निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टबेबिया आणि जॅकरांदाची पाने फोटोत आहेतच,
आणखी काही फरक Happy
जॅकरांदाच्या फुलांना अगदी मंद, व्हॅनिलासारखा वास असतो. टबेबियाच्या फुलांना वास नसतो.
जॅकरांदाच्या शेंगा चपट्या, गोल आकाराच्या असतात. टबेबियाच्या शेंगा लांबट, फुगीर असतात.

आपल्याकडे रुळला म्हणायचा झकरांदा. तरीही तो केनयात / साऊथ आफ्रिकेत / दक्षिण अमेरिकेत जसा फुलतो, तसा फुलत नाही आपल्याकडे. मागे शापित गंधर्व यांनी साऊथ आफ्रिकेतल्या झाडांचे सुंदर फोटो टाकले होते. माझाही एक लेख असणार.

काल शर्टाचे बटन तूटले म्हणून सुई शोधावी लागली. माझ्याकडे असते नेहमी.. पण ती शोधण्याच्या नादात दोन फिल्म्स आठवल्या.

बेअर ग्रील्स ने एकदा दाखवले होते कि घायपाताच्या पानाच्या टोकाला जो टोकदार भाग असतो. त्याच्याखाली एखादे भोक पाडून जर तो भाग खेचून काढला तर त्याला जोडून घायपाताचा धागाही बाहेर येतो. अगदी नैसर्गिक सुईदोरा... घायपाताचे धागे तसेही आपण वापरतोच.

आणखी एक फिल्म आठवली. इन्क्रेडीबल ह्यूमन जर्नीज मधल्या सायबेरीयाच्या भागात, तिथे ४०,००० वर्षापुर्वीची सुई सापडली असे दाखवलेय. ती रेनडीयरच्या हाडापासून केली होती. हा छोटासा शोधच मानवाला तिथे वस्ती
करण्यासाठी उपयुक्त ठरला. तिथे राहणार्‍या प्राण्यांना त्यांच्या फरमूळे तिथल्या गोठवणार्‍या थंडीपासून संरक्षण मिळते. पण माणसाचे काय ? त्याला असे नैसर्गिक संरक्षण नाही. त्यामुळे या फरचाच आधार होता. पण ती फर देखील नुसती पांघरून चालणार नव्हती. अंगासरशी फिट्ट बसेल अशी ती शिवावी लागणार होती आनि ते या सुईमूळेच शक्य झाले. आजही हीच फर त्यांचे संरक्षण करते. लहान मुलांसाठी तर हाताचे पंजे बाहेरही काढता येणार नाहीत असे कपडे शिवतात तिथे.

मी पाहिलेल्या झाडाला गोलाकार लांबुडके तुरे आहेत जसे सागाच्या झाडाला असतात. मी आता परत जाईन तेव्हा थांबुन फोटो काढतेच. जोवर इथे टाकुन ते जॅकरांदा की अजुन कोण हे क्लिअर करत नाही तोवर स्वस्थता नाही मिळणार.

रच्याकने, हे तुरे वा-यावर डोलताना खुप छान दिसतात. Happy

मस्त माहिती दिनेशदा ..

इकड तर वादळवारा पावसानं कहर केलाय .. घरचे लागलेले जवळजवळ सर्वच आंबे पडलेत ..कसल काय अन कसल
काय .. पावसाळा झक मारेल असल वातावरण आहे . रडकुंडी आलाय जीव . इतका जपलेला मोहोर आणि असे आंबे धडाधड खाली पडलेले पाहून Sad

हे काय कमी होत तर घरच्या लिंबाच्या झाडाला लागलेले लिंब पन पिकायच्या आधीच गळून पडत आहेत Sad

मला काळजी वाटतेय, ती पावसाळ्यात नीट पाऊस पडेल कि नाही त्याची.. त्यावरच तर पुढचा पिकाचा हंगाम अवलंबून आहे. शहरांचा पाणीपुरवठाही. एखाद्या वर्षी आंब्याचा मोह टाळू, पण पावसाळा नीट जाऊ दे.
आपला हिमालय हे मौसमी वारे खेचून घेतो. तो त्याचे काम नीट करेलच असा विश्वास आहे मला.

मुंबई ते फलटण (जि. सातारा) प्रवासातील काही क्षणचित्रे Happy

बदलापूर ते वांगणी दरम्यान, बदलापूर स्टेशन सोडल्यावर साधारण १-१.५ मि. (ट्रेनच्या स्पीडने Happy ) कर्जतच्या दिशेने उजव्या हाताला "कुंभा" बहरला आहे (शब्दशः बहरला आहे). :-). पुढे खंडाळ्याच्या घाटात अजुन एक कुंभा बहरला आहे.

पळसदरी ते खंडाळा (रेल्वेने) दरम्यान "पांढरा कुडा" सर्वत्र फुललाय. सगळीकडे ऑफव्हाईट रंगाचा सडा पसरल्यासाखा दिसतोय.

लोणावळा स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरच (पुण्याकडे जाणा-या गाड्या थांबतात तो) तिवर / नेवर बहरलाय. सकाळी इंद्रायणीने पुण्याला गेल्यामुळे तिवर / नेवराच्या माळा पहायला मिळाल्या. Happy

पुणे स्टेशनजवळ, पुणे-हडपसर मार्गावर, रेसकोर्सजवळ नीलमोहर (जॅकरांदा) बहरलाय.

सारसबागेत जांभळी तामण फुललीय.

जेजुरी-निरा-लोणंद मार्गावर मायबोलीकर सरीवांनी टिपलेला पांढरा गुलमोहर शोधत होतो पण नाही दिसला. Sad पण याच मार्गावर तुरळक ठिकाणी आपला नेहमीचा "गुलमोहर" मात्र जोमात बहरलाय.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर मुंबईच्या दिशेने जाताना खालापूर टोलनाक्याच्या पुढे पिवळा धम्मक टॅबेबुया फुललाय. याच्याच अधेमध्ये, हिरवा साजश्रुंगार उतरवून पिवळा साज श्रुंगार करणारा "बहावा" फुलतोय. मध्येच एखाद दुसरा लालभडक पांगारा ही दिसतोय. डोंगरावर बर्‍याच ठिकाणी "कुसुमाची" कुसुंबी रंगाची पालवी नजरेस पडत आहे.

मुंबईत सर्वत्र पाचुच्या हिरव्या माहेरी आलेल्या हळदुल्या रंगाचा सोनमोहराचा सडा सर्वत्र पसरतोय. Happy

सध्या निसर्गात पिवळा, लाल, गुलाबी, निळा, जांभळा, कुसुंबी, पांढरा इ.इ. रंगांचा रंगोत्सव आहे. कॅमेर्‍यात टिपता आला नाही, पण मनात नेहमीप्रमाणेच टिपलाय. Happy

वा जिप्सी, क्या बात है. कविता नाही आज कुठली बरोबर पण तुझे लिखाण हीच कविता आहे आज.

सोनमोहर सडा डोंबिवली एम आय डी सी परिसरात छान पडलाय अगदी गालीचा, भरपूर झाडं आहेत तिथे.

अरे तो टॅबेबुया मीही पाहिलेला... सांगायचे राहुन गेलेच... आंबोलीलाही सगळीकडे बहावा फुललेला.

जिप्स्या.. ती ठळक अक्षरे निळी असतील आणि त्यात तूझ्या फोटोची लिंक असेल असे वाटले होते ! पण तरीही अनुभव आलाच रे !!

राणीच्या बागेत गेलास तर गायत्री फुललीय का ते बघून घे. तशी ती पावसाळ्यात फुलते पण सध्या पाऊस पडतोय, म्हणून शंका आली मला.

न्यू झीलंडमधल्या ज्या बागांच्या वेबसाइट्स आहेत तिथे या आठवड्यात कुठली फुले आहेत, त्यांचे फोटो असतात. काश राणीच्या बागेची पण अशी वेबसाईट असती..

जिप्सी! मला आता उठून त्या मार्गावरून जावे वाटते!! Sad Happy

तुम्ही सोनमोहर म्हटलंय तो कॉपर पॉड का? मुंबईत भरपूर आहेत ते.
पवईत लार्सन टुब्रो च्या आवारात जाकारंदा आहेत. पण ते इथल्या फोटोइतके गच्च भरलेले नसतात पण बर्यापैकी फुलतात. पहिल्यांदा मी बघितले तेव्हा मला जपानच्या साकुराची आठवण झाली (साकुराची/चेरीची फुले खूप लहान असतात पण रंग आणि झाडावरचा बहार बघून आठवण झाली).

व्वा !़़आज कीत्ती दिव सांनी हा धागा म स्त धावला:)
श शांक जी ग्रेट आहात तुम्ही....
आदिजो छान माहिती....
दिनेश दा मst माहिती .
जिप्सी अप्रतिम वर्णन.. ... ंतुम्ची छकुली काय म्हणते? काय
नाव ठेवलं?
साधना जmल त र मी पण फोटो टाकते..
टिना अ रे रे.... वा ईट वाट्ल ग ...

जॅकरांदा बद्द्ल साधनाशी सहमत. मुंबईत पाहिल्याचे अजिबातच आठवत नाही.
मी मागच्या वर्षी आमच्या आसपास एक गुलमोहोर पाहिला तेव्हा आपल्याइथले फुललेले गुलमोहोर आठवले. समहौ खूप नाहीयेत इथे. कारण माहित नाही.

हे शा गं.चे फोटो.

http://www.maayboli.com/node/30259

हो सोनमोहर म्हणजेच copper pod Happy >>>>>>येस्स्स्स Happy

वेका, मुंबईत नाहूर-मुलुंडच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ एक जॅकरांदाच झाड पाहिलंय मी. Happy

जिप्सी, प्रवासातील क्षणचित्रे वाचल्यावर खरंच त्या मार्गावरून भटकंती करायची इच्छा होते आहे!

तुला पांढरा गुलमोहर दिसला नाही, याची खंत मलाही वाटते आहे.पण तुझी तीव्र इच्छाशक्ती नक्कीच कधी ना कधी फलद्रूप होईल.

इतर सर्व माहिती,फोटोही छान.

या कॉपर पॉड्स ची एक मजा डॉ डहाणूकरांनी लिहिली होती.. अगदी शेजारी शेजारी असले तरी ते एकाचवेळी फुलत नाहीत. एकावर नुसतीच पाने, तर एकावर फुले आणि एकावर फक्त शेंगा दिसू शकतात.. अजूनही तसेच असावे.

येस दिनेशदा.

माझ्या घराच्या पाठिमागचा एक फुलला आहे, शेजारचा एवढा नाही.

सरीवा फोटो मस्त. असे फोटो काढता यायला हवेत. नाहीतर मी. मला येतंच नाही. मोबाईलने काढते.

स रिवा म स्त फोटो..

दा छान नि रि क्ष ण...
घरचा आ ळु / धोपा....:)
Photo3410.jpg
महिन्यातुन एकदा याची पात ळ भाजी / आळु व ड्या होतात...:)

मस्त फोटो. अंजू आणि सरिवा, सोनमोहर मस्त . सध्या मुंबई पण नटलीय ह्या रंगात.

सायली, एवढ घरचं अळू ते ही कुंडीत ! मस्त दिसतयं

जिप्सी, उन्हाळी फुलांचं वर्णन मस्त. त्यामुळे फोटोंची कमी नाही जाणवली.

Pages