अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कॅगने प्राईव्हेट कंपनीच ऑडीट करण हे कोणत्या कायद्यात बसत ? > कंपनी कायद्यात् इंडिरेक्टली तरतूद आहे. शेयरहोल्डर्सच्या हिताला बाधा पोहोचत असेल सरकार तसा निर्णय घेऊ शकते . इथे शेयरहोल्डर्स नसले तरीही प्रश्न जनहिताचा आहे त्यामुळे उच्च न्यायालयाने तसा आदेश दिला असावा .

BJP does another U turn on IT act. AAP is the only party with sensible stand on it. Prashant Bhushan files a case about Essar leak and Gadkari?

<<टोचा काही मार्गदर्शक तत्वे असतात ती घेवुनच सरकारला नीति बनवावी लागते. कोणाला कशी फ़ायदेशीर ठरेल त्या साठी काय करायला हव हे सगळ नीट जमवाव लागत.
हिंदी सिनेमे कमी बघा. ते एवढ ग्रॉसली होत नाही. दिवा घ्या>>

ऊप्स. युरो, आजच तुम्ही हे लिहिलंत आणि आज पुन्हा एकदा सरकार आणि उद्योगपतींच्या नेक्ससबद्दल बातमी बाहेर आली.
"More seriously, the emails reveal in detail how the group was engaged in sourcing vital policy-related developments and documents low- and mid-level officials in various ministries, particularly the petroleum one, which pertains to the group’s core business."

हे तर एकदम हिंदी सिनेमा इष्टाइलनेच घडतंय की. Happy

विकु,
प्रशांत भूषणनी एस्सार नेक्सससंबंधी जनहितयाचिका दाखल केली आहे.

IT अ‍ॅक्टचा युटर्न तर अगदीच लाजिरवाणा आहे. २०१२ मध्ये ६६अ च्या निषेधार्थ मोदींनी त्यांचा प्रोफाइल फोटो बदलून काळा चौकोन केला होता.
तेव्हाचे त्यांचे शब्द -
"As a common man, I join the protest against crackdown on freedom of speech! Have changed my DP. Sabko Sanmati De Bhagwan."
कुठल्याही पक्षाचे समर्थक असलो तरी आपण ह्या कायद्याचा निषेध करायला हवा. मेनस्ट्रीम मिडिया तर गेलाच आहे आपल्या हातून, आता निदान हे स्वातंत्र्य तरी घालवायला नको.
Modi Government Pushes For Greater Restrictions On The Internet In India

लोक्स,
दिल्लीत दिलेली सबसिडी हा फार मोठा आकडा नाहीये. आणि समजा असला तरी सरकार त्यांना चालवायचं आहे. आपण गंमत बघूया की त्यांची तारांबळ उडते की ते म्हणत आहेत तसं घडवण्यात त्यांना यश मिळतं.

कंपन्यांची फार काळजी करू नका. कुठलीही कंपनी स्वतःचं नुकसान करून घेऊन धंदा करणार नाही हे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. टाटा आणि रिलायन्स म्हणत आहेत आम्ही तोट्यात आहोत, तर अजून कंपन्या चालू कशा ठेवल्या?
असो. केजरीवाल दुसरे मार्गही घेत आहेत. ४००० मेगावॅटचा स्वतःचा पॉवर प्लाण्ट चालू करण्यासाठी दिल्लीसरकारने केंद्रसरकारकडे कोल ब्लॉक मागितला आहे.
शिवाय सोलर पॉवरबद्दलही त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं आहे.
AAP's aim is to ensure that 20% of Delhi's energy needs are met by solar power by 2025. Experts say the new government can easily deliver on this by targeting large “energy guzzling“ consumers first, such as malls, hotels, office buildings in Delhi.

त्यांच्याकडे किमान ५ वर्षे तरी आहेत. त्यांच्यात कोणी मुरलेले राजकारणी नाहीत. जवळपास सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातील अ‍ॅक्टिव्हिस्टस,तज्ञ आहेत. जगभरातून विविध क्षेत्रातील भारतीय त्यांना मदत करत आहेत. देखेंगे. Happy

Never doubt that a small group.jpg

तर शेवटी मंत्रोच्चारांच्या घोषात कमळाबाईंचा 'निकाह' झालाच म्हणायचा !
जम्मू-कश्मीरमध्ये मुख्यमंत्री पीडीपीचा आणि उपमुख्यमंत्री भाजपाचा. ह्याला म्हणतात युतीचं सरकार.
गेल्या वर्षी आपने काँग्रेसचं समर्थन घेतलं तेव्हा काँग्रेसला कुठलंही पद दिलं नव्हतं. उलट 'तुम्ही समर्थन दिलं असलं तरी तुमच्यावरही भ्रष्टाचारविरोधी कारवाई करू' असं लिखित स्वरूपात आधीच कळवलं होतं. ते होतं अल्पमताचं सरकार.
आशा आहे की निदान इथून पुढे तरी 'काँग्रेसचं समर्थन' हा मुद्दा निकालात निघेल. Happy

दिल्लीत राहत असूनही पंप्र केजरीवालांच्या शपथविधीला गेले नाहीत. कारण शरद पवारांना भेटायचा त्यांचा कार्यक्रम आधीच आखलेला होता. तो रद्द कसा करणार?
आज मुफ्तींच्या शपथविधीला मात्र सर्व लवाजमा घेऊन गेले आहेत. अरे हो, आजच्या दिवशी (योगायोगाने!) त्यांचे कुठलेच कार्यक्रम आधीपासून आखलेले नसतील म्हणूनच हे शक्य झालं असावं ! Wink

यादव आणि केजरीवाल !! परत एकदा !

आप मध्ये लोकशाही नाही हे यादवांनी मागेही लिहिलेले होते. तसेच केजरीवालांमध्ये व इतर पार्टी मेंबर्समध्ये आणि यादवांमध्ये बुधवारी बेवनाव झाल्यामुळे केजरीवालांनी समस करून मी आता उपस्थितच राहणार नाही असा बालिश स्टॅन्ड घेतला. गुरूवारच्या मिटिंगाला तर बोलावलेच नाही. सगळ्या ऑनलाईन न्युज चॅनलमध्ये त्यांच्यात आणि केजरीवाल ह्यांच्यातील जुना बेवनाव परत वर आला हे लिहिले आहे.

एकंदरीत केजरीवाल आपल्या हेकेखोरपणा मुळे कदाचित बाकीच्या फाऊंडर मेंबर सारखे यादवांना काढणार वा त्यांचे महत्त्व कमी करून टाकणार.

बिचारे यादव काल न्युज मध्ये आल्यावरही तसे काही नाही म्हणून सावरून घेत होते. फिलिंग सॅड फॉर योगेंद्र यादव. आपने असे करायला नाही पाहिजे. असो.

http://www.ndtv.com/india-news/2-camps-within-party-says-aap-ombudsman-a...

ते चुकून गेले (शाजिया अन बेदीसारखे) तर आपला फरक पडेल का? नाही तर का नाही?

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण दोघेही आपसाठी केजरीवालांइतकेच महत्वाचे आहेत असं माझं मत आहे. त्यांच्या बाहेर पडण्याने आपला मोठा झटका बसेल.

पण आज दिवसभर मिडियात जे काही छापलं जातंय त्यात फारसं तथ्य नाही असं आधीच्या अनुभवांवरून आरामात म्हणता येईल. बजेटच्या निराशेवरून लक्ष हटवायला 'आपमध्ये अंतर्गत बेबनाव' ह्या बातमीपेक्षा दुसरं चांगलं निमित्त कोणतं ? Wink Light 1
योयांची पोस्ट - For friends who wanted my reaction on some media reports today
जोवर ते स्वतः "मी आप सोडतोय" हे सांगत नाहीत तोवर माझा मुळीच विश्वास नाही.
आपच्या पीएसीचे सदस्य - आनंदकुमार- ह्यांनी ह्या विषयावर बर्‍याच ट्वीटस केल्या आहेत. एकदा नजर टाकून घ्यायला हरकत नाही.

बेदी आणि शाजिया ह्या 'अवसरवादी' लोकांची योया आणि प्रभू ह्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही.

<<एकंदरीत केजरीवाल आपल्या हेकेखोरपणा मुळे कदाचित बाकीच्या फाऊंडर मेंबर सारखे यादवांना काढणार वा त्यांचे महत्त्व कमी करून टाकणार.>>

केदार,
गेल्या महिन्यात केजरीवालांच्या मुलाखतीत ऐकलं होतं की त्यांनी लोकसभा निवडणूकीच्या वेळी हेकेखोरपणा केला नव्हता, पण त्यानंतर मात्र केला होता Lol उदा.- हरियाणा, महाराष्ट्र मध्ये निवडणूका नाही लढवायच्या.
अर्थात त्याचे (ठसठशीत, घवघवीत) परिणाम आपल्यासमोर आहेत.

हायला, तो 'येडा सीएम'' तिकडे रविवारची सुट्टी-बिट्टी न बघता, ब्लड शुगर ३०० झालेली असताना पाणीप्रकल्प वेळेवर सुरू होण्यासाठी प्रयत्नात आहे, दिल्लीतील व्यापार्‍यांशी मिटिंगा घेत बसलाय आणि मिडियाला आपच्या अंतर्गत गोष्टींची चिंता लागून राहिली आहे.
घर-घर पानी भी पहुंचाएंगे और दिल्ली को टैंकर माफिया से मुक्त भी कराएंगे।

माझ्यापुरता मामला एकदम स्पष्ट आहे. रक्ताच्या नात्यांत, घरातही भांडणं होतात. नो इश्यूज. त्यातून स्वतःची मतं असलेल्या, सुशिक्षित व्यक्ती एकत्र राहणं अनेक कारणांमुळे अवघड असतं (इगो, हेकेखोरपणा)
आपमधून बाहेर पडून कुणी व्यक्ती लांब राहिली, अगदी गेला बाजार तिने स्वतःचा दुसरा पक्ष जरी काढला तरी 'आपमध्येच काहीतरी गडबड होतेय' असं म्हणायला पुरेसा वाव आहे. पण ती व्यक्ती आपमधून बाहेर पडून बीजेपी-काँग्रेस किंवा तत्सम इतर पक्षांमध्ये गेली तर ती व्यक्ती मुळातच स्वार्थी हेतूने आपमध्ये आली होती ! उद्या जाणार तर आजच जा.

>> तर ती व्यक्ती मुळातच स्वार्थी हेतूने आपमध्ये आली होती ! उद्या जाणार तर आजच जा.<<

स्वार्थ हेतु वर केजरीवालांनी बोलणं इज ए बिग्गेस्ट हिपोक्रसी. आपच्या निर्मिती नंतरचं हजारेंचं स्टेटमेंट विसरलात एव्हड्यात?

वर उल्लेखलेलं "काॅंग्रेस समर्थन" वाॅज ए वन नाइट स्टॅंड (नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड) गाॅन राॅंग... Happy

जेटच्या निराशेवरून लक्ष हटवायला 'आपमध्ये अंतर्गत बेबनाव' ह्या बातमीपेक्षा दुसरं चांगलं निमित्त कोणतं ? डोळा मारा दिवा घ्या

>>>

अरेरे तुम्ही फार निराशा करता बुवा.

फॉर द रेकॉर्ड -
मला हे बजेट आणि रेल्वे बजेट दोन्ही वाईट वाटत नाहीत. ते बिजेपीचे आहेत म्हणून नाही, तर ते देशाचे बजेट आहे म्हणून. अर्थात तुम्हाला ते कुठे कळणार म्हणा. तुमच्या लेखी मी फक्त बीजेपी समर्थक.

राहिली गोष्ट मी बजेट बाफ लिहित का नाही? तर विरोधी मत प्रदर्शित करणार्‍यांपकी एक मयेकर सोडले तर बाकी सर्व बजेटच्या बाबतीत (तुमच्या सहीत) आनंद. . हा Light 1 तुमच्यासाठी Wink निदान ते चर्चा करताना योग्य मुद्दे आणतात.

नाहीतर तुम्ही आप बद्दलच्या बातमीला आपच्या बाफवर लिहिल्यावर अशी पोस्ट लिहिली नसती. इथे लिहिणार नाही तर बाफ काढून का? तो काढला असता, तर अजून काही म्हणाला असतात, दिवा देऊन.

असो इथे आलो तरी आप बद्दल चांगले आणि बिजेपीबद्दल वाईट लिहिणेच अपेक्षित आहे बहुदा.

अजिबात नाही. ते हिपोक्रेसी वगैरे ज्यांनी लिहीले त्यांनाच बोललो
त्यांच कस आहे की आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून

केजरीवाल हिपोक्रसीच्या शाळेत आहेत तर मोदि त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. आणि हे इथे सांगावं लागतंय यात तुमचा भाबडेपणा उघडा पडतोय.

मोदि घेतातच वेळोवेळी यु टर्न बट दॅट इज गिवन. पण जेंव्हा आपवाले आपण धुतल्या तांदळासारखे आहोत असं मिरवतात आणि बॅक डोअरने तसे प्रकार करतात आणि वर साळ्सुदपणे त्याचं समर्थन करतात तेंव्हा नाइलाजाने म्हणावं लागतं - "टॉक टु माय हँड..." Happy

बॅक डोअरने तसे प्रकार करतात आणि वर साळ्सुदपणे त्याचं समर्थन करतात तेंव्हा नाइलाजाने म्हणावं लागतं - "टॉक टु माय हँड..."

हेच तुमच्यावर लागू होते 370 वर काय चाळे चालू आहेत भक्तांचे ते पाहून हेच म्हणतो आम्ही

<<आपच्या निर्मिती नंतरचं हजारेंचं स्टेटमेंट विसरलात एव्हड्यात?>>

छे, मुळीच नाही. दिल्लीत केजरीवाल अके६७ झाल्यानंतरची हजारेंची स्टेटमेंट्स तुम्ही वाचली असावीत असं गृहित धरते. Happy

<<मला हे बजेट आणि रेल्वे बजेट दोन्ही वाईट वाटत नाहीत. ते बिजेपीचे आहेत म्हणून नाही, तर ते देशाचे बजेट आहे म्हणून. अर्थात तुम्हाला ते कुठे कळणार म्हणा. तुमच्या लेखी मी फक्त बीजेपी समर्थक.
राहिली गोष्ट मी बजेट बाफ लिहित का नाही? तर विरोधी मत प्रदर्शित करणार्‍यांपकी एक मयेकर सोडले तर बाकी सर्व बजेटच्या बाबतीत (तुमच्या सहीत) आनंद. .>>

असू द्या की आनंद आमचा. त्याने काय फरक पडतो? प्रत्येकजण अर्थशास्त्राचा विद्यार्थी थोडीच असतो? हे म्हणजे डॉक्टरने इतरेजनांना वेडावून दाखवण्यासारखं आहे. पेशंटची शंका कितीही यडपट असली तरी तिचं सोप्प्या शब्दांत निरसन करू शकतो तोच खरा डागदर. बाकीचे क्वॅक्स Wink
असो. बजेटच्या धाग्यावर तुम्ही लिहा अशी विनंती. आमच्यासारखे विरोधक चूका काढणारच. ते मनावर न घेता तुम्ही चांगल्या बाबी समजावून सांगा.
अर्थशास्त्र न कळणारे आमच्यासारखे सामान्य लोक हाच विचार करणार की आपल्याला टॅक्स किती भरावा लागतोय? महिन्याच्या अर्थसंकल्पात जमा वाढली की खर्च? कॉर्पोरेट्सचा टॅक्स कमी केल्याने ६२ हजार कोटी नुकसान होणार म्हणे, मग मध्यमवर्गानेच काय पाप केलंय?

Budget.jpg

बरं, हा माझाच गोंधळ आहे असं नाही तर आरके लक्ष्मणांचाही होता. Happy

<<असो इथे आलो तरी आप बद्दल चांगले आणि बिजेपीबद्दल वाईट लिहिणेच अपेक्षित आहे बहुदा.>>

अजिबात नाही. तुम्ही आपबद्दल बिनधास्त वाईट लिहा. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी लिहीत राहीन. पटली तर घ्या, नाहीतर सोडून द्या. हाकानाका.

राज, केजरीवालांनी काय हिपोक्रेसी केली ओ? मुद्दे सांगायचे १,२,३......

कबीर, ठंड राख्खो.

>>राज, केजरीवालांनी काय हिपोक्रेसी केली ओ? मुद्दे सांगायचे १,२,३......<<
बरं:

१. हजारे आणि अर्थात त्यांच्या सहकार्‍यांची सुरुवातीपासुन भुमिका होती - राजकिय पक्ष स्थापन न करता बाहेरुन सरकारवर दबाव टाकायचा; अँड केजरीवाल साइन्ड अप फॉर दॅट. पुढे अर्थात आप स्थापुन त्यांनी कोलांटी उडी मारलीच...
२. दिल्लीत सरकार उभारणीत काँग्रेसचा पाठींबा घेणार नाहि अशी विश्वामित्री प्रतिज्ञा केली परंतु मेनकारुपी सत्ता हातची निसटत आहे हे जाणवताच वनास्टँ करुन काँगेसवर केलेले भ्रष्टाचारांचे आरोप/चॉकशा बासनात गुंडाळल्या...

आता तुम्ही म्हणाल ४९ दिवसच होतो हो सत्तेत, तर हे वारंवार सांगुन चिडीचा डाव खेळु नका.... Happy

कबीर, ठंड राख्खो.>>> मिर्ची, त्यांना मॅच्युअर प्रतिसाद देता येत नाहित तोपर्यंत हाताची घडी तोंडावर बोट ठेवायला सांग. "तोंडात बसली", "चिखलात बरबटले" वगैरे प्रतिसाद देत बसतात. कुठेतरी वाचलं होतं की ते अँग्री यंग मॅन आहेत तरुण सळसळतं रक्त. पण एवढेही लहान नसावेत ना की शाळेतल्यासारखं "तू माझी पेन्सिलची टोक मोडली म्हणून मी तुझं पेन मोडून टाकणार" सारखी निमित्त काढत काहीतरी लिहित बसायचं. परस्पर विरोधी प्रतिसाद वाचायला पण मजा येते पण मधेच पोरकटपणा सुरु झाला की रसभंग होतो. व्यवस्थित लिहिण्यासाठी मयेकरांची आणि अभ्यासपुर्ण लिहिण्यासाठी अल्पनाची शिकवणी लावा म्हणावं. निदान तसले वाक्प्रयोग तरी टाळा.

Hand सोडा मुद्द्यावर बोलून दाखवा
सत्तेसाठी इतकी लाचारी? अरे रे ते ही प्रचंड बहूमत असणार्या पक्षाची वाईट वाटते फार Wink

राज सारखे तर लिहीले नाही ना
ते खटकले नाही? धुतलेल्या तांदळासारखे याच्या विरूद्ध चिखलात बरबटले असा प्रयोग होता

Pages