निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दिवसांपूर्वी बहिणी च्या बाल्कनीत असलेल्या मनडोलिया च्या झाडावर सनबर्ड ने घरटं बांधायला सुरुवात केली.. बाहेरून ओबडधोबड दिसणारं घरटं आतून नक्कीच आरामदायक असणार. यथावकाश घरटे पूर्ण झाल्यावर बर्डीण बाईंनी दोन अंडी ही घातली.आता तिची घरट्याच्या आत बाहेर धावपळ सुरु झाली. इतकुश्या घरट्याच्या जेमतेम अंगठ्या इतक्या लहान प्रवेशद्वारात शिरण्याकरता तिला घरट्याला खालून उलटे लोंबावे लागत होते, मग आत शिरुन उलटे वळून आपली लांबुडकी चोच घरट्याबाहेर ठेवून बसावे लागत होते.
आता समोरच्या झाडावरचा खंड्या घरट्यातील हालचालींवर लक्ष ठेऊ लागला , बाजू च्या वीजे च्या तारेवर बसणार्‍या कावळ्याची काकदृष्टी ही घरट्याकडे वळली..

जवळच्याच एका झाडावर बसून सनबर्ड , या दोन्ही दुश्मनांवर पाहारा ठेवू लागला..बहिणी ने वेळोवेळी हलक्या पावलाने , बर्डिणीला न घाबरवता , बाल्कनीत येऊन खंड्या आणी कावळ्याला हुसकण्याचे काम हाती घेतले.
काही दिवसांनी खंड्या बहुतेक कावळ्या बरोबर भांडण नको म्हणून हा प्रांत सोडून निघून गेला..

पुढले दहा बारा दिवस बर्डीण बाई लगबगीने पुटकन ब्रेकफास्ट, लंच आणी डिनर खाऊन पुटकन परतायची..
पुन्हा कसरत करून आत जाऊन , चोच बाहेर काढून बसायची

पण आज सकाळी दहा वाजता बहिणी चा फोन आला.. सकाळच्या वेळी ती कामात होती, बर्डीण बाई ब्रेकफास्ट साठी बाहेर गेल्या होत्या,, मिस्टर बर्ड ही कुठेसे गायब होते..
आणी कावळ्याने बरोब्बर डाव साधला होता.. शिताफीने त्याने घरट्याचा अर्धा भाग कापून अंड्यांसकट पळवला होता. हे काम त्याने इतक्या सफाईदार पणे केले होते कि बाल्कनीत , घरट्याची एक सुद्धा काडी पडलेली नव्हती..

सकाळपासून बर्डीण बाई भिर भिर सारख्या येऊन झाडा भोवती घिरट्या घालताहेत.. शोध शोध शोधताहेत Sad

काय विचार येत असतील बरं बिचारीच्या मनात???

ही मदनबाणाची फुलं का?>>>> नाही. मदनबाणाची फुले याच्या तिप्पट आहाराची आणि टपोरी असतात. ही सायली आहे.

वर्षू, माझ्या डोळ्यादेखत नुकतेच उडायला शिकलेले एक शिंपी पक्ष्याचे पिल्लू कावळ्याने पकडले होते. त्या शिंप्याचे घरटे आमच्याच बागेत होते. रोज मी असेच घरट्याकडे बघत असे...

पण पक्ष्यांचे एक बरे असते त्यांना अश्या कटू आठवणी फार काळ रहात नाहीत. कावळा मात्र अपवाद आहे. एखाद्याने त्याला त्रास दिला तर तो डूख धरतो.

एखाद्याने त्याला त्रास दिला तर तो डूख धरतो. >> खरच का दिनेशदा ?
बाकी त्याचा आणि पिंड वाहण्याचा काही संबंध असतो का खरेच ? त्यान चोच लावणं न लावणं ?

दुरंगी बाभुळी ची फुलं काय गोड आहेत... म ऊ म ऊ पीसांसारखी ...
वर्षु दी , दा खुप ग्रेट आहात तुन्ही दोघ... कीत्ती माहिती आहे बापरे. ..
म नु षी ताई म स्त फो टो... ती जुई अ सावी ब हुदा..
व र्षु दी मस्त गोष्ट सांगतेस तु... अ ग दी माझ्या शेजारी ब सुन सांगते आहेस असच वाटलं Happy ...... घरट पण गो ड आहे...प ण
ए न्ड दुखद होता.... म न डोलीया च झाड डाळींबा सार ख्च दिसतय...
फु ल लागतात का त्याला? तुझ्या ब हिणीला ध न्स ईतकी छान गोष्ट ऐकायला मिळाली ....

हो खरंच दुरंगी बाभूळ काय मस्तय. पहिल्यांदाच पहातीये.
वर्षू अगदी डोळ्यासमोर घडलं बघ सगळं. खूप वाईट वाटलं.
<<<< Food Chain .. आणखी काय .>>>> टिना अगदी अगदी!
आणि कावळ्याने घरट्याचा भाग तोडून नेला? दुष्ट कुठला!

श शांक जी धns ... ख र च त्या फु लांचे खुप प्र का र आहेत...

आज घारपुरे काकुं कडे गेले होते ... त्यांनी त्यांच्या झाडाचे आंबे दिले Happy पायरी आंबा आहे..

IMG_20150410_213130.JPG

कोणी मायेनी दिलेल्या वस्तुंची चव न्यारीच असते नाही! Happy यातल्या एका कैरीचे आंबट गोड वरण केले होते आज.. म स्त झाले होते
चविला

उद्या दोन कैर्‍यांचा तक्कु आणि ऊरलेल्या कैर्‍या फणसाच्या लोणच्यात वा प रणार आहे :).IMG_20150410_212733.jpg

टीना.. सनबर्ड इतका भिरभिरतो ना..त्याचा फोटो मोबाईल वर काढणं कठीणच..
अगं त्या घरट्याकडे नीट बघ ..ती चोच दिसत आहे ना घरट्याबाहेर आलेली, काळी अणकुचीदार??.. दिसली का??

बाप्रे.. नुकतंच उडणारं पिलू.. आई ग्ग!!! बिच्चारं.. हम्म्म !! फूड चेन..च!!!

कावळा डूख धरतो?हे खरंय?? लहानपणी गोष्टी ऐकल्यात खर्‍या... कावळा कोणाच्या डोक्यावर चोची मारून पळाला वगैरे..

माझे वडील आय सर्जन होते.. एकदा त्यांच्याकडे विचित्र केस आली होती.. बाजू च्या गावात एका तान्ह्या बाळा ला न्हावूमाखू घालून उन्हात ठेवले होते.. एका कावळ्याने झडप घालून बाळाचा डोळाच काढून घेतला होता... इट वॉज इररिपेअरेबल डॅमेज!!! Uhoh

कावळे, घारी बरेच डेंजरस असतात.. आणी धीट ही!!

कावळे डुख धरतात. माझ्या माम्माने कावळ्याचे घरटे थोड्लेले.त्या भागात सहा महीने पाय ठेऊ दिला नाही कावळ्याणि त्याला.

आ मचे एक नातेवाईक होते.. त्य च्या मागे एक काव ळा लागला होता.. ते घra बाहेर प ड ले की काव्ळा कु ठुन सा यायचा आणि त्या च्या डो क्याव र चोच मारय चा... च क्क ६ म हिने हा प्र कार चाल ला.. म ग कोण्या जाण कारा क डुन बंदो ब्स्त केला त्या चा .

किडयाचा पतंग झाला की तो कोष कुरतडून बाहर येतो. या कोशाला उकळवुन रेशीम। काढले तर हजार ठीकाणी तुटलेला दोरा मिलतो. तेच किडि आत असताना कोष ऊकलला तर लांबचलांब असा अखंडित रेशम मिलते

आम्बोलिला ६महिभ्यापासुन परत र
रेशम केंद्र सुरु झाले. बराच काळ बंद होते. तिथे किड्याम्ची पैदास होते. रेशम नाही बनत इथे

सनबर्डचं घरटं मस्त!
सायली, मोगरा सुंदर!

वर्षुदी,
मनडोलिया च्या झाडावर >>>
हे कसलं झाड असतं? अलामांडाचा वेल आहे का? कर्ण्याच्या आकाराची फुलं येणारा?

साधना, रेशमाचे किडे तिथून बहुतेक कर्नाटकात जात असतील. बर्‍याच वर्षांपासून बंद होते ते केंद्र.
आता चालू झाले ते छान झाले.

सायली, नागपुरी उन्हाळा सुरु झाला कि नाही ? मोगरा आणि कैर्‍यांच्या पाठोपाठ तो येणारच.

वर्षु दी मनडोलिया चा वेल/ फुल दोन्ही प ण गो ड आहे...
ध न्स लगेच ईच्छा पुर्ण केलीस..:)

दा आभाळी वातावरण आहे... सगळे ऋ तु च क्र च बदलले आहे...
आ दि जो Happy

काल एका वेली व र अशी नैसर्गीक नक्षी दिसली...
Photo3363.jpg

ही फुल कसली? रंग खुप गोड होता..
>Photo3365.jpg

सायली, असले नक्षीचे पान म्हणजे वरच्या पानांनी, जून्या आणि खालच्या पानांना उन मिळावे म्हणून केलेली सोय असते. मनीप्लांटच्या वेलामधे हे फार दिसते.. ( माझा लेख होता इथेच. बहुतेक पैश्याचे झाड या नावाने. )

आमच्याकडच्या टिव्ही नेटवर्कवर फ्रुट सलाड ट्री.. असे काहीतरी सांगत होते. गूगल केल्यावर हे दिसले.

https://www.fruitsaladtrees.com/

ज्या अर्थी ही कंपनी ते विकतेय त्या अर्थी हे शक्य असणारच. ( एकाच झाडाला वेगवेगळी फळे, पण एकाच वर्गातील )

आपल्याकडे हा प्रयोग करायला हवा.. मला सुचले ते प्रकार असे.

१) पेरू + जांभूळ + जाम
२) चिकू + मोह + अहमदाबादी मेवा
३) आंबा + चारोळी
४) संत्री + मोसंबी + लिंबू + पपनस

हि सर्व गट शक्य होतील असे वाटतेय, कारण यातली झाडे एकाच कूळातली आहेत.

साधना Happy
दा, नक्षी च्या झाडाची कीत्ती छान सोय सांगीतली..
आणि फ्रुट सलाड ट्री अमेझींग... फkt च व कshee अ सेल याची उत्सुक्ता आहे. .

बर एक सांगा, हा आपटा च ना/?
Photo3371.jpgPhoto3375.jpgPhoto3376.jpg

Pages