निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Niru Guljar tumchyakade ek gtg. karavach lagel.

apratim photo aahe chinchechya jhadacha. mala balpan aathavale. aamachyakadehi asach phulancha sada aani savali asayachi chinchechi.

Jaguji, Anytime...
Will post १ more pic so you will be more tempted to arrange gtg.

ओएम जी.. चिंचे चं झाड, तो बाक्,ती फुलांची पखरण... जस्ट अमेझ्ड!!!!
जागु रिअली एक गटग तो बनताईच है..
Happy

.

.

अरे वा. चिंचेच्या झाडाखालचा फोटो फार सुंदर आहे.
खरच झाडाखालचे गटग करायला हवे Happy

जागू, अनंत कित्त्येक दिवसांनी पाहिला.

हा आमचा फेसाळणारा समुद्र. पंधरा दिवसातून एकदा जरी फेरी मारली तरी ह्याला पाहून सगळा थकवा निघून जातो.

ह्या दगडांवर खेकडे फिरत असतात Lol

तो बाकडाही अशाच फांद्यापासुन केल्यासारखा वाटतोय.>>>>साधना मलाही हाच विचार आला.
निरु काय सुंदर वर्णन केलंय!
जागू सग्ग्ळे फोटो सुंदर.
तो अनंताचा फोटो डकवलायस ना वर..............तस्सा एका प्रो.फोटोग्रफरने फेबु वर टाकलाय...पांढर्‍या फुलाचा.
त्याला नाव दिलंय..............Soul drenched in love! फोटो जास्त सुंदर की नाव!!!!!!!!!!

चिंचेखालची जागा म्हणजे -
कल्पनेचा प्रांत | तो माझा एकांत|
तेथ मी निवांत | बैसइन ||>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
अदिजो...................मस्त मस्तच! हे कशातलं आहे?(घोर अज्ञान!!)
सांगलीला आम्ही रहात असू तिथून कृष्णा नदीकडे जाणारा एक बोळ होता. अगदी चिंचोळा रस्ता. समोरासमोरून २ दुचाक्या जातील कश्याबश्या..पण त्या बोळात दुतर्फा चांगली ५/६ चिंचेची झाडं होती.
........." तिनसांजेच्या वेळी चिंचेच्या बोळातून जाऊ नको गं" अशी घरातल्या मोठ्यांची सक्त ताकीद असे.(काही तरी पूर्वीच्या समजूती.....भूत बाधा इ.इ.)
पण निरूनी वर्णन केल्याप्रमाणे तिथेही इतकं मस्त वाटायचं ना की अस्मादिक बर्‍याच वेळा डुलत डुलत, रमत गमत, पडलेल्या सड्यातलं एखादं चिंचेचं ताजं फूल उचलून मटकावत या चिंचेच्या बोळातूनच आगमन निर्गमन करणार! Proud

जागू फोटो सुंदर.

तो अनंताचा फोटो डकवलायस ना वर..............तस्सा एका प्रो.फोटोग्रफरने फेबु वर टाकलाय >> जागू प्रो. फोटोग्राफर पेक्षा कमी आहे की काय ?

बादवे चिंचेचं एवढ खाली आलेल झाड मी प्रथमच बघितलं मी चिंचेचे मोठे वृक्षच पाहिलेत. कलम आहे का ?

निरु, ते किडे आमच्या पारसिक हिलवर मी पाहिलेत पण त्यांच्यावरची नक्षी मी पाहिली नाही की ती नाहीच आहे हे मला माहित नाही. आमच्याकडचे किडे हे दोन तिन मीमी आकाराचे आणि मी सवापाच फुट उंचीवरुन त्यांना पाहणार. त्यामुळे नक्षी आहे की कसे हे ते किडेच जाणोत. आता हे किडे नसणार, मे महिन्यात पाहिलेत भरपुर. पुढच्या वेळेस खाली बसुन नीट निरिक्षण करेन त्यांचे.

शोभा, एका फुलाने गुपचुप रंगांतर केले की काय??????????

चिंचेच्या झाडाखाली मला वाटतं रात्रीच्या वेली हवा अशुद्ध असते म्हणून तसे संकेत आहेत. अशी एक कथाही वाचली होती. दूरवर निघालेला प्रवासी चिंचेच्या झाडाखाली रोज रात्री झोपत असे तेव्हा त्याची प्रकृती खालावली. मग त्याच्या गुरुने त्याला कडूनिंबाच्या झाडाखाली झोपण्याचा सल्ला दिला.. बगैरे.

शोभा, एका फुलाने गुपचुप रंगांतर केले की काय??????????>>>>>>>...हो. बाकी सगळी फ़ुले लाल आहेत. हे एकच असं जन्मलं Happy

साधना ताई ,
तो बाक बांबू पासून बनवला आहे.
अश्विनी ताई ही जागा बदलापुरला आहे
अदिजो,
"चिंचेखालची जागा म्हणजे -
कल्पनेचा प्रांत | तो माझा एकांत|
तेथ मी निवांत | बैसइन ||"
छानच... अगदी असेच वाटते तिथे...
मनीमोहोर,
कलमी चिंच नाही. आपोआप आलेली आहे.

आमच्या बागेतून जाणाऱ्या पावसाळी प्रवाहावर बांधलेला बांध आणि त्यावरचा धबधबा.
भिंतीची उंची अदमासे ६' फुट...
_IMG_000000_000000.jpg

चिंचफुलांची पखरण!
भिजून सुखावलेला अंनत!!!!
डल्ला मारणारी मांजर!!!!
चांदण्यानी बहरलेला मदणबाण!!!

वा!!! काय नावे दिलीत एकेकाला.

हा धागा काहीतरी औरच झाला आहे. माझ्या ऑफीसच्या वाटेवर इतके काही दिसत राहते की जवळ स्मार्टफोन नाही ह्याची उणिव भासते. परवा एका झाडोर्‍यात मी सोनटक्का पाहिला. रोज वास येत होता पण दिसत नव्हता. आज सकाळी ऑफीसमधे जाताना डोक्यावर एक पिकून तडकलेला मोठा आंबा खाली पडला. मी वाट बघून होतो कधी माझ्या वाटेवर एखादा आंबा पडतो.

निरु गुलजार, आणि हि तुमची बाग आहे.. देवा.. मला तर आजकाल निसर्ग पन असा सापडत नाही आणि तुमची बाग इतकी सुंदर..क्या बात

फोटो, वर्णनं सर्वच सुंदर.

नीरु लकी आहात, फ्फार सुंदर बाग आहे तुमची. ते चिंचेचे झाड, बाकडं फार छान आणि तो धबधबा, क्या बात है. मस्तच.

Pages