आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............
तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!
अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!
याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!
वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सर्व पक्ष्यांचे फोटो अतिशय
सर्व पक्ष्यांचे फोटो अतिशय सुंदरेत ........
या धाग्याने रजत महोत्स्व
या धाग्याने रजत महोत्स्व पुर्ण केल्याने सर्व निसर्गातील मंड्ळी इथे येउन शुभेच्छा देत आहेत जणू.
मस्त फोटो सगळे.
व्वा काय मस्त फोटो... एक कप
व्वा काय मस्त फोटो... एक कप चहा देता कोणी असे भाव आहेत...:)
टिना, मला पण जाम आवडते पांढर घुबड बघायला, पण ते जरा उंचावर असत ग.. तरी ट्राय करील फोटो काढायला..
सायली... <<एक कप चहा देता
सायली...
<<एक कप चहा देता कोणी असे भाव आहेत...>>
अगदी Perfect..
भिजलेली साळुंकी ... आताच
भिजलेली साळुंकी ... आताच पडावं या पावसाने... भिगी मोरी सारी हाय !!
जागूचा, दयाळ पण मस्तच !
चंद्रपुरमधे गावी गेली होती
चंद्रपुरमधे गावी गेली होती तेव्हा काढलेला प्रचि.. जुना आहे..
पैनगंगा .. कातरवेळेच्या अलिकडची .
मस्तच ग टीना ...
मस्तच ग टीना ...
टिना पैनगंगा मस्त. पाण्यात
टिना पैनगंगा मस्त.
पाण्यात खेळतेय खारूताई.
आहा.. तुला बरे टिपु दिले
आहा.. तुला बरे टिपु दिले प्रचि तिनं खेळायच्या वेळी ..
खुपच छान..
खेळण्यात दंग होती.
खेळण्यात दंग होती.
सर्व पक्षी सुंदर. टीना सुंदर
सर्व पक्षी सुंदर.
टीना सुंदर फोटो. जागू खारुताई गोड.
गेली ५/६ वर्ष १ कावळ्याचे
गेली ५/६ वर्ष १ कावळ्याचे जोडपे आमच्या बेडरुम बाहेरच्या पिंपळाच्या झाडावर दर वर्षी घरटं करते. आम्ही सुरवातीला त्यांना खिडकीत खाणं द्यायचो. नंतर ते वळसा घालुन लिव्हिंग रूमच्या बाल्कनी मधुन खाणं घ्यायला लागले. हळूहळू लिव्हिंग/बाल्कनी च्या दाराजवळच्या खुर्चीवर येऊन सांगायचे .... अाता वाढा... भूक लागली...
आणि आता तर चक्क लिव्हिंग रुमच्या मध्यभागी खुर्चीवर बसून तीच Demand करतात.....
निरु, तुमचं घर आणि इंटेरिअर
निरु, तुमचं घर आणि इंटेरिअर सुद्धा खूप नॅचरल इफेक्ट वालं दिसतंय. भिंतीचा इफेक्ट, ती पांढरी खुर्ची.. जस्ट वॉव!!
निरु, तुमचं घर आणि इंटेरिअर
निरु, तुमचं घर आणि इंटेरिअर सुद्धा खूप नॅचरल इफेक्ट वालं दिसतंय. भिंतीचा इफेक्ट, ती पांढरी खुर्ची.. जस्ट वॉव!! स्मित >> +१०००००..
मोरपिसांच्या बाजुची आरामखुर्ची आहे न? मस्त..
कावळा कावळीनी .. कसले धीट आहे. ते पाळीव झालेत वाटत आता
वॉव मस्त घर, निरु.
वॉव मस्त घर, निरु.
आमच्या इमारतीचे रंगकाम चालू
आमच्या इमारतीचे रंगकाम चालू असताना परांची बांधली होती. त्यावरुन बाल्कनीत आलेला छोटासा अनाहूत पाहुणा..
नीरु तुमच्याकडे आपले पूर्वज
नीरु तुमच्याकडे आपले पूर्वज आले पाहुणे म्हणून
छान सर्वांनाच तुमचं घर आपलंस वाटते, किती विश्वासाने, आपुलकीने येतात तुमच्याकडे. ग्रेट.
अन्जू, पूर्वज म्हटल्यावर दोन
अन्जू,
पूर्वज म्हटल्यावर दोन मिनीटासाठी माझ्या डोक्यात निरू यांनी पहिले टाकलेला कावळा आला आणि मग माकड ..
आता एक पुर्वज दुसरा आत्मा अस म्हणूया का ?
टीना, अग माकडांना माणसांचा
टीना, अग माकडांना माणसांचा पूर्वज समजतात ना
हो गं ते बरोबरे.. म्हणजे माकड
हो गं ते बरोबरे..
म्हणजे माकड पुर्वज आणि कावळा म्हणजे आत्मे असं..
(No subject)
टिना आणि सायली यांच्यासाठी
टिना आणि सायली यांच्यासाठी विशेषतः ......
झाडाच्या ढोलीत बसलेले -Spotted Owlet from Kanha, M.P. (Courtesy-: Yuwaraj Gurjar...)
कॉमन टेलर बर्ड आणि मुनिया एकच
कॉमन टेलर बर्ड आणि मुनिया एकच का? कोणी सांगू शकेल.
Kay mast tiplayat to
Kay mast tiplayat to ghubdacha photo
To pan dholi sakat.... Dhanyawad..
Tumch ghar phar surekh aahe.... Ek ek vastu prekshaniya aahe ..
Baithak kholit asa kawala yeun basalela pahlyandach pahate aahe.
Jagu khar mast
Nahi donhi veg vegale
Nahi donhi veg vegale aahet..
निरु गुलजार.. लाख लाख
निरु गुलजार.. लाख लाख धन्यवाद.
कसल रुबाबदार आहे ते..
याच्याजवळ जातय ना जरासं .. बघा मी आधीच एक क्लोन करुन ठेवलाय ..
इथ हा प्रचि टाकल्याबद्दल समस्त निसर्गकर्स ची मनापासुन माफी ..
सध्या कडुलिंबावर खूप वेगवेगळे
सध्या कडुलिंबावर खूप वेगवेगळे पक्षी येताहेत. त्यात नवीन म्हणजे पोपट आणि कोणते तरी वेगळेच पक्षी आहेत जे एकमेकांशी संवाद केल्यासारखे शीळ घालत रहातात. खूप गोड.
बाकी आपले कावळे चिमण्या होले बुलबुल, सन्बर्ड्स, साळुंख्या, ककधीमधी वेडे राघू.
पण आजिबात दिसत नाहीत. शीळ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला पण गल्लीतल्या मुलांचा गोंगाटच जास्त ऐकू येतोय त्यात.
आणि पोपटाचे लांबून फुट्टु काढलेत पण आता निरूच्या फोटोनंतर इथे डकवावेसे नाही वाटत.बाकी निरू...घुबड ऑस्समच!
. बघा मी आधीच एक क्लोन करुन ठेवलाय ..>>>>>>>>>>>>टिने तू पण ना..........
मानुषी
मानुषी
डकवा बिनधास्त मानुषीताई,
डकवा बिनधास्त मानुषीताई, तुम्ही छान फोटो काढता.
ओह...अन्जू तुमाखमै गं बै!
ओह...अन्जू तुमाखमै गं बै!
जोक अपार्ट ...अन्जू हौसलाअफजाईके लिये शुक्रिया.
Pages