अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'आप'च्या निमंत्रकपदाचा राजीनामा । पक्षांतर्गत कलहाला कंटाळून सोडले पद ।

Sad

"केजरीवाल यांचा राजीनामा"

काय म्हणावं ह्या पेपरवाल्यांना Uhoh
कशाचा राजीनामा दिला ते लिहा की बाबांनो मथळ्यातच. येवढं बहुमत मिळूनही हा बाबा महिन्याभरातच मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा पळून गेला की काय असं वाटून नाजूक हृदयाचे आपसमर्थक चक्कर येऊन पडतील ! Lol

नाजूक हृदयाचे आपसमर्थक चक्कर येऊन पडतील > त्यांचे माहीत नाही पण गेंड्याच्या कातडीचे नमोभक्त मात्र आनंदोत्सव नक्कीच साजरा करतील Rofl

हो! मिर्ची, एकदम बरोबर. मीडीया नालायकच आहे. मी तर आधीपासून म्हणतेय की असं काही घडतंच नाहिये. ही सगळीच मीडीयाची साजिश आहे. केजरीवाल आणि इतर आप मेंबर्स गुण्यागोविंदानं नांदतात ते बघवत नाहिये. आता बघा, महाराष्ट्रामध्ये बीफ बॅन केलं या म्ह्तवाच्या बातमीवरून लक्ष हटवण्यासाठी मीडीया या बातम्या देतंय. पण तुम्ही बातम्या वाचताच कशालआ? काय व्हीडीओ वगैरे बघता त्याचंच काय ते सांगा. तितकाच आम्हाला पण दिलासा.

नालायक मीडीयावाले हो. आपच्या वाईटावर टपलेत. तुम्ही त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

<हो! मिर्ची, एकदम बरोबर. मीडीया नालायकच आहे. >>

तुमच्या तिरकस वाक्याशी मी सरळपणे १०००००% सहमत. Happy (बहुतेक पहिल्यांदाच)

http://timesofindia.indiatimes.com/India/AAP-meet-Kejriwal-quits/liveblo...

Apart from not being in the PAC Yogendra Yadav will also not be the party spokesman anymore, PTI says.

आणि मिर्ची, तुम्ही म्हणालात कोणी इन्फरमेशन लिक केली? तर लिखित स्वरूपात टिओआय म्हणते की According to PTI, Yadav came under attack in the meeting for allegedly leaking information to a reporter which was later used in a column.

(अर्थात लिखित आहे हे सर्व. व्हिडीओ नाही माझ्याकडे, तुम्ही विश्वास ठेवत नाहीत हे माहित आहे, पण इतरांसाठी लिहिलेच.)

कोणाला तो जुना मराठी चित्रपट आठवतोय का? ज्यात मुख्यमंत्री अचानक हेल्थ रजेवर जातात, आणि सगळी उलथापालथ घडवतात. निळू फुले आणि अरूण सरनाईक आहेत त्यात. मला काल हा चित्रपट आठवला. अकेंनी रजेवर जाऊनही जे घडवायचे होते ते घडवून आणले. हळू हळू अके "साहेब" हे वन मॅन आर्मी झाले. ते ह्या दोघांना पटले नाही म्हणूनच त्यांना काढले.

बॅड फॉर आप !! आणि काईंडा एक्सपेक्टेड !

केदार, तो सिंहासन सिनेमा. त्यात मुख्यमंत्र्यांना हृत्पीडा झाल्याने सक्तीच्या रजेवर जावं लागतं.
आ.न.,
-गा.पै.

<<आणि मिर्ची, तुम्ही म्हणालात कोणी इन्फरमेशन लिक केली? तर लिखित स्वरूपात टिओआय म्हणते की>>

आवो केदारभौ, लिखित स्वरूपामंदी टिओआय लई काई बाई म्हणतंय आन मंग नंतर माफीबी मागतंय. ह्यो बगा ताजा ताजा नमुना.

B_OuDvjWwAAAVfZ.jpg

आधी खोटी-नाटी विधानं करून नंतर खोपच्यात कुठेतरी असलं स्पष्टीकरण दिलं की काम संपलं ह्यांचं?? तोपर्यंत गाव जळून खाक होतं त्याचं काय? ह्यांना काय शिक्षा करायची?

प्रशांत भूषणही PAC मध्ये नाहीत.

तर मिर्ची तुम्हाला ह्या घडामोडी बद्दल काय वाटते? प्रचारकी उत्तर देऊ नका. (माझ्याकडून पार्टी तशीही कन्फर्म आहे. Happy )

मिर्चीबाईंनी मिडियाला गार करून टाकलं.
Wink

मिर्ची, अके आणि आपबद्दल खास काही वाटत नाही पण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.

अकेंचा राजीनामा नामंजूर केला हे तर त्याहून आवडलेलं नाही. अकेंना हटवून तिथे तिसर्‍याच कोणाला तरी संयोजक बनवायला हवं होतं (तिसर्‍या म्हणजे ह्या सगळ्या गोंधळात नाव न आलेल्या), पूर्ण पीएसी रद्द करून नवीन बनवायला हवी होती.

साती, तुमाखमै Happy

योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या दोघांना PAC मधून वगळण्याच्या निर्णयाचं वाईट वाटलं. पण त्यावर योगेंद्र यादवांनी एनडीटीव्हीला दिलेली प्रतिक्रिया खूपच संयत आणि आशादायक आहे. ("ना छोडेंगे, ना तोडेंगे; सुधरेंगे, सुधारेंगे")

दुसरीकडे, प्रचलित राजकीय व्यवस्थेमधलं हे अपरिहार्य वळण आहे. दिल्लीत रिझल्टस दाखवून मग विस्तार करावा, की आता त्या विस्ताराची तयारी सुरु करावी यावर नक्कीच मतमतांतरं असू शकतात / असावीत. आजतरी पहिल्या मताच्या लोकांची सरशी झाली आहे. यादव/भूषण यांच्या तुलनेत ती 'यंग ब्रिगेड' आहे. दिल्लीच्या निवडणुकीत रस्त्यावरच्या लढाईत त्यांचा जोश कामी आला. 'व्हॉट वर्क्स ऑन द ग्राउंड, हे आम्हांला माहितीय' असं त्यांना नक्कीच वाटू शकतं. ती धग जिवंत ठेवणं, ही अरविंद केजरीवालांची अपरिहार्यताही असू शकते.

व्यक्तीकेंद्रित राजकारणाच्या दिवसांतही, व्यक्तींपलिकडे जाऊन मुद्दे पाहण्याची तयारी 'आप'मधले काहीजण ठेवताना दिसतंय, राजकारण दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. यादव आणि भूषण संयम ठेवतील अशी अपेक्षा.

मिर्ची , लगे रहो. हम तुम्हारे साथ है.

बाकी नंदिनी ताईंना मिर्ची फारच जोरात झोंबलेली दिसतेय. काहीतरी गोड / गार खा बघू.

प्र.भु. आणि यो.या. यांना पीएसी मधुन काडुन टाकलं ते हि अ.के. मिटिंगला उपस्थित नसताना, ये एक बडी साजीश हो सकती है. अ.के. प्लेइंग हिज कार्डस वायजली टु कीप अ‍ॅब्सोलुट कंट्रोल ऑन पार्टी अफेअर्स.

अ.के. अँड कंपनी हाउस ऑफ कार्डस बघत असावेत अशी मला दाट शंका येतेय... Happy

कौवा, आख्ख्या प्रतिसादाला अनुमोदन.

मला स्वतःला केजरीवालचा राजिनामा मंजूर झालेला आवडलं असतं. नविन PAC व्हायला हवी होती.

मी स्वतः योगेंद्र यादवांची फॅन आहे. त्यांची आजची प्रतिक्रिया आवडली.

मी स्वतः योगेंद्र यादवांची फॅन आहे. त्यांची आजची प्रतिक्रिया आवडली>>+१. मागेही हेच लिहिलं होतं आपचा फेस केजरीवाल असला तरी ब्रेन यादव आहे. केजरीवालपेक्षा यादव जास्त सेन्सिबल आहेत त्यामुळे मी यादवांकडून जास्त अपेक्षा ठेवते.

डेलिया, धन्यवाद. हल्ली कोण कुणाची इतकी काळजी घेतंय. आता तुम्ही म्हटलात तर मी फिरनी करून खाते.

मला स्वतःला केजरीवालचा राजिनामा मंजूर झालेला आवडलं असतं >>>

अल्पना? अजूनही ?

अरे दोन वेळा ते नाटक झाल आहे की. त्यावरूनच तर गोंधळ झाला आहे ना? अ के हे आपच्या सिंहासनाचा अरूण सरनाईक आहेत. हाऊ डिफिकल्ट इज टू गेट दॅट? . (मिर्चीचे समजू शकतो एकवेळ.)

नॉट दॅट की त्यांनी तसे राहू नये, पण मग आप मध्ये अन इतर पार्ट्यात फरक काय?

अजूनही योगेंद्र यादव आणि भूषणांना का काढले ह्याची खरी कारणं यायची आहे. कोणी लोकशाही तत्त्वाने जर प्रश्न विचारत असेल तर त्याला PAC मधून काढले, हे फारच तकलादू कारण आहे असे नाही का वाटत? पाणी अजून मुरत आहे,खरी कारणं काही दिवसात मिडीया बाहेर काढेलच म्हणा.

जर त्यांनी राजीनामा दिला असता तर यादवांना महाराष्ट्रात पाठवणार होते आणि भूषणांना लिगल हेड अशी ऑफर होती, , अशी अपेक्षा म्हणजे पण फारच ! यादवांनी ती ऑफर स्विकारली नाही ह्यात त्यांचे तत्त्व दिवसात.

मयंक गांधी म्हणत आहेत की "प्र भू आणि योया हे दोघे कार्यकारिणीमध्ये असतील तर मला संयोजक म्हणून काम करणं शक्य नाही, मी राजीनामा देतो" असा केजरीवालांचा स्टॅण्ड होता.
मयंक गांधींनी ब्लॉग लिहून हे सगळं सांगितलं हे मला आवडलं. लोकपालच्या मिटींग्ज चालू असतानाही व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे असं मत असणार्‍या लोकांना पारदर्शकता दाखवावीच लागणार. नो ऑप्शन.
मयंक गांधींवर शिस्तभंगाची कारवाई होईल का?

आता प्र भू आणि योया ह्यांनी नेमकं असं काय केलंय हेसुद्धा पक्षामार्फत अधिकृतपणे कळवलं जायला हवं. निर्णय मोठा होता. ८ तास मिटींग चालू होती. मतदान झालं, त्यात प्र भू आणि योयांनाही मत द्यायचा हक्क वापरता आला. गुड थिंग. ११ विरोधात असतील तरी ८ मतं अजूनही त्या दोघांच्या बाजूने आहेत हेही दिलासा देणारं आहे. पण नेमकं काय घडलं होतं?

उघड आहे!
केजरीवालना एकाधिकारशाही हवी होती स्वत:ची!
यादव आणि भूषण हा विरोधी सूर होता तो खपला नाही!

"पार्टी विथ अ डिफरन्स"वाल्यांनी " पण मग आप मध्ये अन इतर पार्ट्यात फरक काय?" हे असले प्रश्न विचारत इतरांना कस्सं पकडलं लब्बाड! असल्यास्टाईल पोस्टी अन धागे टाकायचे, व वरतून आम्ही बै तटस्थ असे म्हणायचे, हे 'पथेटिक' या क्याटेगरीत मोडते का?

केदार, मी तेच म्हणतेय की मला एके चा राजिनामा मंजूर झालेला आवडलं असतं. पण तसं झालेलं नाहीये. जे होतंय किंवा झालंय ते योग्य नाहीये असं माझं मत.
माझ्या ओळखीमध्ये यो या मूळे या पक्षात आलेले बरेच कार्यकर्ते आणि नेतेसुद्धा आहेत. पण जनरल पॉप्युलेशन मध्ये इथे किमान दिल्लीत तरी एके हाच आपचा फेस आहे. मलाही सध्या एके आपल्या हातात पार्टीचा कारभार एकवटून घ्यायच्या प्रयत्नात आहे असं वाटतंय खरं. (खरी सिच्युएशन योगेंद्र यादवांशी बोलल्यावर कळेलच.)

तसंही जे होईल ते पहाण्याशिवाय सध्यातरी काहीच हातात नाहीये कुणाच्याही. दिल्लीचा कारभार अजूनतरी व्यवस्थित चालुये.

<<आम्हिसुद्धा उत्सुक आहोत, कळवा लवकर...>>

काय आणि कसं कळवणार. कुणीच काही बोलायला तयार नाहीये. Sad

दिलीप पांडेंनी लिहिलेल्या पत्रातील आरोप गंभीर आहेत.
"दिल्लीत आप हरावी म्हणून प्र भू आणि योया प्रयत्न करत होते. बीजेपीला जिंकवायचं, मग अके LOP बनले की त्यांना 'एक व्यक्ती, एक पद' ह्या कारणावरून आणि त्यांचं नेतृत्व फेल गेलं ह्या कारणावरून संयोजक पदावरून हटवता येईल असे प्रयत्न चालू होते. ह्या तिघांनीच अवामला पाठिंबा देऊन मजबूत केलं." असे आरोप आहेत.

"Soon the trio facilitated the formation of an anti party forum called AVAM. There is substantial proof to show that Shanti ji and Prashant gave legal and all other kinds of assistance to AVAM to carry out activities against the AAP. Regular meetings between AVAM members and the trio were held at Bhushans' residence. When party members like Khetan pleaded with the Bhushans' to stop supporting AVAM, they were told by Prashant that for him AVAM was like a trade union within the party and he saw nothing wrong in aiding and assisting AVAM. He publicly embarrassed everyone while being accountable to no one in the party or outside. Prashant & Shanti Bhushan supported anti-party elements like AVAM. AVAM is the group that did everything to demolish and defame the party. Besides the Bhushans' the other big force behind AVAM was the BJP."

आपचे नेते त्यांच्याकडे पुरावे आहेत असं म्हणत आहेत. त्यांनी ते पुरावे पब्लिक डोमेनमध्ये टाकावेत हे योग्य ठरेल. असं न करण्यामागे प्र भू आणि योया ह्यांच्या प्रतिमेला धक्का लागू नये हा हेतू आहे असं सध्यातरी वाटतंय.

दुसरा सोप्पा मार्ग म्हणजे ह्याच दोघांनी डिमांड करावं की तुम्ही आमच्यावर केलेले आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा. पण दोघंही हे बोलत नाहीयेत. खरंच पाणी मुरतंय का?

वरच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर पक्षाचा निर्णय कितीही कठोर आणि कटु असला तरी योग्य आहे.
"कार्यकर्ता हेच आपची शक्ती आहेत. लोकांनी नोकर्‍या सोडून आपसाठी काम केलंय" असं एकीकडे मुलाखतींमध्ये म्हणणं आणि दुसरीकडे ह्याच कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवायचे प्लॅन्स करणं हे अजिबात समर्थनीय नाही.

<<वरच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर पक्षाचा निर्णय कितीही कठोर आणि कटु असला तरी योग्य आहे.>>
----- असेल तर... नसेल तर.... या शक्यता आहेत. हे सर्व शिजवलेले असण्याची शक्यता पण आहे. शेवटी योया यान्चे महत्व कमी होणे कुणाच्या फायद्याचे आहे?

केजरीवाल यान्चे महत्वाच्या बैठकीसाठी गैर-हजर रहाणे, सुटीवर जाणे हे समजण्याच्या पलिकडे आहे. ते राजिनामा देतात, पण त्यान्चा राजिनामा स्विकारला जात नाही यात कुठेतरी पारदर्षकतेचा मोठा अभाव आहे.

केजरीवाल यान्च्या कडुन मोक्याच्या क्षणी सुटीवर जाणे किव्वा आजारी असल्याचे कारण गैरहजेरीसाठी पुढे येणे सन्शयाच्या वातावरणात भर निर्माण करते. ते खरोखरीच आजारी असतीलही पण प्रत्येक महत्वाच्या टप्प्यात आजारी.... हा निव्वळ योगायोग समजायचा का ?

सर्व खेळाची सुत्रे केजरीवाल पडद्यामागुन हलवत आहेत असे चित्र दिसते आहे. वर केदार यान्नी त्यान्ना अरुण सरनाईक असे यथार्थ सम्बोधले आहे.

केजरीवाल पद्धतशीर पणे खुप पुढे येणार्‍या इतरान्चे महत्व कमी करुन पक्षात एकछत्री अम्मल आणत आहे का?... एका ठराविक मर्यादेपुढे इतरान्ना पुढे सरकणे अशक्यप्राय असण्याची शक्यता किती? असे करणारे ते पहिले आणि शेवटचे राजकारणी नाहीत.

त्यान्च्यावर शाई हल्ला (मिर्ची यान्च्या पहिल्याच प्रतिसादात शाई टाकलेला फोटो आहे) करणार्‍या व्यक्तीवर काय कारवाई झाली? त्या प्रकरणान्चे पुढे काय झाले? का तो आप निर्मीत-प्रसिद्धी स्टन्ट होता?

<<असेल तर... नसेल तर.... या शक्यता आहेत. हे सर्व शिजवलेले असण्याची शक्यता पण आहे. शेवटी योया यान्चे महत्व कमी होणे कुणाच्या फायद्याचे आहे?>>

उदय,
नक्कीच. म्हणूनच मला वाटतं की योयांनी पुढे येऊन माझ्याविरुद्ध पुरावे द्या अशी मागणी करणं जास्त लॉजिकल आणि गरजेचं आहे. योया यांचं महत्व कमी होणं आपच्या फायद्याचं नक्कीच नाही. पण त्यांनी जे केलं (असं आपचे नेते म्हणत आहेत) त्यामध्ये आपचं नुकसान जास्त आहे. विचार करून बघा, आप जर दिल्लीत हरली असती तर आज पूर्ण पक्षाची अवस्था किती वाईट झाली असती. अर्थात शिव्या खायला आणि माफी मागायला पुन्हा केजरीवालांनाच पुढे करण्यात आलं असतं ही गोष्ट वेगळी.

लोकसभा निवडणूकीत फक्त दिल्ली, पंजाब, हरयाणा इथेच उमेदवार उभे करूया असं अकेंचं मत होतं. पण योया आणि इतर पीएसी सदस्यांनी पूर्ण देशभर निवडणूक लढवायचं असं ठरवलं. परिणाम काय झाला तो सगळ्यांनी पाहिला आहे. नंतर स्वतःची चूक नसतानाही अकेंनीच टीका झेलली, माफी मागितली. योया किंवा प्र भू पुढे येऊन एकदाही 'हा निर्णय आमचा होता' असं बोलल्याचं आठवत नाही. निदान माझ्या पाहण्यात नाही. सिलेक्टिव रिडींग ? Wink असू शकेल. कुणी वाचलं/ऐकलं असल्यास सांगा.

केजरीवाल आत्ताच नेमके रजेवर गेले हे आधी मलाही खटकलं. पण आता असं वाटतंय की उत्तम झालं. Happy

<<त्यान्च्यावर शाई हल्ला (मिर्ची यान्च्या पहिल्याच प्रतिसादात शाई टाकलेला फोटो आहे) करणार्‍या व्यक्तीवर काय कारवाई झाली? त्या प्रकरणान्चे पुढे काय झाले? का तो आप निर्मीत-प्रसिद्धी स्टन्ट होता?>>

यु मीन टु से त्या शाई फेकणार्‍यावर आपने कारवाई करायला हवी होती?? Uhoh
म्हणणारे म्हणतच असतात की शाई, थप्पड, लाठ्या खाणं हे सगळे आपनेच केलेले स्टण्ट्स आहेत. मला तसं वाटत नाही. ज्यांना वाटतं त्यांच्याकडे ह्यासाठी काही पुरावे नाहीत.

अकेंनी एक गोष्ट मात्र नक्की करावी. त्यांनी आप पक्ष आणि दिल्ली सरकार ह्यामध्ये एक फायरवॉल उभी करावी. पक्षांतर्गत घडामोडींमुळे सरकारच्या कामावर अजिबात परिणाम व्हायला नको.

Pages