निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मानुषी गो ऑन..
कॉलेजमधे हॉस्टेलच्या खिडकीबाहेर भरपुर झाडे होती . तिथं सतत वेडे राघु ठाण मांडून असायचे...
त्यावेळी कॅमेरा म्हणजे मोबाईल चा १.३MP . त्यात काढलेले फोटो तर चुकुनही दाखवण्यासारखे नाही Biggrin

बाकी निरु, नजर ठेवून असणारा तर खतरनाक आहेच आहे पण ते बाजुला निर्धास्त झोपा काढत असलेल घुबड सुद्धा एक नंबर हं ..

टीना इथे सर्वात बेकार फोटो टाकणारी मी आहे, मला नजरच नाहीये Lol

मला इथे competion नाही. सर्वजण फोटो छान टाकतात.

अन्जू, नजर नाहीए तुला अस कस म्हणते ?
तुला जे दाखवायच असत फोटोत, ते बरोबर दिसत कि फोटोत..झाल तर मग.
विश्वास ठेव नजर नसणारे भरपुरच आहेत माझ्या पाहण्यात Wink

अंजू, मी पण आहे तुझ्या जोडीला. पण स्वत:ला ती नजर नसली तरी कौतुकाची नजर हवी दुसर्याच्या कलेसाठी. ती आहे ना, बास Happy

मनीमोहोर,जागु,मानुषी,सावली,निरु गुलजार
असे सुंदर फोटो पाहुन धीर देखील येतो.

मनी मोहोर,
निसर्गाचा हा हिरवा गालीचा आता सर्वत्र दिसेल,
पावसाची पुन्हा सुरुवात होऊ दे, ही हिरवाई सुकुन जाऊ नये, अशी आशा करतो.

टीना, पैनगंगेचा फोटो सुंदर आलाय.
घुबडाचा फोटो मस्तच पण टीना मला तु टाकलेल्या तुझ्या फोटोचीच आठवण झाली बघ तो खर्‍या घुबडाचा फोटो पाहुन.
मानुषी तुझ्या फोटोंच्या प्रतीक्षेत.

ती कोनफळाची पाने किती सुंदर चकचकीत आहेत. सॉलिड कलर. पिंपळाला पालवी फुटते तेव्हा असाच कलर असतो, सुरुवातीला.

सुप्रभात निगकर्स!
ममो, अन्जू, टिना भापो! ममो गुच्छ मिळाला. दिनेश कोनफळ पानं काय कोवळी फ्रेश दिस्तताहेत!
माझ्याकडे कुंडीत एक आंब्याची कोय रोपली होती. त्याचं रोप आश्चर्यकारक रित्या भराभर वाढतय.
आता तर १ दिवसात पानं इतकी मोठी होऊन अगदी लोंबताहेत.
तर मंडळी...................................................
...माझा लेख "सृष्टीचे कौतुक" या महिन्याच्या(जुलाई)च्या "मेनका" मासिकात आला आहे. जरूर वाचा.
विषयः अमेरिकेतली निसर्गातली स्थित्यंतरे. तेही through my (eye) i pad!....poor try to do a pun. शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न. :स्मितः
याच विषयावर आमच्या रोटरीत मी एक पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशन दिलं होत. मागे मी इथे उल्लेख केला होता.
आता अजूनही एका रोटरीत(पुणे), एका कलामहाविद्यालयात (बीड) हेच प्रेझेन्टेशन द्यायचंय! आणि आमच्या नगरच्या एका कॉलेजातही. बघू.....................................
यातल्या काही महत्वाच्या स्पष्टीकरणासाठी दिनेशची खूप मदत झाली.

पिंपळाला पालवी फुटते तेव्हा असाच कलर असतो, सुरुवातीला.>>>>>अगदी.मला पटकन तेच आठवलं. >> +१
मस्त प्र्रचि आहे दिनेशदा.. मस्तानीच सौंदर्य वर्णिनेलं आठवल.. नितळ..

मानुषी, अभिनंदन..

Abhinandan Manushee,
hee paane sundar aahet, paN yaa velaalaa phoole yet naaheet.

हेमा ताई सुंदर पुष्प गुच्च्छ... कसली फुलं?
दिनेश दा, काय नजाकत आहे त्या पानांमधे.. सुंदर खुपच आर्टीस्टीक वाटते आहे..
मानुषी ताई मना पासुन अभिनंदन..:)

मानुषी ताई अभिनंदन ग.

दा कोनफळ मस्तच.

मंजूताई, अश्विनी जर नजर नसती तर तुम्ही ह्या धाग्यावर वळला कशा असतात ? Happy

दिनेश दा कोनफळाची पालवी फार सुंदर दिसतेय.

मानुषी, अभिनंदन. मानुषी तुझ्या लेखाची सॉफ्ट कॉपी असेल आणि जमत असेल तर इकडे फॉरवर्ड कर ना वाचायला आवडेल. तो पांढर्‍या फुलांचा गुच्छ खास तुझ्यासाठी ( स्मित)

फुलं कसली आहेत ते माहित नाहीत. इकडे खूप एक्स्पर्ट आहेत ते सांगतील.

जागु जास्वंद झक्कास..
ती खार किती घाईत आहे..
किती नारळ उरलेत याचा रिपोर्ट द्यायला चाल्ली वाटत कुणालातरी Wink

मुलींनो Wink मेनका कडे चौकशी करून देईन इथे.
ममो गुच्छ मिळाला बरं!
नक्की. सर्वांना धन्यवाद.
जागूले आमचेही नारळ मोजायचेत. विचारते का खारूताईंना? :स्मितः

जागू, तू निरिक्षण केले आहेस का ? कावळे सहसा खारींच्या वाटेला जात नाहीत. गोव्यात तरी तसे बघितले होते. तिथे त्यांचे घरटेच माझ्या खिडकीत होते. हो त्या गवताचेच घरटे बांधतात पण अंडी वगैरे घालत नाहीत Happy ( खुप जणांचा तसा समज असतो ! )

मानुषीताई अभिनंदन.

जागू सुंदर फोटो दोन्हीही. खारुताई मला खूप आवडते, किती तुरुतुरु पळत असते, आमच्या मागच्या झाडावर असते, फार गोड. तसेच मुंगुसपण आवडते.

Pages