग स्ट्राइकच्या बाबतीत होणार नाहि जिथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो.
वर दिलेल्या गंमतीशीर उदाहरणात तसं (डेलिबरेट डिले) व्हायची शक्यता जास्त आहे...
अमेरिकन प्रेसिडेंट बाहेरच्या जगाकरता कितीहि पावरफुल माणुस असला तरी घटनेने त्याच्या अधिकारांवर भरपुर चेक्स ॲंड बॅलंसेस लावलेले आहेत. ट्रंप प्रेसिडेंसी डिझास्ट्रस असेल या डेम्स/मिडियाने केलेल्या फियर माॅंगरींग वर किती विश्वास ठेवायचा हे आता तुच ठरव...
राज रोज काहि तरी बेताल बोलून
राज रोज काहि तरी बेताल बोलून मिडियाला खाद्य कोण पुरवतेय ? मूळात आडात असेल तर पोहर्यात येणार ना ?
डेम्स/मिडियाने केलेल्या फियर
डेम्स/मिडियाने केलेल्या फियर माॅंगरींग >>>> आणि ट्रंप काय फॅक्टस सांगतोय का अंगाई गातोय? इथल्या काही टीन एजर्सची प्रतिक्रीया बोलकी होती. हा माणूस लोकांच्या मनातल्या भितीला उत्तेजन देतोय. याच्या बोलण्याचा परीणाम म्हणून कोण माथेफिरू कधी काय करेल सांगता येत नाही. साधं मॉलमधे जायचं तर भिती वाटते. याच्या बोलण्यानं केकेके पण परत डोकं वर काढायला लगलं आहे ते वेगळंच.
बुवा, तुमचं आर्ग्यूमेंट
बुवा, तुमचं आर्ग्यूमेंट कुठल्याही 'नॉर्मल' उमेदवाराबद्दल बरोबर आहे. पण इथ आपण ट्रंपबद्दल बोलतोय ;). आता त्याची मानसिक आरोग्याची चाचणी व्हावी ही मागणी जोर धरायला लागली आहे
http://www.nbcnews.com/news/us-news/trump-s-mental-state-becoming-campai...
आणि ट्रंप काय फॅक्टस सांगतोय
आणि ट्रंप काय फॅक्टस सांगतोय का अंगाई गातोय? >>
+१
फियर माँगरींग तर तो करतोय. त्याचे ते कन्व्हेन्शन मधले अॅक्सिपटन्स स्पिच पाहिले का ? फियर माँगरींग चा उत्तम नमुना आहे. सगळे डार्क आहे, सगळीकडे काळोख आहे आणि फक्त मी (मीच रिपब्लिकन पार्टी वगैरे नाही) पण मीच तुम्हाला यापासून वाचवू शकतो. आणि जानेवारीत मी शपथ घेतली की त्या दिवशीपासून सगळे नीट होणार ! आता याला काय म्हणायचे ?
Pages