आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोबाइल वर आहे हो.. उद्या लिहीतो.. स्वराज खरच चांगल्या आहे पण आंतरराष्ट्रीय दबाव काय असतो हे त्यांना आता कळत आहे

ओके जयंत. माझी पण मोबाईलवरून अशीच गडबड होते त्यामुळे समजू शकते. मग मी अती शॉर्ट लिहिते. आत्ताही मी फोनवरूनच आहे.
--्---्---्--

अफगाणिस्तानच्या कंदाहार विमानतळावर ९ तालिबान्यांनी काल मिलिटरी वेशात कॅलॅशनिकॉव्हच्या सहाय्याने हल्ला केला. अनेकांना ओलिस ठेवले. ३७ निरपराधांची हत्या केली गेली.

http://m.timesofindia.com/world/south-asia/37-killed-in-Taliban-siege-at...

पर्यावरण मिटींग मधे काय ठराव पास झाले आपण किती मान्य केले आहे? याची माहीती मिळाल्यास कळवा
मी जावडेकरसाहेबांनाच विचारले आहे बघू देतात का?

बाकी ट्रंम्पला मजबूत बसत आहे फेसबुकवर

जयंत, तुम्ही पर्यावरण मंत्र्यांना कसं विचारलं?

http://www.moef.gov.in/content/india-climate-action-website-cop21 ह्या सरकारी साईटवर काही अपडेट होतं का बघायला हवं.

खाली लेटेस्ट लिंक आहेत. सगळं गिचमिड आहे. मुद्देसूद कुठे मिळालं तर समजायला बरं पडेल.

http://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/paris-outcome-dr...

http://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/paris-climate-dr...

http://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/paris-outcome-dr...

त्यांच्या ईमेल आयडीवर विचारले आहे.
उत्तर दिले तर चांगलेच आहे.
मागे मोदी अमेरिकेला गेलेले तेव्हा बातम्यांमधे बरेच काही आलेले परंतू आरटीआय मधे खुलासा झाला की कोणतेही एमओयुवर स्वाक्षरी झाली नाही.

भारताबरोबर एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या नागरी अणुकरारानुसार कॅनडाने अंदाजे २५० MT युरेनियम भारतात पाठवले आहे. ह्या करारानुसार अंदाजे २७३० MT युरेनियमचा पुरवठा केला जाईल. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी विधेयक सही केले नाही म्हणून ऑस्ट्रेलिया व कॅनडाने हा करार करुन भारताला युरेनियम द्यायला नकार दिला होता पण अमेरिका व फ्रान्सशी भारताने नागरी अणुकरार केल्यावर ऑस्ट्रेलिया व कॅनडाने भारताला अणुइंधन पुरवायला मान्य केले. ह्यामुळे भारताच्या अणूर्जा प्रकल्प पुर्ण क्षमतेने वापरला जाऊन वीजनिर्मितीला चालना मिळू शकते. पुढच्या २० वर्षांत भारताने २७५०० मेगावॅट इतकी अणुऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि त्यासाठी दरसाल २००० MT युरेनियम लागेल. ह्या घडीला भारतात २१ अणुऊर्जा प्रकल्प चालू असून अजून ६ प्रकल्प उभारले जात आहेत. ह्या सगळ्या प्रकल्पांना युरेनियम कमी पडून नये म्हणून भारताने आतापर्यंत ११ देशांबरोबर युरेनियम पुरवठ्यासाठी करार केले आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या जयपूरला पोस्टिंग असलेल्या मोहम्मद सिराजुद्दीन नावाच्या असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग)ला ISचा प्रचार करणे, लोकांना दहशतवादी गटात सामिल होण्यासाठी प्रोत्साहन देणे ह्या आरोपावरुन अटक केली आहे. लिंकमध्ये तो मॅनेजर आहे असे चुकीचे लिहिले गेले आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/indian-oil-executive-arres...

सिरियातील रिफायनरी ताब्यात घेवून IS तुर्कीला तेल निर्यात करत असल्याचे रशियाने आरोप केलेच आहेत. आता भारताच्या फ्लॅगशिप कंपनीत घुसून नक्की काय करायचा बेत आहे IS चा?

http://www.india.com/news/india/indian-oil-corporation-employee-arrested...

नकोऽऽ ती ISची ब्याद इकडे भारतात.

ट्रंप च्या जोडीनी फ्रांस मधे पण मरीन पेन च्या रुपानी आशेचा किरण दिसतो आहे. तिच्या पार्टीनी स्थानिक निवडणुकां मधे ३०+ टक्के मते मिळवलीत.

आमच्याकडे सिरिया मधुन निर्वासित आणण्याच्या कार्यक्रमाला गती मिळते आहे. फेब-२०१६ पर्यन्त २५,००० लोकान्ना आणायचे आहे. निर्वासितान्ना घेऊन आज पहिल्या विमानाचे आगमन झाले.

लोकान्मधे समिश्र प्रतिक्रिया आहे. अत्यन्त हलाखीच्या परिस्थिती मधुन निर्वासित जात आहेत. मदत करणे कर्तव्यच आहे. खरोखरच गरजू असणार्‍यान्ना मदत करण्या बाबत दुमत नाहीच... पण एक भिती यात २-४ लोक काही विध्वन्सक हेतू बाळगुन आले तर ? ०.१ % किव्वा दोन व्यक्ती पण डोकेदुखी ठरू शकतात.

निर्वासितांच्या मुद्द्यावरुन युरोपिय महासंघ फुटण्याची लक्षणं आहेत का? ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन ह्यांनी गेल्या महिन्यात युरोपिय महासंघात सुधारणांची मागणी पुर्ण न झाल्यास महासंघातून बाहेर पडण्याबद्दल इशारा दिला होता आणि आता निर्वासिंतांच्या मुद्द्यावरुनही एक्झिटची शक्यता वर्तवून महासंघावर दडपण वाढवले जात आहे. तसेच जर्मनी, फ्रान्स आणि इतर देश निर्वासितांना आश्रय देण्याच्या मताचे असले तरी पूर्व युरोप व बाल्कन देशांनी विरोध सुरु केला. जर्मनी व फ्रान्सने युरोपात येणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी 'रॅपिड रिस्पॉन्स बॉर्डर कंट्रोल फोर्स' ची कल्पना मांडली आहे. महासंघातील ज्या सदस्य देशांना निर्वासित रोखण्यास अडचणी येतात त्या देशांमध्ये हे दल तैनात होईल. आत्तातरी खूपश्या युरोपिय देशांनी निर्वासितांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केल्याने ग्रीसमध्ये मोठ्या प्रमाणात लोंढे जात आहेत.

यांना कुंपणं वगैरे घालून रोखण्याऐवजी अगदी कडक पात्रता/स्किल टेस्ट घेउन व्हिसे दिले तर?
त्या सगळ्यांना पण फक्त यु एस आणि युरोप देशांमध्येच जायचं आहे. कोणी लेकाचा भारतात येऊन पैसे कमावतो/सिंगापूर थायलंड मध्ये येऊन पैसे कमावतो म्हणत नाहीये.
आम्ही तयार्‍या करतो,शिकतो,स्किल मिळवतो,त्यांना 'आम्हाला कायम तुम्च्याकडे यायचे नाही' हे हर प्रकारे पटवतो आणि तरी कधी कधी एल १ रिजेक्ट होतात, हे लोक आरामात काही पात्रता नसताना थेट युरोपात येऊन कायम राहण्याची इच्छा कशी बाळगतात?(याला 'सोअर ग्रेपस' म्हणून नाके मुरडू नये Happy कोल्ह्याचे पोट आधीच भरलेले आहे.)

अगं हे लोक झुंडीने जायायत त्या देशांच्या सीमांपर्यंत. इटलीच्या किनार्‍यावर पोहोचता पोहोचता किती नावा उलटल्या, किती लोक वाहून गेले. इतकं डेस्परेट असतात ते लोक. पात्रता/स्किल टेस्ट/ व्हिसा बघण्याएवढी उसंतच नसेल. नंतर रजिस्ट्रेशन मात्रं होतंय. रजिस्ट्रेशनशिवायही लोक घुसलेले असू शकतीलच.

भारतात बांगलादेशींची घुसखोरी नविन नाही. थायलंड वगैरे पुर्वेकडील देशांमध्ये देखिल म्यानमारमधून निर्वासीत रोहिंग्या मुस्लिम जातच आहेत. भर समुद्रात अडकून पडले होते ते लोक मध्यंतरी १-२ महिने आणि अन्नपाण्याशिवाय मरणपंथाला लागले होते.

प्रॉब्लेम हा आहे की खरोखरचे जीव मुठीत घेवून पळालेले पीडित आणि निर्वासिताच्या अंगरख्याखाली दडून घुसणारे दहशतवादी हे वेगळे ओळखता आले पाहिजेत.

बरोबर आहे. कधीतरी दुसर्‍या देशात आहे त्यापेक्षा चांगले पैसे कमवायला जाणे आणि जीव आणि अस्तित्व वाचवायला स्वतःच्या देशातलं सगळं सोडून कोणत्यातरी सीमेवर याचितासारखी वाट पाहत बसायला लागणे यात खूप फरक आहे.
या मूर्ख आय एस वाल्यांनी यांच्या देशांची वाट लावली नसती तर यांच्यावर हे प्रसंग आले नसते.
त्यांना देशात घ्यावं तर आतापर्यंत ज्या सिक्युअर कोषात जगले तो सोडून भारतासारखा दहशतवादाचा धोका घ्यावा लागतो, न घ्यावं तर ते सीमेवर तणाव वाढवतात. टुमदार युरोपी देशांची वाट लागली आहे.

पश्चिम युरोपियन देशात फ़क्त सिरीयातले निर्वासित येत नाही आहेत तर अफ़्रिके मधुन पण येत आहेत. खरे निर्वासित कोण हे समजणे कठीण आहे.
पश्चिम युरोपियन देशात पूर्व युरोप मधुनही निर्वासित येतात. फ़्रांस सारखे देश त्याना क्वारंटाईन करतात आणि यु के मधे पाठवतात आपल्याकडे ठेवत नाहीत. यु के चे निर्वासितांना आश्रय देण्याचे धोरणामुळे यु के ला त्यांना परत पाठवता येत नाही.

पश्चिम युरोपियन देशातिल असलेली सोशल सेक्युरीटी सिस्टीम बर्‍याच निर्वासितांना आकर्षित करते.

कॅमेरुन च्या विरोधाला ही किनार पण आहे.

<<प्रॉब्लेम हा आहे की खरोखरचे जीव मुठीत घेवून पळालेले पीडित आणि निर्वासिताच्या अंगरख्याखाली दडून घुसणारे दहशतवादी हे वेगळे ओळखता आले पाहिजेत.>>
---- हे अशक्य आहे... मागच्या आठवड्यातच अमेरिकेत गोळीबारात १४ निरपराध्यान्ना प्राण गमवावे लागले.... त्यान्ची काय चुक होती ?

तसेच अफगाण किव्वा बगदाद मधे अनेक निरपराधी मारले जातात... सर्व बाजून्नी मारले जाणारे सामान्यच असतात...

सिरिया मधे नक्की कोण, कुणाशी आणि कशासाठी लढतो आहे हेच मला समजत नाही. आय एस जगाला एव्हढा त्रास देत आहे तर इस्रायल आणि सौदी शान्त कसे रहातात ? अमेरिकेने निर्माण केलेले बुजगावणे आहे का ?

ऑईल $११० + होते ते आता $३५ पर्यन्त खाली आले आहे... कोणाकडे उत्तर आहे ?

उदय, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ होतोय बस्स!

इस्रायल व सौदी शांत राहिले तरी फ्रान्स, ब्रिटन हल्ले करत आहेत. आणि ही सगळी अमेरिकेची मित्र राष्ट्र आहेत. इस्रायलचा गोलन टेकड्यांचा भाग ऑलरेडी अशांत आहे. सौदी येमेनमध्ये गुंतला आहे आणि इराकमध्ये आयएसविरोधी आघाडीमध्ये सैनिक पुरवणार आहे.

इसिसची निर्मिती सिरियातील अन्यायकारक राजवटीमुळे झाली असली तरी ती आता अनिर्बंध इतर देशांमध्ये पसरत चालली आहे. ह्या संघटनेचा मूळ उद्देश वेगळा असावा आणि तो केव्हाच मागे पडून आता तिचा भस्मासूर झाला आहे. पण आता रशियन राष्ट्राध्यक्षांनी आयएसविरोधी संघर्षात सिरियन बंडखोरांना सहाय्य करेल अशी घोषणा केली आहे कारण गेल्या महिन्यात 'फ्री सिरियन आर्मी' ह्या सिरियन बंडखोरांनी रशियन लढाऊ विमानांना आयएसच्या ठिकाणांची माहिती पुरवून सहाय्य केले. अर्थात रशिया अमेरिकेसारखा सिरियन बंडखोरांना शस्त्र पुरवणार नाहिये. नुसतं सहाय्य करेल म्हणजे नक्की काय करेल माहित नाही.

सौदीमध्ये सिरियातल्या शांतीसंदर्भात जी आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली त्यात अस्साद सिरियाचे सर्वेसर्वा आहेत तोवर सिरिया शांत होणार नाही असा सूर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी ह्यांनी लावला होता. त्यावर अस्साद ह्यांनी प्रत्युत्तर दिले की सिरियन सरकार 'परदेशी दहशतवाद्यांशी' चर्चा करणार नाही व फक्त सिरियावर निष्ठा असणार्‍या विरोधकांशी/बंडखोरांशीच आपण चर्चा करु.
---
तेलाचा किंमती खाली येण्याची संभाव्य कारणं काही पानांपुर्वी डिस्कस झाली होती. अर्थात, आपण जे दिसतंय त्याच्याबरहुकुम विचार करणार. काही राष्ट्रांचे छुपे हेतू काही वेगळेच असतील.

<<इस्रायल व सौदी शांत राहिले>>
---- सर्व जगाशी खेटे घेत आहेत, पण या दोन देशान्ना अजुन धक्का नाही लागला... सौदी पण सिरीयात आहे (अनेक खेळाडू मैदानात आहे पैकी कुणाला तरी पाठिम्बा दिलेला आहे)...

मी हा धागा नियमितपणे वाचत नाही. त्यामुळे इथे याबद्दल चर्चा झाली असेल तर ती नजरेतून सुटलीय. क्षमस्व,

इस्रायलवर बहिष्कार घाला अशी हाक अमेरिका आणि युरोपातल्या अनेक संस्था, व्यक्ती देत असल्याचं दिसतंय.. याचा पॅलेस्टाइनशी संबंध असेलच.

तुर्की आणि रशियात विमान पाडण्यावरुन जुंपली तशी तुर्की आणि इराकमध्येही सार्वभौमत्वावरुन जुंपणार बहुतेक. रशियाला घुसखोर म्हणता म्हणता तुर्की स्वतःच इराकमध्ये सैन्य घुसवून बसलाय असा इराकच्या जनतेचा आरोप आहे आणि त्या सैन्याच्या माघारीसाठी निदर्शनंही चालू झाली आहेत. तुर्की सैनिकांना इराकमधून हाकलण्यासाठी त्यांच्या पायाखालची जमीनही पेटवून देवू, फक्त नेत्यांच्या आदेशाचीच खोटी आहे असा इशारा इराकमधील 'बर्द ऑर्गनायझेशन' ह्या सशस्त्र गटाने दिला आहे. इराकी पंतप्रधान अबादी ह्यांनी इराकच्या हद्दीतून तुर्की सैनिकांनी माघार घ्यावी म्हणून ४८ तासांची मुदत दिली होती.

आत्ता डिसेंबरच्या सुरुवातीलाच उत्तर इराकच्या मोसूल भागात एका लष्करी तळावर तुर्कीने आपलं सैन्य / रणगाडे तैनात केलं आहे. ह्या भागावर आयएसने ताबा मिळवला आहे. तुर्कीचा दावा आहे की इराकमधील कुर्द सैनिकांना आयएसविरोधी संघर्षाचे प्रशिक्षण देण्यासाठी तुर्की सैनिक इराकमध्ये दाखल झाले आहेत. ही आंतरराष्ट्रीय मोहिम असून तुर्की सैन्य मागे जाणार नाही असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन ह्यांनी बजावले. ह्या अडेलतट्टूपणा विरोधात इराक संयुक्त राष्ट्रसंघात दाद मागणार आहे. रशिया व इराणने ह्या बाबतीत इराकला पाठिंबा दिला आहे. तुर्कीमुळे इराकमधील जनता बगदाद, बसरा आणि इतर मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर उतरुन निदर्शनं करतेय. 'तुर्कीचा विनाश होवो, एर्दोगन ह्यांचा विनाश होवो' अशा घोषणा दिल्या गेल्या. बसरा मध्ये एर्दोगन ह्यांची प्रतिमा जाळण्यात आली. इराकमधील शिया धर्मगुरु अली सिस्तानी ह्यांनीही तुर्कीला हाकलून लावा असे आवाहन केले.

गेल्या महिन्यात आयएस आणि तुर्कीतील एर्दोगन सरकार ह्यांच्यातील अवैध इंधन व्यापाराची माहिती उघड झाल्यावर इराकने तुर्कीविरोधात ही भूमिका घेतली आणि सिरियाप्रमाणेच इराकमधील दहशतवाद्यांबरोबरही तुर्कीचे व्यापारी संबंध असल्याचा आरोप केला होता.

भांडणं आणि युद्धाशिवाय उद्योग उरला नाहीये लोकांना.

भरत, इस्रायलवर बहिष्कार घालण्याच्या मागणीबद्दल चर्चा झाली नाहिये. पॅलेस्टाईन तिढा तसाच घट्ट बसला आहे अजून. तुम्ही जमल्यास डिटेलवार लिहा.

अश्विनी तेलाच्या किंमती उतरल्यावर हे सगळ किंबहुना या पेक्षा जास्तच अपेक्षित आहे.

तेलाच्या किंमती अश्याच खाली राहिल्या तर मोठ युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते झाल्यशिवाय जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार नाही. Sad Sad Sad

उदय, सौदी कुठे ना कुठे पाठिंबा/विरोध करतोच आहे. जिथे इराण पाठिंबा/विरोध करत असतो असतो तिथे विरुद्ध भूमिकेत सौदी असतोच :हाहा:. सद्ध्या सरळ सरळ दोन तट आहेत आणि तटस्थ राहणं अनेक राष्ट्रांना हळूहळू कठीण होणार आहे.

युरो,

रशिया ऑलरेडी ऑईल वॉरसाठी सज्ज आहे. रशियन अर्थव्यवस्थेला पुढल्या वर्षी २१ अब्ज डॉलर्सचा घाटा होण्याचे अंदाज आहेत. जीडीपीतील तूट २%पर्यंत खाली जाईल आणि ती ३%पर्यंत खाली जाऊ नये म्हणून अर्थमंत्रालयाला खर्चात जास्त कपात करावी लागेल.

तेलाच्या किंमतीत अजून घसरण चालू राहील ह्या अंदाजाने रशिया पुढील सात वर्षांसाठी खास तयारी करत आहे. आणि ही तयारी म्हणजे सौदी अरेबिया व ओपेकसाठी इशारा असल्याचे म्हटले जातेय. रशियातल्या कच्च्या तेलाच्या व्यवहारांवर 'ऑईल बेंचमार्क' लागू करायच्या बेतात आहे. २०२२ पर्यंत कच्चं तेल ४०-६० डॉलर्स पर बॅरल राहिल असा अंदाज करुन ही योजना तयार केली जात असल्याचे रशियाचे उपार्थमंत्री मॅक्झिम ओरेश्किन ह्यांनी म्हटले आहे. घसरण कायम राहिल्यास २०१६ अखेर रशियातील राखीव परकिय गंगाजळी संपायची शक्यता आहे. पण रशिया ह्या प्राईस वॉरचा आक्रमक होवून मुकाबला करेल.

ओपेक राष्ट्रांनाही खूप फटका बसतो आहे पण बाजारपेठेत मोठा भाग राहण्यासाठी ओपेक उत्पादनात कपात करण्यास तयार नाही आणि ह्यामागे सौदीचा पुढाकार आहे. ओपेक राष्ट्रं तयारीत असलेल्या रशियाप्रमाणे जास्तकाळ तेलाच्या किंमतीतील घसरणीचा मुकाबला करु शकणार नाहीत कारण तेलाशिवाय तरण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही.

पॅरिस परिषदेबद्दल (ग्लोबल वॉर्मिंग):
पॅरिस परिषद अखेरीस शुक्रवारी ११ डिसेंबरला संपली. ही एक ऐतिहासिक परिषदच म्हटली पाहिजे कारण प्रथमच सर्व देशांनी आपापली ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स कमी करण्याची तयारी दाखवत पॅरिस करार स्वीकारला. सर्वात मुख्य म्हणजे - अमेरिकेनेही हा करार स्वीकारला; आतापर्यंत ग्रीन हाऊस गॅस विषयक कोणतेही आंतरराष्ट्रीय करार अमेरिकेने स्वीकृत केले नव्हते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने देखील हा करार स्वीकृत केला; पॅरिस करारात भारत मोठाच अडथळा ठरत होता (भारताचे काही मुद्दे अगदी रास्तच होते आणि ते करारात स्वीकारलेही गेले आहेत).
न्यूयॉर्क टाईम्स मधील गेल्या आठवड्यातील हे व्यंगचित्र पॅरिस परिषदेतील भारताच्या भूमिकेविषयी बरेच काही सांगून जाते :

nyt-cartoon-india-climate_650x400_61449578996.jpg

या करारात काय आहे ? - तर, सनसनीखेज बातम्या सोडल्या तर, काहीही विशेष नाही. हे अतिशय मोठे दुर्भाग्य आणि चीड आणणारी घटना आहे. ३ मुख्य गोष्ती आहेत:

१. सर्व देशांनी ग्लोबल वॉर्मिंग २ सें पेक्षा कमी ठेवण्यासाठी आपापले हरित गृह वायू उत्सर्जन कमी करण्याची तयारी दाखविलि आहे. पण हे करण्यासाठी, लेखात लिहिल्याप्रमाणे २०३० सालापर्यंत आपले (प्रुथ्प्रुथ्वीचे) उत्सर्जन ~५०% ने कमी होणे आवश्यक आहे - जे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे सर्व जणांनी कमिटमेंट दिली हे चांगले आहे - पण या सर्व पोकळ बाता आहेत असे माझे मत.

२. भारतासारख्या विकसनशील देशांनी बंधनकारक उत्सर्जन कपात स्वीकारली नाही. भारताचे कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पोन्सिबिलिटी हे ब्रीद मान्य झाले आहे. अर्थात हे आर्ग्युमेंट जुनेच आहे. पण भारताने (आणि चीन, साऊथ आफ्रिका, मेक्सिको ई.) जी INDC (Independently Determined National Committment) दिली होती - म्हणजे आम्ही स्वतःहून काय उपाय करु असे जे सांगितले होते - ते करणे मात्र भारताला बंधनकारक राहील. उदा. भारताने २०२२ सालापर्यंत १,७५,००० मेगावॅट रीन्यूएबल एनर्जी बांधण्याचे कबूल केले आहे - जे भारताला आता करावेच लागेल.

३. हे विकसनशील देशांना जमावे म्हणून १०० बिलीयन डॉलर्स चा ग्रीन क्लायमेट फंड तयार करण्यात येईल - जो विकसित देश फायनान्स करतील. पण एकून खर्चाच्या दृष्टीने हा आकडा पीनट्स आहे.

पण हे सर्व जुन्या करारांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात होतेच. थोडक्यात, पॅरिस कराराची टिमकी वाजते आहे सर्व देश एकत्र आले म्हनून - पण याहून जास्त त्यात काहीही नाही.

मी आधी लिहिल्याप्रमाणे, या सगळ्या वादात खरे भरडले जातात ते म्हणजे गरीब आणि ग्लोबल वॉर्मिंगचे भयावह दुष्परिणाम भोगणारे देश. उदा. ऑस्ट्रेलिया जवळील मार्शल आयलंड. हा छोटासा देश समुद्रसपाटीपासून ६ फूट उंचीवर आहे. जर तापमानवाढ १.५ सें पेक्षा जास्त झाली तर हा संपूर्ण देश पाण्याखाली जाणार आहे. मार्शल आयलंडच्या अध्यक्षांचे संयुक्त राष्ट्रसंघाला उद्देशून केलेले एक अतिशय पॅशनेट भाषण इथे ऐकता येईल : https://www.youtube.com/watch?v=pgtN_T5uaKg

ह्या कराराचे भारतावर नेमके परिणाम काय होणार आहेत ? जागतिक पातळीवर पर्यावरणावर काय परिणाम होणार आहेत ? त्याची आर्थिक राजकीय गणिते काय आहेत ? याबद्दल एक वेगळा लेख येत्या काही आठवड्यात लिहेन.

ह्या कराराचे भारतावर नेमके परिणाम काय होणार आहेत ? जागतिक पातळीवर पर्यावरणावर काय परिणाम होणार आहेत ? त्याची आर्थिक राजकीय गणिते काय आहेत ? याबद्दल एक वेगळा लेख येत्या काही आठवड्यात लिहेन.>>> निकित, धन्यवाद. नक्कीच लिहा. तुम्ही सोप्या शब्दात लिहिता.

मार्शल आयलंडच्या अध्यक्षांचं भाषण घरुन बघते.

ह्या निर्वासितांपैकी एक तरी धर्म बदलुन घ्यायला तयार आहे का?

ह्या निर्वासितांच्या युरोप मधे घुसण्यानी आयसिस चे चांगलेच फावते आहे. काही वर्षानी युरोप मधे ह्यांचे क्रीटिकल मास झाले की युरोप ला नष्ट करुन टाकतील आणि महत्वाचे म्हणजे बाहेरुन काही करायची गरज च नाही.

आत्ताच युके मधे मुस्लिम व्होट बँक तयार होते आहे. अनेक ठीत्या, कोण निवडुन येणार ते ही लोक ठरवू शकतात कारण मुख्य पक्षांमधे फार गॅप नसते. त्यामुळे तिथे ही भारतासारखे लांगुनलांचन चालू झाले आहे.

Pages