अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Donation.jpg

जोपर्यंत अके ही कामं करत आहेत तोपर्यंत मी त्यांच्या हेतूबद्दल शंका घेणार नाही.
ही (अनेक गोष्टींपैकी) अजून एक छोटीशी पण दिलासा देणारी गोष्ट.
(त्याची पार्श्वभूमी-Delhi restaurant denies entry to differently-abled customer)
सरकार ह्यासाठीच असतं. प्रत्येक नागरिकाची काळजी घेण्यासाठी--जात, धर्म, लिंग, व्यंग ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचं रक्षण करण्यासाठी.

<<<यु मीन टु से त्या शाई फेकणार्‍यावर आपने कारवाई करायला हवी होती?? अ ओ, आता काय करायचं
म्हणणारे म्हणतच असतात की शाई, थप्पड, लाठ्या खाणं हे सगळे आपनेच केलेले स्टण्ट्स आहेत. मला तसं वाटत नाही. ज्यांना वाटतं त्यांच्याकडे ह्यासाठी काही पुरावे नाहीत. >>
----- आआपने स्वतः कारवाई करावी अशी अपेक्षा नाही... पण पोलिस, गृह खाते काय कायदेशिर कारवाई करते आहे याचा पाठपुरावा ते करत आहेत का?

निवडणुकीपुर्वी आआपच्या सर्वोच्च नेत्यावर नियमीत आणि ठराविक काळाने हल्ले झाले होते... तर चौकशीचा पाठपुरावा होतो आहे का? मारेकरी सुटले का अजुनही अटकेत आहेत?

प्रत्येक नागरिकाची काळजी घेण्यासाठी--जात, धर्म, लिंग, व्यंग ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचं रक्षण करण्यासाठी.
----- सहमत आहे.... वादच नाही.

<<आआपने स्वतः कारवाई करावी अशी अपेक्षा नाही... पण पोलिस, गृह खाते काय कायदेशिर कारवाई करते आहे याचा पाठपुरावा ते करत आहेत का?>>
<<निवडणुकीपुर्वी आआपच्या सर्वोच्च नेत्यावर नियमीत आणि ठराविक काळाने हल्ले झाले होते... तर चौकशीचा पाठपुरावा होतो आहे का? मारेकरी सुटले का अजुनही अटकेत आहेत?>>

काही कल्पना नाही. पाठपुरावा करत नसावेत असा अंदाज आहे. तो करावा अशी अपेक्षा अजिबात नाही. त्यांना त्यापेक्षा अनेक महत्वाची कामे आहेत. Happy

<<काही कल्पना नाही. पाठपुरावा करत नसावेत असा अंदाज आहे. तो करावा अशी अपेक्षा अजिबात नाही. त्यांना त्यापेक्षा अनेक महत्वाची कामे आहेत. स्मित>>
---- अपेक्षित उत्तर आहे... Happy

मग तो प्रसिद्धीसाठी केलेला स्टन्ट होता किव्वा नव्हता हे गुलदस्त्यातच रहाणार. ते कृत्य आआपच्या विरोधकान्नी केले असेल तर ते पाठपुरावा करणार नाही, आआपने नाट्य घडवले असेल तर.... असो, त्यान्ना पक्षामधिल इतर अनेक मोठ्या होणार्‍या नेत्यान्ची पन्ख कमी करण्याची महत्वाची आणि मह्त्वाकान्क्षी कामे आहेत. Happy

आआप पक्षाला अन्तरर्गत लाथाळ्यातुन बाहेर येण्यासाठी शुभेच्छा...

<<मग तो प्रसिद्धीसाठी केलेला स्टन्ट होता किव्वा नव्हता हे गुलदस्त्यातच रहाणार. ते कृत्य आआपच्या विरोधकान्नी केले असेल तर ते पाठपुरावा करणार नाही, आआपने नाट्य घडवले असेल तर....>>

उदय, एका प्रसंगाचं उदाहरण देते. बघा पटतंय का.
आपच्या कार्यकर्त्यांवर तुघलकाबादमध्ये हल्ला झाला होता. तो भाजपाचा नेता रमेश विधुडीने केला असा आपवाल्यांनी आरोप केला. त्यावर रमेश विधुडीचं हे मत होतं.
"However, Bidhuri said that the allegations by AAP are politically motivated and rejected them. "All the allegations are baseless. Neither my family nor I have any role in the incident," he said."

आणि त्यानंतर आपने हा व्हिडिओ रिलीज केला होता. आता तुम्हीच ठरवा.

कबुल आहे... पण पुढे काय होत अशा प्रकरणान्चे? हल्ला करणारे कुठल्याही पक्षाचे असेना, कारवाई व्हायला हवी असे वाटते, असो.

मला राजकारणात, समाजकारणात स्वच्छतेची अपेक्षा आहे; कोण करतो हे महत्वाचे नाही आहे. पण कुणी आढळले, प्रामाणिक प्रयत्न केले तर नक्की कौतुक वाटते. तुर्तास हा विषय मी थाम्बवतो.

ज्वालामुखीतून लाव्हा उसळत रहावा तसं त्या लेखाच्या शब्दा-शब्दांतून द्वेष आणि हेटाळणी उसळताना जाणवतंय. Lol माबुदोस.
रच्याकने, संबंधित केसमध्ये न्यायालयाने खुद्द गडकरींनाच १०,००० रूपये दंड बजावल्याची बातमी लेखकमहाशयांना माहीत नसावी बहुतेक !

काँग्रेसच्या वळणाने जातोय की नाही ते माहीत नाही पण जनता दलाच्या वळणाने जाऊ पहात होता. तो बेत उलटवून लावण्यात आला आहे असं दिसतंय. हळूहळू एकेक गोष्टी बाहेर येत आहेत. हा टिप ऑफ आइसबर्ग असू शकेल. त्यामुळे आत्ताच कुठलीही भूमिका/एका गटाची बाजू घेणं अवघड आहे.

भगवंत मान ह्यांच्या मते पक्षाने प्र भू आणि योया ह्यांच्याबाबत फारच नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यांना पक्षातून बाहेर काढायला हवं. पहिल्यांदाच आपच्या कुणी नेत्याने इतका परखड विचार बोलून दाखवला आहे.

तो लेख म्हणजे दिल्लीच्या पराभवाची झोंबलेली मिर्चीचे उट्टे काढनारा आहे.
लिहिणार्‍याला आणि वाचणार्‍याला कोपरा पासुन नमस्कार

केजरीवालांच्या स्टिंगची ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर अंजली दमानियांनी आप सोडला. नी-जर्क रिअ‍ॅक्शन. नॉट गुड.

"Very soon, we would need fleet of 67 Reporters,with 24X7 Channel dedicated to AAP to track AAP Development ... बाप रे बाप , ये है AAP !" Lol

मूर्खपणा आहे अगदी.
करण्यासारखं काही नाही म्हणून आपच्या मागे लागलेयत लोक.
'घोडेबाजार' शब्द वाचून काय बुवा त्या ऑडियोक्लिपमध्ये ऐकायचा प्रयत्न केला तर नेहमीचाच सत्तेचा जुगाड होता.
'चुनावी जुमला' पेक्षा नक्कीच सोज्ज्वळ.

हम आह भी भरते हैं, तो हो जाते हैं बदनाम
वो क़त्ल भी करते हैं, तो चर्चा नहीं होता
-अकबर इलाहाबादी

केजरीवाल जरा बाहेर गेले की सगळे नेते यडचापपणा सुरू करतात. तिसर्‍यांदा झालंय हे.

<<केजरीवाल जरा बाहेर गेले की सगळे नेते यडचापपणा सुरू करतात. तिसर्‍यांदा झालंय हे.>>
------- ते बाहेर गेल्यामुळेच हे सर्व होत आहे असे वाटत नाही. परिस्थितीवर त्यान्चे नियन्त्रण आहे, त्यान्च्या मर्जीनुसारच सर्व (योया, प्रभु यान्चे पन्ख कापण्याचे प्रकर) चालले आहे. जर तसे नसेल तर गोन्धळ बघुन ते सुटीवर गेले असण्याची शक्यता किती?

योया आदी विरुद्ध आआप मधे बोलणार्‍यान्ना केजरीवाल यान्चा उघड पाठिम्बा आहे असे दिसते. ते फक्त मिडिआ आणि जनते पासुन दुर आहेत. कठोर, कटू निर्णय (योया प्रभु यान्ना दुर करणे) घेताना मी तेथे नव्हतो हे दाखवण्यासाठी (सिन्हासन...).

नक्की काय गौडबन्गाल आहे हे अन्जली दमानिया यान्ना आपल्यापेक्षा अधिक माहित असणार आणि येत्या दिवसात ते बाहेर येणारच.

७० पैकी ६७ असा मजबुत निकाल पाठिशी असताना एव्हढ्या कमी वेळात या व अशा बातम्या याव्यात यामुळे सखेद आश्चर्य वाटते.

<<'चुनावी जुमला' पेक्षा नक्कीच सोज्ज्वळ>>
------ सहमत...

नक्की अजुन किती सोज्वळ आहेत हे अजुन येत्या काही महिन्यात/ वर्षात दिसेल.

अके आपली कामं करत आहेत तोपर्यंत त्यांच कुनिही काहिच वाकड करु शकनार नाहित.
१० लोक निघाली तर दुसरे २० येउन मिळतिल.

योया यांच्या फेबु वर खुलासा करणारे पत्र आहे ते वाचा. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिसतील.

अके काम करत असतील हा चुकीचा मुद्दा आहे. काम तर बाकीचे लोकही करत होते पण उदो उदो होतो अके चा आणि हाय कमांड निर्माण झाली आहे आता आप मध्ये असे म्हणायचे का?

>>केजरीवाल जरा बाहेर गेले की सगळे नेते यडचापपणा सुरू करतात. तिसर्‍यांदा झालंय हे.<<
रिंगमास्टरच्या जाचाला/अरेराविला कंटाळुन वाघ, सिंह, बकरी पलायनाच्या मार्गावर. शेवटी सर्कशीत फक्त रिंगमास्टर आणि निवडक जोकर्स रहाणार असं चित्रं दिसतंय... Happy

>>केजरीवाल जरा बाहेर गेले की सगळे नेते यडचापपणा सुरू करतात. तिसर्‍यांदा झालंय हे.<<

चांगल्या नेत्याना असेच अनुभव येतात. मागे रागा कुठेतरी गेले होते तेव्हा माजी पंतप्रधानानी एक ऑर्डियन्स पास केला होता तो त्याना परत आल्यावर फाडुन टाकावा लागला. ह्यावेळी सुट्टीवर गेले तेव्हा भुमि अदिग्रहण कायदा लोकसभेत पास झाला. ते नाहित हे बघुन सरकार पटकन बजेट पण पास करुन घेतिल Happy

ते शिवजी कि बारात वगैरे ठिक आहे, पण केजरीवालांनी ६ आमदार फोडण्याचे प्रयत्न केले यावर तुमचं मत काय? "पार्टी विथ ए डिफरंस" ये भी एक चुनावी जुमला है क्या? Happy

राज, तुमच्यासाठी खास सविस्तर उत्तर. खरंतर सध्या जो काही सावळागोंधळ चालू आहे त्यावर लिहायचं टाळतेय. कारण कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. पण राजेश गर्गबद्दल आधीपासून वाचण्यात येतंय. सो जस्ट कनेक्टिंग द डॉट्स.

राजेश गर्ग - आधीचा काँग्रेसचा नेता. लोकसभा निवडणूकांनंतर आपची बेक्कार अवस्था झाली होती. कार्यकर्त्यांचं आणि आमदारांचंही धैर्य, आत्मविश्वास कमी झालेला होता. त्यावेळी
राजेश गर्गने काँग्रेसचा सपोर्ट घेऊन सरकार स्थापन करूया ह्यासाठी आपवर दबाव आणायला सुरूवात केली होती. AAP MLA Garg calls on Congress to help his party form Delhi government

"There should be a government in Delhi, irrespective of which party's it is. We had come to serve people, not to do politics for power. Today we need to think of rescuing the people of Delhi from the expenditure of Rs 1,000 crore for another election and not be stubborn about holding fresh elections. Could we not have done good work while sitting in the opposition? How will we face the people of the city if no party gets a clear majority in the next election," he had said. This is diametrically opposite to the stand taken by Kejriwal."

राजेश गर्ग असं बोलतानाचा व्हिडिओ पाहिलेला आहे. (नाहीतर बातमीवर विश्वास कसा ठेवला वगैरे प्रश्न सुरू होतील. :डोमा:)
तर ह्या अशा लोकांना बांधून ठेवण्यासाठी गुंतवणं आवश्यक होतं. जेव्हा फेरनिवडणूक नक्की झाली तेव्हा ह्या बंडखोर महाशयांना तिकीट दिलं गेलं नाही. तेव्हा ह्यांनी कुमार विश्वासला ही ऑडिओ टेप पाठवून 'मला तिकीट मिळालं नाही तर मी ही टेप मिडियाला देईन' असं ब्लॅकमेल करायला सुरूवात केली.
कुमार विश्वासांनी ही टेप लगेच पक्षाकडे पाठवली
(अर्थात गर्गबुवांना हे माहीत नसावं. म्हणून त्यांनी कालपासून कुमार विश्वासला ह्यात अडकवायचा प्रयत्न चालवला होता :हाहा:)
प्लीज नोट - ब्लॅकमेल करीन अशी धमकी देऊनही राजेश गर्गला तिकीट मिळालं नाही. कर नाही त्याला डर कशाला? शिवाय ह्या टेपमध्ये काहीच नाहीये. टेप ऐकली आहे का? इथे ऐका.
"ये छे लोग अलग होके अपनी पार्टी बनाये और हमें बाहर से समर्थन कर दे । ये छे लोग बीजेपी में जा रहे थे, लेकिन जा नहीं पाये क्योंकी इन में तीन मुसलमान है, वो छे फिर हमें ही समर्थन कर दे"
ही त्यातली महत्वाची वाक्ये.
ह्यामध्ये घोडेबाजार कुठे दिसला? पैसे ऑफर केले? पद ऑफर केलं? राजेश गर्गला कशात तरी गुंतवून ठेवण्यासाठी कामाला जुंपलंय फक्त. मुत्सद्देगिरी. एके इज अ वाइज मॅन. Wink

असो. चेकच्या पैशाने हवाला व्यवहार होतो हा ज्ञानोदय मिडियामुळेच झाला होता. तसाच पैसा,पद काहीच न देताही घोडेबाजार होतो हा नवीन साक्षात्कार करून दिल्याबद्दल मिडियाचे शतशः आभार !

इच्छुकांसाठी कुमार विश्वासची मुलाखत. वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असूनही ह्या ८-१० दिवसांत त्यांनी उत्तम मॅच्युरिटी दाखवली आहे.

अजून एक. राजेश गर्गला आपमध्ये योगेंद्र यादवांनी इण्ट्रोड्युस केलं होतं असं वाचण्यात आलं (खात्रीशीर माहिती नाही). योयांचं पत्र (ज्यात आप काँग्रेसचं समर्थन घेत होता हे लिहिलंय) आणि गर्गबुवांची टेप लीक होणं ह्या दोन गोष्टींच्या टायमिंगबद्दलही जरा गंमत वाटली. असो.

रच्याकने, भाजपाने पीडीपीसोबत युती करताना काय-काय साटंलोटं केलंय हे मसरतच्या सुटकेने दिसलंच आहे. ह्यावर काही टिप्पणी ?

१६ जुलैला केजरीवाल नी चिवचिव (tweet) केले होती की भाजप कोग्रेस मधुन ६ कोग्रेस चे MLA खरेदी करायचा प्रयन्त कर आहे २० कोटी प्रत्येकी, २ मंत्रीपद आणि ४ चेअरमन.

आता जी टेप रीलिज झाली आहे आणि बर्याच आप च्या कार्यकर्त्यानी मान्य केले आही की ती टेप खरी आहे. आणि त्या टेप मध्ये केजरीवाल कोग्रेस चे ६ आमदार आपल्याबाजुने करायाची गोष्ट केली आहे

ह्याचा अर्थ असा होतो की आप नी आमदार / खासदार तोडायचा प्रयत्न केला तर realginment आणि बाकीच्या लोकानी केले तर horse-trading.

एके इज अ वाइज मॅन. Happy

हा हा, स्पॉट ऑन साहिल शहा.

>>"ये छे लोग अलग होके अपनी पार्टी बनाये और हमें बाहर से समर्थन कर दे । ये छे लोग बीजेपी में जा रहे थे, लेकिन जा नहीं पाये क्योंकी इन में तीन मुसलमान है, वो छे फिर हमें ही समर्थन कर दे"<<

ठळक केलेलं वाक्य हि सुचना आहे कि विनंती आहे कि सौदा आहे हे सुद्न्यांनीच ठरवा. आपची वाटचाल जनता पार्टीच्या पाउलांवर चाललेली आहे असं समजायला हरकत नाहि... Happy

मिर्चीताई, वरच्या पोस्ट आणि लिंक बद्दल धन्यवाद!

अँड येस, हाइंडसाइट इज २०/२०...

अण्णांना का दूर केलं ?
केजरीवाल तर म्हणायचे मै तो अण्णाजी का हनुमान हुं...

कालांतराने अण्णांचा वाली झाला.

स्वच्छ ठेवूनही राजकारण रंजक कसं होऊ शकतं हे बघायला मिळेल.>>

खूपच रंजक आहे

आता ओखला मतदारसंघातील माजी आमदार असिफ मोहम्मद खान यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी एकदा, तर आपचे नेते संजय सिंह यांच्याशी दोन बैठका झाल्याचा दावा केला

लगे रहो

Aam Aadmi Party (AAP) leader Kumar Vishwas on Thursday alleged that people conspire against his party whenever its convener Arvind Kejriwal is unwell or protesting for a noble cause.

प्रॉब्लेम हे सगळे केजरीवाल किंवा आम आदमी पार्टीत घडतय हा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की इतर लोकांना शिव्या घालणारे लोक स्वतःही काही वेगळे नाहीत हे दिसले. असो.
मला तरी वाटते की केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने हे सगळे Deny करण्यापेक्षा मान्य करावे आणि Move on.मी केजरीवाल यांचा फॅन नाही पण हे जे काही बाहेर येतेय..याने फक्त ते एक राजकारणी आहेत एवढेच सिद्ध होतेय सो व्हॉट?
त्यांच्याकडे Massive Mandate आहे आणि त्यांनी दिल्लीच्या जनतेच्या समस्यांवर लक्ष केंन्द्रीत करावे. जर त्यांनी दिलेली वचने पुर्ण केली तर जनता त्यांना या सगळ्याबद्दल क्षमा करेल.

एक जण विकण्यास तयार झाला दुसरा विकत घ्यायला तयार झाला तिसरा म्हणाला आता तु विकतच आहेस तर मी देखील घेतो. लोकांनी पहिल्या दोन जणांना सोडुन तिसर्‍याने इच्छा जाहीर केली म्हणुन त्याला बदडायला सुरुवात केली. पहिल्या दोन जणांना मात्र सोडुन दिले. व्वा रे मिडीया व्वा Rofl

बाकी हे सगळे हायलायटींग चालु आहे ते दिल्ली जे घडले ते बाहेरच्या राज्यात घडु नये.

Pages