निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डल्ला मारण्यासाठी गुपचुप टेहेळणी

आणि शत्रूची चाहूल लागताच जिना मार्गाने पलायन

सावली, तुझी प्रोफेशनल नजर ,जबरदस्त आहे स्मित एकदम तेरे कॅमेरे जैसी !! >>>>> येस्स.....+ १००
निरु .....केवळ अप्रतीम फोटो

निरू गुलजार, तुम्ही टाकलेले फोटो केवळ अप्रतिम .....

युवराज गुर्जर >>>>> ग्रेट फोटो, शब्द नाहीयेत कौतुक करायला .....

सावली, तुझी प्रोफेशनल नजर ,जबरदस्त आहे स्मित एकदम तेरे कॅमेरे जैसी !! >>>>> येस्स

असचं म्हणते

निरू गुलजार, जब्बर्र्दस्त फोटो. तुम्ही आणि तुमच्यामुळे युवराज गुर्जरही यानिमित्ताने नि.ग. शी जोडले गेलात हे मस्त झाल Happy

निरु गुलजार, थँक्यु, इथे नाव दिल्याबद्दल. Happy आणि तुम्ही इथे येऊन नवनविन माहिती दिल्याबद्दल.

लोक्स, फोटो किती क्रिस्प, क्लिअर आणि परफेक्ट आहेत आणि किटक + कॅमेरा दोन्हीची माहिती किती व्यवस्थित आहे ते बघा. युवराज गुर्जर यांच्या फोटोखाली अशा प्रकारे नेहेमीच लिहीलेले पाहिले आहे. हे काम त्यांच्यासारख्या प्रोफेशनलचे असावे हे लक्षात यायला खरंच काही फारसे स्किल्स लागणार नाहीत Happy
( afterthought- पण तरिही मी इतक्या चटकन नाव लिहायला नको होते. नुसते विचारयला हवे होते, दुसरा कोणी फोटोग्राफर असता तर....)

जागु, मस्त!
हा Buff striped keelback आहे. नानेटी.
कालच आमच्या ऑफिसशेजरी दिसला, तेव्हा एकीने सांगितले याचे नाव, म्हणून मला माहिती Happy

ही नानेडी आहे. ही रविवारी पाहिली की ७ नानेड्या दिसतात असे काहीतरी म्हणायचे आता काही आठवत नाही नक्की काय ते.

ही काही करत नाही. आपल्याला पाहून पळून जाते.

माझ्याकडे फुललेला मदनबाण.>>>>> प्रचंड हेवा.चांदण्यांनी फुललेले झाड पाहून खूप छान वाटले.
माझ्या कुंडीतला मदनबाणाला ३ ऐवजी ५ फुले लागली की काय कौतुक वाटते.

फुललेला मदणबाण! अहाहा!
पळ काढणारी माऊ Happy
नानेटी किती मोठी आहे! सात नानेट्या प्रकार मीही ऐकला होता लहानपणी.

वाह, फुला,झाडांबरोबर पक्ष्या,कीटकांची नांवांच्या ज्ञानात भर पडणार...

मस्त.मस्त.मस्त.. फीलिंग लकी!!! Happy

आमच्या बागेची जागा घेतली तेव्हा आधीच्या मालकाने हे एक चिंचेचे झाड सोडून बाकी सर्व जंगली झाडे, फळझाडे लावण्यासाठी JCB, Bulldozer ने तोडून टाकली होती.
मग आम्ही ह्या चिंचेच्या झाडाला कात्री पण लावली नाही. हळूहळू त्याच्या फांद्या अगदी जमिनीला टेकतील एवढ्या वाढल्या. एक एकदम Cozy,Comphy जागा तयार झाली झिरमिळत्या सावलीची. त्या उजेड कमी, अंधार जास्त अशा जागेत बसल्यावर बाहेरच्या माणसाला दिसायचो पण नाही एकदम पटकन...
अगदी करवंदाच्या जाळीत बसलेला वाघ असल्याचा Feel यायचा....
आणि कधी वार्‍याने झाडाची फुले गळून पडली की अशी...
चिंचफुलांची पखरण पसरायची....
IMG_20150630_232942038.jpg

वा किती सुंदर फोटो आणि वर्णन. तो बाकडाही अशाच फांद्यापासुन केल्यासारखा वाटतोय. हिचकॉकच्या एखाद्या गुढपटातील सिन आता सुरू होईल असे वाटतेय Happy

साप दिसला की त्याच्या मागुन अजुन सात साप येतात हे खुप ठिकाणी वाचलेले. याचे कारण एका लेखात वाचायला मिळाले. मिलनाच्या ऋतुत सापिणीच्या मागावर साप असतात. आपल्याला साप पाहुन तो मेल की फिमेल हे कळत नाही. कित्येक वेळा साप दिसला की मारला जातो. जर मारला गेलेला साप फिमेल असेल तर तिच्या मागावर असलेले साप वासावरुन हुंगत माग काढत येऊन पोचतात. त्यांना कुठे माहित असते तिची हत्या झालीय ते. यांची संख्या ब-याच वेळा एकापेक्षा जास्त असते. त्यामुळे आपल्याला वाटते की एका सापाच्या मागे सात साप आले. खरी परिस्थिती वेगळीच असते.

हो. म्हणुनच नाग युगुलाचे मिलन चालु असताना हौशी Photographer ना नेहेमिच आजुबाजुला लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
कारण एका यशस्वी नागाकडे Focused झाल्यावर आजुबाजुच्या अनेक असंतुष्ट नागांकडे दुर्लक्ष होणे जिवावर बेतु शकते...

निरु, धन्यवाद!
Silk Cotton Bugs ... गूगलवर शोधलं. हे किडे सिल्क कॉटन ट्री म्हणजे काटेसावरीच्या बिया खातात त्यामुळे जिथे ही झाडे आहेत तिथे हे जास्त करून दिसतात. नावही त्यावरूनच पडले आहे.
चिंचेखालची जागा म्हणजे -
कल्पनेचा प्रांत | तो माझा एकांत|
तेथ मी निवांत | बैसइन ||

Pages