आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौदी अरेबिया व मित्रदेशांचे येमेनमधील हौथी बंडखोरांवर जोरदार हवाई हल्ले.

इराक व सिरियामधील दहशतवाद्यांकडे जगाचे लक्ष वेधले गेल्यामुळे येमेन मधल्या हौथी बंडखोरांकडे जागतिक पातळीवर दुर्लक्ष झाले होते. इराणच्या समर्थनाने हौथी बंडखोरांनी येमेन मधील राष्ट्राध्यक्ष हादी ह्याचे सरकार उलथवून टाकले आणि राजधानी साना व हादींच्या सरकारी निवासस्थानाचा ताबा घेतला होता. सद्ध्या येमेनची राजधानी सानासह साऊथ येमेनचा बराचसा भाग ह्या बंडखोरांकडे आहे.

हादी समर्थक असलेल्या देशांचे दूतावास, नागरिक ह्यांच्यावर हल्ला चढवण्याची धमकीही हौथी बंडखोरांनी दिली होती. या धमकीनंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांना येमेन सोडावयास सांगितले. सानामधील दूतावास बंद करुन आपले लष्कर मायदेशी बोलावून घेतले. भारताने देखिल तिथे असलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याची सुचना केली आहे.

ह्या बंडखोरांवर सौदी आणि अरब मित्र राष्ट्रांनी काल चढवलेल्या हवाई हल्ल्यात १० देश सहभागी असून इजिप्त, पाकिस्तान, सुदान आणि मोरोक्को हे ही लवकरच सामिल होतील. हौथी बंडखोरांच्या दहशतीमुळे आपल्या दक्षिण सीमारेषेला धोका निर्माण झाल्याचे सांगून सौदीने १०० लढाऊ विमाने व दीड लाख सैनिक तैनात केले होते. ह्या हल्ल्यात प्रमुख मोहम्मद अली अल-हौथी जबर जखमी झाल्याबद्दलच्या उलट सुलट बातम्या आहेत. येमेनला वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ह्या संघर्षात सामिल व्हावे अशी विनंती राष्ट्राध्यक्ष हादींनी केली.

हा संघर्ष येमेनचा अंतर्गत (हादी सरकार आणि हौथी बंडखोर) असला तरी ह्या हल्ल्यांमुळे सौदी विरुद्ध इराण असे स्वरुप येऊ शकते कारण इराणने येमेन वरील हल्ले थांबवायचे आवाहन केले आहे व हौथी बंडखोरांना सत्तेमध्ये स्थान मिळावे ह्यासाठी इराण आग्रही होता.

ऑलरेडी अल कायदा, आयएसचे येमेनमध्ये अस्तित्व आहेच.

फ्रांसमधे जर्मनविंग्ज चे एक विमान सहवैमानिकानेच पाडले. भयानक प्रकार आहे तो. कुणीही वाचले असण्याची शक्यता नाही. यात कुणा अतिरेक्याचाही हात नाही. विमान कंपन्या तरी आणखी काय सुरक्षा बघणार ?

अश्विनी - खूप माहितीपूर्ण धागा चालू केलास.

जोपर्यंत आपल्याला झळ पोहोचत नाही तोपर्यंत "आपल्याला काय त्याचे" असे वाटून या व अशा कित्येक जागतिक घडामोडी दुर्लक्षिल्या जातात.

या धाग्याच्या निमित्ताने "एक डोळा" या बातम्यांवरही राहील.

शुभेच्छा !

अश्विनी के,

>> हा संघर्ष येमेनचा अंतर्गत (हादी सरकार आणि हौथी बंडखोर) असला तरी ह्या हल्ल्यांमुळे सौदी विरुद्ध इराण असे
>> स्वरुप येऊ शकते

ते तसेच आहे अगोदरपासून! Happy

आ.न.,
-गा.पै.

आपल्यकडे मागे खाजगी विमान कंपन्यात काम करणार्‍या वैमानिकांनी त्यांना ज्या परिक्षा द्याव्या लागतात त्यात घोटाळे करुन नोकर्‍या मिळवल्याची बातमी होती.

हे राम.

'साऊथ चायना सी' मधील कॄत्रिम बेटे भारतासाठी चिंतेची बाब

साऊथ चायना सीमध्ये चीन जी कॄत्रिम बेटे उभारत आहे, त्यामुळे या सामरिक आणि धोरणात्मकदॄष्ट्या महत्वाच्या प्रदेशावर चीनची पक्कड बळकट होईल. पण यामुळे या क्षेत्रांतील देशांबरोबर व्यापारी व सामरिक सहकार्य प्रस्थापित करून "अ‍ॅक्ट इस्ट" धोरण हाती घेणार्‍या भारताची ही येथील गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.

हो दिनेश. वैमानिक, गाड्यांचे ड्रायव्हर, मोटरमन ह्यांच्यावर सगळ्या पॅसेंजर्सची जबाबदारी असते आणि आपणसुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकून निर्धास्तपणे प्रवास करत असतो...करायलाच हवा. कठिणच आहे.

आशिका,
चीनला संपूर्ण साऊथ चायना सी वर नियंत्रण हवे आहे. हा इंधन समृद्ध प्रदेश तर आहेच पण ह्या सागरी मार्गाने व्यापारी वाहतूकही बरीच असावी. त्यामुळे ह्या बेटांवर जर चीनने हवाई, नौदलाचे तळ उभारले तर आपल्या south east कडल्या हितसंबंधांसाठी तू म्हणतेस तसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकत (धावपट्टी उभारली आहेच बहुतेक). कारण south east asian countries शी आपले ऊर्जा आणि इंधनाबद्दलचे अनेक करार, गुंतवणूक आहे. पण चीनला भारताचा तिथला प्रभाव खपणार नाहीच.

साऊथ चायना सी च्या ऑलमोस्ट ९०% भागावर चीन हक्क सांगतोय. आसियन ने ही साऊथ चायना सी मधल्या चीनच्या हालचालींवर टीका केली होती. हा वाद सोडवण्यात चीन आडमुठा राहिला तर फिलिपाईन्स वगैरे बाकीचे देशही त्यांना उत्तरा दाखल असेच प्रोजेक्ट्स चालू करतील.

दिनेश,

एक वैमानिक कॉकपिटमधून बाहेर आलेला होता असे आज वर्तमानपत्रातून समजले. त्यात म्हंटले आहे की त्या अवधीत सह-वैमानिकाने विमान खाली आणले होते.

जीओ पॉलिटीक्स वर धागा. मस्त कल्पना.

येमेन मधे जे शिया बंडखोर आहेत त्यांच्या विरुद्ध साउदी ने उघडलेली आघाडी आहे आणि त्यामुळेच इराणचा त्याला विरोध आसावा.

तेलाचे भाव अचानक वाढण्यामगे हे मत्वाचे कारण आहे. तरी दुसर्‍या बाजुला जर ईराण बरोबर अमेरिकेची बोलणी यश्श्वी झाली तर ईराणचे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात विकायला येईल आणि परत पुरवठा वाढल्याने भाव खाली येवु/ स्थिर होवु शकतात.

बेफी, ९/११ नंतर असा नियम केला आहे कि एक पायलट कुठल्याही कारणाने कॉकपिट बाहेर आला तर एका केबिन क्रू ने कॉकपिट मधे जाऊन थांबायचे ( कारण वैमानिकानेच आत्मघात केल्याच्या काही घटना त्यापुर्वीही घडल्या आहेत ) पण या विमानात हा नियम पाळला गेला नाही.

होय, पण जो सहवैमानिक आत थांबला होता त्याची पार्श्वभूमी दहशतवादाशी संबंधीत नसल्याचा निर्वाळाही देण्यात आलेला आहे. तसेच ऐकू आलेले संभाषणही हरकत घेण्याजोगे वाटत नसल्याचे सांगितले गेले आहे.

एकुण हा प्रकार विचित्रच आहे असे मानावे लागेल.

अजून एम एच ३७० चा काहीही मागमूस लागलेला नाही.

दिनेश, हा नियम अमेरिकेत आहे पण युरपमधे सगळीकडे नाही असं वाचलं कुठेतरी. आता यापुढे बहुदा सगळ्या विमानात सक्तीचा केला जाईल.

धन्यवाद लोकहो.

आपण सगळेच वाचत असतो पण सगळंच वाचलं जात नाही आणि सिरियसली तर नाहीच नाही. म्हणून आपण जे जे वाचू किंवा त्यावर विचार करु ते इथे लिहित गेलं तर बाकिच्यांनाही समोरच मिळेल. ५ टक्के आधीच वाचनामुळे माहित झालं असेल तर १५-२० टक्के तरी अजून कळेल. आणि आपण काही गांबियातल्या अमक्या नदीत नाव उलटली असल्या बातम्या देणारच नाहियोत. पण खरंच सगळीकडे काही ना काही गदारोळ चालू असताना आपण किती अलिप्त असतो, हे जाणवून अस्वस्थ वाटलं आणि हा धागा काढला.

चांगला बीबी, केश्विनी.

आअपल्याला सामरिक नीतीसाठी पश्चिम आणि पूर्व या दोन्ही किनारपट्ट्या सध्या महत्त्वाचय ठरत आहे. पश्चिमेचा धोका काय आहे तो आपण अनुभवला आहेच (२६-११) पण पूर्वेची किनारपट्टी ही स्लो पॉयझन ठरतेय. त्यानुसार आपल्या नौदलाची आखणी सुरू झालेली आहे.

मध्यंतरी रशियाने जोमात सुरू केलेल्या सोनेखरेदीवर आणि सोने-तेल-चलनदर अशा एकमेकात गुंतलेल्या आर्थिक घडामोडींवर खूप रोचक विश्लेषण वाचलं.
http://www.gold-eagle.com/article/grandmaster-putins-golden-trap

http://www.globalresearch.ca/a-major-international-monetary-crisis-is-lo...

वरच गोल्ड्च आर्टिकल बरचस रशियाच्या बाजुने चित्र रंगवणार आहे. आर्थात हे नोव्हेंबर २०१४ च आहे. हे रशियाच विशफ़ुल थिंकींग म्हणता येइल. विषयांतर नको तेव्हा जास्त लिहीत नाही.

वरदा,

पहिल्या लिंकमधलं <<< Putin is not shouting about it all over the world. And of course, he still accepts US dollars as an intermediate means of payment. But he immediately exchanges all these dollars obtained from the sale of oil and gas for physical gold!>>>> हे वाक्य भारी आहे. Really a grandmaster.

दुसर्‍या लिंकमध्ये त्या निमित्ताने COMEX बद्दल माहिती कळली. परत वाचावं लागेल. COMEX नीटसं कळलं की बाकी आर्टिकल समजून घेता येईल.

हो, विशफुल थिंकिंगचा भाग मलाही स्पष्ट दिसतोय. पण त्यातलं किती काय साध्य होतंय्/होऊ शकतं हे बाजूला ठेवलं तरीही एकुणात रशियन्स ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखताहेत ते मला फारच रोचक वाटलं.

केश्वे, कॉमेक्स म्हणजे पूर्वीचं अमेरिकेतलं कमॉडीटी एक्स्चेन्ज ना? जे नंतर न्यूयॉर्क मर्कन्टाईल एक्स्चेन्जमधे सामावलं गेलं? आता मला वाटतं ते बहुतांशी मेटल ट्रेडिंगसाठीच वापरतात. गूगलून बघितलं पाहिजे.

मी ठरवलं होतं की या घडामोडींवर थोडं लक्ष ठेवायचं पण विसरून गेले Proud

केश्वे, कॉमेक्स म्हणजे पूर्वीचं अमेरिकेतलं कमॉडीटी एक्स्चेन्ज ना? जे नंतर न्यूयॉर्क मर्कन्टाईल एक्स्चेन्जमधे सामावलं गेलं? आता मला वाटतं ते बहुतांशी मेटल ट्रेडिंगसाठीच वापरतात. >>> असंच वाटतंय. मी पण कधीतरी वाचलेलं होतं पण मेमरी चिपमधून साफ उडालंय. त्यातून शेअर्स, कमोडिटी एक्स्चेंज वगैरे रुक्ष विषय Proud

पण अश्या शह्/काटशह प्रकरणाच्या निमित्ताने वाचायला आवडतं त्या रेफरन्सने.

या वेळी चीन किंवा इतर देशांनी सोन घेण्याचे मुख्य कारण अमेरिकेने आपल्या अर्थकारणाला गती देण्यासाठी वाढवलेली लिक्विडीटी. अमेरिकेने इतक्या प्रंमाणात डॉलर छापले की डॉलरचे मुल्य प्रचंड प्रमाणात घरसले.

चीन सारख्या देशांनी त्यांचे रीजर्व्स अमेरिकन डॉलर मधे ठेवलेले आहेत त्याचे अचानक झालेले अवमुल्यन त्या देशांना पर्याय शोधण्यास भाग पाडते. नुसतेच सोने नाही तर चीन सरकार डॉलरला पर्याय म्हणुन जपान ऑस्ट्रेलिया युरो या देशांच्या चलनाकडे ही बघत होता. सबप्राइम क्रायसिस च्यावेळी चीनने असेही सुचवले होते की कोणत्या एका देशाच्या चलनात रीजर्व ठेवण्यापेक्षा ते आय एम एफ़ कडे कोणत्यातरी स्वरुपात असावेत ज्यायोगे त्याचे असे अवमुल्यन होणार नाही.

अमेरिकेने प्रचंड प्रमाणात लिक्विडीती वाढवुन आपली अर्थ व्यवस्था वाचवण्या साठी केलेले छुपे अवमुल्यन याला जास्त कारणीभुत आहे

.बाकी कॉन्स्पीरसी थिअरीज नेहमीच मार्केट्मधे चर्चेत असतात.

येमेनमधला लढा मुख्यत्वे सौदी वि. इराण असा आहे. तसेच सौदीच्या पाइपलाइन्स पण आहेत. दुसर्‍या बाजूला इराणबरोबर बोलणी यशस्वी होवू नयेत म्हणुन इस्राएल आणि सुन्नी राष्ट्रे (लेड बाय सौदी) प्रयत्नात आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात सगळी गंमतच असते.
तेलाचे भाव ओपेकने मार्केट फ्लड केल्यामुळे पडले आहेत. शेल/फ्रॅकिंग ऑइलचा ब्रेक इव्हन ७०-८० डॉ. पर बॅलर आहे (असे खाजगी सुत्रांकडून ऐकले). ओपेक देश ५० वर्षे मार्केट फ्लड करूनसुद्धा टिकतील इतकी त्यांची होल्डिंग कपॅसिटी आहे असेही बैठकीत ऐकले. कॅनडाची पण गुंतवणुक मार्केट पडल्याने आर्थिअक दृष्ट्या तोट्यात जाते आहे.

http://csis.org/publication/america-saudi-arabia-and-strategic-importanc...

http://atimes.com/ वर पण नजर ठेवा.

अश्विनी ताई चांगला धागा काढल्याबद्दल अभिनंदन

येमन मध्ये मिडल ईस्टची पहीली मदर रिफायनरी बी पी ने १९५४ ला लावलेली होती, जेंव्हा साउदी मध्ये तेल काढायला सुरुवात झालेली नव्हती. येमेन हा नहेमीच अस्थिर राहीलेला आहे. हा देश ईस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माला पवित्र असा देश असुनही त्या देशाबद्दल कोणालाही आस्था नाही.

येमेन हा देश जागतीक शिपींग लाईन वर अगदी मौक्याच्या जागी आहे. ह्या देशाला एडन सारखा चांगल बंदर
आहे. खनिज तेला शिवाय बर्याच मोठ्या प्रमाणावर ईथे मिनरल्सचा साठाही आहे.
दुबईने बंदराच जागतीक शिपींग लाईन वर आपल वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी येमेनला वेगवेगळ्या आमिषाने
बांधुन ठेवले. त्यामुळे एडन बंदराचा विकास झालाच नाही.

एडन ही ब्रिटीशांची वसाहत होती आणि तेथे काम करण्यासाठी ब्रिटीशांनी भारतातुन बरेच कामगार १९०० च्या
असपास तेथे नेले होते. त्यातले बरेच लोक तिथेच स्थाईक झाले आहेत. एडन मध्ये त्या कामगारांसाठी चाळी
बांधलेल्या आहेत. अजुनही त्या चाळी सुस्थितीत आहेत. त्या मुळे एडनला गेल्यास मुंबईला आल्याचा फिल येतो.

ह्या देशाच्या संपत्तीकडे आणि दुबळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवुन चीनने ह्या देशावर २००० पासुन आपला प्रभाव टाकायला सुरुवात केली होती.

टण्या,

मला वाटतं की अमेरिकेला काहीही करून इराणशी लढाई करायचीच आहे. थेट इराणवर हल्ला चढवणं शक्य नाही म्हणून सौदी व/वा आयसिस मार्गे इराणला सतवायचा हेतू दिसतोय. सौदीतरी इराणशी कशास्तव फुकट पंगा घेईल? म्हणून अमेरिकेने सौदीला शियांचं वर्चस्व कमी करवून देतो अशी चाल सुचवली असल्याचा संशय येतोय. सौदीही अगोदर का कू करीत होता म्हणून आयसिस कडून अमेरिकेने धमकी देवविली. एकंदरीत सीरिया व इराक येथे आयसिसला इराणप्रेरित शिया विरोधक जोरदार टक्कर देताहेत म्हणून अमेरिकेने येमेनचं नवं मैदान खोललेलं दिसतंय.

आ.न.,
-गा.पै.

चांगला धागा.
येमेन ओमानच्या दक्षिणेचा देश. देशाच्या मस्कत या राजधानी पासून १०००+किमी अंतर आहे. काल-परवा पासूनच इथल्या वर्तमानपत्रातून ओमान सरकारने शिक्षण, नोकरी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी येमेन मधे असलेल्या आपल्या नागरिकांना परत ओमान मधे परतण्याचे जाहिर आवाहन केले होते. काल हवाई हल्ल्यात जखमी झालेले अनेक येमेनी नागरिक ओमानमधे वैद्यकिय सुविधांसाठी आल्याची पण बातमी आहे. येमेनचे राष्ट्राध्यक्ष वैद्यकिय तपासणीकरता ओमान मधे आले होते, तसेच पुढे सौदीला गेल्याची ही बातमी होती.

Pages