आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२४ जूनला सेऊल येथे बैठक होणार आहे. NSG सदस्यत्वासाठी भारताला अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि रशियाचाही पाठिंबा मिळालाय. जपान आणि ऑस्ट्रेलिया देखिल भारताला सदस्यत्व मिळावे म्हणून पुढाकार घेत आहेत. भारताला विरोध करणारे स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझिलंडने त्यांच्या भूमिकेत बदल करण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे चीन एकाकी पडू लागलाय. त्यातून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एनएसजीच्या ४८ सदस्यांना भारताच्या सदस्यत्वाला विरोध न करण्याचे आवाहन केलंय.

ह्या जोरदार हालचाली सुरु असताना परराष्ट्र सचिव एस. जयशंकर १६-१७ जूनला चीनच्या अघोषित दौर्‍यावर जाऊन आलेत.

बघू काय होतं.

आजच आपल्या परराष्ट्रमंत्रांनी (सुषमा स्वराज) यांनी एनएसजी च्या सदस्यत्वासाठी चीनची आडकाठी नसल्याचे म्हटले आहे.

इंग्रजीत ती बातमी hopeful we can convince china on nsg अशीही वाचली..चीनचा भारताला विरोध नसून तो सदस्यत्वाच्या निकष व प्रक्रियेसंबंधी बोलत आहे असं.त्या म
हणाल्या.
विकास स्वरुप हे फक्त प्रवक्ते आहेत. परराष्ट्र.सचिव एस जयशंकर जाऊन आले चीनला

आपले राष्ट्रपती आफ्रिकेत घाना, Cote d’Ivoire (ह्यो कंचा देश?) आणि नामिबियाच्या दौर्‍यावरुन परतले. भारत अक्षरशः जगातील प्रत्येक देशाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतोय.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/president-mukher...

परराष्ट्र.सचिव एस जयशंकर जाऊन आले चीनला >>>हो चुकून विकास स्वरुप लिहिल. विकास स्वरुप ह्यांनी ती बातमी दिलीय. बदल करते. धन्यवाद.

आत्ता सुषमा स्वराज नक्की काय म्हणाल्या ती बातमी वाचली Happy

आपण अणूकरारावर स्वाक्षरी न करता आपल्याला सदस्यत्व मिळू नये असे चीनचे पहिल्यापासून म्हणणे आहे. आणि आपल्याला मिळालं तर पाकिस्तानलाही मिळावं असं ते म्हणतायत. पण पाकिस्तानची हिस्ट्री (ए. क्यू. खान) विश्वास ठेवण्याजोगी नाही. तरी सुषमा स्वराज म्हणाल्यात की भारताप्रमाणेच एनएसजीच्या सदस्यत्वासाठी प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानच्या सदस्यत्वाचा निर्णय गुणवत्तेवर व्हावा अशी अपेक्षा आहे.

NSG सदस्यत्वात फारसा राम नाहीये.>>> कुठले सदर? मी ऑनलाईन लोकसत्ता बघितलाय.

ताजी बातमी China has said that India's admission to the elite Nuclear Suppliers' Group (NSG) is not on the agenda of the grouping that started a plenary session in Seoul today.

The statement is being seen as a rebuff to India's effort to join the NSG, especially a day after Foreign Minister Sushma Swaraj expressed optimism and said Beijing is only talking of "procedure".

एवढ्या लवकर हे सहज शक्य होईल असे वाटत नाही. पाक ने भारताची बरोबरी करणे आणि त्या मुद्याला चीन ने उचलुन धरणे यातच त्याच उत्तर आहे.

NSG सदस्यत्वा साठी किती सदस्यांचा पाठिंबा लागतो? की सर्वांचे एकमत असावे लागते?

एकमत असावे लागते. म्हणून तर चीनमुळे प्रॉब्लेम आहे. फ्रान्सनेही पाठिंबा दिलाय आता. तुर्की आणि दक्षिण आफ्रिकाही वळवण्याजोगे आहेत. एस. जयशंकर रवाना झाले सुद्धा सेऊलला.

ANI च्या ट्वीटर हँडल वर बातमी वाचली की भारत आणि चीन यांमधील आर्थिक / व्यापारी स्तरावरील चर्चा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कदाचित NSG सदस्यत्वासाठी दबावतंत्र असेल.

The meet has been deferred as Department of Economic Affairs Secretary Shaktikanta Das could not attend the meeting.

आजच श्री. अरुण जेटली चीन दौर्‍यावर जाणार आहेत.

धागा --> http://www.aninews.in/newsdetail4/story269265/india-china-financial-dial...

नागालँड विषयी ज्या उलट सुलट बातम्या येत आहेत, त्याच्या बद्दल कुणाला माहीती असल्यास येथे पोस्ट करावी.
धन्यवाद.

<कदाचित NSG सदस्यत्वासाठी दबावतंत्र असेल.

The meet has been deferred as Department of Economic Affairs Secretary Shaktikanta Das could not attend the meeting.>

ही बैठक पुढे ढकलण्याचं कारण ब्रेक्झिट परिणामांचा सामना करण्यासाठी त्यांनी भारतात असणं आवश्यक आहे असं आकाशवाणीवरच्या सरकारी कार्यक्रमात ऐकलं, पण लगेच पुढल्या वाक्यात जेटली एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकीसाठी चीनला जात असल्याचं सांगितलं.

आज सगळ्या जगाचे डोळे ब्रिटनच्या ब्रेक्झिट पोलकडे लागलेत.

ज्या NSG च्या सदस्यात्वाबद्दल एव्हढी चर्चा चालू आहे, त्या NSG च्या सभासदांचे काम काय असते? जे असते ते करण्यात त्यांना कितपत यश आले आहे, कधी?

समजा, कुणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केले नाही तर ते काय करतात? उदा. त्यांनी ठरवले की उत्तर कोरिया, आयसिस इ. ना Nuclear supplies द्यायचे नाहीत तरी कुणितरी कसे तरी ते करण्याचा प्रयत्न केला, किंवा केले तरी ही समिती काय करू शकते? तसे कुणि करू नये म्हणून हे कुठे कुठे कसे कसे लक्ष ठेवतात?

कदाचित ते म्हणत असतील ती जबाबदारी प्रत्येक देशाची आपल्या आपल्या देशापुरती आहे. पण जबाबदारी देशातील राजकीय पुढार्‍यांवर असते, नि अमेरिकेत तर काय, पैसे दिले तर हे लोक काय वाट्टेल ते करतात.

मला काहीच कल्पना नाही म्हणून विचारले.

ब्रेक्झिट चा पहिला परिणाम म्हणून भारतीय शेअरबाजार गडगडला. १० वाजण्यापूर्वीच ३% टक्के घट झालीय.

ह्म्म.

त्याचा ब्रिटनवर, उर्वरित युरोपवर आणि आपल्यावर काय परिणाम होईल? मतदानापुर्वी काही तास ब्रिटन महासंघात राहावा हा पर्याय निवडणार्‍यांची वाढ झाली होती. ब्रिटनचे पौंड स्टर्लिंग आणि इंधन वधारले होते. सोने घसरले होते.

बहुतेक करून ब्रिटन युरोपिअन महासंघामधून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आधीपासून होता असे दिसून येते.
२००५-२००८ च्या दुहेरी जागतिक मंदी मुळे युरोप मधे जी मंदी आली होती तिचा परिणाम खोलवर झाला. इटली, स्वीडन ग्रीस, इ बरेचसे देश यामंदीच्या गर्तेत सापडलेले. ग्रीसची परिस्थिती तर आधीपासून दिवाळेखोरीच्या सांगाड्यावर उभी होती तिला धक्का या मंदीने दिल्याबरोबर ती पत्त्यासारखी कोसळली. ग्रीसला 'बेलआउट' देण्याच्या निर्णयावर युरोपमधे गट पडलेले. जर्मन ने ग्रीसला दिलेल्या बेलआउट चा सुध्दा देशातंर्गत विरोध झालेला " आम्ही का म्हणून वाचवू? आम्ही आमचा देश आधी वाचवला पाहिजे सारखे मत बर्‍याच जणांची होती.
आर्थिक मंदीमुळे स्वतःचे सोडून दुसर्‍याला वाचवण्याची भुमिका सगळ्यांची नसते. इंग्लंड मधे हजारो लोकांच्या नोकरीवर गदा आली होती इतकेच काय पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या आईची नोकरी सुध्दा मंदीमुळे गेली. सहाजिक युरोपिअन देशांमधल्या आर्थिक स्थितीचा भार ब्रिटन आणि जर्मनी यांच्यावर जास्त प्रमाणात होता. परंतू त्याप्रमाणात त्यांना परतावा मिळत नव्हता. कॅमेरून यांनी युरोपिअन महासंघाकडे ब्रिटन संघात राहिल्यास मोबदला , इ. जास्त मिळावा याची विनंती केली होती. ती मागणी मतदानापर्यंत मान्य झाली नव्ह्ती. याचा सुध्दा विचार जनतेने केला असेल.
तसेच स्कॉटलंड देशाने ब्रिटन बरोबर राहण्याचा ठराव गेल्याच वर्षी पास केला त्यामुळे ब्रिटनची आर्थिक सामाजिक बळकटी कायम राहिली. स्कॉटलंड खनिजसमृध्द देश आहे. याचा फायदा इंग्लंडला होणार आहे. म्हणून युरोपातून बाहेर पडण्यासाठी लोकांची ओढ वाढली असेल. ही झाली आर्थिक बाजू

सामाजिक बाजू मधे विस्थापितांची समस्या खासकरून सिरिया लिबिया सारख्या देशातून येणार्‍या प्रचंड विस्थापितांमुळे फ्रांस, जर्मन ब्रिटन इ देशांची सुरक्षितता आणि सामाजिक स्थैर्य धोक्यात आले आहे असे तिथल्या जनतेला आता प्रकर्षाने वाटू लागले आहे. यामागे "काही जणांचा प्रचार" "अतिरेकी हल्ले" "मुस्लिम लोक" इ. कारणे प्रामुख्याने आहे. "आमच्याच देशाच्या लोकांसाठी देशात नोकर्या मिळत नाही मग या लोकांसाठी कुठून नोकर्‍या निर्माण करायच्या?" हा ही प्रश्न तिथली लोक विचारू लागली आहे. तिथे लोकांच्या रहाण्याची नोकरीची जवाबदारी सरकारची आहे. नियमित गलेलठ्ठ भत्ते हे इंग्लंडची खासियत आहे. हे तिथल्या स्थानिक लोकांना मिळेपर्यंत इतर लोकांना काहीच प्रोब्लेम नव्हता परंतू हेच फुकटचे भत्ते विस्थापितांना सुध्दा मिळू लागले हे इंग्लंडमधल्या टॅक्सपेअर लोकांना अजिबात रुचत नाही आहे. याचा विरुध्द पण लोक एकवटले आहे. आम्हाला आमचा देश आमच्या सोईनुसार सांभाळू द्या" अशी मागणी लोकांच्यामनात येणे ही आश्चर्याची बाब ठरत नाही.

पुढे फ्रांस, जर्मनीमधून सुध्दा महासंघातून बाहेर पड्ण्याची मागणी आली तर युरोपसंघ निश्चितच अडचणीत सापडणार. आणि ही मागणी १-२ वर्षात निश्चितच येण्याची शक्यता आहे.

पुढे फ्रांस, जर्मनीमधून सुध्दा महासंघातून बाहेर पड्ण्याची मागणी आली तर युरोपसंघ निश्चितच अडचणीत सापडणार. आणि ही मागणी १-२ वर्षात निश्चितच येण्याची शक्यता आहे. >>>> हॉलंडमधील अती-उजव्या विचारसरणीच्या पक्षाने (Party for Freedom) मागणी केलीच आहे.

ब्रिटन बाहेर पडल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार ३% कोसळला, डॉलरच्या तुलनेत रूपया घसरला अश्या बातम्या येत आहेत. जर युरोपियन संघ कोलमडला तर त्याचे जगाच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल का?

अमेरिकी गुप्तचर विभागातील सूत्रांनुसार पाकिस्तान अजूनही उत्तर कोरियाला आण्विक साहित्य अवैधरित्या पुरवतोय. भारतापेक्षाही पाकिस्तानकडे अधिक विश्वासार्हता असल्याचे प्रतिपादन करणार्‍या पाकिस्तानचे आणि चीनचे ह्यावर काय म्हणणे आहे ते कळेलच. 'पाकिस्तान एनर्जी कमिशन' उत्तर कोरियाला हे साहित्य जहाजाने पाठवतंय. उत्तर कोरिया सारख्या सारख्या अणुचाचण्या करतंय आणि दक्षिण कोरिया, जपान व अगदी अमेरिकेलाही आण्विक हल्ल्याच्या धमक्या देतंय. असं असताना पाकिस्तानची कसली आलीय विश्वासर्हता?

इराणमधल्या पाकिस्तानी दूतावासाला २०१२-१५ ह्या काळात उत्तर कोरियाच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी ८ वेळा भेटी दिल्या होत्या आणि त्यातच ह्या आण्विक सहकार्याच्या वाटाघाटी झाल्या असाव्यात. पाकिस्तान उत्तर कोरियाला युरेनियम पुरवतंय असा आरोप आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनाही ही माहिती मिळालीय आणि भारताची ह्याकडे नजर आहे अशी बातमी मध्यंतरी होती. पाकिस्तान उत्तर कोरियाला पुरवत असलेले आण्विक साहित्य आणि इंधन पाकिस्तानला चीनकडून मिळाल्याचेही बोलले जातेय. म्हणजे भारताला रोखण्यासाठी अण्वस्त्र प्रसारबंदीवर शाळा घेणारा चीन स्वतःच ह्या उचापती करतोय अशी टीका भारतीय मुत्सद्दी करतायत. येवू देत पाकिस्तान आणि चीनही अडचणीत आता.

टाटा मित्तल महिंद्रा इ भारतीय कंपण्यांची उलाढाल ब्रिटन आनि युरोप मधे मोठ्याप्रमाणात आहे. ब्रिटन वेगळा झाल्यावर मिळणार्‍या सवलती, व्यापार करण्याचे मार्ग बदलणार आहे याचा परिणाम होईल तसेच. देश वेगळा झाल्यावर तिकडचा व्यापार वेगळा आणि इकडचा वेगळा करावा लागणार. ब्रिटन वेगळे झाल्यावर कोणकोणते कडक नियम नव्याने करते यावर सुध्दा बाकीचे अवलंबून आहे

टाटा मोटर्स ९% व टाटास्टील ७.५% घसरलेत.
कॅमेरूनचा राजीनामा.
स्कॉटलंडला बाहेर पडायचे नव्हते. ६२% लोकांना इयु मधे राहवयाचे होते. इयु मधे राहाणार्‍यांची टक्केवारी ४८.१ इतकी आहे व त्यात स्कॉटलंडचा मोठा वाटा आहे. इंग्लंड बरोबर रहावयाचे की नाही याबाबत स्कॉटलंड मधे परत सार्वमत घेतले जाऊ शकते असेही तेथील लोक बोलू लागले आहेत.

"ब्रिटनने बाहेर पडायचा निर्णय घेतल्याचे कळल्यावर मला आनंद झाला. हा ऐतिहासीक निर्णय आहे. बाहेरून येणार्‍या उपर्‍या लोकांच्या विरोधात (त्या धोरणाविरूध्दचा) हा राग आहे. हा राग सगळ्या जगामधेच आहे. आम्ही (अमेरिका) बाहेरून येणार्‍यांबाबत कडक आहोत. अन्यथा आमच्या इथेही अस काही घडायला लागले असते." डोनाल्ड ट्रंप

सगळ घडायला अजुन वेळ आहे. ब्रिटनला युरोपियन महासंघाबरोबर परत वाटाघाटी करव्या लागतिल त्या नंतर हे शक्य होईल. नविन वाटाघाटी केल्यानंतर पर एकदा त्या बद्दल सार्वमत घेण्याचा मार्ग ब्रिटन वापरु शकते.

पूर्णपणे ब्रिटन २०१९ मधेच बाहेर पडूशकेल. अजुन बरेच काही होणे बाकी आहे. ज्या कंपन्या ब्रिटन मधुन बाकी युरोपियन देशाना सेवा पुरवतात त्यांना बर्‍याच बदलांना सामोरे जावे लागेल.

Pages