निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसले सुन्दर दिसतायत हे पतन्ग! काय कलर आहेत एकेकाचे.

अदिजो...सगळेच फोटो छान!
फालसा हे फळ खुप मस्त लागते. कित्ती वर्ष झाली खाउन! राहुरी कृषी विद्यापीठात विकायला असायचे.

काल आम्ही मांजरीचं बी पेरलं वाटतं अक्षय तृतीयेला हाहा >>>> जर्बेरा - लै भारी ... मातोश्रींची प्रतिक्रिया काये ???? Happy Wink

अदिजो लिंक छानच .. वाचते आता .. >>> खरंच खूप मस्त लिंक - ते पुस्तक तर फारच अभ्यासपूर्ण दिस्तंय - जरा वेळ काढून शांतपणे वाचायला पाहिजे ...

'कास'चा पतंग भारीए .... Happy

टिने काय मस्त टिपलायस पतंग! आणि अदिजोचाही!
पण आमच्या माऊला >>> पण डोळे सॉलिड भेदक.>>>> कोण म्हणतं रे? आमचा तिव्र णिशेद!
सर्व माऊ शॉल्लेट्ट गोड आहेत!

अदिजो .. धन्स.. तरीच अगदि डोकात शिरल नै.. अर्थ माहिती होता पण आठवला नै वेळेवर .. आणि मी सुरवंट लिहलं Proud

अदीजो, मस्तच फोटो.

टीना, पुरणपोळीला जेवढी डाळ तेवढाच गूळ घेतात ना ? आणि त्या चित्रपटात प्रत्येकवेळी कापूस हाच शब्द वापरलाय. असो. हा इथला विषय नाही.

काही देशांत, दुर्मिळ जातीच्या फुलपाखरांची पैदास करुन त्यांची निर्यात करणे हा मोठा व्यवसाय आहे. भारतात या व्यवसायाला परवानगी नाही. का ते माहित नाही ? भारतात या उद्योगाला पोषक हवामान आहे.

काही देशांत, दुर्मिळ जातीच्या फुलपाखरांची पैदास करुन त्यांची निर्यात करणे हा मोठा व्यवसाय आहे. >>> दा, याबाबत अजून जाणून घ्यायला आवडेल - सविस्तर लिहाल का ??

अ न्जु ताई आभार...

हा पि व ळा गुल मो ह र का? ंका अजुन काही नाव अ स त याच... पा न फुलं त शीच दिस ताय त...
Photo3519.jpgPhoto3516.jpg

सायली मला वाटते तुझी फुले "संकासूर" आहेत ("http://www.flowersofindia.net/catalog/slides/Peacock Flower yellow.html"), सोनमोहर ("http://www.flowersofindia.net/catalog/slides/Copperpod.html") नाहीत.

झाडाच्या उंचीवरून तुला ओळखता येईल.

बादवे ह्या सोनमोहर सारखी आणखी दोन झाडे ह्या वेब साईटवर आहेत.
"http://www.flowersofindia.net/catalog/slides/Yellow Poinciana.html"
"http://www.flowersofindia.net/catalog/slides/African Wattle.html"

तुझे झाड कदाचित African Wattle सुद्धा असेल.
मुंबईत बर्याच रस्त्यावर मुख्यत: कॉपर पोड आणि येलो पोइन्शिआ लावलेला दिसतो.

घ र चे टो माटो... यंदा एकाच झाडाला चक्क ३३ टोमाटो लागलेले..:)

ही शेवट ची ब्याच...
म स्त र साळ.. आंब ट गोड चवीला आहेत..
Photo3544.jpg

सायली तुम्ही फुलं बर्फात ठेवता? नागपूरच्या गरमीसाठी कदाचीत ते आवश्यक असेल.

हा लाल इतका गोड दिसतोय पण ही वीड आहे. त्यादिवशी चालताना दिसलं.

RedonWalk.GIF

veka khadisakhar aahe ti ... deva jawalch naivedyacha bhanda ahe... Jawalun photo ghetala mhanun ice cubes watale astil tumhala..

Te lal makhmali ture kasle bhari distayat hirwali madhe...

Devki ithech ni ga warach samjle... roj aapan bhaji/ koshimbir karto na, tuachee deth, saal n chukta zaadaat ghalat aste... Adhun madhun shen khat, gandul khat ghalat aste...

http://www.butterflyfarm.co.cr/en/the-butterfly-farm/butterfly-farm-cost...

शशांक, कोस्टा रिकामधल्या फार्मची इथे माहिती आहे. न्यू झीलंडला पण एक पार्क आहे असे. ( पण तिथून एक्स्पोर्ट करतात का याची कल्पना नाही. ) पण एक मात्र खरे नैसर्गिक शत्रुंपासून संरक्षण मिळाल्याने अशा ठिकाणी मोठ्या संख्येने फुलपाखरांची पैदास होते.

सायली, सगळे राणीच्या बागेत जमलेत आज !

आज बरेच दिवसांनी जरा लवकर ६ च्या आधी घराबाहेर पडायला मिळालं. खूप दिवसांनी गोग्रासवाडीतल्या मारुती आणि कृष्ण्मंदिरात गेले.

आज निवांत झाडांशी संवाद करत गेले. एरवी फार घाईघाईने जाते आणि अंधार पण असतो. सोनमोहर होतेच. पण दोन मोठे पर्जन्यवृक्ष त्या भागात जाताना आहेत ते छान बहरले होते. वड-पिंपळ पण आहेत.
शेवग्याची झाडं आहेत. शेंगा सुकल्या होत्या. कोणीच काढत नाही बहुतेक. काही झाडे मला ओळखता आली नाहीत. डोंबिवलीत काही ठिकाणी झाडे मात्र बरीच वेगवेगळी आहेत.

डोळ्याच्या कॅमेऱ्याने मनात उतरवले फोटो सगळे. परत असा निवांतपणा कधी मिळेल सांगता येत नाही.

बाकी मला फोटो काढण्याचं vision नाही म्हणून त्या फंदात पडले नाही.

छान एन्जॉय केलं सगळं. Happy

अन्जू ताई मस्तच.
राणीबागेत यायला पाहिजे होते तुम्ही. Happy

हि पाचुंदाची *Common name: Spreading Caper) लिंकः
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Spreading%20Caper.html

राणीबागेत पाहिलेला पाचुंदा नव्हता, पण Caper फॅमिलीतील आहे Happy

आज परत someone tresspassed in my house Happy
हा पन मॉथच का ?
आम्ही पहिल्या पाहुण्यापेक्षा तुलनेने छोटे होतो म्हणून आमच्या स्पर्शिका कम अँटीने दिसले नै .. असो..

moth (1).JPGmoth (2).JPGmoth (3).JPG

Pages