निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.maayboli.com/node/53579

नविन धागा काढलाय हो मंडळी. गटग साठी Happy Happy

आता पटापट हजेरी लावा, धाग्यावर नाही तर शनीवारी राणी बागेत.

माझ्याकडे ५ सफरचंद एकाच झाडावर आहेत. कलम केलंय, त्यातल्या २ प्रकारच्य सफरचंदाना आता फुलं आलीय्ते, उरलेल्यांना फॉलमध्ये येतील म्हणजे एकूण वर्षभर फळं मिळतील...अजून २-३ वर्षे जातील नीट फळधारणा होण्यासाठी.

जर्बेरा, मस्त फोटो..

आज अक्षय तृतीया.. आज झाडे लावा म्हणजे त्यांचा कधीही क्षय होणार नाही.

सफरचंदावर आजपर्यंत एवढे प्रयोग झालेत आणि अजूनही होताहेत.. कि त्यात मूळ चव राहिली असेल का याचीच शंका आहे.

कझकस्तान हा देश सफरचंदाचे उगमस्थान मानला जातो. तिथे अजूनही काही पुरातन वाण जतन केलेले आहेत.
( जाऊन बघून येऊ काय एकदा ? )

जर्बेरा - या नवीन माऊ आणल्यात का ?? गोड आहेत पिल्ले ...

आज अक्षय तृतीया.. आज झाडे लावा म्हणजे त्यांचा कधीही क्षय होणार नाही. >>>>> फार वर्षापूर्वीची गोष्ट - माझी आजी या दिवशी (अक्षय तृतीयेला) आमच्या घरालगतच्या छोट्याशा बागेत काही ना काही पेरायचीच ....

मला एक विचित्र शंका आली.

शेतात कापसाची लागवड करताना, दोन रोपात ठराविक अंतर ठेवतात ना ? गाभ्रीचा पाऊस चित्रपटात कापसाचे बियाणे, पाभरीने पेरताना दाखवलेय.

( तसे हा चित्रपट परत परत पाहताना मला अनेक प्रश्न पडतात. नागपुर भागातला शेतकरी कापूस म्हणेल का कपाशी ? पुरणपोळी करताना अर्धा किलो चणाडाळीला पावशेर गूळ पुरेल का ? वगैरे वगैरे Happy )

घरामागच्या टेकडीवर :
बहावा
bahava.JPG

खैर
khair.JPG

काटेसावरीचा कापूस
katesavar.JPG

फालसा
khatkhati.JPG

कुडा
kuda.JPG

सिगमकाठी / दुरंगी बाभूळ
sigamkathi.JPG

नागपुर भागातला शेतकरी कापूस म्हणेल का कपाशी ? >> कपाशी हा शब्द जास्त वापरतो दिनेशदा ..
आणि इकड खेड्यात गोड पन जरा जास्तच खातात .. मग ती पुरणाची पोळी असो, बोंड असो की चहा Happy

सकाळी उठून पाहिलं तर स्वयंपाकाच्या ओट्यावर ठेवलेल्या भांड्याच्या टोपल्यात हा पाहूणा विसावलेला होता .
त्याला तसाच उचलून मग लॉन मधे ठेवला . जरा वेळानी जाऊन पाहतो तर आल्या पावली महाशय गायब..
काय कोण याबद्दल जरा साशंकच आहे . जाणकारांनी प्रकाश टाकावा .. सुरवंटच असावा, नै का ?

surwant (1).JPGsurwant (2).JPG

मिशा का तुरे ?

surwant (3).JPG

बरं वरचा सुरवंट तर मग मी कोण ?

1's.JPG

हे आणखी एक फुललेलं Happy :

lal jaswand.JPG

श शांक जी , दि ने श दा अ रे व्वा मी आजच एक झाड लावलय
आज लेकीचा वा. दि अ स तो... तीच्या आव डीच फुल पाखराच (त्या सारखी फुलं येणार) झाड लावलय...
टिना मस्त टिपलायस पाहुणा....
आदिजो म स्त म स्त फोटोज...

काय कोण याबद्दल जरा साशंकच आहे . जाणकारांनी प्रकाश टाकावा .. सुरवंटच असावा, नै का ?>>>>> मॉथ आहे हे ..
या लिंकवर सर्व माहिती आहे त्याबद्दल -

http://www.maayboli.com/node/36675?page=29&destination=node%2F36675%3Fpa...

जर्बेरा - या नवीन माऊ आणल्यात का ??
दरवर्षी आमच्या घराच्या समोर एक पावसाळी आणि एक हिवाळी बॅच घातली जाते. त्यातल्या हिवाळी अधिवेशनाच्या या दोन पोरी.
समोर काम करणाऱ्या ताईला आणि मला मांजरी खूप आवडतात म्हणून काल तिने हातात आले तसे आणून दिले. मग दिवसभर राहिले आणि संध्याकाळी सोडून आले तर एक पिल्लू परत आले आज सकाळी घरात. Blush

काल आम्ही मांजरीचं बी पेरलं वाटतं अक्षय तृतीयेला Lol

टीना, भन्नाट फोटो आहेत.
बहुदा तो सिल्क मॉथ असावा आणि दुसरा कमांडो मॉथ. नक्की माहिती नाही. या लिंकवर माहिती मिळाली:
http://www.wormspit.com/polyphemus.htm

ऐझॅक किहिमकरांचे एक पुस्तक नेटवर उपलब्धआहे, त्यात पहा:
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/vp-moths-kehmikar.pdf

>>या कुड्याची रचना वेगळी दिसतेय. मोठे झाड होते का>>
दिनेशदा, वेगळी म्हणजे? झाड फार काही उंच नव्हते. खरंतर तो गेल्या आठवड्यात खूप छान फुलला होता, आता बरीचशी फुलं सुकली आहेत.

पुरंदरे शशांक ,
लिंक बद्दल धन्यवाद .
छान माहिती दिलीय Happy .. मॉथ ला मराठी शब्द काय ? आणि सुरवंट म्हणजे इंग्रजीत काय ?

अदिजो लिंक छानच .. वाचते आता ..
मला त्याचे अँटेना खुप आवडले .. इथ साईझ कमी करुन टाकावी लागते म्हणून क्लीअर दिसत नाही आहे पण ओरिजनल DG च्या प्रचि मधे ते खुप स्वच्छ दिसतात Wink

मॉथ ला मराठी शब्द काय ? >> पतंग
सुरवंट म्हणजे इंग्रजीत काय ?>> larva किंवा caterpillar

हो, अँटेना (स्पर्शिका) खूपच छान आल्या आहेत.

Pages