निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा काय मस्त वाटतय आज... जागु त झे फोटो खुप मी स क र त होते...... क्लास टिपलेस...
वि चिंचेला इ क्डे चीज बिलाई आणि गुजराथीत जंगली जलेबी म्ह् ण ता त.....

दह्याची फुलं, खोब र्‍याची फुलं, गुल मेहंदी काय म स्त म स्त नाव क ळ्लीत...

>>> आम्ही त्यांना आइसक्रीमची फुलं म्हणतो. Happy

सुप्र निगकर्स
हे फूल कोणते? काल मनोहर मंगल कार्यालयाच्या (पुणे) आवारात मस्त फुललेलं हे झाड.


आणि हा लांबून घेतलेला फोटो.

आणि हो..............आम्ही शिरीष फुलांना आईसक्रीमची फुलं म्हणतो.

मानुषी ताई
हा गुलाबी कॅशिया
फोटो बघूनच डोळे निवले.
राणीच्या बागेतला कॅशिआ फुललेला नव्हता.
पुण्यातला फुललाय आत्ताच.

किति सुंदर फोटो..

मराठीत नाव नसावे बहुतेक. गुलाबी बहावा म्हणता येईल.

cassia fistula - बहावा, अमलताश, golden shower tree, indian laburnum
cassia javanica - pink shower tree, apple blossom tree, rainbow shower tree.

हे राम... एक्दा क्लिक केले तरि दोनदा प्रतिसाद. Happy

मनोहर मंगल कार्यालय कुठे आहे पुण्यात? नारायण पेठेत आहे का? शनवारी पाहता येईल मग.

Survey No. 31/1, Mehendale Garage Compound, Karve Road, Erandwane, Pune - 411004
Land Mark: Near Mehendale Garage
साधना पत्ता घे म.मं. का. चा.

जावा कॅशिया बघायला यावसं वाटते!! Happy मस्त फोटो!
चर्चगेटला योगक्षेम, मंत्रालय कडून मरीन ड्राईव्हला जाणार्या रस्त्यावर बर्मीज पिंक कॅशिया आहे. (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Burmese Pink Cassia.html")

गोरेगावला पश्चिम द्रुतगती मार्गाच्या बाजूने ओबेरॉय माल कडे जाणार्या सर्विस रोडवर बरेच तामण लावले आहेत आणि सध्या सगळ्यांना फुले आलीत.

मा नु षी ताई, पैकी च्या पैकी मार्क्स तुला , कसले फोटो टाकलेस व्वा.... पु ण्यात गेल्या व र्षी मी दे खील पाहिला हो ता गुलाबी ब हावा ....

नागपूरला मला नाही दिसला गुलाबी बहावा .. पिव ळा बraaच दिसतो... पुण्याहुन शेंगा आणुन नागपूर ला वे ग वे ग ळ्या ठीकाणी लावल्या त र?
साधना साधारण ह रब र्‍या शी मिळती जुळ ती च पान आहेत मसु री ची..
कडु मेन्दी मस्तच... ह्यालाच बागड म्हणतात का?
गोल्डन ड्युरांटा मस्त् च..

ब कु ळ... सोसाईटीच्य अगदी बाहेरच बहरलीये....
Photo3638.jpg
चार फुलं मिळालीत पुजेला:)

जा बा जागुतै .. आंबे बघुन असला हेवा वाटतोय तुझा Sad
माझ्याकडले आंबे अवकाळी पाऊस, वादळाने अगदी मोठे असलेले सुद्धा पडले .. ते काय कमी होत कि दोन दिवसाआड माकडांची टोळी येते जाते आणि जे २ ४ शिल्लक आहेत त्याचा पन फन्ना उडवून जाते..
आत्ताच एक मोठा जवळपास १७ * १२ सेमी चा आंबा तोडून गेले.. असला लचका तोडून फेकुन गेले त्या आंब्याला .
या वर्षीचा एक तरी आंबा नशीबात आहे कि नै का ! Sad

इथ प्लीज कुणी त्या मर्कटांची बाजु घेऊ नये.. मानवांनी त्यांचा नैसर्गिक अधिवास उध्वस्त केला वगेरे सांगु नये..

मी जाम दु:खात आहे सो शेअर करतेय Sad

टीना सॅड. मी सावंतवाडीला होते राहायला तेव्हा तिथे मोठे वानर येऊन असेच बाग उद्वस्थ करुन जायचे. तिथे ही माकडे वांडर म्हणुन प्रसिद्ध होती. एक वांडरमारी म्हणुन जमात होती, त्यांना या दिवसात खुप भाव असायचा. ते लोक बंदूकींनी त्या वानरांना मारायचे. हे वानर म्हणजे अगदी सहा फुटी माणसेच जणु. आणि इतके हुशार.. आपल्याला झाडावरचा नारळ खाली पाडून् मग तो खुप कसरत करुन त्याचे वरचे साल काढावे लागते, तरच तो आपल्या वापरण्यासारखा होतो. हे वानर त्या नारळाला झाडावरतीच कुठेतरी भोक पाडायचे आणि त्यातुन पाणी आणि खोबरे दोन्ही गुल करायचे.... माझी आई झाडांवर सिताफळांना कापडी फडक्यांत लपवुन ठेवायची. ती फडकी तशीच ठेऊन आतली सिताफळे गडप...

आता हसायला येते हे लिहिताना, पण ज्यांची फळे अशी हातातोंडाशी येऊन जातात ( literally Happy ) त्यांनाच माहित आहे त्याचे दु:ख.

केशर, आम्ही गेलेलो रविवारी. एकतर गाडी घेऊन जायचा शानपणा केला, त्यामुळे पार्किंगची बोंब. नशिबाने पार्किंग मिळाले. आत जेमतेम ३०-३५ पक्षी होते, सगळे पॅरकिट, पॅरट आणि कोकाटू जातीचे. यातले काही खुप मोठे होते. लाईन खुप होती. नशिबाने आत मोठे फॅन्स लावलेले. त्यामुळे जरा बरे होते. पिंजरे अगदी १ इंच बाय १ इंच जाळीचे, त्यामुळे पक्षी नीट दिसत नाहीत. आत फक्त मोबाईलने फोटो काढायची सोय आहे. वरच्या फोटोत लिखाण्बाशेजारीच ते ग्रे रंगाचे पक्षी आहेत ना ते बहुतेक फिंच आहेत, मी नाव विसरले. ते आपल्या चिमणीएवढे आहेत आणि इतके क्युट दिसतात की हे घरी हवेतच हा हट्ट धरला गेला (नशिबाने तिथे पक्षी विकत मिळत नव्हते, नाहीतर.......... )

१५-२० फिशटँक्स पण ठेवलेल्या. बच्चे कंपनीला थोडे बरे वाटेल असा सिन आहे एकंदर. मी मात्र वैतागले. अर्ध्या तासात बघुन आटोपले आणि त्यासाठी एवढे लांबुन गेलो तिथे.

Pages