निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप पुर्वी करजेंल म्हणून तेल असायचे. त्यात वात घालुन दिवा लावायचा.थोड्या वेळाने दिव्यातले तेल गरम झाले की त्यात कापुस बुडवुन कान नाक टोचले असेल्, काटा मो डला असेल तर शेक द्यायचा. ते हेच असेल.

जागु या भागाच्या सुरुवातीचा फोटो मस्त आहे. एकदम फ्रेश.

यंदा पहिल्यांदीच फॉलमध्ये कंद लावून आलेले ट्युलिप्स. या फुलांना मंद पण छान वास आहे हे मला पहिल्यांदीच कळलं. Happy

Tulips2.gif

यंदा पहिल्यांदीच फॉलमध्ये कंद लावून आलेले ट्युलिप्स. >>>> ट्युलिप्स ते ही आपल्याच दारात/परसदारात ... हे नुसते वाचूनही आऽहा ..... झाले ....

फारच सुंदर ....

आहा! ट्युलिप्स!!
फारच सुंदर!

चार वर्षापूर्वी मी पुण्यातही ट्युलिप्स फुललेले पाहिलेत!! भांडारकर रस्त्यावरच्या एका बंगल्यात एक हौशी कुटुंब दरवर्षी परदेशातून ट्युलिपचे कंद आणुन हा उद्योग करत असते - केवळ आनंदासाठी. हे कंद भारतात आणल्यावर त्यांना ते काही दिवस फ्रीजमध्ये ठेवावे लागतात. योग्य वेळी ते कुंडीत लावणे, सुर्यप्रकाश, तापमान, पाणी वगैरेची काळजी...कधी तापमान वाढले तर त्यांना कुंड्यांमध्ये बर्फही घालावे लागते Happy एवढे केल्यावर त्यांच्याकडे ही राजबिंडी फुलं फुलतात. माझ्याकडे त्यांचा एक फोटो आहे:
Tulips.JPG

शशांकजी कित्ती झाड आहेत तुमच्या कंपनीत. मस्त वाटत असेल ना एकदम.
हेमा तई वा दि च्या खुप उशिराने शुभेछ्या.

ट्यूलिप्स सुंदरच.. पुर्वी फ्रेंड्स ऑफ ट्रीज चे प्रदर्शन असायचे त्यावेळी खास विमानाने ट्यूलिप्स आणली जात मुंबईत.

---

काल चायनाच्या चॅनेलवर रेशीम उद्योगावरची एक फिल्म बघत होतो. आपल्यापेक्षा फार वेगळ्या प्रकारे जोपासना करतात त्यांची.

आपल्याप्रमाणे बंदीस्त जागेत न करता, उघड्यावर एका टेकडीवर ते किडे पाळले जात होते. झाडेही तूतीची नव्हती.
किडेही आकाराने पिवळे सोनेरी होते. उघड्यावर असल्याने बर्फ, पाऊस पडला तर खुप नुकसान होतेच. शिवाय पक्षी, सरपटणारे प्राणी यांच्यापासूनही संरक्षण करावे लागते. त्यासाठी ते लोक, टेकडीवरच खोपटे बांधून राहतात.

कोष झाले कि वेचून घरी आणतात. मग मार्केटमधे जाऊन विकतात. ते कोषही आपल्याकडच्या कोषांपेक्षा मोठे आणि रंगानेही वेगळे होते. त्या बाजारात प्रत्येक कोष पारखून घेतला जात होता. ( तो हातात धरून अलगद हलवून बघत होते. काय बघत होते ते कळले नाही )

चायनाने अनेक वर्षे रेशीम कसे तयार होते ते गुपित ठेवले होते. त्यांचा व्यापार थेट युरपपर्यंत होता. त्या सिल्क रुटच्या आठवणी आजही काढल्या जातात.

वेका वॉव.क स ले गोडुले टुयलिप्स आहेत..
आ दि जो नी टाकलेला फो टो प ण छान आहे त्या निमित्यानी ट्युलीप्स ची काळजी क शी घ्यायची याची छान माहिती मिळाली...
दा चीन रेशीम प्रकरण छान आहे... तु तीच्या झा डाचा काय संबध अ स तो?

आ म च्या ़कडे मारव्याला ईटुकले पिटुकले फुलं लागलेतः)
Photo3353.jpgPhoto3347.jpg
आ णि हे विंचवाच्या झाडाला क्रोटन सारखे फुल लागले...
Photo3342.jpgPhoto3341.jpg

सायली तुतीच्या झाडावर रेशीम किड्यांची पैदास करतात .

त्या सिल्क रुटच्या आठवणी आजही काढल्या जातात.>>>>>>>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी!

अरे ईतना सन्नाटा क्यु है भाई !
सगळे गेलेत कुठे?
आज संध्याकाळी नागपूरला मुसळधार पाऊस झाला
ऊन्हाळ्यात धो धो पाऊस म्हणजे कै च्या कै ....

नगर, नागपुरात काय चाललय ? उन्हाळा नको असल्यासारखे पाऊस काय पाडून घेताय Happy

सायली, नागपूरच्या आसपास सिल्क उत्पादन केंद्र आहे का ? अंबोलीला पुर्वी होते.

मुंबईत खुप वर्षांपुर्वी हातमागाची प्रदर्शने भरायची. त्यापैकी एका प्रदर्शनात हे सर्व ठेवले होते. आपल्याकडे वाया गेलेल्या कोषापासूनही सजावटीच्या वस्तू करतात. ते कोष नेमके वाया कश्याने जातात, ते मात्र मला कळले नाही.

वाया गेलेले कोष म्हंजे क्वालिटी वाईज पुअर असावेत,त्यांमधून निघणारे रेशीम सारखे तुटत असावे , सलग एकाच जाडी चे नसावेत.. हा माझा आपला अंदाज आहे Happy

मी पाहिल्यात रेशमा च्या फॅक्टरीज.. सु चौ ( शांग हाय जवळ)ला

टाकते फोटोज शोधून

रच्याकने तिकडे कोषांतून रेशीम काढून घेतल्यावर रेशमा च्या किड्यांची रवानगी थेट एखाद्या रेस्टॉरेंट मधल्या किचन च्या मोठ्ठ्या कढईत होते. क्रिस्प तळलेले मीठ तिखट मसाला भुरभुरलेले हे किडे म्हंजे चायनीज टेबलावर चा अत्यंत पॉप्युलर चखणा..

अदीजो, सायली क्यूट फुलं..

आ णि हे विंचवाच्या झाडाला क्रोटन सारखे फुल लागले.. >>>>>> सायली - हे तेच फुल आहे का ???

Common name: Moss rose, Portulaca , नोनिया •
Botanical name: Portulaca grandiflora Family: Portulacaceae (moss rose family)

(जरा गुगलून पहाणे.... Happy ) कारण यात खूप प्रकार आहेत - पण त्या सार्‍यांना मॉस रोझ म्हणतात त्यामुळे तुझ्या बागेतील नेमके फुल शोधून पहाणे ....

सुप्रभात!
आज सकाळी नेहमीचा फिरण्याचा रस्ता सोडून जरा वेगळा रस्ता धरला तर सिगमकाठी / दुरंगी बाभूळ दिसली. मोबाईलवरचे फोटो आहेत, त्यामुळे स्पष्ट नाहीत.

sigamkati.jpgsigamkati2.jpg

आमच्या या फिरण्याच्या रस्त्यावर सध्या खैर, कडुनिंब, कुडा भरभरून फुललेत. त्यांचा परिमळ आमची सकाळ प्रसन्न करून जातो. त्यांचेही फोटो टाकेनच.

..

पसरणीचा घाट उतरताना वाईला आहे रेशीम उत्पादन केंद्र. एकदा महाबळेश्वरहून येताना तिथे गेलो होतो. तिथे कसली तरी सरकारी मीटींग चालली होती. पण सर्व जण अगदी लक्ष देऊन ऐकत होते. बोलणारा अधिकारी अतिशय चांगल बोलत होता. तिथल्या एका माणसानी अम्हाला रेशीम उत्पादनाची केंद्राची माहिती दिली होती.

वर्षू, तयार कोष हातात घेऊन, हलवून काय बघतात ?

रेशमाची जन्मकथा मी ऐकल्याप्रमाणे अशी.. एक मुलगी रानातून काही कोष घेऊन आली. तिची आई पाणी गरम करत होती. तिने मुलीला विचारले काय आणले ? तर ते कोष चुकून पाण्यात पडले. ते काडीने उचलून बघितले तर त्या काडीला चिकटून सलग धागा बाहेर येऊ लागला... मी बघितल्याप्रमाणे कोषापासून अजूनही साधारण याच पद्धतीने धागे काढतात.

इथे अंगोलातही असे मेलेले किडे विकायला असतात. बहुतेक चिनी लोक घेत असावेत ( अंगोलात रेशीम उद्योग आहे का याची कल्पना नाही )

ती दुरंगी बाभूळ, ( त्यातला गुलाबी भाग ) दिवसा गुलाबी असतो तर संध्याकाळी पांढरा होतो. रात्रीही ते फुललेले झाड छान दिसते.

ती दुरंगी बाभूळ, ( त्यातला गुलाबी भाग ) दिवसा गुलाबी असतो तर संध्याकाळी पांढरा होतो. >>>>
हं, पण त्या झाडावर तर एकाच वेळी काही गुलाबी-पिवळे आणि काही पांढरे-पिवळे तुरे होते.....

पसरणीचा घाट उतरताना वाईला आहे रेशीम उत्पादन केंद्र.>>>
आम्हीही एकदा ते पहायला गेलो होतो, तेव्हा मला तिथल्या माणसाने काही रेशमाचे कोष दिले होते. ते घरी आणून ठेवले, तर काही दिवसांनी त्यातून रेशमाचे पतंग बाहेर पडले!

.एकेक कोष हातात धरून हलवतात.. आत जर प्युपा असेल तर त्याचा आतील पोकळीत हलण्याचा रॅटलिंग साउंड येईल.. अश्या कोषातून मिळणारा सिल्क थ्रेड उत्तम प्रतीचा असतो..
रिकाम्या कोषातून किडे उडून गेल्यामुळे काहीच आवाज येत नाही आणी या कोषांपासून मिळणारे रेशीम धागे निम्न प्रतीचे असतात.
म्हणून कोष सेपरेट करण्यात येतात..

या कामात तरबेज असलेले कामगार हे काम अतिशय गतीने आणी चोख रीतीने करतात


ही मदनबाणाची फुलं का?

ओव्याच्या पानावरचा चिंटूकला रंगीत पाहुणा

गुड न्यूज.. श्री. आयपॅड व श्री. वायफाय यांचं भांडण मिटलं .

वर्षू.. किती हळूवारपणे करतात हे काम ना ? ( असे लिहिणे योग्य नाही, पण मला आधी वाटलं त्या माणसाचा हात म्हातारपणामूळे थरथरत असेल. )

मानुषी.. मस्त फोटो.. हि अशी फुलपाखरे आमच्याकडे पण दिसतात. इथूनच गेली असतील काय ? Happy

Pages