निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायलीचे टोमॅटो अगदी रसाळ! याचा एक रस्सा सांगीन गं नंतर आणि गोळा अळू सुद्धा.
टिने कोण कोण भेटतं गं तुला! मस्त.

मॉथ लै भारी ....
म नु षी ताई पा . कृ च्या प्र तिक्षेत...

ह्याचे नाव काय? मी लहान प णा पासुन याला तामण स म ज त आले. .
Photo3555.jpgPhoto3554.jpg

सायली, जरा या पांढर्‍या फुलांच्या झाडाच्या पानांचेही फोटो टाक ना. म्हणजे ओळखता येईल.
मला हा तामणाचाच भाऊ वाटतो आहे. हा एकतर Lagerstroemia parviflora म्हणजे बोंडारा असेल, किंवा Lagerstroemia tomentosa (स्थनिक नाव माहिती नाही.) असेल.

मॉथ, अबोली, टोमॅटोचे फोटो मस्त आहेत.

या पांढर्या फुलांना आमच्या इथे जॅपनीज गुलाब म्हणायचे. अर्थात ते नाहीयेत. खुप सुंदर दिसतात ही फुले. दिसायला जरी तामणसारखी असली तरी त्याच्या कळ्या आणि फुले गेल्यावर उरणारी फळे यात खुप फरक आहे.

गुलमेंहंदी ना ही ?. यात गुलाबी आणि जांभळा असे दोन्ही रंग असतात. तूम्ही दह्याची तर आम्ही खोबर्‍याची फुले म्हणतो !

आदिजो ही पानं...
Photo3572.jpg

दह्याची फुलं, खोब र्‍याची फुलं, गुल मेहंदी काय म स्त म स्त नाव क ळ्लीत...
श शांक जी तामणचाच प्र् कार ना ! झुडुप तामण.
हो गुलाबी जांभ्ळी फुलं पण अ स ता त

किती छान गप्पा चालु ...माझा प्रश्न अगदीच बेसिक आहे....मला सांगाल का... जाई जुई मोगरा चमेली कुंदा ह्यात काय फरक आहे...
आणि मला गजरे वेन्या बनवायला शिकायला आवडेल..दादर जवळ कुठे शिकवशिकवतात का ?
धन्यवाद....

गौरी... गजरा, वेण्या बनवायला खुप सराव लागतो. दादरला रानडे रोडवर जे लोक बसतात त्यांचे निरिक्षण करुन
बेसिक्स शिकता येतील. आपली जागू पण करते, पण तिला शिकवायला वेळ मिळायला हवा.

बघा आज माझे नाव घेतले आणि मी हजर.

सगळ्या गप्पा आणि फोटो चाळले. भन्नाट.

राणीच्या बागेतला गटग मस्त झाला. सगळ्या निग करांची आठवण आली.

गौरी आता मी प्रयत्न करते व्हिडिओ बनवायचा गजर्‍याचा.
त्या वरच्या दह्याच्या पांढर्‍या फुलाला आमच्याइथे खोबर्‍याचे फुल म्हणतात कारण कोबरे खरवडल्यावर जसे दिसते तशा त्याच्या पाकळ्या दिसतात.

सायली तुझी नेहमी आठवण येते पाणी घालायला गेल्यावर. कारण तू दिलेल्या टोमॅटो आणि वांग्यांवर फळे धरू लागली आहेत. Happy

Jaagu nakki video pathav...mi tar matunga la gele ki bhan harpun baghat baste south indians chya fulanchya dukanankade...mi raniche baag gtg miss kel..ushira msg vachle...parat kadhi tharnar asel tar mi pan nakki yenar..mabo karanchi charcha vachunach mi mnp udyanat jaun ale...kasle mast ahe...khuuup shikayla milte maaybolivar...mi kunala bhetle nasle tari khup varshapasun niyamit vachan chalu aste...dineshda jagu sadhana tar agadi mazya gharatlya sarvana mahit ahet..itki mi tumchya vividh angi gunan baddal bolat aste..

हल्ली मानुषीताई, हेमाताई, वर्षुताई गायब. >>>>>> एक्सेप्ट मानुषी, सगळे वॉट्सपवर असल्याचा हा परिणाम ... Happy Wink ----तिथे जोरदार गप्पा, टी पी चालू असते.....

शांकलीला तर आता आमच्या कन्यकाही चिडवायला लागल्यात - कस्ली अ‍ॅडिक्ट झालीये वॉट्सपला म्हणून .... Happy Wink

Nisarga gr cha watsapp var pan gr asel tar malahi tyat samil vhyayla avdel....

Mala photo upload karaycha ahe...pan khup vel praytna karunhi hot nahi ahe...

जास्वंदच आहेना ती? >>>> बरोबर, जास्वंदच आहे पण अगदी छोटे फुल असते हे .....
Hibiscus hirtus - दुपारीचे फुल किंवा नरेरी असेही नाव आहे याचे ...

हो .. रानात मिळतं हे. माझ्या घरी पण होते कधीकाळी Wink
दह्याची फुलं, खोब र्‍याची फुलं, गुल मेहंदी काय म स्त म स्त नाव क ळ्लीत... >> +१

Pages